एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सकाळी नविन मालिकेची अ‍ॅड बघितली. २७ ऑगस्ट पासुन सुरु होतेय, म्हणजे फायनली एलदुगो संपतिये. पण ही मालिका संपली की इतकी साधी म्हणजे काही कट्-कारस्थाने नसलेली मालिका पाहण्याचा योग केव्हा येईल माहित नाही. Happy

घनाकडे बघवत नाही. नाक डोळे तोंड सगळे एकत्र लहानशा जागेत कोंबलेत, बाकीची जागा रिकामी आणि पार टोकाला दोन बाजुला दोन कान...>>>>>>>> अशक्य हसतेय

साधना Lol
डोक्यात तर माझ्या केव्हाच जायला लागलाय पण आणखिन एक गोष्ट. सारखी जीभ बाहेर काढून परत आत घेतो! त्याला हे एकदम नॅचरल वगैरे वाटत असेल पण सारख सारखं केल्यामुळे पुर्णपणे फेक आणि यडबंबू (मृणमयी कडून साभार) वाटतं.

साधना, वैद्यबुवा,
अगदी अगदी.
आणखी एक म्हणजे "असं नै......ना होत .....कधी." हे तो आत्तापर्यंत शंभरवेळा तरी बोलला असेल.
एलदुगोवाल्यांनी शेवटी कुहू आणि घनाच्या कपड्यांवर पैसे खर्च केले नाहीतच. आता शेवटच्या आठ दहा भागांसाठी कोण करणार आटापिटा. जे आहे ते आहे. मालिका लवकर संपतिये हीच काय ती आनंदाची बातमी. मला तर दिवसभरात कधितरी आठवण येते, नाहीतर बघायलाच विसरते.

आणि तो घना सारखा डोकं नाहितर पोट खाजवत असतो बोलताना. यक्क..
भयाण बोर होतंय आता. कधी व कशा वाईट रितीने संपतेय तेच पाहण्यात उत्सुकता.

>>>>>>घनाकडे बघवत नाही. नाक डोळे तोंड सगळे एकत्र लहानशा जागेत कोंबलेत, बाकीची जागा रिकामी आणि पार टोकाला दोन बाजुला दोन कान...>>>>>>>> जबरी ईमॅजीनेशन : हहगलो:

ही गोष्ट फायनली २६ ला संपणार........ हुश्श....!!!!

मग "अजूनही चांदरात आहे" सुरू................. जुन्या गाण्यांच्या शब्दांवरून सिरिअल पिक्चरची नावं ठेवणं अजूनही कमी झालेले नाही.

विनोदकाकाच्या दिसण्यावर आक्षेप का बरे? तो ज्या वयाचा, ज्या प्रकारचा माणूस दाखवलाय त्याला योग्यच दिसतो की गिरीश.
असो.. काल काय झालं?

काल रक्षाबंधन - टाइमपास. राधाच्या पपांनी माईआजीला लवकर सोक्षमोक्ष लावा, नाहीतर मी लावतो असे सांगितले. माईआजींना अचानक आपण त्या दोघांच्या संसारात लुडबुड करू नये असे वाटू लागलेय.
आज माईआजी, विनोद, घना, राधा यांचे अधिवेशन आहे. राधा-घनाला आपण 'पर्देमें रहने दो पर्दा ना उठाओ' वाटत होते , तो पर्दा कधीच उठला आहे हे कळेल.

त्या छोट्या मुलीस एकच फ्रॉक आहे. उल्की व वल्ली दोघींच्या हिरव्या निळ्या साड्या छान होत्या.
उलकीने ब्लंट कट वरून आंबाडा कसा घातला असा केशरचनेशिअस प्रश्न पडला मला. बाकी वेगवेगळ्या परम्युटेशन्स मध्ये राख्या बांधणे. तरी इलाबाई रुद्ध रडवेल्या झाल्याच. मी फोर एक्स
स्पीडने बघितला त्याहुन कळले नाही का ते.

बाबांनी अल्टिमेटम दिला.तो ही आजीला.

काल जामच बोर झाला एपिसोड..
घनाच्या आई च नाव देवकी आहे / देवयानी?
वि.ला. काल देवयानी म्हणाले बहुदा..

आणि देवकी , वल्लि काकुच्या भावाचे काय राडे आहेत नक्कि???
आता ती ही पात्र वाढवणार कि काय????????

उलकीने ब्लंट कट वरून आंबाडा कसा घातला असा केशरचनेशिअस प्रश्न पडला मला >> सेम हियर अ.मा..
पण उल्कि फारच क्यूट दिसत होती कालच्या भागात..

हो गं आणि तिची हिरवी साडी अगदी स्वतःच्या पहिल्या डोजेला घालण्यासारखीच होती. तिच्या आयुष्यात कधी येणार असा प्रसंग म्हणून तिने नेसली असेल रक्षा बंधनासाठी असे वाटले. ( आपण नक्की जास्त विचार करतो. ) हिरवा व निळा दोन्ही जरीची ब्लाउजे मस्त होती. शिववून घेण्यात येतील.

उंच माझा झोका मध्ये आई गदगदून मुलीस म्हणते. अगदी साखरेसारखी विरघळलीस की ग तिकडे आणि इकडची पण गोडी वाढवलीस. एकदम फाडू डायलॉग.
दीडशे वर्षे झाली असतील पण ह्या अपेक्षा बदललेल्या नाहीत.
( रेकॉर्ड केल्यामुळे आधिच्या सिरीअलीचा थोडा भाग दिसतो. म्हणून बरें )

काळे कुटुंबियांनी रक्षाबंधन एकत्र का साजरे केले नाही? सगळ्यानी आपापल्या भावांना वेगवेगळ्या राख्या बांधल्या.

आपल्याकडे शालेय शिक्षणातला 'जोड्या लावा' कार्यक्रम फार सिरीयसली घेतला जातो.
अश्या नाहीतर तश्या(म्हणजे राखीयुक्त!) Wink

उंच माझा झोका मध्ये आई गदगदून मुलीस म्हणते. अगदी साखरेसारखी विरघळलीस की ग तिकडे आणि इकडची पण गोडी वाढवलीस. एकदम फाडू डायलॉग.
दीडशे वर्षे झाली असतील पण ह्या अपेक्षा बदललेल्या नाहीत.

पुढची दिडहजार वर्षेही बदलणार नाहीत....

आपल्याकडे शालेय शिक्षणातला 'जोड्या लावा' कार्यक्रम फार सिरीयसली घेतला जातो.

हो, कार्यक्रम कुठलाही असो, जोडी पाहिजेच. जोडी नसली तर सगळे आयुष्य वाया, मग भले ती जोडी विरुप का असेना...

हो गं आणि तिची हिरवी साडी अगदी स्वतःच्या पहिल्या डोजेला घालण्यासारखीच होती. तिच्या आयुष्यात कधी येणार असा प्रसंग म्हणून तिने नेसली असेल रक्षा बंधनासाठी असे वाटले. ( आपण नक्की जास्त विचार करतो. ) >>>> कैच्या काय अमा. अशी हिरवी साडी कधिहि घालू शकतात. आणि डोजे वगैरे काय. एखाद्याला नकोच असेल असा प्रसंग किंवा काहि कारणाने नसेल येत त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग तर त्यांनी काय करावं.
आणि तयार अंबाडा मिळतो ना. तो वापरला असेल तीने.

एका लग्नाच्या निमित्ताने......

च्यायला, हा 'राजवाडे' काय धुमाकूळ घालतोय सध्या, अशक्य सुटलाय! समस्त मराठी बायाबापड्यांनी डोकी गहाण ठेवलियेत असेच समजतोय हा. एक तर कुणाच्या संसारात ढवळाढवळ करू नये आणि नवराबायकोच्या मध्ये तर ब्रह्मदेव पण कधी लुडबुड करत नाही असं म्हणतात. पण राजवाडे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलाय. अरे पैसे, नाव मिळतंय म्हणून काय काहीही दाखवायचं? नवरा बायकोचं नातं हा जागतिक पातळीवरचा जिव्हाळ्याचा विषय आहे हे मान्य, मालिका करताना स्वातंत्र्य ( space ) हवं हे ही मान्य, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार समजतो की काय हा माणूस? आजच्या जमान्यातील अगदी पुणे-मुंबई सारख्या पुढारलेल्या शहरातील कोणती मध्यमवर्गी मराठी मुलगी 'contract marrage' ला तयार होईल. त्यातून तिने किलोच्या भावात मुले नाकारली लग्न करायचे नाही म्हणून, मग हा सोंड्या 'घना' कोण लागून गेला की तिने अश्या संबंधांना तयार व्हावं?.. आणि ज्या बापाची खूप काळजी वाटत होती त्याला अंधारात ठेवून? ती खाटेवर पडलेली म्हातारी नातवाचे आणि नातसुनेचे संबंध सुधारावेत म्हणून परपुरुषाला आमंत्रण देते.... 'विस्तवाजवळ लोणी नेवू नये' हे ही म्हातारीला समजत नसेल तर तिने लवकरच 'राम' म्हणावे. मुंबई सारख्या शहरात स्वतःची वाडी नामक मोठ्ठ घर असताना समस्त 'काळे' काय करतात पोटापाण्यासाठी? का बाप कमाई? घनामाउली स्वतःची सोफ्टवेअर कंपनी चालवत असतो तर नोकरी का शोधतो? - ते ही अमेरिकेत - धंदा चालत नाही तर लग्नाचा घाट कशाला? आधी खरा वाटणारा दिग्या काय माकडचेष्टा करायला लागलाय?

आता ह्या राजवाडे आणि कंपनीचे आणि माझे काही वाकडे नाहीये. ह्याच मालिकेबद्दल का लिहिले? चांगले कलाकार घेवून मालिकेची माती होताना पाहून त्रास होतो म्हणून........ ( उंच माझा... सोडून ) इतर मालिका उल्लेख करायच्या पण लायकीच्या नाहीयेत. आणि त्यांच्याबद्दल लिहायचे तर ते पाहण्याची शिक्षा! आमच्या काळातील गजरा, चाळ नावाची वाचाळ वस्ती वगैरे मालिकांची अपेक्षा नाहीये पण ४-४ मराठी वाहिन्या असताना काही तरी वस्तुस्थितीला धरून आम्हाला पचेल असे कुणीतरी दाखवा की राव! मराठी कलाकारांची रेलचेल असलेल्या 'सब' टीव्ही वरच्या मालिका आपल्या निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकारांना दाखवायला हव्यात..... तो परमेश्वर आपल्या लोकांना सुबुद्धी देवो हीच इच्छा!!!

एल्गो संपली की १००० फटाक्यांची माळ लावणार आणि दगडूशेठ ला नारळ्,उदबती देणार.सद् बुडईधी देण्यासाठी.
असो.

Pages