कृष्ण मोहिनी
Submitted by पुरंदरे शशांक on 31 August, 2012 - 05:01
खळखळणारा अद्भुत श्रावण
नाचत येतो ओला होऊन
रंग फुलांचे अंगी लेवून
गाणे गाई झर्याझर्यातून
हिरवा मरवा गंधित साजण
कृष्ण घनांना थोडे सारून
उन्हात वेडा रंग उधळतो
सप्तरंग देतो फिस्कारून
रेशीम कोवळ हिरवी कांती
सळसळ अंगी किती हा नवथर
रंगबिरंगी हसू ओठींचे
मनामनावर नाजुक फुंकर
असाच वेडा सुखवून जाई
कधी कळेना याचे अंतर
वसुंधरा का राधा वाटे
कृष्ण मोहिनी ही कोणावर
शब्दखुणा: