कृष्णाष्टमीनिमित्त- राग वृंदावनी सारंग वाजवायचा प्रयत्न

Submitted by चैतन्य दीक्षित on 9 August, 2012 - 01:23

नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम सर्वांना श्रीकृष्णजन्माष्टमीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

आज कृष्णाष्टमीनिमित्त बासरीवर 'राग वृंदावनी सारंग' वाजवण्याचा प्रयत्न केलाय.
तुम्ही ऐकून काही सुधारणा असतील तर जरूर कळवाव्यात ही विनंती.
ही स्वर-सेवा श्रीकृष्णचरणी अर्पण!

राधे कृष्ण, राधे कृष्ण !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन चैतन्य! राग एकदम सही साकार झाला. सगळे स्वर मस्त लागले.

हा राग मला फार आवडतो. ह्या रागाचे चलन असे आहे ना:

सा, सारेम, मरे, निसा, रेमप, मपनिप, रेमपनि, पनिसा, पनिसारे, निसारेमरे, रेनिसा

आणि आरोह अवरोह असे आहे:

सा रे म प नि सा
सा नि प म नि सा

मी भर दुपारी ऐकला तेंव्हा आणखीनच आवडला.

वा ! सुरेल !
अभिनंदन चैतन्य!
अन हो धन्यवादही इतकी सुरेल सकाळ केलीस Happy
अगदी वृंदावन अनुभवलं रे ...........
पुन्हा पुन्हा ऐकतेय... अजून अजून... अशी आर्तता मनात दाटलीय....

चैतन्या - तू वाजवलेला कुठलाही राग सुंदर असणारच पण इथे ऑफिसात ऐकता येत नाहीये..... घरी गेल्यावर नक्कीच ऐकणार.....

"धणी न पुरे गुण गाता, रुप तुझे न्याहाळिता ...." हा अभंग आठवला - बहुतेक वृंदावनी सारंग मधेच बांधलेला ऐकला आहे....

सुंदर वादन. खुप आवडले.
माझाही अत्यंत आवडता राग. प्रसन्न राग.

(झननन झन झननन नन बाजे पायलिया (लता-रफि) आणि आजा भँवर सूनी डगर (लता) हि रानी रुपमति मधली दोन्ही गाणी याच रागातली !)

अतिशय सुरेख रे. आणखी ऐकायला आवडला असता. एखादा द्रुत खयाल वगैरे.. Happy
एक सुरेख गाण.. आ लौटके आजा मेरे मीत.. तुझे मेरे गीत बुलाते है..

चैतन्य, मला संगीतातलं कळंत नाही. पण धून सुश्राव्य आहे एव्हढं जाणवतं. तुमचे बाकीचे व्हिडियोपण भारी आहेत. तुम्हाला जपानी पण येतं की काय?

आ.न.,
-गा.पै.

चैतन्य प्रथम तुला श्रीकृष्णजन्माष्टमीच्या अनेकोत्तम शुभेच्छा! माझ्या देवघरातील मोठया मानाचा व आवडता देव आहे हा......त्या अनुषंगाने त्याची बासरीदेखील...... तुझी बासरी ऐकताना खुप शांत, प्रसन्न वाटले, धन्यवाद आजच्या शुभदिनी तुझे बासरीवादन ऐकायला मिळाले Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार Happy
बी, रागाच्या आरोहावरोहाबद्दल धन्यवाद Happy
दिनेशदा, तुम्ही दिलेलं 'झननन झन' गाणं ऐकलं नव्हतं आधी. मस्त आहे.
अनिलभाई, सकाळी तीनतालात एक रचना वाजवत होतो, पण मध्येच कुणी तरी बेल वाजवली त्यामुळे रेकॉर्डिंग थांबवलं Sad
योग, तुम्ही जाणकार आहात, काही सूचना असतील तर नक्की सांगा.
प्रसन्ना, अरे हरिजी कुठे, मी कुठे.. प्रयत्न चालू आहेत शक्य तितकं चांगलं वाजवायचे Happy
व्हिनस, तुमच्या घरच्या कृष्णाचा फोटो टाकू शकलात तर बघा प्लीज. कृष्णाच्या चित्रांइतकंच घरातल्या देवातला कृष्ण बघायला फार आवडतं मला Happy
गा.पै, मी जॅपनीज ट्रान्स्लेटर आहे Happy
पुन्हा एकदा सर्वांचे आभार Happy

आशा आणि रफी ह्यांच 'सावन आये, सावन जाये..' हे एक गाणे वृंदावनी सारंग मधले आहे. खूप गोड आहे हे गाणे. एकदा जरुर ऐका.

गोड, गोड, गो ऽऽ ड बासरी वाजवलीस रे चैतन्या - काल किती तरी वेळा ऐकली.......

व्हिनस - मुरलीधराचे सर्व फोटो अप्रतिम..........

व्हिनस...
काय वर्णन करू देवाचं?
दृष्ट लागेल अशी मूर्ती आहे. फारच सुरेख.
अनेक अनेक धन्यवाद, फोटो इथे दिल्याबद्दल.
पुरंदरे काका, धन्यवाद Happy

आज ऐकलं. इतके दिवस कसा काय ध्यानात नाही आलं Uhoh
अप्रतिम वाजवलय चैतन्य! हरीजींपेक्षाही पं. हळदीपुरांची आठवण आली. शांत आणि प्रसन्न. दुपारी हलकेच गार वार्याची झुळुक येते तसा आलाप पसरतोय हवेत अलगद असं वाटलं!
शुद्ध सारंग पण वाजव की रे एकदा. माझा आवडता सारंग आहे. (खरं असं फर्माईश करणं चुकीचं वाटतं पण तु आपल्या गटातला आहेस म्हणुन हिंमत केली Wink )