अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो पुन्हा टाकले आहेत. एक सोडून. तो सापडला की टाकेन.

तोवर एका एक्झिबिशनमध्ये विकायला मांडलेली ही मातीची भांडी बघा :

Pages