हिरव्या हाताची हिरवी जादू

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुणाकुणाच्या हातात जादू असते तशी माझ्या बाबांच्या हातात जादू आहे असा माझा विश्वास आहे. त्यांच्या हाताने लावलेलं कुठलंही झाड लागतं, फुलतं, बहरतं. बाबांनी आता टेरेसवर भाज्या लावल्या आहेत दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, हळद, पुदीना, अळू, घोसावळं...

तुमच्यासाठी बागेचे हे फोटो..

या फोटोत चार मोठे दूधी भोपळे आहेत ... तुम्हाला दिसताहेत का ?

Rakhi 057.JPG

कांदा - टोमॅटो. छोट्या चौकोनी भागात वांग / ढोबळी मिरचीची छोटी रोपं तयार करायची प्रक्रीया चालू आहे.

Rakhi 043.JPG

तांबड्या भोपळ्याचा वेल आणि दूसरा विभाग बनतोय त्याचं चित्र..

Rakhi 044.JPG

दुसर्‍या बाजूला फुलं आणि हळद, अळू, घोसावळं, पुदिना आहेत. आत्तापर्यंत बागेचे जे फोटो काढलेत ते खालील अल्बममधे बघा Happy

https://picasaweb.google.com/meenakshi.hardikar/MyDadSBeautifulGarden?au...

विषय: 
प्रकार: 

मस्त बाग बनवलीये. Happy

कुणाकुणाच्या हातात जादू असते तशी माझ्या बाबांच्या हातात जादू आहे असा माझा विश्वास आहे>> हो असते अशी जादु. Happy
माझी आई म्हणजे माझी आज्जी (म्हणजे तिची सासु) हिचा हात असाच होता.
जे पेरेल ते छान उगवणार, त्याला फळ, फुल धरणार... Happy

मस्त आहे गच्चीबाग. Happy बर झाल ४ दुधी सांगितलेस. शोधले तेव्हा ४ था सापडला Happy मागे फुलबाग तुझ्या बाबांची टाकली होतीस ती पण ग.बा. च आहे का?

हो फुलबाग पण गच्चीतच आहे..

चिनूक्स कधी पण ये जवळच आहे गुरुगणेशनगरमधे. पण उजेडात पाहण्यात मजा.

प्रचंड कष्ट आहेत. खूप प्रयोग करतात. नारळाच्या शेंड्या, गांङूळ खत, बायो डीग्रेडेबल वेस्टचा वापर, शास्त्रीय संगीताचा उपयोग. आणी पुन्हा हे सगळं दुसर्‍या कुणाची मदत न घेता. तार आणून त्यांनी ती तारेची जाळी बनवली वेली चढवायला. कमीत कमी खर्चात न लागणार्‍या अनेक वस्तूंचा उपयोग करून चालते आमची बाग.

बागेला सगळ्यात मोठी दाद म्हणजे बागेत घरटी बांधणार्‍या पक्षांची. हळदीची दोन पानं शिवून एका पक्षाने छान घरटं बांधलंय आणि तीन छोटी छोटी अंडी घातलीत. अगदी चिटकू पिटकू अंडी आहेत. पूर्वी एका नर्तक पक्षाने घरटं बांधलं होतं कर्दळीच्या पानात. Happy

खरंच जादू आहे तुमच्या वडिलांच्या हातात! फारच सुंदर बाग केलीये. पुण्यातच आहे म्हणजे बघायला यायला जमेल. तुमच्या वडिलांना नमस्कार सांगा.

खरंच महानच (ग्रेट) आहेत तुमचे वडिल - इतकी छान टवटवीत, हिरवीगार बाग फुलवायची म्हणजे किती कष्ट घेत असतील ते, शिवाय तुम्ही म्हणता तसे प्रयोगशील, संगीतप्रेमी - मला तर ते वाचतानाच धाप लागली...
मी व शांकली जरुर ही बाग बघायला येणारच.
तुमच्या वडिलांना सा. नमस्कार..

खरंच अशी माणसं असतात. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी लावलेली झाडे सहज जगतात.
अशीच बहरलेली झाडे बघायला मिळोत आम्हाला. !

मीन्वा...तुमच्या बाबांना सलाम. ___/\__! Happy

आम्ही कधीपासुन ठरवतोय, पोर्चच्या वरती आणि टेरेस गार्डन करुया. त्यासाठी उसाची चिपाडं, पोयटा माती सगळं आणलं. ब्रोकोली, वांगे लावले होते पण देखभालीअभावी वाया गेली झाडं. Sad

जाऊदे..मी ठरवलय. निवृत्तीनंतर पुर्ण वेळ यावरच केंद्रीत करणार.

वॉव...मानलं पाहिजे तुमच्या बाबांना.
भोपळे कस्सले छान दिसतायेत.
माझ्या आईच्या हातात हिरवी जादू आहे. माझ्या हातात मुळीच नाही Sad कितींदा तरी रोपं लावायचा प्रयत्न केलाय, दरवेळी फसतो.

मीन्वा
खूप छान आहे बाग! येऊ का बघायला(खरंच सीरियसली विचारतीय.)? मी बरेच दिवस गच्चीत/अंगणात बाग करण्याचा विचार करतीय. दुधी कित्ती गोड दिसताहेत!
>>>>>>>>>बागेत घरटी बांधणार्‍या पक्षांची. हळदीची दोन पानं शिवून एका पक्षाने छान घरटं बांधलंय आणि तीन छोटी छोटी अंडी घातलीत. अगदी चिटकू पिटकू अंडी आहेत. पूर्वी एका नर्तक पक्षाने घरटं बांधलं होतं कर्दळीच्या पानात. >>>>>> हे सगळं तर फार आवडलं!

ज्यांना ज्यांना बघायला यायचंय त्यांनी खरंच या. बाबांना फार आवडेल. Happy एखाद्या शनिवारी / रविवारी सगळे एकत्र आलात तरी चालेल. नक्की या.

हे भारीच आहे. तुझ्या वडिलांना सलाम.
मी गेले ३ वर्ष असं काहितरी करायचं ठरवतोय पण आजून जमलं नाही. फुलं झाडं, मेथी, आळू, पुदिना वगैरे जमलं पण असे दुधी सारखे मोठे वेल, आणि इतर भाज्या काही जमत नाहित. आणि जरा जमतय असं वाटलकी काहितरी होऊन मरतात नाहितर कीड पडते.
खरच भेटायला पाहिजे त्यांना.

Pages

Back to top