Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चामखीळ, मस, रक्ताचे तीळ आणि
चामखीळ, मस, रक्ताचे तीळ आणि इंग्रजीत ज्याला गुसबम्प्स म्हणतात असे मांसाचे तीळ लेझर ट्रीट्मेंत शिवाय घरच्या घरी काढायचा काही उपाय आहे का?
जनरली आपण ज्याला अंगावर काटा
जनरली आपण ज्याला अंगावर काटा येणे, शहारा येणे म्हणतो त्याला गूजबंप्स म्हणतात ना?
हो नीधप !
हो नीधप !
गूझ पिंपल्स असाही शब्द प्रयोग
गूझ पिंपल्स असाही शब्द प्रयोग ऐकला आहे
साधना तै चुकून हा धागा आता
साधना तै
चुकून हा धागा आता (शेवटून ) वाचला. कडुनिंब भारीच आहे.
(वाचायला हरकत नाही. मी पण होणार सुंदर ! )
खरे तर काकडीचा ताजा रस, दही,
खरे तर काकडीचा ताजा रस, दही, दही+लिंबु+मधाचे थेंब, टॉमेटोचा रस दररोज उन्हाने काळवंडलेल्या त्वचेला लावल्यास त्वचा पुर्ववत होते. हा उपाय खात्रीशीर आहे, आणी स्वानूभव आहे. जुन्या मायबोलीवर वाचुनच मी केला होता.
मला एकदा असा चामखिळ आला होता.
मला एकदा असा चामखिळ आला होता. मी त्यावर कॉर्नकॅप लावण्याचा प्रयोग केला. ३र्या दिवशी कॅपबरोबर निघून आला. कणभर अजून त्वचेला चिकटला होता तो हातानेच निघाला. मग हुळहुळ्या झालेल्या बेसच्या त्वचेवर सोफ्रामायसिन लावले.
वि.सु. : हे मी माझ्या जबाबदारीवर केले होते. ज्यांना करायचे असेल त्यांनी स्वतंच्या जबाबदारीवर करावे. घरच्या घरी काही करण्याजोगे आहे का असं विचारलं गेल्यामुळे हा केलेला उद्योग लिहिला. चामखिळ खूप जून आणि खूप मोठा असेल तर एका कॉर्नकॅपने काम होणार नाही किंवा कदाचित कितीही कॉर्नकॅप्सने उपयोग होणारच नाही.
सॅलॅक्टीन नावाचे एक केमीकल
सॅलॅक्टीन नावाचे एक केमीकल रोज चामखिळीवर लावल्यानंतर चार पाच दिवसात चामखिळ निघुन जाते. डॉ ने लिहून दिलेले औषध आहे. तरीसुद्धा आपल्या जबाबदारीवर उपाय करावा. हे केमीकल लावताना दुखत नाही. दोन दिवसात चामखिळ सुकून जाते व मग खपलीप्रमाणे निघून जाते.
खरे तर काकडीचा ताजा रस, दही,
खरे तर काकडीचा ताजा रस, दही, दही+लिंबु+मधाचे थेंब, टॉमेटोचा रस दररोज उन्हाने काळवंडलेल्या त्वचेला लावल्यास त्वचा पुर्ववत होते
हे सगळे वेगवेगळे वापरावे ना?
माज्या नाकावरची त्वचा खुप
माज्या नाकावरची त्वचा खुप तेलकत आहे व खराब ही जाली आहे व त्या थिकानी white heads हि आले आहेत काय उपाय केल्याने त्वचा व्यवस्थित होईल
तसे काही नाही साधना.
तसे काही नाही साधना. दही+मध+लिंबुरस्+टॉमेटो असे प्रत्येकी १ छोटा चमचा या प्रमाणात घेऊनही एकत्र करुन वापरले तरी चालते. ( टॉमेटो आणी लिंबाचा रस पाव चमचाच वापरावा,कारण त्याने त्वचेला थोडी खाज सुटते, त्वचा तेलकट असेल तर कमी त्रास होतो) अगदी नुसते कुठल्याही फळांचा रस लावला तरी त्वचेला ते टॉनिकच असते.
सॅलॅक्टीन नावाचे एक केमीकल
सॅलॅक्टीन नावाचे एक केमीकल रोज चामखिळीवर लावल्यानंतर चार पाच दिवसात चामखिळ निघुन जाते. >>
सॅलॅक्टीन पेंट ना?? हो हो.. खरे आहे.. हे औषध हातापायांच्या बोटांवर जे कॉर्न असतात त्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. मी कॉर्नसाठी ऑलरेडी वापरलेले आहे. ते उपयोगी पडेन नक्कीच..
एक शंका- seborrheic keratosis म्हणजेच चामखीळ का?? गुगल मध्ये seborrheic keratosis सर्च केल्यावर जे फोटो दिसले तसेच माझ्या अंगावर आहेत. मी त्यांना चामखीळ समजत होते.
माझ्या डोक्यावर भरपुर बारिक
माझ्या डोक्यावर भरपुर बारिक पुरळ आहे.गालवरहि थोडे आहे.मोहरी आणि कच्चे दुधाचा प्र्योग करण्याचा विचार चालु आहे योग्य आहे का?हे मला अचान्क येतात
माज्या नाकावरची त्वचा खुप
माज्या नाकावरची त्वचा खुप तेलकत आहे व खराब ही जाली आहे व त्या थिकानी white heads हि आले आहेत काय उपाय केल्याने त्वचा व्यवस्थित होईल
>>>
हे कायमचे जात नाहीत. तेलकट त्वचा असेल तर नाकावर व्हाईट हेड्स त्रास देतातच देतात. काही गोष्टी कायमच्या अंगी बाणवणे चांगले. उदा. अशा लोकांना सकाळी उठल्या उठल्या नाकाभोवती तेलकटपणा जाणवतो. तेव्हा उठल्यावर लगेच शक्यतो कोमट पाण्याने व ऑईल कंट्रोल फेशवॉस वापरून चेहरा धुवावा. टर्किश नॅपकीनने चेहरा रगडून पुसावा (विशेषता: नाकाच्या आजुबाजुचा भाग). अॅप्रिकॉट फेशियल स्क्रब्स मिळतात. बाहेरून घरी आल्यावर स्क्रब ने चेहरा स्वच्छ व चोळून धुवावा.
दही + चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन) लावून वाळल्यानंतर रगडून धुणे हे ही करता येईल.
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally कोनत्या company चा वापरावा. अॅप्रिकॉट फेशियल स्क्रब्स medical मधे उपलब्ध होतिल क?
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally कोनत्या company चा वापरावा. अॅप्रिकॉट फेशियल स्क्रब्स medical मधे उपलब्ध होतिल क?
माझ्या डोक्यावर भरपुर बारिक
माझ्या डोक्यावर भरपुर बारिक पुरळ आहे.गालवरहि थोडे आहे.मोहरी आणि कच्चे दुधाचा प्र्योग करण्याचा विचार चालु आहे योग्य आहे का?हे मला अचान्क येतात>>
कोणीतरी प्रतिसाद द्या.मोहरी आणि कच्चे दुधाचा प्र्योग आणखी कोणी केला आहे का? मि हिमालयचे फेसवाश वापरायला सुरु केले आहे दोन दिव्सापासुन बघु फरक पडतो का काहि!!!
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally कोनत्या company चा वापरावा>>
मला हिमालयाचा सूट करतो. तुम्ही मेडिकल मधून एखादा ब्रँड घेऊन वापरून बघा. तुमच्या त्वचेचा तेलकटपणा चेहरा धुवून पुसल्यानंतर कमी झालेला (चेहरा कोरडा) जाणवला पाहिजे. एव्हरयुथ चे फे.वॉ. अजिबात एफेक्टिव्ह वाटत नाहीत मला.
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally कोनत्या company चा वापरावा>> फॅब इंडियामधे 'टी ट्री'चा फेस वॉश मिळतो तो ऑइली स्कीनसाठी बेस्ट आहे. माझी स्कीन प्रचंड ऑइली आहे. ऑइल वेल्स आहेत अगदी. मला खुप सार्या ब्रँडसनंतर हे सगळ्यात जास्त सुट झालं.
शिवाय मॅट लुकसाठी एक स्प्रेही मिळतो. फॅबचाच. तोही चांगला आहे.
हिमालयाचा नीम फेस वॉश बेस्ट
हिमालयाचा नीम फेस वॉश बेस्ट आहे.
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally
ऑईल कंट्रोल फेशवॉस normally कोनत्या company चा वापरावा> ORFILAME चा
Pure Nature Organic Tea Tree & Rosemary Purifying Wash & Tone Gel मस्त आहे मि वाप र ला मला फरक वाटला.
हिमालयाचा नीम फेस वॉश बेस्ट
हिमालयाचा नीम फेस वॉश बेस्ट आहे.>>>+१
मी हिमालयाचा नीम फेस्वाश
मी हिमालयाचा नीम फेस्वाश वापरते आहे मागिल तिन आठवड्यापासुन,पिंपल्स्वर काहि परिणाम झाला अस वाटत नाहि . साफि(blood purifire) tonic कस आहे? गरोदरपणात घेतले तर चालते का?कोणि सांगु शकेल का??? प्लिज लवकर रिप्लाय द्या........
हिमालयाचा नीम फेस वॉश बेस्ट
हिमालयाचा नीम फेस वॉश बेस्ट आहे.>
शिवाय त्यांच नीम च स्क्रब आणि फेस पॅक पण खुप छान आहे.
अमृता, गरोदर असताना काही
अमृता, गरोदर असताना काही वापराल ते प्लीज तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा.
मेधा आभारि.... मला आणखी एक
मेधा आभारि....
मला आणखी एक प्र्श्न विचारायचा होता.मला आमच्या येथिल आयु.दुकानात d.jain ची जास्वंदि आणि अँलेवेरा जेल मिळाले आहेत ति ओरिजनल आहेत ना?माझ्या तेलकट बारिक पिंपल्स्वाल्या त्व्चेसाठि आणि कोरड्या कोंड्याच्या केसांसाठि किति फायदेशीर आहे?काहि साईड ईफेक्ट होणार नाहि ना?
माझ्या पतिचि त्वचा खुपच काळवंडली आहे. अँलेवेरा जेल फायदेशीर आहे? उन्हात काम असते ना?
माझ्याकडे आयुशचे अँलेवेरा
माझ्याकडे आयुशचे अँलेवेरा फेस्वॉश आहे..कोणाला अनुभव आहे का? काय फायदा होईल त्याचा..अँलेवेरा कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी जास्त फायदेशिर आहे कोणि सांगु शकते आहे का?
कृपया नवर्याच्या राकट त्वचेसाठि काहितरि उपाय सांगा.
आमच्या येथिल आयु.दुकानात
आमच्या येथिल आयु.दुकानात d.jain ची जास्वंदि आणि अँलेवेरा जेल मिळाले आहेत ति ओरिजनल आहेत ना?<<<
तुमच्या येथील दुकानातले ओरिजिनल आहे की नाही हे इथे कसे सांगणार?
उर्जिता जैन चे सगळे प्रॉडक्टस उत्तम आहेत हे वारंवार या बाफवर य लोकांनी य वेळा म्हणलंय. आधीचे वाचायची तसदी घ्यावी.
d.jain आणि ऊर्जिता जैन हि
d.jain आणि ऊर्जिता जैन हि वेगवेगळी उत्पादने आहेत ना?
त्यांच्या पूर्वीच्या डब्यांवर
त्यांच्या पूर्वीच्या डब्यांवर नुसते डॉ. जैन असायचे. अर्थात त्यांच्याच दुकानातून घ्यायचे त्यामुळे ते त्यांचेच असायचे.
Pages