Submitted by Adm on 2 August, 2012 - 04:37
"तुम गुजराथी बडे क्यूट होते हो, पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्युं होता है? ढोकला, थेपला, फाफडा, हंडवा, ऐसा लगता है कोई मिसाईल्स है !"
पण प्रत्यक्षात मात्र काही मिसाईल वगैरे नसतं! तर हा धागा गोडसर, गुळचट, तुपाळ गुजराथी पदार्थ आवडणार्यांसाठी आणि आवडते पदार्थ (आणि ते कसे (खायला) आवडतात), ते मिळण्याची ठिकाणं आणि रेसिप्यांच्या लिंका ह्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी..
त.टी. १ : चमचमित, तिखट पदार्थ आवडणारे इथे तु.क. टाकायला, दात विचकवायला आले तर त्यांचे गोड, गुळचट, तुपाळ स्वागत करण्यात येईल.. !
त. टी. २ : बाकीच्या फ्यॅन क्लबांप्रमाणेच जर रेसिपी द्यायची असेल तर आशापाकृ मध्ये रेसिपी लिहून तिची लिंक इथे द्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टिपटॉप मधे निरनिराळे सरबतांचे
टिपटॉप मधे निरनिराळे सरबतांचे प्रकार देऊन स्वागत करायची आयडीआ पण छान आहे.
सुकांतामध्ये दणादण वाढतात
सुकांतामध्ये दणादण वाढतात याच्याशी सहमत. त्यामुळे एकाही पदार्थाचा 'आस्वाद' घेता येत नाही. मी तीनेक वर्षांपूर्वी , एकदाच गेलीये म्हणून जास्त काही माहीत नाही पण तेंव्हा पोट बिघडलं नव्हतं.;)
रसपात्रा कृती अन फोटो :
रसपात्रा कृती अन फोटो : http://www.maayboli.com/node/36932
स्वाती & अनु, माबोवर आलेच
स्वाती & अनु, माबोवर आलेच नव्हते इतक्यात म्हणुन तुमच्या दोघींच्या पोस्टस आता पाहिल्या. अगं पुण्यात चांगली गुजराथी थाळीबद्दल तुम्ही दोघींनी विचारलंत आणि तेही तुम्ही दोघी कॅम्पच्या आसपासच्या असुन?
इस्ट स्ट्रीटवरचं 'मयुर' थाली विसरलात का? मी स्वतः तिथे खाल्लं नाहीए, पण मयुर थालीमधे गेलेल्या प्रत्येक माणसाकडुन प्रचंड कौतुकच ऐकलं आहे. मी थाली ( श्रेयस, सुकांता, दुर्वांकुर इ इ )ठिकाणी जेवुच शकत नाही. फार अन्न पाहिलं की मला नॉशिया येतो. पण तरीही मयुर थालीचं खुप कौतुक ऐकलं आणि आपलाच एरिया आहे म्हणुन ते रेकमेंड करेन. आता तुम्ही ट्राय करुन मला कळवा. मयुरची अजुनही एक ब्रांच आहे म्हणे. कुठे ते माहित नाही.
मयुर चिंचवडलाही आहे एक तीच का
मयुर चिंचवडलाही आहे एक
तीच का त्यांची ब्रांच?
पण तिथलं जेवणही अप्रतिम असतं
दिल खुष होऊन जातो एकदम
जे.एम रोडला आहे अजून एक मयूर
जे.एम रोडला आहे अजून एक मयूर पण ती थाळी गुजराती नव्हती.
आहाहाहा... मी गुजराती फूड ची
आहाहाहा... मी गुजराती फूड ची बिग बिग फॅन !!
उंधीयो सगळ्यात जास्त फेवरेट. आठवणीने पण तोंपासू. अहमदाबाद ला असताना अगणित वेळा घरचा उंधीयो खाल्लाय डब्यात. :).. सगळ्याच भाज्या, लोणची, मुठीया, फाफडा, थेपले, आणी वर सर्वांनी लिहीलेलं सगळंच अतिशय आवडतं.
बंगळुरुत आमचा कुक एका अस्सल
बंगळुरुत आमचा कुक एका अस्सल गुजराती फॅमिलीकडे पण होता कामाला. त्याला मी खूपदा सांगायचे की त्यांच्याकडे जश्या करतो तश्या कर भाज्या...मला मजा यायची खूप ते खाऊन. :).. बटाट्याची भाजी तर चिंच, भरपूर कोथिंबीर, गूळ, भरपूर धनेपूड घातलेली दाटसर रश्श्याची अफलातून लागायची.
शारजाहला पण गिटार नावाचे
शारजाहला पण गिटार नावाचे गुजराती हॉटेल आहे.. जेवण छान मिळते पण मला त्यांची मुगडाळची खिचडी खुप आवडली..( कोणाला माहीत असेल तर सांगा गुजराती खिचडी कशी बनवतात)
धन्स मनि ह्या वीकांताला जाऊन
धन्स मनि ह्या वीकांताला जाऊन पाहते
मस्कत (ओमान) मधे जागोजाग
मस्कत (ओमान) मधे जागोजाग गुजराथी रेस्टॉरंटस होती. तिथे अगदी घरगुति पद्धतीचे जेवण मिळत असे. शिवाय आग्रह करकरुन वाढत असत. तिथे सगळ्याच भारतीय भाज्या मिळतात, त्यामूळे सर्वच प्रकार होत असत. प्यायला हवे तेवढे ताक असे. (तिथल्या उन्हाळ्यात ताक पिणे आवश्यक असते.)
मयुरी, त्या खिचडीसाठी त्यांचा
मयुरी, त्या खिचडीसाठी त्यांचा एक खास तांदूळ असतो. त्याशिवाय मजा येत नाही. बाकी कृती खास नसते. अख्खे मेथी दाणे, जिरे, लाल मिरच्या, शेंगदाणे, हिंग व हळद घालून फोडणी करतात आणि त्यात भरपूर पाणी ओततात. मग भिजवून ठेवलेले तांदूळ आणि मूग टाकतात आणि अगदी मऊसर शिजवतात. मग मीठ आणि वर तूप टाकून, कढीबरोबर खातात. मुंबईला फोर्ट मधे भट्ट यांचे साबर रेस्टॉरंट आहे, तिथे मिळते.
चिंचवडच्या मयुर मधेही गुजराथी
चिंचवडच्या मयुर मधेही गुजराथी थाळीच मिळायची छान असायची, कढी खासच. आता माहीत नाही. खुपच महाग होतं ते. मी २० वर्षां पुर्वी जेवायचो तिथे.
मस्त धागा... माझेही गुजरथी
मस्त धागा...
माझेही गुजरथी फुड प्रचंड आवडीचे. लहानपणासून बहुतेक शेजारी गुजराथी.
उंधियो प्रचंड आवडीचा पदार्थ, सुरळीच्या वड्या, खमण , शेव बुंदी, खिचडी - ताक खुपच आवडत.
धन्स दिनेशदा..पण खरेच ती
धन्स दिनेशदा..पण खरेच ती खिचडी अगदी मऊ असते ( चावायचे कामच नाही ) मला टेस्ट आवडली पण.. आणि खरेच इकडे पण आग्रह करुन वाढतात
चिंचवडच्या मयुर मधेही गुजराथी
चिंचवडच्या मयुर मधेही गुजराथी थाळीच मिळायची छान असायची, कढी खासच. आता माहीत नाही>>
आताही मिळते थाळी.
जे जे तिथे जेवलेत त्यानी खुप छान आहे असाच अभिप्राय दिलाय.
आता रेट बहुतेक १८० पर हेड असेल.
मी अजुन नाही गेलो तिथे जेवायला.
झकासराव, मी या बाफवर लिहिलं
झकासराव, मी या बाफवर लिहिलं म्हणुन चौकशी केली नुकतीच. मयुर थाली - इस्ट स्ट्रीट, कॅम्प - ३००रुपये + स्वीट डीशचे वेगळे. चिंचवडला निम्मा दर नसेल. जास्तच असावेत १८० पेक्षा.
मयुर चिंचवड २७५ बहुदा..
मयुर चिंचवड २७५ बहुदा.. कलासागरची चांगली आहे १८०/-
आपल्याकडे जशी तांदळाची उकड
आपल्याकडे जशी तांदळाची उकड असते तसे गुजरात्यांचे खींचू. हे अन्य धान्यांच्या पिठाचेही करत असावेत. कधी खाल्लेले नाही. पण ज्या टीव्ही मालिकांमध्ये गुजराती कुटुंब असते आणि कुटुंबात अतिवृद्ध आजीबाई/आजोबा असतात ते हे खींचूच खातात.
भरत, हे खिचू उकडीसारखेच असते
भरत, हे खिचू उकडीसारखेच असते पण तांदूळ तीन दिवस भिजवून वगैरे करतात. याचे तयार मिक्स (सिल्होड चे) बाजारात मिळते. नैरोबीत, नवरात्रीत खिचू, तेल आणि लाल तिखट असे तिथल्या देवळात मिळायचे.
मयुर चा दरजा पार गेला आहे.
मयुर चा दरजा पार गेला आहे. रेट पुण्यापेक्शा जास्त आहे. ३००रु.लीमीटेड स्वीट.
मयुर तेव्हाही महाग होतं. इतर
मयुर तेव्हाही महाग होतं. इतर ठिकाणी ८,१० रु असले तर तिथे ३२ रु रेट होता.
गुजराथी नाही पण तिकडचाच(बहुतेक राजस्थानी) गोटा नावाचा भज्यांचा प्रकार पण छान लागतो. त्याचं तयार पिठपण मिळतं, डाकोर गोटा असं.
रेट पुण्यापेक्शा जास्त आहे.
रेट पुण्यापेक्शा जास्त आहे. ३००रु.लीमीटेड स्वीट.>> ३०० जरा जास्तच आहेत की..
गुजराथी लोकांची एक खासियत
गुजराथी लोकांची एक खासियत म्हणजे जगात कुठेही गेले तरी आपले खाणे सोडत नाहीत. त्यांच्या या आग्रहामूळेच जगात जिथे जिथे गुजराथी आहेत, तिथे तिथे त्यांचे खाणे सहज मिळते.
केनयामधला कसावा पापड, हा तर त्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्तम नमूना आहे.
ठाण्याचे टिपटॉप अजूनही मस्तच
ठाण्याचे टिपटॉप अजूनही मस्तच आहे पण ते जेंव्हा अशोक टॉकीजच्या समोर होते तेंव्हा अप्रतिम चव असायची त्याच्या जेवणाची.
पुण्याला आप्पा बळवंत चौकात 'शाल्मली' होते. त्याची थाळी अप्रतिम असायची.
आपल्या फेण्या गुजरातमध्ये (खरं तर सौराष्ट्रात) खिचीया होतात. आणि त्याचा शिजवलेला चिक म्हणजे खिचू. मित्राच्या डब्यात खिचीया खूप वेळा खाल्ल्या आहेत पण खिचू नाही खाल्ला कधी.
http://www.loksatta.com/index
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=243...
वरच्या लिन्कवर एक मस्त लेख आहे.
काहि अस्सल गुजराती पदार्थांविषयी लिहिलय...
हा लेख वाचताना मला हा धागा आठवला होताच...
झकासराव खरच मस्त लेख आहे,
झकासराव खरच मस्त लेख आहे, धंन्यवाद
गुजराती हांडवो मधे दुधी किसुन
गुजराती हांडवो मधे दुधी किसुन घालतात असे ऐकीवात आहे. काही कल्पना?
बरोबर आहे.
बरोबर आहे.
माझ्या गुजराथी कलीगने आणलेला
माझ्या गुजराथी कलीगने आणलेला पदर्थ.
त्याच नाव विसरले पण लेफ्ट ओव्हर खाकरे आणि भाजलेले पापड (४/१ प्रमाणत) बारीक चुरा करुन घ्यायचेत. कढाइत अगदी थोड तुप गालुन हिंग जीरे घालुन वरचा चुरा घालुन कुरकुरीत होईपर्यंत परतणे वरुन चाट मसाला / लाल तिखट / जिरालू आपल्याला हव तस. मस्त लागत.
Pages