गुजराथी फूड फॅन क्लब

Submitted by Adm on 2 August, 2012 - 04:37

"तुम गुजराथी बडे क्यूट होते हो, पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्युं होता है? ढोकला, थेपला, फाफडा, हंडवा, ऐसा लगता है कोई मिसाईल्स है !"

पण प्रत्यक्षात मात्र काही मिसाईल वगैरे नसतं! तर हा धागा गोडसर, गुळचट, तुपाळ गुजराथी पदार्थ आवडणार्‍यांसाठी आणि आवडते पदार्थ (आणि ते कसे (खायला) आवडतात), ते मिळण्याची ठिकाणं आणि रेसिप्यांच्या लिंका ह्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी..

त.टी. १ : चमचमित, तिखट पदार्थ आवडणारे इथे तु.क. टाकायला, दात विचकवायला आले तर त्यांचे गोड, गुळचट, तुपाळ स्वागत करण्यात येईल.. !
त. टी. २ : बाकीच्या फ्यॅन क्लबांप्रमाणेच जर रेसिपी द्यायची असेल तर आशापाकृ मध्ये रेसिपी लिहून तिची लिंक इथे द्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुकांतामध्ये एकदा गेले होते, आवडले.

माझी वहिनी बडोद्याची आहे. त्यांच्या घरी गेलं की होत असतं खाणं. आता नावं आठवत नाहीत. पण आवडतं.
तिच्या आईने एकदा उंधीयो बनवलेला. अप्रतिम होता!!

माझ ऑफिस गुजराथ्यांनी भरलेल आहे. काय जेवतात ते लोक. टिफीन मध्ये तुप घातलेल्या राइसची मुद, डाळ, कमीत कमी दोन भाज्या, आपण पुर्‍या करतो त्या शेपचे पण एकदम पातळ फुलके, चटणी / लोणच, एखादा खाकरा, शेव, बाखर वडी, फळ, पेस्ट्री चा तुकडा / मिठाइ, छास इ. सगळ पण थोड थोड, सगळा डबा मांडुन अगदी आस्वाद घेउन खात असतात. आणि हो मुखवास.

सुकांता राजस्थानी आहे ना? स्टार्टर्स असतात गुजराथी अर्थात.. पण त्याची क्वालिटी फार खराब झाली आहे हल्ली.. बर्‍याच जणांची पोटं बिघडल्याचं ऐकलं सुकांतात जाऊन आल्यापासून... शिवाय तिथे फार दणादणा वाढतात.. बसल्या बसल्या सगळे वेटर तुटूनच पडतात येऊन.. !

मो.. नाही गेलीस तरी चालेल.. त्यापेक्षा तुम्ही आलात की आपण मुंबईच्या सम्राटमध्ये जाऊ.. ट्रिप पण होईल. Proud लिस्ट कंपाईल करतो. Happy

सुरळीची वडी गुजराथी प्रकार आहे का मुळचा? मला वाटायचं आपला आहे.

सपना खरच फार भारी होतं !

सगळा धागा वाचुन आता अस वाटतय की पट्कन जाऊन गुज्जु थाळी खावी Happy
प्लीज कोणीतरी पुण्यात कुठे कुठे थाळी मिळेल हे एकत्रित लिहा ना

>>मग घरातल्या ज्ये नांना विचारुन ऑथेंटिक गुजराती रेसिपी इथे का लिहित नाही?<<
तुम्ही करणार आहात का व फोटो टाकणार का त्या रेसीपीचे? हे सांगा आधी.

सुरळीची वडी गुजराथी प्रकार आहे का मुळचा? मला वाटायचं आपला आहे.
<<< आपली सुरळीची वडी = खांडवी .
ओरिजनल कोणाचा माहित नाही पण गुज्जु स्नॅक शॉप मधे, रेस्टॉरन्ट्स, गुज्जु लोकां कडे आवर्जुन असते 'खांडवी' म्हणून उगीच अंदाज कि गुज्जु असावा, बघायला पाहिजे गुगल करून ओरिजिन काय ते.
माझ्या आवडत्या गुज्जु स्नॅक्स मधे 'पात्रा' (आळुची वडी) अ‍ॅड करायची राहिलीच.

पात्रा सही असतात.. नंदुरबारला गाड्यांवर सकाळी सकाळी गरम पात्रा आणि जिलबी मिळते... दोन्ही एकदम कुरकुरीत आणि टेस्टी !
अटलांटाच्या स्वामी नारायण टेम्पलमध्ये फाफडा, कढी, जिलबी आणि पात्रा असा कॉम्बो मिळायचा.. मस्त असायचे सगळेच पदार्थ.

माझी स्वातीने आठवण काढली. Happy विकतचे गुजराती अन्न मी पुणे-मुंबईतले नाही सांगू शकणार. फक्त अमदावाद मधले. Happy भरतजी, लीलवाकचोरी बोरीवली किण्वा पार्ल्यात न्क्की मिळणार - इथेही सिझन मधेच अर्थात - शियाळा ( हिवाळा) तच मिळते. ही पण बाहेरची ३-४ दा खाल्ल्यावर घरी करून पाहिली होती. उंधियो बाहेरचा मला आवडत नाही, कारण तेलात बुडालेला असतो. तशा बाकीच्या भाज्या घरी सुध्दा तेलाने लथ्पथलेल्या असतात. सध्या नागपंचमी त्योहारनिमीत्त "गळ्या,तिख्या,मोळा खाजा" चे दिवस आहेत. ह्या लोकांची नागपाचम आपल्यानंतर १५ दि. येते. आदल्या दिवशी "रांधणछ्ट" असते. आदल्या दिवशी आपले पूर्वज जसे रांधून ठेवायचे तस. अगदी लवकर हे बनवायला घरी जाणे वगैरे.. पूरी,पराठे, गोडधोड करून-विकत आणून ठेवतात.
अन गु. जेवण फकत मुळमुळीत मुळ्ळीच नसते तिखट बरेच खातात ते. पण त्याबरोबर गोड खातातच. गोड न आवडणारा गुज्जु क्वचितच भेटेल. Happy
मला गुज्जु ची न आवडाणारी गोष्ट म्हणजे प्रचंsssssड पेटू असतात ते.. असो. पण चर्चा सुध्दा - कुठे काय चांगल मिळेल / मिळते. घरी काय कसे बनवतात ते बायकापुरूष्मुलीबाळी सगळेच सतत करतात. खावा माटेज तो जिवीये छीये. असे म्हणतात सुध्दा. Lol

कोणताही सण , मग ते उत्तरायण (संक्रात) असो की नवरात्री, दसरा, शिवरात्र, कृष्णाष्टमी, रक्षाबंधन, संवत्सरी( जैन सण), धुलेटी गुज्जू लोक आपले सकाळी उठून जवळच्या दुरच्या दु कानात पिशव्या घेऊन लाईनी लावतात. फाफडा + जिलेबी तर फेव्हरेट फोर उ. अन नवराती-दसरा. उपासाला उपवासाच्या वानगी अगदी फराळी मिसळीपासून पिज्झ्याप्र्यंत.

मी सुद्धा गुजराती फूड फॅन. पात्रा, उंधियो, बाजरीच्या रोटल्या, खांडवी, ढोकळे, कढी, हांडवो.. हे पदार्थ सर्वात जास्त आवडतात. गुज्जू गोड पदार्थ मात्र आवडत नाहीत. अपवाद बडोद्याचे फ्रूट श्रीखंड. गुज्जू लोणचीही मला आवडतात.

पार्ल्यातल्या रुचीमधे मिळणारा उंधियो अप्रतिम असतो. पार्ला वेस्टला गुज्जू स्नॅक्स मस्त मिळतात खूप ठिकाणी. स्वादमधेही छान गुजराती जेवण असतं. पार्ले इंटरनॅशनलच्या निमंत्रणचीही थाळी छान असते. पार्ल्यात तोसामधे दालढोकळी अप्रतिम. बाकी थाली जेवणात राजधानी, सम्राट, भुलेश्वरचं अजून एक (नाव विसरले). ताडदेवच्या स्वाती स्नॅक्समधली पालक खिचडी आणि इतर गुज्जू पदार्थ केवळ अप्रतिम.

पात्रा, उंधियो, बाजरीच्या रोटल्या, खांडवी, ढोकळे, कढी, हांडवो >>> विकतचे पात्रा जाड अस्ते. आपल्या घरच्या अळूवड्या बेस्ट लागतात त्यापेक्षा Happy यातल खांडवी - अर्थातच सुरळीच्या वड्या मला जमत नाहीत बाकी सगळ मस्त येते, खाता बनवता. ढोकळा मला जास्त प्रिय कारण झटापट बनतो. Happy ढोकळ्याचे प्रकार मात्र माबो - सुलेखाताईंना फॉलो केले.

>>>>मग घरातल्या ज्ये नांना विचारुन ऑथेंटिक गुजराती रेसिपी इथे का लिहित नाही?<<
तुम्ही करणार आहात का व फोटो टाकणार का त्या रेसीपीचे? हे सांगा आधी.>>>

कोण करुन बघेल किंवा फोटो टाकेल ह्याचा विचार न करता तुम्ही रेसिपी लिहा तर खरं. वेगळे पदार्थ वाचायला /करायला/ खायला कुणाला आवडत नाहीत?

इथे चौपाटीला विठ्ठ्लदासच शॉप आहे. इथला खाकरा अप्रतीम असतो. एकदम पातळ आणि चवीश्ठ. हे लोक जिरालु, वेगवेगळी सुकवलेली फळ - पेरु, चिकु, आंबा, चिवडे, वेफर्स, मुखवास असे बरेच पदार्थ मिळतात. चढे भाव आहेत पण अप्रतीम चव.
आमच्या ऑफिसमध्ये कोणाचा वाढदिवस असला की भुलेश्वर वरुन छोटे छोटे समोसे आणले जातात. त्यात मुगा सारण असत. मस्त लागतात. शिवाय दर महिन्याला बेस्तो महीन्याच्या दिवशी जिलेबी हाउस ची फाफडा जिलेबी ठरलेली.

सिंडे, स्वादमधे मराठी थाळी गं फक्त.. गुजराथी थाळी टिप टॉप प्लाझाला असते. एकदम जंबो थाळी. एक अख्खा दिवस उपास करून दुसर्‍या दिवशी ती थाळी जेवावी.

अरुंधती, लक्ष्मी रोडवरचे भगत ताराचंद राजस्थानी आहे ना? मला फार आवडते.. सही फूड असते एकदम..तिथे ताक बाटलीमधे देतात.

गुजु थाळी खायची तर सी.एस.टी ची कल्पना क्लबची थाळी.... शुक्रवारी कॉईन पुरणपोळ्या असतात. मस्त तुपाळल्या..जायला हव परत परत अशी.. एकदम.. स्लर्प टाईप.. Happy

गुज्जूंच्या पुपो तुरीच्या डाळीच्या अन छोट्या (पुरीए वड्या) अन जाड असतात. बेडमी म्हणतात त्यांना. अन खरपूस भाजत पण नाहीत.

आणि गुळाऐवजी साखर ना?

आठवलेले आणखी पदार्थ : मेथीचा ठेपला , छुंदो, मुठिये- (आपल्याकडे मुटके करतातच)
करायला आणि खायला आवडणारे : हांडवो, दंडगेल
स्वातंत्र्यदिनी तिरंगी ढोकळा ठरलेला.

मंजुडी कल्पना क्लब मुंबादेवी व भुलेश्वरच्या मध्ये आहे, (झवेरीबाजरतुन जायच चालत जायच झाल्यास). टॅक्सीने गेल्यास मुंबादेविला उतरुन मागे गल्लीत यायच.. मस्त अहे नक्की जा.. Happy

पुण्यातील टिळक रोडजवळच्या भोज रेस्टॉरंट बद्दल गृहसदस्यांचा रिपोर्ट ''जेवणाची चव चांगली होती'' असा आहे.

सुकांताच्या अपडेट्सबद्दल थँक्स. मी आतापर्यंत तिथे ३-४ दा गेली आहे व ६-७ वेळा तिथून पार्सल आणलेले खाल्ले आहे. तेव्हा तरी कधीच त्रास झाला नाही किंवा पदार्थांच्या गुणवत्तेत तक्रारीस्पद आढळले नाही. प्रत्येक रेस्टॉरंटची वेळ असावी एकेक!

लंपन, थँक्स माहितीबद्दल.

Sahee dhagaa!
Parag, nandurbaarchaa patra! aprateem! AajoLache divas aathavale!
tithale tarbuj/kharbuj paN ekdam chavishta asayache.

Nashik roadla puroheet, nashikmadhye panchavatee hotel ya thickened guju thalee changalee milate. Puroheet chee saputaryala shakha ahe. Korum madhye panchavatee gaurav madhye hee chaan hotee.

<<शिवाय तिथे फार दणादणा वाढतात.. बसल्या बसल्या सगळे वेटर तुटूनच पडतात येऊन.. !>> पराग Lol
शर्मिला अजून निमंत्रण ची थाळी असते का ग?

Pages