"सत्यमेव जयते" भाग ९ - (Think Before You Drink)

Submitted by आनंदयात्री on 1 July, 2012 - 11:46

आज, १ जुलैच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1

अजून एक ज्वलंत आणि जगाला भेडसावणारा प्रश्न! सत्यमेव जयते कडून छान हाताळला गेलाय. डॉ. देशपांड्यानी आतिशय सोप्प्या -in Lay man terms-- भाषेत दारुची नशा ही सवय नसून एक आजार आहे हे छान समजावून सांगितल. आपल्या नशेबाजीचे अनुभव सांगण्याचे हिम्मत दाखवलेल्या लोकांच कौतुक वाटल पण विजय आपल्या आईला अजून का नाही भेटला?? करणच्या वडिलांची गोष्ट ऐकून तर खूप वाईट वाटल पण आमच्या इथे हा प्रश्न तर अजून भयानक आहे-- अस आपल मला वाटत. भारतात राहणारे मायबोलीकर जास्त सांगू शकतील.

आमीर खानने सुरुवातीलाच स्टुडिओत हजर असलेल्या पंचविशीतील प्रेक्षक वर्गाला 'तुमच्यापैकी कितीजण ड्रिंक घेता ?" असे विचारल्यावर जवळपास सर्वानी हात तर वर केलेच, पण दोन तरुण आणि दोन तरुणी यानी तर त्या पिण्याचे समर्थनही केले. पुढे जसजसा एपिसोड खुलत गेला आणि ज्याना 'अ‍ॅडिक्ट' (आमीरने हिंदीत 'बेवडा' आणि 'लत लग गई ऐसे लोग' असे शब्दयोजन केले) म्हटले गेले त्यांच्याच तोंडातून ते भयाण अनुभव समोर येऊ लागले त्यावेळी मात्र ऑडियन्स सुन्न झाल्याचे जाणवले.

सामान्य कामगार 'लक्ष्मण' च्या अनुभवाबरोबरच आमीर खानने थेट सुप्रसिद्ध लेखक-कवि श्री.जावेद अख्तर यानाच स्टेजवर बोलावून त्यांच्याही पिण्याच्या सवयीची आणि त्यानी भोगलेल्या दुष्परिणामाची माहीती त्यांच्याच तोंडून ऐकविली, त्याचा निश्चितच प्रभाव पडला.

पुढे दिल्लीतील नुकताच दहावी उत्तीर्ण झालेला 'किरण' एका नशेबाज मित्राच्या चुकीमुळे कार अ‍ॅक्सिडेंटमध्ये कसा मृत्युमुखी पडला हे त्याच्या वडिलांनी अश्रूपूर्ण वर्णन केले त्यावेळी निष्पाप जीवासाठीही दारू किती घातक होऊ शकते याचे प्रखर प्रत्यंतर आले.

मला राहूनराहून वाटले की, कार्यक्रमाच्या शेवटी आमीर खानने सभागृहातील परत त्याच तरुण-तरुणींना प्रश्न विचारायला हवा होता, तो असा की, 'ज्यानी ज्यानी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोशल ड्रिंक घेण्याचे समर्थन केले होते, त्याना आता या क्षणीही तसेच वाटते का?" मला वाटते झाडून सार्‍याजणांनी नकारार्थी उत्तर दिले असते. 'थिंक बीफोर यू ड्रिंक' अशी आमीरने जरूर चेतावणी दिली, पण खरेतर 'हीअरइनआफ्टर, नो मोअर ड्रिंक' अशीच तिथल्या उपस्थितांची भावना झाली असेल.

अगदी 'इफेक्टिव्ह' म्हणावे असे सादरीकरण झाले या एपिसोडचे.

अशोक पाटील

कार्यक्रमात सतत वाजणार्‍या टाळ्यांचा, त्याही आधी आमीरने वाजवायच्या आणि मग क्लु मिळाल्याप्रमाणे स्टुडियो ऑडियन्सने (की रेकॉर्डेड), कंटाळा आला.

मुंबईत अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलंय. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. रात्री 12.30च्या सुमारास वांद्र्यात ही घटना घडली. या घटनेच्या वेळी सोहेल खान कारमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय.

या घटनेनंतर पोलिसांनी सोहेल खानचा ड्रायव्हर धनंजयला अटक केली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता का याची चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय याप्रकरणी अभिनेता सोहेल खानची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

यापूर्वी सोहेल खान याचा मोठा भाऊ आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सलमान खान यानेही २००२ साली याच भागात दारूच्या नशेमध्ये आपली लँड क्रुझर ही आलिशान गाडी फुटपाथवर घुसवली होती. त्यावेळी फुटपाथवर झोपलेले कामगार जखमी झाले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता.
.----------------------------------------------------------------------------------------------------
.
आमीर ने जावेद अख्तरांबरोबर सलमान खान ला सुध्दा बोलवायला हवे होते....त्याने सुध्दा दारु च्या नशेत बरेच कारनामे केले आहेत...

>>भरत मयेकर | 2 July, 2012 - 08:27 नवीन
कार्यक्रमात सतत वाजणार्‍या टाळ्यांचा, त्याही आधी आमीरने वाजवायच्या आणि मग क्लु मिळाल्याप्रमाणे स्टुडियो ऑडियन्सने (की रेकॉर्डेड), कंटाळा आला.
<<

+१००

भरत मयेकरजी यान्ना + १

ह्या भागाचा विषय आवडेश...........रच्याकने.........मायबोलीवर मद्यपानविषयक दोन धागे आहेत. त्यात हिरीरीने मद्यपानाचे किस्से रंगवून सांगणार्‍या सदस्यांची (सोबर) मते इथे वाचायला आवडतील...... Wink Proud Light 1

दुर्दैवी आहेत जे दुसर्‍यांच्या नशापाण्याची शिकार होतात. तुम्हाला जेव्हढी प्यायची तेव्हढी प्या पण मग घरी जातांना टॅक्सी करा किंवा ज्याने दारु घेतलेली नसेल अशा व्यक्तीला चालवण्यासाठी बसवा. मद्यपान केल्यावर गाडी चालवण्याचा धोका पत्करु नका. या विषयावर एक मोठी चर्चा मायबोलीवर झालेली आहे.

दारुड्यांच्या बीबीवर ३०० प्रतिसाद आणि नो अल्कोहोल च्या बीबीवर २० प्रतिसाद... जय मायबोलि Proud

मलाही विषय आवडला. काही अतिशय प्रतिभावान, हुशार परिचितांचे आयुष्य दारूच्या व्यसनामुळे वाया गेल्याचे प्रत्यक्ष बघितले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनाही पाहिल्या आहेत.

अंमली पदार्थांचा विषय फार मोठा असल्याने तो यात समाविष्ट केला नसावा. त्यावर वेगळा कार्यक्रम होईल का याचे औत्सुक्य आहे. कदाचित दारूचे दुष्परिणाम दाखवल्यावर इतर अंमली पदार्थांच्या बाबतीत कार्यक्रम करायचे आवश्यक वाटणार नाही आमीरच्या संचाला.

---------------------------------------------------------------------------------------------------

दिनुभाऊ, काकाकुवा Biggrin

काकाकुवांची पोष्ट खरंच विचार करायला लावणारी आहे. Sad
आमच्या जुन्या घराशेजारी परिट होता, त्याला २ मुली आणि एक मुलगा.. टपरीत लाँड्री चालवायचा. चालता फिरता होता.. पण काम करताना कायम दारू प्यायलेला असायचा. वर्षभरापुर्वी वगैरे थोरल्या मुलिचं लग्न केलं, एक मुलगी बाकी आहे लग्नाची आणि मुलगा तर फारच लहान आहे.
तो परीट गेला मागच्या आठवड्यात अचानक. दारूमुळेच. आपल्या व्यसनामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या मागे वाताहत होईल असा विचार एकदाही यांच्या डोक्यात येत नसेल काय?
मला अजून एक प्रश्न पडतो... एखादी स्त्री (कुटुंब असलेली) अशा प्रकारे व्यसनाला बळी पडू शकते का? तुमच्या पाहण्यात असं उदा. आहे का?

एखादी स्त्री (कुटुंब असलेली) अशा प्रकारे व्यसनाला बळी पडू शकते का? तुमच्या पाहण्यात असं उदा. आहे का?

मीनाकुमारी

मीनाकुमारीला 'कुटुंब' म्हणावं असं फारसं कुणी नव्हतं. फक्त नवरा कमाल अमरोही होता. तो तिच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसल्याने हे उदाहरण अतार्किक, अचाट, आणि खोडसाळ यांत मोडतं.

>>तुमच्या पाहण्यात असं उदा. आहे का?
हा प्रश्न आहे. मीनाकुमारी तुमच्या प्रत्यक्ष पाहण्यात होती? Uhoh

मदिरापानाच्या बीबीवर आलेल्या पोष्टींची संख्या पाहून नाक मुरडण्याचा प्रकार त्या 'किस्से' धाग्यावर आणि इथेही झाला.

दोन्ही धाग्यांचे हेतू पूर्णपणे वेगळे आहेत. दारू पिऊन वाहन चालवू नये हे जितके खरे आहे तितकेच जगात दारू आहे आणि ती प्यायली जाते हे खरे आहे.

मदिरापानाच्या धाग्यावर अभिप्रेत असलेले प्रतिसाद हे दारूचे उदात्तीकरण करणारे नव्हते तर जे कोण पितात त्यांची टेस्ट कशी आहे आणि नवीन लोकेशन्स कोणती आहेत इतपत मर्यादीत होते. दारू प्याच असे सांगीतले जात नव्हते.

आमीर खानहा हाही भाग मी पाहिला नाही. (मला तो मुस्लिम मुलाला हिंदू सासुरवाडीच्या लोकांनी मारले तोच भाग अती कंटाळवाणा वाटल्यामुळे नंतर कष्ट घेतले नाहीत). (हे वै म आहे).

दारू पिऊन वाहन चालवू नयेच. (मी चालवतो आणि पकडा गया वो चोर है या उक्तीचा गैरफायदा घेतो हेही खरेच)

पण मुळात दारू पिऊन वाहन चालवू नये हे पटतेच.

पण आपली संस्कृती आणि आपल्याकडची अवस्था वेगळी आहे. आपल्याकडे दारू मिळते ती वाईन शॉप्स आणि परमिट रूम्समध्ये. वाईन शॉपमधून दारू विकत घेणारे (सहसा) स्वतःच्या ठिकाणी दारू पितात व नंतर त्यांना (सहसा) कुठे जायचे नसते. जे परमिट रूम्समध्ये घेतात त्यांना घरी जायचे असते. (बहुतेक पाश्चात्य देशांमध्ये, मला माहीत नाही) इतर ठिकाणी असे असावे की तुम्ही स्वतःच्याच घरी घेत बसलात तर घरचे काही म्हणणार नाहीत इत्यादी. आपल्याकडे घरात माणसे असतात. मोठी माणसे, मुले, बायका (ज्या घेण्याचा तिरस्कार करतात वगैरे). त्यामुळे माणूस बाहेर जाऊन घेतो व वाहन चालवत घरी येतो.

स्वतःच्या इच्छा, कायद्यांचे भान आणि परिपक्वता याबाबतीत आपला समाज अविकसित राहिला आहे इतकेच म्हणावेसे वाटते.

-'बेफिकीर'!

कार्यक्रम उत्कृष्ट झाला.
काकाकुवांची पोष्ट खरंच विचार करायला लावणारी आहे. > अनुमोदन
दक्षिणा असे एक उदाहरण आहे. माझ्या ताई कडे कामाला येणाऱ्या मुलीच्या आईला दारूचे व्यसन होते. मुलगी स्वभावाने खूप चांगली , कामसू आणि प्रेमळ. तिला दोन भाऊ. वडील ही मुले शाळेत असताना वारले . वडील वारल्यावर आई घर काम करायला लागली आणि त्यातच दारू चे व्यसन लागले . जी मुलगी माझ्या ताई कडे कामाला होती तिला खूप वाईट वाटायचे कारण लोक विचारायचे आणि आई घरी खूप चीड चीड करायची. ताईने आणि माझ्या आईने पण त्यांना एक दोनदा घरी जाऊन समजावले. काकी तश्या स्वभावाने चांगल्या होत्या ऐकायच्या. पण काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या. व्यसन वाढत चालल्यावर मुलीच्या लग्नाकडे पण दुर्लक्ष. मुलगी दहावी पास होती . मुलगी चांगली असल्यामुळे शेजारच्या बाईने एक स्थळ आणले. त्या मुलीने (नाव देत नाही ) माझ्या आई आणि बहिणीला सांगितले. माझ्या बहिणीकडे लग्नाची बोलणी झाली. बहिणीने मुलाला सगळी सत्य परिस्थिती सांगितली आणि मुलीची खात्री दिली. माझ्या बहिणीने आणि भाउजीनी कन्यादान केले. लग्नानंतर काही दिवसांनी स्वस्तातील दारू आणि ती पण सतत पिऊन काकी वारल्या. मुलगी तशी सुखात आहे पण आईबद्दल सासरच्यांकडून आणि नवर्या कडून टोमणे ऐकावे लागतात. आईच्या आठवणीने अजूनही रडते. दारूच्या व्यसनामुळे या मुलीला आणि तिच्या भावांना आईचे प्रेम मिळालेच नाही.

इथे किंवा देशातही, दारु प्यायलानंतर गाडी चालवु नयेच! बारमधुन घरी जायचे झाल्यास रिक्षा/टॅक्सी चा पर्याय उपलब्ध आहेच.
घरी कोणी आले आणि ड्राईव्ह करुन जाणार असतील तर दारुचा 'दा' ही उच्चारायचा नाही असा आमच्याघरी अलिखित नियम आहे. त्यानंतरही कोणी स्वतःच आणलेली पिणार असलाच तर त्याचे लिमिट त्याला ठाऊक असतेच.

आमीरने संपूर्ण भागात दारु पिणे वाईटच असा सूर न लावता, दारु पिणे हा अत्यंत वैयक्तिक निर्णय असून आपल्या पिण्याने इतरांना (यात नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि आजूबाजूचे लोक सगळे आले) काही त्रास होऊ नये आणि कायद्याचे उल्लंघन होऊ नये असा पवित्रा घेतला... जो योग्य वाटला.

मीनाकुमारीला 'कुटुंब' म्हणावं असं फारसं कुणी नव्हतं. फक्त नवरा कमाल अमरोही होता. तो तिच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसल्याने हे उदाहरण अतार्किक, अचाट, आणि खोडसाळ यांत मोडतं.

एका माणसाचेही कुटुंब असते... कुटुंब असो वा नसो दारुला बळी पडलेल्या व्यक्तीचे लिवर एकाच पद्धतीने खराब होते. आणि तिचा अल्पायुष्यात होणारा अंत दारुणच असतो.

भाग अजुन पाहीला नाही.
पण दक्षिणा तुझ्याप्रश्नाच्या उत्तरासाठी हि लिंक.
लेख मागच्या वर्षीचा आहे. आणि या वर्षीही असाच लेख पेपरमधे वाचलेला आहे.
"डॉ. अनिल अवचट यांच्या ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण त्याच ‘मुक्तांगण’चा ‘निशिगंध’ नावाचा महिलांसाठी स्वतंत्र विभाग आहे."

हा भाग आवडला.

प्रॉडक्शन टीमच्या डोक्यात समस्या काय आहे, तिचा कुठला आवाका आपण मान्डू शकतो आणि ती कशी मांडावी आणि त्याबद्द्लचे उद्देश क्लीअर आहेत हे जाणावलं. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवरील माणसाना बोलावल्यामुळे हा भाग जरा बॅलन्स्ड वाटला.

विनयजीच्या उदाहरणावरून एका प्रसिद्ध मराठी दैनिकामधला एक पत्रकार आठवला. त्याचे वयाच्या तीसाव्या वर्षीच लिव्हर खराब झाले होते. मात्र, आपण आता मरणार हे समजल्यावर मात्र तो पूर्णपणे व्यसनमुक्त झाला. अन्यथा महिन्यातून एकदा जेजेमधे अ‍ॅडमिट व्हायचे हे नियमित होते. आता मात्र पूर्णपणे सोबर.

दारु पिणे हा अत्यंत वैयक्तिक निर्णय असून आपल्या पिण्याने इतरांना (यात नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि आजूबाजूचे लोक सगळे आले) काही त्रास होऊ नये आणि कायद्याचे उल्लंघन होऊ नये असा पवित्रा घेतला<<<
मी हा एपिसोड बघितला नाही पण जर हे खरे असेल तर दुसर्‍या बाफंचा इथे संदर्भ आणणे चुकीचे नाहीये का? त्या दोन्ही बाफंवर दारू पिऊन त्रास देणे, दारूत आयुष्य बुडवणे, कायदे तोडणे यातील कशाचेही समर्थन करण्यात आले नव्हते.

Pages