दहिहंडी झाली की, किंबहुना त्याच्याही थोडं आधी श्रावण सुरू झाला रे झाला की 'चला, आता महिन्याभराने गणपती येणार' असे वेध बहुतेक सगळ्यांनाच लागतात. यावर्षीही सगळ्यांना असे वेध लागले आहेतच.
गेली १३ वर्षे, गणेशाच्या आशीर्वादामुळे दर वर्षी घरचा गणपती घरी करू शकलो. ह्यावर्षी अजून मूर्तिकाम सुरू केलं नाहिये, पण ते सुरू केलं की शक्य झाल्यास 'स्टेप बाय स्टेप फोटो' आणि मला माहिती आहे तितकी माहिती इथे देण्याचा मानस आहे. तोपर्यंत हे फोटो देतो आहे.
-गणपती बाप्पा मोरया!
१) गणपतीची मूर्ती घरी करावी ही प्रेरणा ज्यांच्यामुळे मला झाली त्या श्री. उमेश नारकर (सातारा) यांनी केलेली
अतिशय देखणी 'पेशवाई थाटातली' गणेशमूर्ती (मला अजून ह्यांच्याइतकी सुंदर मूर्ती करता नाही येत)
From sahaj
२-१) मी सुरुवातीला केलेल्या मूर्तींपैकी एक
From sahaj
२-२) मी सुरुवातीला केलेल्या मूर्तींपैकी एक
From sahaj
२-३) मी सुरुवातीला केलेल्या मूर्तींपैकी एक
From sahaj
३-१) सारसबागेतल्या गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून केलेली उजव्या सोंडेची गणेशमूर्ती
From sahaj
३-२) उजव्या सोंडेचा गणपती (बाजूने काढलेला फोटो)
From sahaj
३-३) उजव्या सोंडेचा गणपती (बाजूने काढलेला फोटो)
From sahaj
४-१) रदं च वरदं हस्ते
From sahaj
४-२) जपानातले बाप्पा
From sahaj
४-३) जपानातले बाप्पा (बासरी वाजवताना)
From sahaj
From sahaj
४-४) बासरी वाजवणारे बाप्पा- बाजूने
From sahaj
४-५) बासरी वाजवणारे बाप्पा- बाजूने
From sahaj
५-१) रिद्धि-सिद्धिसहगणेश- मूळ
From sahaj
५-२) रिद्धि-सिद्धिसहगणेश- रंगीत
From sahaj
बाप्पा मोरया !
जय गणेश! केवळ अप्रतिम !!!
जय गणेश!
केवळ अप्रतिम !!!
अश्विनी ++१
फार छान रे चैतन्य! कलाकार
फार छान रे चैतन्य!
कलाकार माणूस आहेस अगदी!
अप्रतीम!! बासरीवाली मुर्ती
अप्रतीम!! बासरीवाली मुर्ती सगळ्यात जास्त आवड्ली
>>कलाकार माणूस आहेस
>>कलाकार माणूस आहेस अगदी!
+१
मस्तच मूर्ती.
सुरेखच. एका माणसात किती कला
सुरेखच.
एका माणसात किती कला असाव्यत!
सुरेख आहेत मूर्ती!
सुरेख आहेत मूर्ती!
फार अप्रतिम!!
फार अप्रतिम!!
सुंदर! नारकरांनी घडवलेली
सुंदर! नारकरांनी घडवलेली पेशवाई थाटातली गणेशमूर्ती देखणी आहे. तुमच्या मूर्त्यांमधे येत गेलेली सफाई जाणवते.
बासरीवाजवणारे बाप्पा फार गोजिरवाणे!
मस्त !
मस्त !
अप्रतिम !!!!
अप्रतिम !!!!
बाप्पा मोरया.
बाप्पा मोरया.
अप्रतिम...
अप्रतिम...
पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल
पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
गणपती बाप्पा मोरया!
खुप सुंदर आहेत सगळ्या
खुप सुंदर आहेत सगळ्या मूर्त्या!!! स्व:हस्ते घडवलेल्या असल्याने त्यांचे महत्त्व वादातीतच!
सुंदर! अति सुंदर!!
सुंदर! अति सुंदर!!
आणि ही श्रींची
आणि ही श्रींची आरती.
दुर्वांकुर अन् शमीची पत्रे,तुज आवडती गणराया
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्ठोत्तम तो मोरयाSS
.......गणपती बाप्पा मोरया,मंगल मुर्ती मोरया ३
दु:ख जनांचे घेउनी उदरी लंब झाले रे उदर तुझे
कसा वाहतो भार तुझा आश्चर्य जगी हे मुषक असे
शक्ती असावी मुषकापरी ,भक्ती असावी मुषकापरी
वाटते मजला गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्टोत्तम तो मोरयाSS
.......गणपती....
गवत पत्री फुल तुज आवडे निसर्गाशी प्रेम दिसे
मूषक मयूर तुज साथी असती दीन करूणा ह्रदयी वसे
दीन सेवेचा धडा शिकावा,जन सेवेचा धडा शिकावा
तुज पासून श्री गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्ठोत्तम तो मोरयाSS
.......गणपती....
रामायण सांगती वाल्मिकी लेखपाल श्री तू होशी
बटूक वेश तू धरूनी रावणे शिवलिंग घेऊनी येशी
मातृ पितृ भक्ती शिकावी,मातृ पितृ भक्ती शिकावी
तुज पासून श्री गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्ठोत्तम तो मोरयाSS
.......गणपती....
अनंत भक्त जे तुज भजती ते का असती संकटी रे
अनंत मी ह्रदयातून नमीतो दे मजला तू सद्गती रे
पापी आम्ही क्षमाशील तू,पापी आम्ही क्षमाशील तू
शरणची तुझला गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्टोत्तम तो मोरयाSS
.......गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया...
विभाग्रज
(अनंत केशव शिंदे.)
व्वाहवा...छान जमलय की.......!
व्वाहवा...छान जमलय की.......!
अहाहा !!
अहाहा !!
Pages