Submitted by Adm on 2 August, 2012 - 04:37
"तुम गुजराथी बडे क्यूट होते हो, पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्युं होता है? ढोकला, थेपला, फाफडा, हंडवा, ऐसा लगता है कोई मिसाईल्स है !"
पण प्रत्यक्षात मात्र काही मिसाईल वगैरे नसतं! तर हा धागा गोडसर, गुळचट, तुपाळ गुजराथी पदार्थ आवडणार्यांसाठी आणि आवडते पदार्थ (आणि ते कसे (खायला) आवडतात), ते मिळण्याची ठिकाणं आणि रेसिप्यांच्या लिंका ह्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी..
त.टी. १ : चमचमित, तिखट पदार्थ आवडणारे इथे तु.क. टाकायला, दात विचकवायला आले तर त्यांचे गोड, गुळचट, तुपाळ स्वागत करण्यात येईल.. !
त. टी. २ : बाकीच्या फ्यॅन क्लबांप्रमाणेच जर रेसिपी द्यायची असेल तर आशापाकृ मध्ये रेसिपी लिहून तिची लिंक इथे द्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुजराथमधे वाडीलाल
गुजराथमधे वाडीलाल आईस्क्रीमची ( मी १९८६ च्या सालातले लिहितोय.) खुपच चलती होती.
अगदी पानपट्टीवाल्याकडे पण या आईस्क्रीमचे किमान दोन स्वाद मिळायचे. भरपुर खाल्ले त्यावेळी.
भावनगरचा भला मोठा पेढा, एक खाल्ला कि पोट भरेल असा, पण अगदी आवडीचा. त्याकाळात मी भावनगरला वारंवार जायचो. तिथून येताना ऑफिसमधला प्रत्येकजण मला पेढे आणायला सांगायचा.
अरे नुसती नावे वाचून किती
अरे नुसती नावे वाचून किती दिवस काढायचे!पाक्रू.ची यादी करून छानश्या रेसिपीज् टाकाना आता म्हणजे मायबोलीवर एक छान गुजराथी रेसिपीज् चे कुकबुक तयार होईल!दिनेशदाच्यानवीन खूप व्हेरिएशन्स् असलेल्या शाकाहारी पाक्रू, सुलेखाची माळवी खासियत,जागूची कोकणी खासियत,अवलच्या सि.के.पी पाक्रू,अल्पनाच्या पंजाबी/पहाडी पाक्रू,विविध मसाले ई.चे........संकलन केलेतर मज्जा येईल!
कालच्या(१६ सप्टेंबर) इंडियन
कालच्या(१६ सप्टेंबर) इंडियन एक्सप्रेसमधला गुजराती जेवणावरचा लेख. (या धाग्याशी संबंध नसलेला मजकूर गाळून वाचा )
तिथे एका थाळीचं छायाचित्रही आहे. छापील आवृत्तीत पदार्थांची नावेही दिली आहेत.
इथे नाहीत, आणि इ-आवृत्ती अजून लोड झालेली नाही.
इड्डा या नवीन पदार्थाचा शोध लागला. इडलीचे मिश्रण ढोकळ्यासारखे वाफवून वरून फोडणी.
एका गुजराती कुकरी शो मध्ये हलवासन हा दूध फाडून करायचा प्रकार पाहिला.
इथे ऑथेंटिक गुजराती रेसिपी मिळाव्यात. (गुजराती जमण आवडणार्यांना गुजराती लिपी अवघड जाणार नाही)
दिनेशदा वाडीलाल
दिनेशदा वाडीलाल महाराष्ट्रातही जोरात होता बरेच वर्ष. वॉल्स आल्यावर त्याची पिछेहाट झाली, मुळचा गुजराथ मधला होता का?
मयुर चिंचवडला २७५ रु थाळी.
मयुर चिंचवडला २७५ रु थाळी. त्यात स्वीट जिलेबी होती. वेगळं स्वीट हवं असेल तर त्याचे वेगळे पैसे.
पार्सलसाठी ५० रु चार्ज एक्स्ट्रा...
हो जो, गुजराथमधलाच. त्यांची
हो जो, गुजराथमधलाच. त्यांची तिथली फॅक्टरी पण बघितल्यासारखी वाटतेय.
गुजराथी घरात, शकुनाचा म्हणून कन्सार नावाचा प्रकार करतात. कणकेचा तूपातला शिरा, असतो तो. पण तो मात्र मी बाहेर कधी खाल्ला नाहि.
Pages