Submitted by Adm on 2 August, 2012 - 04:37
"तुम गुजराथी बडे क्यूट होते हो, पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्युं होता है? ढोकला, थेपला, फाफडा, हंडवा, ऐसा लगता है कोई मिसाईल्स है !"
पण प्रत्यक्षात मात्र काही मिसाईल वगैरे नसतं! तर हा धागा गोडसर, गुळचट, तुपाळ गुजराथी पदार्थ आवडणार्यांसाठी आणि आवडते पदार्थ (आणि ते कसे (खायला) आवडतात), ते मिळण्याची ठिकाणं आणि रेसिप्यांच्या लिंका ह्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी..
त.टी. १ : चमचमित, तिखट पदार्थ आवडणारे इथे तु.क. टाकायला, दात विचकवायला आले तर त्यांचे गोड, गुळचट, तुपाळ स्वागत करण्यात येईल.. !
त. टी. २ : बाकीच्या फ्यॅन क्लबांप्रमाणेच जर रेसिपी द्यायची असेल तर आशापाकृ मध्ये रेसिपी लिहून तिची लिंक इथे द्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पण गुजराती थाळीची
मी पण गुजराती थाळीची फॅन.
अमेरिकेत एकदम भारी काठेवाडी थाळी ऑरलँडोत 'खासियत' मध्ये खाल्ली.अहाहा!!
पूर्वी विश्रामबागवाड्याकडून तुळशीबागेत जाताना उजव्या हाताला(हॉटेल अगत्यच्या गल्लीसमोर) वर तिसर्या मजल्यावर 'रंगोली' म्हणून एक गुजराती थाळीचे हॉटेल होते.सध्या आहे का माहित नाही पण त्यांची कढी अफलातून असे.
सम्राट आणि स्टेटस ची थाळी
सम्राट आणि स्टेटस ची थाळी अप्रतिम
स्टेटस ची मसाला दाल खिचडी नी दही कढी झक्कास.
पुण्यात भांडारकर रोडला पंचवटी
पुण्यात भांडारकर रोडला पंचवटी गौरव आहे तिथे ही हूं म्हणून वाढतात.
पण चव बरी वाटली मला.
निलायम शेजारचं अशोका माझ्या सगळ्यात जास्ती आवडीचं होतं गुजराथी थाळी साठी, आता बंद झालं बहुतेक.
थोडसं तुप आणी जिरालू
थोडसं तुप आणी जिरालू भुरभुरवून पहा. >>
जिरालू म्हणजे काय ?
जिरालू म्हणजे काय ?>> एक
जिरालू म्हणजे काय ?>> एक पावडर असते.
हे पहा http://kapolspices.com/products/surti-jiralu-masala.htm
मुंबईला गिरगाव चौपाटीजवळ
मुंबईला गिरगाव चौपाटीजवळ ठक्कर्स नावाचे एक ठिकाण आहे, तिकडची गुजराथी थाळी १०/१२ वर्षांपुर्वी खाऊन पाहिलेली अजुन विसरू शकत नाही. अप्रतिम चव होती. आता आहे की नाही माहिती नाही.
एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमधे मिळणारे गुजराथी जेवण आणि प्रत्यक्ष गुजराथमधे ढाब्यावर मिळणारे जेवण यात खुप फरक असतो. कोणी जाणकार याबद्दल सांगाल का ?
धन्यवाद स्वाती. वापरून पाहते.
धन्यवाद स्वाती. वापरून पाहते.
महेश, ठक्कर्स अजुनही आहे नी
महेश, ठक्कर्स अजुनही आहे नी चव तशीच अप्रतिम
अजुन १ बाबुलनाथ ला गोविंदा
पुण्यात कॅम्पात रिट्झ म्हणून
पुण्यात कॅम्पात रिट्झ म्हणून हॉटेलात (बहुदा) गुजराती थाळी मिळायची. शेवटची एक ५-६ वर्षांपूर्वी खाल्ली होती. मस्त असायची. त्यात गवारीच्या वाळलेल्या शेंगा तिखटमीठ लावून तळलेल्या असायच्या... अहाहा.. स्लर्रर्रप
मागे मुंबईहून येणार्या एका
मागे मुंबईहून येणार्या एका पाहुण्यांनी पेपर डोसा फ्लेवरचा खाकरा आनला होता. निव्वळ अप्रतिम. चेंबुर (बहुतेक) ला चंदन नावाच्या दुकानातला होता.
स्वाती, सुकांता गुजरातीच गं
स्वाती, सुकांता गुजरातीच गं (बहुतेक! ;-))... म्हणजे तिथले पदार्थ गुजराती + मारवाडी ष्टाईलचे असतात म्हणून हां! सुरुवातीचे चाट आयटेम्स अनलिमिटेड, स्वीट डिश, मिनी कचोरी / सँडविच ढोकळा / खांडवी, स्वीट डिश, डाळ / कढी - खिचडीची चव एकदम गुज्जू असते.
अशोकाची गुज्जू थाळी छान असायची खरंच!
तुळशीबागेत एक रंगत नावाचं रेस्टॉरंट होतं.... तिथंही गुज्जू पदार्थ / थाळी असायची. तेही चांगलं होतं. आता बर्याच वर्षांत तिथे खाल्लेले नाही, त्यामुळे सध्याची परिस्थिती माहीत नाही.
भगत ताराचंद लक्ष्मी रोडचा काय अनुभव आहे? तिथेही गुज्जू जेवण असतं म्हणे!
भोज नावाचं नवं गुजराती
भोज नावाचं नवं गुजराती खाद्यगृह चांगलं आहे, असं ऐकून आहे.
मला पण गुजराथी थाळी खूप
मला पण गुजराथी थाळी खूप आवडते. पूर्वा बरोबर पुण्यात रांगोळी मध्ये मी पण गुजराती थाळी खाल्ली आहे. पण आत्ता मला वाटत ते बंद झाल .पार्ल्यात पार्ले इंटरन्याशनल मध्ये पूर्वी ७-८ वर्षापूर्वी अनलिमिटेड गुजराथी थाळी मिळायची . खूप सुंदर चव .आत्ता जाऊन बघितले पाहिजे.
अरुंधती, तुळशीबागेत एक रंगत
अरुंधती,
तुळशीबागेत एक रंगत नावाचं रेस्टॉरंट होतं>>मी म्हणत आहे तेच हे आहे बहुतेक.माझं नावात कंन्फ्युजन झालंय....
पूर्वी विश्रामबागवाड्याकडून तुळशीबागेत जाताना उजव्या हाताला(हॉटेल अगत्यच्या गल्लीसमोर) वर तिसर्या मजल्यावर >>तू म्हणतेस ते इथे आहे का?
पूर्वा, रंगोलीच नाव होतं
पूर्वा, रंगोलीच नाव होतं त्याचं. कावरे कोल्ड्रींकची गल्ली.
अगत्यच्या समोर काकाकुवा मॅन्शन मध्ये रोनक पावभाजी सेंटर होतं.
मला पण आवडतं गुजराती
मला पण आवडतं गुजराती जेवण.
पीआयसीटीच्या शेजारी चंदूभाई म्हणून गुज्जू माणसाची मेस होती, त्यांच्या फ्लॅटमध्येच होती. अप्रतिम जेवण मिळायचं. गरम गरम फुलके मिळायचे ताटावर बसलं की. आणि चंदूभाई आग्रहाने खायला घालायचे. पण फर्स्ट इयर नंतर ती मेस बंद पडली :(. का ते माहिती नाही.
सुकांताबद्द्ल ऐकलय. पुढच्या ट्रिप मध्ये ते आणि इथे मेन्शन केलेली बाकीची काही नक्की ट्राय करण्यात येतील. पराग तू सगळी कंपाईल करुन वर टाक बरं.
बादवे, थालीच्या भाज्या खरच बेचव असतात. बाकी ठीक, पण व्हरायटी पण नाही फार. प्रत्येक वेळेला तेच ते अॅपेटायझर्स. दुधाची तहान ताकावर भागवायची असेल तर बरय.
शार्लेटला एका गुजराती काकूंकडे जायचो आम्ही कधी कधी जेवायला, मस्त असायचं. सरस छे सरस छे करत करतच जेवायचो आम्ही
आम्हांलाही आवडते गुजराती थाळी
आम्हांलाही आवडते गुजराती थाळी किंवा गुजराती जेवण. मागे फोर्टमध्ये कुठेतरी जेवलो होतो ते ही मस्त होतं. त्या भुलेश्वरच्या ठक्करचं नाव ऐकून आहे पण जायचा योग आला नाही अजून.
इकडे झुपडी पूर्वी बरं असायचं पण आता चव बिघडली आहे अगदी.
सुकांतामधे फार वाईट जेवण
सुकांतामधे फार वाईट जेवण मिळाले होते आम्हाला २ वेळा. पनीर कडू होते व भात कच्चा.
मुंबईच्या सम्राट की
मुंबईच्या सम्राट की कुठल्यातरी गुज्जू थाळी बद्दल खूप ऐकलय.. तिथे जायचय एकदा.. >> येस सर.
मुंबईला गिरगाव चौपाटीजवळ
मुंबईला गिरगाव चौपाटीजवळ ठक्कर्स नावाचे एक ठिकाण आहे, तिकडची गुजराथी थाळी १०/१२ वर्षांपुर्वी खाऊन पाहिलेली अजुन विसरू शकत नाही>>>> महेश +१ मी पण १०/१२ वर्षापुर्वी तेथेच खाल्ली होती अप्रतिम..
सुकांताचा माझाही अनुभव
सुकांताचा माझाही अनुभव अवर्णनीय वाईट आहे.
बडोद्यातील सयाजी , सूर्या
बडोद्यातील सयाजी , सूर्या पॅलेस मस्तच ! मेथीचे पराठे तर अप्रतिम असतात. मेथीची तळलेली पाने असतात पराठ्यांवर (मला नक्की माहीती नाही कसे करतात ते), गरमागरम पराठे अन दही-लोणचे(हे ही अगदी खासच हं) ! भरपूssर साजुक तुपातील मूगडाळीचा हलवा दोन चमचे खाल्ला की पोट भरतं !
नाशिक - पंचवटी (?) हॉटेल, पोट
नाशिक - पंचवटी (?) हॉटेल, पोट फुटेस्तोवर जेवण (२५ वर्षांपुर्वि, आता कल्पना नाहि)
आम्हाला तिखटजाळ आणि गुजराथी
आम्हाला तिखटजाळ आणि गुजराथी असे दोन्ही प्रकार आवडतात. तु.क. मिसाइलची दिशा बदला
ठाण्यातल्या स्वादमध्ये चांगली मिळते गुजराथी थाळी. जुन्या स्वादमधली जास्त चांगली असायची. ठाणे स्टेशनपाशी एक रेस्टॉरंट आहे. तिथे पण थाली मस्त मिळते.
पूर्वा, बिल्वा तुळशीबागेत जी
पूर्वा, बिल्वा
तुळशीबागेत जी गुजराथी थाळी होती ते 'रंगत' डायनींग हॉल. तुळशीबागेत विश्रामबागेकडून आत गेल कि उजव्या बाजूला ३ र्या मजल्यावर आहे.
पूर्वी तिथे मस्त मिळायची गुजराथी थाळी, ईतक्यात नाही ट्राय केली.
ढोकळा, सुरळीची वडी, हांडवो,
ढोकळा, सुरळीची वडी, हांडवो, खाकरा, फरसाण प्रकारत मोडणारे स्नॅक्स टाइप पदार्थ आवडतात :).
बाकी गुज्जु भाज्यांची नाही मी फॅन.
ए अरे मला उंधियो काय प्रकार
ए अरे मला उंधियो काय प्रकार आहे तो पाहून खायचा आहे. पुण्यात खुप चांगला कुठे मिळेल ?
>>>>>>>>>>>>>गोड, गुळचट,
>>>>>>>>>>>>>गोड, गुळचट, तुपाळ >>> एकदम चुक. सौराष्ट्रामधे जेवुन बघा. राजकोट, जुनागढ, गीर, द्वारिका, भुज इथलं गुजराथी जेवण मस्>>>>>>>>>>>>><<
+१
मी पण अर्धी गुज्जु. पण आम्ही नाही हो नेहमी गोड, गुलचट खात.
सारे गुजराती काही तूपाळ, गुळचट नाही खात. जनरलाईज्ड वाक्य आहे ते गुजराती जेवण म्हणजे गुळचट....
>>मी पण अर्धी गुज्जु>> झंपी,
>>मी पण अर्धी गुज्जु>> झंपी, मग घरातल्या ज्ये नांना विचारुन ऑथेंटिक गुजराती रेसिपी इथे का लिहित नाही?
फारतर चार आठ गुजराथी पदार्थ
फारतर चार आठ गुजराथी पदार्थ चाखले असतील ते सगळे आवडले.
फक्त एक पापडासारखा (पण पापड नसलेला) प्रकार नाही आवडला.
एक गुज्जु मैत्रिण तो प्रकार सारखा आणून देत असे, नको म्हटले तरी.
Pages