रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली'

Submitted by रचना. on 28 June, 2012 - 00:56

थ्री डी टी सेट ला भरभरुन दिलेल्या प्रतिसादासाठी खुप धन्यावाद !
खास छोट्या दोस्तांसाठी ही आहे छोटुशी बाहुली

सुलेखा यांनी क्विलींगच्या तयार विकतच्या पट्ट्यांना विकल्प विचारला होता.
तर हा आहे पेपर श्रेडर

DSCF0309.JPG

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929

गुलमोहर: 

हे चूक आहे. आगामी आकर्षण म्हणून काही तरी वेगळंच दाखवलं होतस चौथ्या भागात. आणि आता हे असले भन्नाट प्रकार दाखवत सुटली आहेस. हे बघून पेपरला हात लावायचे पण धाडस होणार नाही माझे. भयंकर भारी आहे हे प्रकरण. जरा माझ्यासारख्याला जमेल असे काही दाखव ना Happy

अफलातून. ___/\__
लेकाचा प्रश्न - " मावशीने बाहुलीला डोळे का नाही काढले ?"
बाहुली आवडली त्याला पण.

खुप क्युट झाली आहे बाहुली. कलर्सपण खुप छान आहेत. तिच्या साइड प्रोफाइल्समधे तिचे कुरळे केस इतके छान दिसताहेत. मस्त एकदम !

अगा बाब्बो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

हे कागदापासुन केलय???????????

एवढ सुंदर???????????

जबरी कला आहे बॉ Happy

नको शिकऊस आम्हाला तुझी कला, हरकत नाही.
पण किमान अशी ही बाहुली , टी सेट विकायला तरी ठेव. Happy आणि पहिली ऑर्डर माझी नोंदवुन घे.

वा!

सगळ्यांना धन्यवाद!
माधव,
पुढचा लेख नक्की आगामी आकर्षण (मासिकातील पानांपासुन निरनिराळ्या गोष्टी) यावर लिहणार.
हे पण सोप्पच आहे. जमायला हरकत नाही. ३ र्‍या उद्योगात प्रतिसादात लिहिलय, बघा. मला नीट सांगता येत नाहीये हाच प्रॉब्लेम आहे.
रुणुझुणू ,
तुझ्या लेकाचे उद्योग पण अफलातून आहेत. बाहुलीचं तोंड इतकं लहान आहे की डोळे, नाक, ओठ काढले तर ती विद्रुप दिसतेय. काही वेगळं शोधावं लागेल त्यासाठी.
मी_चिऊ,
कित्ती हुशार ग तु ..........अगं, विकणे सुरु केले आहे म्हणुन तर नीट सांगता येत नाही हे कारण देऊन कृती टाळतेय. Wink
अगं, सध्या अजिबातच वेळ नाहिये. दुकान थाटणे सुरु आहे. वेळ मिळाला की व्हिडिओ टाकेन.

फारच अप्रतिम!! आणि वर प्रतिसाद दिलेल्या सर्वांना १००% अनुमोदन!! विशेषत: माधवना..:स्मित:

कित्ती हुशार ग तु ..........अगं, विकणे सुरु केले आहे म्हणुन तर नीट सांगता येत नाही हे कारण देऊन कृती टाळतेय.>> Lol
चालेल, सुरु केलस की पत्ता दे दुकानाचा.

मस्तच बाहुली !!!
नाण्यामुळे खरी साईझ कळतेय नाहीतर हे इतकं बारीक काम आहे हे खरचं कळलं नसतं!!!!! अनुमोदन........

Pages

Back to top