Submitted by आनंदयात्री on 1 July, 2012 - 11:46
आज, १ जुलैच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलाही हा भाग विशेष आवडला.
मलाही हा भाग विशेष आवडला. योग्य त्या मुद्द्यांवर भर दिला गेला.
यावेळचा निधी मुक्तांगणला मिळणार आहे, याचाही आनंद आहे.
दारू पिऊन गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. असे करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. इतक्या साध्या गोष्टीलाही सांस्कृतिक फाटे फुटतांना पाहणे क्लेशदायक आहे. पण असे काही लिहिले की "हे विधान तुम्ही स्वतः गेली चाळीस वर्षे व्यसनमुक्ती आणि जनजागृती करण्यात घालवत असल्यासारखे लिहिले आहे" वगैरे उत्तरे येतील.
असो.
हे कोणाला उद्देशून लिहिले
हे कोणाला उद्देशून लिहिले आहेत नीधप? काकाकुवा का?
SMS साठीचा नं. कुठला आहे ?
SMS साठीचा नं. कुठला आहे ?
ज्यांनी त्या दोन बाफंचा
ज्यांनी त्या दोन बाफंचा संदर्भ इथे आणला त्यांना आणि संदर्भ आणल्याचे समर्थन करतायत त्यांना. तुम्हाला नाही.
दक्षिणा मदिरापानामुळे बरबाद
दक्षिणा मदिरापानामुळे बरबाद झालेल्या,दारूड्या झालेल्या लिव्हर सिरॉसिस झालेल्या स्त्रीया कोंकणात आणि मुंबईतही फार पाहिल्यात.
या कर्नाटकातल्या भागात विड्या पिऊन लंग डॅमेज केलेल्या बायका नेहमी बघते.
पोटातुन नॉर्मली अॅसिडीटि झाल्यावर ढेकरा येतात त्याचा इथल्या स्त्रीया फार बाऊ करतात. 'वाय्गूळ' का कायसं म्हणतात. अगदी जीवावर बेतल्यासारखं टेंशन घेतात.मग त्यावर औषध म्हणून विड्या पिणं चालू करतात. आणि कधी लंग डॅमेज झालं हे न कळण्याइतकं त्याच्या आहारी जातात.
मागच्याच महिन्यात अश्या एका लपून छपून विड्या पिणार्या लेडी पेशंटमुळे (जिचे हार्ट आणि लंग्ज टोटली डॅमेज झाले आहेत) माझं आयसीयू जळता-जळता वाचलं. विडीचा वास आयसीयूत कुठे येतो हे माझा ड्यूटी डॉक्टर बघायला गेल्यावर तिने विडी पेटतीच चादरीखाली लपवली. आणि नंतर झोपेच्या ग्लानीत विसरून गेली. त्याआधी आयसीयूचे कर्टन लाईटमुळे झोप येत नाहीत या बहाण्याने ओढून घ्यायला लावले होते.
मेग रायनचा व्हेन अ मॅन लवज अ वुमन हा खूप छान चित्रपट स्त्रीयांच्या अॅडिक्शन संदर्भात आणि अॅडिक्ट माणसाच्या रिहॅबविषयी आहे. अप्रतिम आहे.
नक्की बघ.
>>दक्षिणा मदिरापानामुळे बरबाद
>>दक्षिणा मदिरापानामुळे बरबाद झालेल्या,दारूड्या झालेल्या लिव्हर सिरॉसिस झालेल्या स्त्रीया कोंकणात आणि मुंबईतही फार पाहिल्यात.<<
अश्या स्त्रिया मुंबईत असतीलही, पण अतिरीक्त दारुपानामुळे बरबाद झालेल्या, दारूड्या झालेल्या लिव्हर सिरॉसिस झालेल्या अश्या स्त्रिया उर्वरीत कोकणाच्या कोणत्या भागात पाहील्यात हे कृपया सांगू शकता का?
धन्यवाद.
दारूड्या झालेल्या लिव्हर
दारूड्या झालेल्या लिव्हर सिरॉसिस झालेल्या अश्या स्त्रिया उर्वरीत कोकणाच्या कोणत्या भागात पाहील्यात हे कृपया सांगू शकता का?>>>
का? कोकणात या रोगांची हिम्मत नाही का कुणाला व्हायची?
कृपया हलके घ्या आंग्रे साहेब 
रायगड जिल्ह्यात कातकरी समाजात
रायगड जिल्ह्यात कातकरी समाजात स्त्रिया व पुरूष दोघांच्यात दारूच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाण प्रचंड आहे.
रत्नागिरीत,माझ्या स्वतःच्या
रत्नागिरीत,माझ्या स्वतःच्या गावात.
मी रत्नागिरीत तीन महिने ईंटर्नशीप + दोन वर्षे सरकारी रुग्णालयात नोकरी केलीय. पीएचसी आणि डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल दोन्हीकडे.(पीएच्सीचं नाव सांगणार नाही वैद्यकीय नैतिकतेखातर)
नंतर एम डी करताना सायन हॉस्पिटलात रायगड,ठाणे इ भागातील ग्रामिण भागातून रेफर झालेल्या कित्येक केसेस पाहिल्यात.
अहो आंग्रेजी, आमच्याही रक्तात कोंकणी अभिमान कुटून-कुटून भरलाय.
पण फॅक्ट इज फॅक्ट.
@ साती Doctor कदाचित तुम्ही
@ साती
Doctor कदाचित तुम्ही रत्नागिरीत ( तसेच पुढे मुंबई/ठाणे या भागात ) काही वर्ष काम केल्यामुळे तुम्हाला तेथील स्त्रियांचा अनुभव जास्त मिळाला असेल पण तुम्ही लिहीलेल्या वाक्यामुळे असे वाटते की फक्त कोकण व मुंबईतील महिलांमध्येच हे प्रमाण जास्त आहे व इतर भागातील महिला दारु पितच नाहीत किंवा अतिआहारी जात नाहीत.......
आंग्रेसाहेबांप्रमाणेच मलाही ते वाक्य वाचताना जरा खटकलेच ( शेवटी कोकणस्थ ना आम्ही
)
बाकी फॅक्ट इज फॅक्ट असेल तर भयंकर आहे
वर्षा, तसं नाहि, ते मागच्या
वर्षा, तसं नाहि, ते मागच्या पानावरच्या दक्षिणाच्या प्रश्नासाठी होतं.
आपल्या गावाविषयि वाइट वाचायला आपल्याला आवडत नाहित ही खरीच गोष्ट.
पन जल्ला तुमचा ना माजा गाव एकच हा.
एकेका गावात असे ब्यसनाचे ट्रेटस एवॅलॅबिलिटि ओफ सबस्टन्स, अॅक्सेप्टॅबिलिटी इन कम्युनिटी आणि लोकल बिलिफ मुळे असतात.
माझ्या सासरच्या गावातला ट्रेंडपण लिहिलाय की नाही फिट्टंफाट करायला.
मायबोलीवर कोणाच्या अस्मिता
मायबोलीवर कोणाच्या अस्मिता कधी, कुठे आणि कशाने(ही) दुखावतील, हे सांगता येत नाही.
मायबोलीवर कोणाच्या अस्मिता
मायबोलीवर कोणाच्या अस्मिता कधी, कुठे आणि कशाने(ही) दुखावतील, हे सांगता येत नाही.
<<<<<<<<<<<
मी वर्षा अवांतरः कोकणातल्या
मी वर्षा
अवांतरः कोकणातल्या माझ्या गावात तरी मी मद्यपी स्त्रीया पाहिलेल्या नाहीत. अजिबातच.
(केळशी, तालुका दापोली)
अवांतरः माझ्या गावात (केळशी,
अवांतरः माझ्या गावात (केळशी, तालुका दापोली) तरी मी मद्यपी स्त्रीया पाहिलेल्या नाहीत. अजिबातच.>>
पण कशाला पाहायच्या?
साती, बापरे
साती, बापरे
(आयसीयुसाठी)
दारू पिणे ही वैयक्तिक बाब असू शकते. पण त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्याने शरीराला (आणि कुटुंबाला) फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होतात.
व्यसानांबाबत माझी मतं फारच फिक्सड आहेत, तेव्हा मी न बोललेलंच बरं.
रुणुझुणू, अनुमोदन.
रुणुझुणू, अनुमोदन.
d@ मंदार जोशी तेच तर म्हणायचे
d@ मंदार जोशी
तेच तर म्हणायचे होते मला की कोकणात मद्यपी स्त्रिया एवढ्या प्रमाणात असतील असे मुळीच वाटत नाही, पण Doctor सातींना अनुभव आहे त्यामुळे काय बोलणार.......... आमिर खान नाही का आधी hall मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना मत विचारतो की तुम्हाला काय वाटते किती प्रतिशत जनता असे करत असेल मग लोक बोलतात २०% ३५% वगैरे वगैरे आणि मग आमिर आपल्याला आकडेवारी दाखवतो हे बघा direct ७०% , आपण चाट
तसेच वाटले मला आता ,,,, स्वत: Doctor साती आपल्या अनुभवातुन सांगत आहेत म्हणजे खरेच असणार
मूळ धागा "केवळ मद्यपानाविषयी"
मूळ धागा "केवळ मद्यपानाविषयी" आहे, दारूनिमित्ते स्त्री की पुरुष हे भेद जागविण्यासाठी नाही हे कृपया लक्षात घ्यावे
तसेही, एड्स बाबतचे शिक्षणही, त्याच पातळीवर जाऊन पोहोचले आहेच.
एकन्दरीत कार्यक्रम, बघणारा जर "सज्जन", सजग असेल, तर दारूबद्दल कुठेही भूषणावह आभास तयार होऊ देत नव्हता.
आमिरखानच्या मर्यादा लक्षात घेता, त्याने हा कार्यक्रम केला हेच विशेष. मात्र सरकारी धोरणे, अगदी गहू सडवुन (कुणी तरी त्या अक्षतावाल्यान्ना पण सान्गा हे) उपलब्ध करुन देण्यापर्यन्तची उघड व छुपी धोरणे बघता, अन जर त्याला ये देशी "नीटपणे" शिल्लक रहायचे असेल तर आता आताशा कोणीही उघडपणे "दारूचा" विरोध करु शकणार नाही हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. सबब, अमिरखानने अमकेच केले वा नाही केले याला तितकेसे महत्व न देता विरोधी परिस्थिति असूनही, हा विषय निदान "चव्हाट्यावर" तरी मान्डला याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत, कारण माझ्या आजुबाजुचे पट्टीचे पिणारे देखिल, ज्यान्नी हा कार्यक्रम बघितला हे, ते पुढल्यावेळचा ग्लास उचलून तोन्डाला लावताना पुन्हा एकदा विचार करतील, किमान खन्तावतील तरी याची खात्री वाटते. असेच अनेक वेळा झाल्यावर, ज्याप्रमाणे किमान सार्वजनिक ठिकाणी तरी धूम्रपानबन्दी लागू झाली तसे काहीसे होईल असे वाटते.
नपेक्षा, दारू पिण्याचे म्यानर्स शिकविणे शालेय शिक्षणापासूनच अन्तर्भूत केले गेले तरीही मला नवल वाटणार नाही.
नीधप | 3 July, 2012 - 15:39
नीधप | 3 July, 2012 - 15:39 नवीन
रायगड जिल्ह्यात कातकरी समाजात स्त्रिया व पुरूष दोघांच्यात दारूच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाण प्रचंड आहे.<<
अहो कातकरीच कशाला, इथे पहा चांगली शिकली सवरलेली, आणि स्वत:ला सुशिक्षीत समाजणारी अनेक मंडळी दारुच्या प्रचंड अहारी गेली आहेत व आपण पिऊन काय-काय किस्से केलेत तेही मोठ्या चविने सांगत सुटतात.
आणि ते तर बोलून चालून कातकरीच, दिवसभराचे श्रम आणि चिंता मिटवण्यासाठी घेतात थोडी-थोडी मोहाची किंव्हा हातभट्टीची.
स्वत:ला सुशिक्षीत समाजणारी
स्वत:ला सुशिक्षीत समाजणारी अनेक मंडळी दारुच्या प्रचंड अहारी गेली आहेत <<<
तुम्ही काय सगळ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून आलात काय?
सर्वांचे पोटापाण्याचे उद्योग, आवक, उदरनिर्वाह, बचत, खरेदी सर्वकाही व्यवस्थित चालू आहे. दारूमुळे दातावर मारायला फुटकी कवडी उरली नाही, दारूमुळे लिव्हर खराब होऊन मेलेत असलं काही झालं नाहीये.
फरक कळतो का?
इथे कशाचंही(दारूचंही नाही) समर्थन करायचं नाहीये पण आमिर खानच्या कार्यक्रमात नवीन सत्य समजल्यासारखं आपली लोकांवरची मळमळ काढायला या बाफचा उपयोग होतोय.
@ साती रत्नागिरी जिल्हातील
@ साती
रत्नागिरी जिल्हातील तुमचे स्वतःचे गाव आणि ठाणे, रायगड जिल्हातील काही ग्रामीण भाग, म्हणजे संपूर्ण कोकण होत नाही.
>>>मदिरापानामुळे बरबाद झालेल्या,दारूड्या झालेल्या लिव्हर सिरॉसिस झालेल्या स्त्रीया कोंकणात आणि मुंबईतही फार पाहिल्यात.<<<
तुम्ही लिहलेल वरिल वाक्य खटकणार वाटले, म्हणजे कोकणात कधीही न गेलेल्या अथवा फार माहीती नसलेल्या एकाद्या व्यक्तिने वरिल वाक्य वाचल तर, एकूणच कोकणातील सर्वच स्त्रीया ह्या पियक्कड आहेत. असा त्याचाच काय तर कुणाचाही गैरसमज होऊ शकतो.
गज्जु, तुम्ही नका हो त्या
गज्जु, तुम्ही नका हो त्या शिकल्या सवरल्या लोकांची काळजी करु. त्यांच ते बघुन घेतील. फारच तळमळ वाटत असेल तर तेव्हाच तिथेच लिहायचे ना! आमिरने या विषयावर कार्यक्रम केल्यानंतर दोन दिवसांनी या बाफवर काय लिहीता आहात?
फार या शब्दाचा अर्थ
फार या शब्दाचा अर्थ डॉक्तरसाठी आणि इतर लोकांसाठी वेगळा असतो.
समजा एखाद्या गावात गेल्या वर्षभरात, एखाद्या सरकारी दवाखान्यात एकही दारुड्या बाईची केस नव्हती... आणि अचानक या दोन महिन्यात दोन दोन केसेस आल्या, तरी डॉक्तरी भाषेत प्रमाण खूप वाढले असा अर्थ होतो.. लोकांच्या दृष्टीने या दोन चार केसेस ला काही अर्थ नसतो.
पोलिओ सारख्या रोगाबाबत तर राज्यात एक केस मिळणे, हेही 'फार' समजले जाते. सामान्य माणूस म्हणतो एक केस सापडली म्हणून पेप्रात बातमी कशाला द्यायची? त्यात असं काय मोठं?? कशाला फार म्हणावं, कशाला नाही, याचे आकडे रोग, एरिया, यानुसार बदलतात. ( अशा आकडेवारीच्या अभ्यासाला एपिडेमिऑलॉजी म्हणतात. डॉक्टर जेंव्हा 'फार' म्हणतात, तेंव्हा ते त्या संदर्भात बोलत असतात. )
"फार" या शब्दाचा अर्थ समजावून
"फार" या शब्दाचा अर्थ समजावून सांगितल्या बद्दल आभारी आहे. डॉक्टर कागलकर.
"फार" या शब्दाचा अर्थ समजावून
"फार" या शब्दाचा अर्थ समजावून सांगितल्या बद्दल फार आभारी आहे.
असे लिहा.
मी माझे नाव कमला कागलकर करु का?
पण आमिर खानच्या कार्यक्रमात
पण आमिर खानच्या कार्यक्रमात नवीन सत्य समजल्यासारखं आपली लोकांवरची मळमळ काढायला या बाफचा उपयोग होतोय.
>>>
एकच मारा, पण शॉल्लेट मारा
@ लिम्बुटिम्बू ~ तुमचा
@ लिम्बुटिम्बू ~ तुमचा "पुढल्यावेळचा ग्लास उचलून तोन्डाला लावताना पुन्हा एकदा विचार करतील, किमान खन्तावतील तरी याची खात्री वाटते." हा आशावाद सद्यस्थितीत स्वीकारण्यासारखाच आहे. मला वाटते खुद्द आमीरही या भ्रमात असणार नाही की केवळ एका एपिसोडच्या परिणामामुळे तमाम भारतीय 'द्राक्षायणी' पासून दूर होतील आणि ते एकसुरात 'मंगल देशा पवित्र देशा' म्हणत राहतील.
कार्यक्रमाची सांगता करताकरता आमीरनेच 'मॉडरेट ड्रिंक' विषयी बंगलोरच्या एका तज्ज्ञाकडून काही आकडेवारी सांगितली, ज्यात (मेडिकली योग्य अशी) दिवसातून एकदा ३० एम.जी. ची मर्यादा उल्लेखीली गेली; पण पुढे त्यानीच हेही स्पष्ट केले की भारतात मात्र सर्वसामान्यतः हे लिमिट कधीच पाळले जात नाही. कित्येकदा त्याच्या पाचपट अल्कोहोल रिचविले जाते.
मला वाटते इथल्या मातीत 'सोशल ड्रिंक' याची सांगड 'मॉडरेट ड्रिंक' शी घालता येत नसेल. सोशल ड्रिंकिंगच्यावेळी अन्य अनेक घटना आजूबाजूला चालू असतात (गप्पा, उद्योगधंद्याच्या मीटिंग्ज, सरकारी कामानिमित्त्य गेटटुगेदर, अचिव्हमेन्ट पार्टी, "मिळते चकटफू तर प्यावी भरपूर" अशी मनोवृत्ती इ.इ.) त्यामुळे आपण किती घेत आहोत याकडे पुरुषाचे लक्ष जात नाही. त्याची अर्धांगिनी सोबत असेल तर ती आपल्या पतीला अधूनमधून जास्त न घेण्याबद्दल टोचत असतेच; कारण तिला घरी परतायची काळजी असतेच. तरीही सिंधूच्या दटावणीकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करणारे सुधाकरही मोठ्या संख्येने अशा पार्टीत असतातच.
आमीरने या संदर्भात जो प्रश्न विचारला आहे तोही 'ड्रिंक आणि ड्रायव्हिंग' याच्याबाबतीतच आहे....म्हणजे एकप्रकारे त्यानेही ड्रिंक्स ताबडतोब बंद केले पाहिजे असा सूर लावलेला दिसत नाही. ज्याना एपिसोड पाहून 'आपण ड्रिंक कायमचे बंद केले पाहिजे' असे वाटले तर ती स्वागतार्हच घटना मानली पाहिजे.
वर एस.एम.एस. साठी कार्यक्रमाचा टेलिफोन नंबर विचारला आहे. तो असा :
५७८२७११
"ड्रिंक घेऊन ड्रायव्हिंग करणार्या व्यक्तीला कठोर शासन झाले पाहिजे का ?" या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर Y..... नाही असेल तर N.
अशोक पाटील
त्यामुळे आपण किती घेत आहोत
त्यामुळे आपण किती घेत आहोत याकडे पुरुषाचे लक्ष जात नाही. त्याची अर्धांगिनी सोबत असेल तर ती आपल्या पतीला अधूनमधून जास्त न घेण्याबद्दल टोचत असतेच; कारण तिला घरी परतायची काळजी असतेच. तरीही सिंधूच्या दटावणीकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करणारे सुधाकरही मोठ्या संख्येने अशा पार्टीत असतातच.>>>
हे अॅक्च्युअली पटत नाही
१. अर्धांगिनीच पीत असेल तर?
२. पुरुषाचे स्वतःच्या 'क्वॉन्टिटीकडे' लक्ष असेल तर
इत्यादी
सरसकटीकरण का करावे? 'मोठ्या संख्येने' हे मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या 'य' पार्ट्यांमध्ये खरंच झाले नाही. अॅक्चुअली, मी इतकी दारू पीत असूनही आणि ड्राईव्ह करत असूनही मला तोल जावा इतकी कधी चढलीच नाही. म्हणून इतरांना चढू नये असे नाही. पण 'न पिता गाडी चालवल्याने झालेल्या अपघातांची संख्या' पिल्याने झालेल्या अपघातांच्या संख्येहून खूप जास्त आहे हे पेपरमध्ये दिसतेच.
कार्यक्रमाची सांगता करताकरता
कार्यक्रमाची सांगता करताकरता आमीरनेच 'मॉडरेट ड्रिंक' विषयी बंगलोरच्या एका तज्ज्ञाकडून काही आकडेवारी सांगितली, ज्यात (मेडिकली योग्य अशी) दिवसातून एकदा ३० एम.जी. ची मर्यादा उल्लेखीली गेली; पण पुढे त्यानीच हेही स्पष्ट केले की भारतात मात्र सर्वसामान्यतः हे लिमिट कधीच पाळले जात नाही. कित्येकदा त्याच्या पाचपट अल्कोहोल रिचविले जाते.>>>
अशोकराव, तीस एम एल असणार
जर तीस एम एल च असेल, तर तीस एम एल घेण्यापेक्षा न घेणे आणि सज्जन ठरणे परवडते
मी फारच अवांतर बोलत असलो तर माझे प्रतिसाद उडवले गेले तरी मला मनात वाईट नाही वाटणार
Pages