गुजराथी फूड फॅन क्लब

Submitted by Adm on 2 August, 2012 - 04:37

"तुम गुजराथी बडे क्यूट होते हो, पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्युं होता है? ढोकला, थेपला, फाफडा, हंडवा, ऐसा लगता है कोई मिसाईल्स है !"

पण प्रत्यक्षात मात्र काही मिसाईल वगैरे नसतं! तर हा धागा गोडसर, गुळचट, तुपाळ गुजराथी पदार्थ आवडणार्‍यांसाठी आणि आवडते पदार्थ (आणि ते कसे (खायला) आवडतात), ते मिळण्याची ठिकाणं आणि रेसिप्यांच्या लिंका ह्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी..

त.टी. १ : चमचमित, तिखट पदार्थ आवडणारे इथे तु.क. टाकायला, दात विचकवायला आले तर त्यांचे गोड, गुळचट, तुपाळ स्वागत करण्यात येईल.. !
त. टी. २ : बाकीच्या फ्यॅन क्लबांप्रमाणेच जर रेसिपी द्यायची असेल तर आशापाकृ मध्ये रेसिपी लिहून तिची लिंक इथे द्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिपा भारी Happy मी अर्धी गुजरातीच. डाळढोकळी, गवारढोकळी, उंधीयो, खमण, ढोकळा (हे दोन्ही वेगळे पदार्थ आहेत, प्लिज नोट), सगळ्या गुजराती भाज्या, मूगडाळीचा शिरा, ..... कित्ती मोठी यादी. माझ्या गवार ढोकळीची लिंक टाकेन नंतर . धन्यवाद अॅडमीन Happy

ऊंधियो, ढोकळा, दालढोकली, गुजराती पद्धतीची मूडाखि, पहुवा, खांडवी वगैरे मला जाम आवडतात.
खाकरा प्रकार प्रवासासाठी ठीक!
अहमदाबादेत एकदा अतिशय स्वादिष्ट अशी रताळ्याची भजी/पकोडे खाल्ले होते.
बाकी त्यांचे चिवडा, फाफडा, मूगडाळ, डाळमूठ प्रकारही मस्त असतात.

आणि त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास, फळांवर भुरभुरायचा मसाला, पाचक देखील! Wink

मला पुण्यातले सुकांताचे गुज्जू पद्धतीचे जेवण आवडते. गुजराती पद्धतीची कढी, खिचडी, पापड, कैरी नो अचार.... वाह वाह!

खाटा ढोकला, कढी. गुड स्ट्फ जनरली. वाडिलाल आइस्क्रीम.
सर्व फरसाण!

शिफ्ट झाल्याच्या रात्री नऊ वाजता हताश चेहर्‍याने सामानाच्या क्रेट्स मध्ये बसले असताना शेजार्‍यांनी एक प्लेट ढोकला व हिरवी चटणी दिली होती. तेव्हा फार छान वाटले होते.

ते आशा पाकृ आशापुरा वाटले चुकून.

गोड, गुळचट, तुपाळ >>> एकदम चुक. सौराष्ट्रामधे जेवुन बघा. राजकोट, जुनागढ, गीर, द्वारिका, भुज इथलं गुजराथी जेवण मस्त तिखट्ट असतं. गुजराथी जेवण मला अजिबात आवडत नाही, पण माझ्या प्रत्येक राजकोट ट्रीपमधे जीभ सुखावते. मस्त यम्मी जेवण असतं. गुजराथी कढी गोडमिट्ट पण सौराष्ट्रात तीच 'तिखारी' नावाने दिली कि जीभ हुळहुळते. नुसतं लसुण आणि ग्रीन चिलीजची फोडणी, पण भारी प्रकार आहे हा.

शिवाय राजकोटमधला रसिकभाई चिवडावाला, त्याच्याकडचे चिवडे असले तिखट आणि खमंग असतात. त्याच्याकडची एक प्रसिद्ध हिरवी मिरची आणि कैरीची चटणी असली जबरी तिखट आणि टेस्टी असते. जर तिकडुन पदार्थ आणण्यावर बंदी असती तर मी स्मगलिंग केलं असतं.

मंजुडी धन्यवाद Happy
अॅडमिन यांना दिलेले धन्यवाद काढुन Admयांना देण्यात आहे, तसदीबद्दल क्षमस्व Happy
आर्या ये खाऊ घालते Happy

अ‍ॅडम Happy
मला फारसे गुजराती पदार्थ माहिती नाहियेत पण फरसाण, ढोकळा, कढी, खिचडी आवडते.
आमच्या एक मेसच्या काकु होत्या कोल्हापुरच्या पण नवर्‍याच्या नोकरीमुळे २५ वर्षे तरी गुजरातला अहमदाबाद मध्ये राहिलेल्या.
त्या शेव टमाट्याची भाजी मस्त बनवायच्या.
आणि त्यानी गुजराती बनवलेल कैरीच गोड लोणच ऑस्सम... Happy

माझ्या ऑफिसमधील दोन मैत्रीणी, दोघी गुजराती, एक वैश्णव ब्राम्हण व दुसरी जैन..... त्यातील वैश्णव ब्राम्हण तर प्रोपर एकावर एक असतो तो स्टीलचा डबा घेउन यायची लंच टाईम मध्ये जेवायला.... त्यात नेहमी नवीन नवीन गुजराती प्रकार चाखायला मिळायचे, गोडुस लागणारया चविष्ट शाक (भाज्या), भरपुर तुप लावलेले लहानसे फुलके,डाल-चावल व त्यावर घरी विरजण लाउन तयार केलेले ताक..... रोज एकदम घरी जेवल्यासारखे वाटायचे..... त्यात आम्ही तिघीजणी पुर्ण शाकाहारी त्यामुळे बिनधास्तपणे एकमेकींचे डबे चाखायचो...... हा धागा बघितल्यावर ते सर्व आठवले Happy

ऊंधियो, ढोकळा, पात्रा, शेव भाजी, चुरमा लाडू, खाकरे, कोथिंबीर चटणी, फाफडा, मोहनथाळ, कढी / खिचडी.. सगळं फारफार आवडतं... आई गुजराथ बॉर्डरची असल्याने बरेच पदार्थ घरी बनतात.. थंडीच्या दिवसात उंधियो बर्‍याचदा होतं..

पुण्यात पूर्वी अशोका आणि सपना नावाच्या ठिकाणी गुज्जू थाळी खाल्ली आहे. भारी होती ! आता ती दोनही ठिकाणं बदं झाली बहूतेक. न्युजर्सीला झुपडी मध्ये अत्यंत भारी काठेवाडी थाळी होती ! त्यातले चुरम्याचे लाडू सही होते एकदम. झुपडी शिकागोत पण आहे.

अटलांटाला 'थाली' नावाच्या रेस्टॉरंटात पण चांगली असायची थाळी. फक्त तिथल्या भाज्या गंडलेल्या असायच्या जरा.

मुंबईच्या सम्राट की कुठल्यातरी गुज्जू थाळी बद्दल खूप ऐकलय.. तिथे जायचय एकदा..

अॅडमिन यांना दिलेले धन्यवाद काढुन Admयांना देण्यात आहे >>> Proud

एकदम चुक. सौराष्ट्रामधे जेवुन बघा. राजकोट, जुनागढ, गीर, द्वारिका, भुज इथलं गुजराथी जेवण मस्त तिखट्ट असतं. >>>> मनिमाऊ.. बरय मग आपण तु.क. टाकणार्‍यांना हे देऊ.. Proud
मी खाल्लं नाहीये कधी तिकडच बहूतेक Happy . पुण्यात कुठे मिळतं का?

मंजू.. तेव्हा तुरीया पात्रा वाटाणा वाचून फार भारी असेल असं वाटलं नव्हतं.. पण झुपडीला खाल्ली तेव्हा आवडली होती. पण तो पर्यंत रेसिपी जुनी झाली.. Proud

पुण्यात जं. म. रस्त्यावर शिवसागरच्या समोर एका पार्किंग लॉटात एक आजीबाई डायनिंग हॉल चालवायच्या. अफलातून गुजराती जेवण असायचं तिथलं. दोन वर्षांपूर्वी ते बंद पडलं. Sad

मला सर्व गुजराथी जेवण अतिशय आवडतं. हळद, तेल यांहा सढळ हस्ते वापर असतो. खिचडी, तोंडल्याची भाजी, भेंडीची भाजी.. एकसे एक तोंपासु

गुजराती कढी-खिचडी, तुपात लथपथलेल्या मिठाया खूप आवडतात.
खाकरा विशेष आवडत नाही. पण टिकाऊ पदार्थ म्हणून देशातून येताना भरपूर आणला जातो. त्यामुळे आवडून घ्यावा लागतो.

ढोकळा माझा जीव की प्राण आहे
मी कितीही आणि कधीही खाऊ शकते
नुसत नाव काढलं निघाला तरी माझ्या तोंडाला पाणी सुटत

पुण्यात दांडेकर ब्रिजकडून निलायम कडे जाताना (दुल्हन मेंदी) च्या रस्त्यावर चौधरी स्वीट मार्ट आहे त्याच्याकडे अत्यंत मऊ आणि लुसलुशीत असा ढोकळा मिळतो, तसा ढोकळा मी आयुष्यात खाल्लेला नाही. इतरत्र मिळतो तो आपल्याला वरवरचा ट्राय करायला देतात तो मऊ लागतो खाताना, विकत घेऊन घरी आणला की कोरडा ठक्क असतो आणि घशाला तोठरा बसतो. Sad

रुणुझुणू तु खाकर्‍यावर शेंगदाण्याची चटणी पसरून खा.. म्हणजे थोडा सुसह्य होईल.. मस्त पोट भरतं त्याने.
अ‍ॅक्चूअली काही कंपन्यांचे खाकरे अप्रतिम असतात आणि काही कंपन्यांचे अत्यंत बोर.. Sad चवच नसते त्याला काही.

मने गुजराति जमण मां 'स्नेक्स- ढोकळा , कचोरी' बहुच गमे छे !
अमारे त्या मुगदाळना ढोकळा मळे छे . अमणाच ट्राय कर्‍या. ए ढोकळो बेसनाना खमणढोकळाथी पण सरस लागे छे. अने हेल्दी पण हशें ने?
मेन जमण एटलु नथी गमतु. एमनी दाळने पण एटली गळी खुशबू आवे छे! पण गुजराती कढी बहु सरस. ए पण गळीच होय (गुजरातीमां गळ्यु एटले गोड. मीठु एटले मीठ)
चर्चगेटना सम्राटमां जमवा जता होय तो सवारथी उपास राखजो. तोच पैसा वसूल थाय.
लिलवा नी कचोरी (काचा तुअरना दाणा, सिंगमाधी काढीने खाववाना) बाबत बहु साम्हळु छे. हजीसुधी खादु नथी के जोयु नथी.
गुजरातीयों कहे छे के सुरत नु जमण अने काशी नु मरण नसीब होय तोच मळे.

हे कृष्ण भगवान! भाषांतर
मला गुजराती जेवणातले स्नेक्स (स्नॅक्सचा खास गुज्जु उच्चार) आवडतात. गुजराती थाळीतही स्ने/स्नॅक्स असतातच. ढोकळा , कचोरी फेवरिट. अलीकडेच मूगडाळीचा ढोकळा खाल्ला. तो बेसनाच्या खमण ढोकळ्यापेक्षा छान वाटला. आणि पौष्टिकही असेल का? गुजराथ्यांचे मुख्य जेवण तितकेसे आवडत नाही. त्यांच्या डाळी/वरणाला तर इतका गोडुस वास येतो. पण गुजराती कढी , हीसुद्धा गोड असते, आवडते.
चर्चगेटच्या सम्राटला (अनलिमिटेड थाली)जेवायला जायचे असेल तर सकाळपासून उपास ठेवा, तरच पैसे वसूल होतील.
लिलवा नी कचोरी (शेंगांतून काढलेल्या तुरीच्या कच्च्या दाण्यांच्या कचोरीबद्दल खूप ऐकले आहे. पण अजून खाल्ली काय पाहिलीही नाही.
काशीतले मरण आणि सूरतचे जेवण नशीब असेल तरच मिळते, म्हणे!

इतरत्र मिळतो तो आपल्याला वरवरचा ट्राय करायला देतात तो मऊ लागतो खाताना, विकत घेऊन घरी आणला की कोरडा ठक्क असतो आणि घशाला तोठरा बसतो <<<<<<<<<<

अगदी बरोबर..... त्यामुळे सध्या ढोकळा हा प्रकार नावडतीच्या हातचा पदार्थ झाला आहे Sad

हो दक्षिणा, आम्ही त्यावर शेंगदाणा चटणी, लोणचं, ईटालियन फूडसचे पास्ता ड्रेसिंग्ज असलं काहीबाही पसरवून खात असतो.

ते मिळण्याची ठिकाणं>> पत्त्यासहीत असं लिही ना.

भरतजी, आता त्या पोस्टचे भाषांतर करा प्लीज. Happy

गुजराथी जेवण माझ्या पण भयंकर आवडीचे.
पुण्यात पुर्वी सारसबागे जवळ सबरस होते. तेव्हा तिथे मस्त थाळी मिळायची.
आता पुण्यातली ठिकाणे सुचवा बरे. आणि मुंबईमधली पत्त्यासहित द्या.
इथे, अनघा ताई आहेत का? गुजरात मधली ठीकाणे सुचवायला?
आणि 'सुकांता' राजस्थानी आहे ना?

रुणुझुणू, थोडसं तुप आणी जिरालू भुरभुरवून पहा.
खरतर, पुण्यात फार जाड खाकरे मिळतात. खायचा कंटाळा येतो. इथल्या ब्रँडमध्ये 'लोटस' चे खाकरे चांगले वाटतात.
अहमदाबाद मध्ये घरगुती खाकरे मिळतात. अगदी पात्तळ असतात.

Pages