'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
मला आवडणारा पाऊस. : पावसाळा
मला आवडणारा पाऊस. :
पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गगंध. पहिला पाऊस पडल्या पडल्या प्रगट होणारे लाल रंगाचे मखमली गोल आकाराचे छोटे छोटे मृगाचे किडे. अगदी छोटे न दिसण्यासारखे तुरु तुरु पळणारे खेकडे, छोटी छोटी टणाटण उड्या मारणारी बेडक्यांची पिल्ले. ओलीचिंब होऊन अत्यानंदाने डोलणारी झाडे-झुडपे, वेली. झुळू-झुळू वाहणारे गढूळ पाण्याचे झरे, अंगणात भरलेले पाणी, आणि त्यात आम्ही सोडलेल्या होड्या. बेडकांचे आनंदगीत, नळ्यातून्-कौलातून ओघळणारया पागोळ्या, त्याच्या खाली भांडी लावून घरात भरलेले पाणी. पावसाचा आवाज, गढूळ पाण्याने दुथडी भरून वहाणारी नदी. डोक्यावर धरलेली छत्री उडून जात असतानाही पूर पहायला जाण्याची आमची लगबग. सकाळी लवकर ऊठून बैल आणि नांगर घेऊन जाणारे शेतकरी. आणि बरेच काही आठवते
जागू, नवीन भाग, या भागातल्या
जागू, नवीन भाग, या भागातल्या ११११ पोस्ट पुर्ण झाल्या की काढ.
शोभा, आणि गंमत म्हणून तरवा
शोभा, आणि गंमत म्हणून तरवा लावणे, डोक्यावर इरली घेऊन बाकिच्यांबरोबर भातलागवड करण्यासाठी केलेल्या चिखलात आरामात चालणे. आणि बरेच काही..........
दिनेशदा, आम्ही सुद्धा ईथे असंच म्हणतो. "कोकणातल्या पावसासारखा पाऊस नाही "
परत एकदा पावसाळ्यात चार महिने कोकणात जाऊन रहावे, मनसोक्त पावसाळा अनुभवावा असे वाटते बघु कधी जमते ते !
"कोकणातल्या पावसासारखा पाऊस
"कोकणातल्या पावसासारखा पाऊस नाही "
परत एकदा पावसाळ्यात चार महिने कोकणात जाऊन रहावे, मनसोक्त पावसाळा अनुभवावा असे वाटते बघु कधी जमते ते ! >> प्रज्ञा असं आठवल की सर्व सोडुन गावी पळायची ईच्छा होते पण नाहीच जमत
मला आवडणारा पाऊस मस्तच शोभा तुमच्यासाठी खास
इनमीनतीन काय सुरेख फोटो
इनमीनतीन काय सुरेख फोटो टाकलेत ! धन्स !!
हुश्श वरुन वरुन सगळे
हुश्श वरुन वरुन सगळे वाचले.
सगळ्यांची बुलबुलच्या बाळाबद्दलची सुचना लक्षात घेतली आहे.
माधव बारसे तुम्हा सगळ्यांच्या सवडीने करू. ठरवा.
शशांक तुम्ही टाकलेय त्याच जातीचा बुलबुल आहे.
उद्या ९ वा भाग काढते.
आजच आले सगुणा बाग व माथेरानची ट्रिप करून. सगूणाबाग मला आवडली. श्रावणीला तर परत जायचे आहे.
नितीन मस्त फोटो. जागू,
नितीन मस्त फोटो.
जागू, माथेरानला पाऊस मिळाला का ?
खरेच कोकणातल्या पावसासारखा
खरेच कोकणातल्या पावसासारखा पाऊस कुठे नाही. दारावरुन गळणा-या पागोळ्या बघत मी दिवसच्या दिवस वाया घालवेन.
आता इथे नी तिथे सगळेजण खिडक्यांवर पत्रे वगैरे बसवतात त्यामुळे पावसाचा तडतड ताशा वाजवल्यासारखा आवाज येतो. मला तो अजिबात आवडात नाही. मी इथे बेलापुरला राहायला आले तेव्हा आजुबाजुची सगळी घरे रिकामी होती. आमच्याही खिडक्यांवर पत्रे नव्हते (त्यामुळे पाणी घरात यायचे ). पाउस पडायला लागला की इतक्या शांतपणे पडायचा की मला त्याचे नवल वाटायचे. आवाजही नही करता.... मला तो अगदी शांतपणे एका लईत कोसळणारा पाऊस बघत बसायला खुप आवडायचे.
आता इतका आवाज होतो की जोराचा पाऊस असताना घरात ओरडुन बोलावे लागते नाहीतर दारेखिडक्या तरी बंद कराव्या लागतात.
दिनेश तुमचा विश्वास बसणार नाही पण या वर्षी मे महिन्याचे शेवटचे १५ दिवस आंबोलीत पाण्याचा दुष्काळ पडला. पुर्ण गाव पाणीहीन. मी माझ्या घरासमोरच्या भाजीचे जे फोटो इथे मिरवत होते ती सगळी भाजी सुकून गेली. माझी कुंड्यामधली विकतची झाडे काकाने कशीबशी बोरिंगचे पाणी देऊन वाचवली. माझ्या आजीच्या घरासमोरची विहीर जी आजवर कधीही आटली नव्हती ती यावर्षी पहिल्यांदा आटली. खरेतर आंबोलीत पाऊस १५ मे पासुन धुमधड्याक्यात सुरू होतो पण यावर्षी पावसाने पाठ फिरवलीय. अजुनही पाऊस नाही. (आणि मी इथे स्वप्ने बघत होते की पहिला पाऊस पडला की चढलेले मासे खायला जाणार म्हणुन... )
साधना, फार काळजी करू नको.
साधना, फार काळजी करू नको. कोल्हापूरपर्यंत मान्सून येऊन रूसून बसलाय. त्याचा रुसवा गेला की येईल तो पुढे.
साधना, खरेच विश्वास बसत नाही.
साधना, खरेच विश्वास बसत नाही. गोव्यातला उन्हाळा असह्य झाल्यावर आम्ही अंबोलीला, मे महिन्यात सहल
काढायचो. मे महिन्यातही तिथे पावसाळी वातावरण असायचे !
माझ्या आजीच्या घरासमोरची
माझ्या आजीच्या घरासमोरची विहीर जी आजवर कधीही आटली नव्हती ती यावर्षी पहिल्यांदा आटली. खरेतर आंबोलीत पाऊस १५ मे पासुन धुमधड्याक्यात सुरू होतो पण यावर्षी पावसाने पाठ फिरवलीय.
या वर्षी राज्यात काही ठिकाणी १९७२ सारखा दुष्काळाची स्थिती आहे,पण नेत्यांना त्याची फिकीर नाही,तशी त्यांना त्याची झळही बसत नाही, नाहीतर त्यांना तिकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुठे आहे ,?
पण तिकडे आंबोलीत १-२ दिवसात पाऊस सुरु होईल अशी आशा बाळगु या ...
ईनमीन तीन धन्यवाद. खरचं
ईनमीन तीन धन्यवाद. खरचं कोकणात गेल्यासारख वाटंल. फक्त हे फोटो कुठले ते सांगा आता.
फक्त हे फोटो कुठले ते सांगा
फक्त हे फोटो कुठले ते सांगा आता >>> काही मानगावचे तर काही देवरुखचे आहेत
अनिल इथे शहरात लोकांना
अनिल इथे शहरात लोकांना माहितही नाहीय मुंबई सोडुन बाहेर दुष्काळ आहे ते. मुंबईत सगळ्याचाच सुकाळ आहे...
दिनेशदा माथेरानला पाऊस आम्ही
दिनेशदा माथेरानला पाऊस आम्ही गेलो आणि रिमझीम पडायला लागला.
आमच्याइथे आता ढग भरतात. अस वाटत आता जोरात पाउस पडणार थोडा शिंपडतो आणि लगेच पळून जातो.
साधना मी कमळे आणली सगुणाबाग मधून.
मी सध्या कमळे दोन टबांमध्ये ठेवली आहेत. तिकडे ३ रंगांची होती. मी तिन्ही मागितली होती पण घरी येऊन पाहते तर जो दुर्मिळ पिवळसर रंग होता तोच त्यांनी नेमकी दिला नाही. निळे व लाल कमळ दिले आहे. ते आता कसे लाऊ ? दोन मोठे टब बाजारातून आणून त्यात माती घालून त्यात ती रुजवून वरून पाणी घालू का ?
मी कमळे आणली सगुणाबाग मधून
मी कमळे आणली सगुणाबाग मधून >>> वा आता आमची प्रभात सुमंगल होईल, कमळाचे प्रचि पाहुन
नितीन, देवरुखची नदी कुठली
नितीन, देवरुखची नदी कुठली ?
मुद्दाम उत्सुकता आहे, कारण आई सांगते त्याप्रमाणे मी ४ वर्षाचा असताना देवरुखला हरवलो होतो. मावशीचे लग्न होते आणि मी एकटाच बाहेर पडलो. एकटा गेलो कि कुणी नेले ते पण कुणाला माहीत नाही. लग्नाच्या
गडबडीत कुणाच्या लक्षातही आले नव्हते.
मी त्या नदीवर कुणालातरी सापडलो, लग्नघरातलाच असणार म्हणून कुणीतरी भल्या माणसाने आणून सोडले.
नवल म्हणजे, घरापासून नदी खुपच लांब आहे. (मावशीचे घर बाजारपेठेतच आहे.) अनेकवेळा सांगूनसुद्धा
मला इतक्या वर्षात, कुणीही तिथल्या नदीवर नेले नाही. कुठे सापडलो, ते पण कुणी सांगत नाही.
परत हरवेन, असे वाटत असेल !!
मधे काही दिवस इथे येऊ शकले
मधे काही दिवस इथे येऊ शकले नाही.. त्यामुळे खूपच चुकल्या-चुकल्या सारखं वाटत होतं. आत्ता सगळं वाचून काढलं. मस्तच चालल्याएत गप्पा.
जागू, हा भागही संपत आला की गं...
साधना, मांजर खरंच मतलबी असतं.
ईन मीन.. मस्त फोटो आहेत.
दिनेशदा..:स्मित:
दिनेशदा होय नितीन त्यासाठीच
दिनेशदा
होय नितीन त्यासाठीच मी प्रची सांभाळून ठेवतेय. :स्मितः
साधना, मांजर खरंच मतलबी
साधना, मांजर खरंच मतलबी असतं.
शांकली अनुभव आलेला दिसतोय
अरे मला कमळाच्या लागवडीच लवकर सांगा. मी दोन दिवस घरात आहे तोपर्यंत मला त्यांची लागवड करायची आहे. साधना तुझी कमळे अजून टब मध्ये आहेत का ?
परत हरवेन, असे वाटत असेल !!
परत हरवेन, असे वाटत असेल !! >>>
दा , देवरुखची सर्वात मोठी नदी बावनदी, त्यानंतर मुचकुंदनदी पण उन्हाळ्यात त्यात पाणी कमीच.
दुसरा प्रचि जो आहे तो बावनदीचा गणपतीच्या वेळचा आहे.
मांजर खरंच मतलबी असतं. >>> मी
मांजर खरंच मतलबी असतं. >>> मी सहमत नाही , मध्ये इथेच मांजरांचे किस्से वाचले होते त्यावरुन मांजरही इमानी असतात हेच दिसुन येत होत.
माझा ही एक किस्सा आहे मांजराने केलेल्या (हिस्स... विरुद्ध मांजर) कमालीचा पण नंतर कधीतरी.
माणस जशी विविध स्वभावाची
माणस जशी विविध स्वभावाची असतात कदाचित मांजरपण असु शकतील काही मतलबी तर काही जिवा भावाची
नाही गं जागू; मला मांजरांचा
नाही गं जागू; मला मांजरांचा असा अनुभव कधीच आला नाहीये! कदाचित सगळे प्राणी पक्षी मनापासून आवडत असल्यामुळे ह्या गोष्टी जाणवत नसतील!!
जागू, साधनाने लिहिले होते
जागू, साधनाने लिहिले होते कमळाच्या लागवडीबद्दल. तळाशी थोडी माती टाकून, टबमधेच ठेवावी लागतील.
नितीन, बावनदीच असणार (लहान बाळाला चालत जाण्याइतकी जवळ आहे ना )
अगं लहान डब्यात म्हणजे वारणा
अगं लहान डब्यात म्हणजे वारणा श्रीखंड ५०० ग्र. किंवा तत्सम आकाराच्या डब्यात माती घाल (डब्याला भोक नको करुस), त्या मातीत कमळ लाव आणि मग तो डबा रिकाम्या टबात ठेव. टब मोठा पाहिजे, आपण कपडे भिजत घालतो तेवढा. तळाशी डबा ठेवलास की हळूहळू तोटीने किंवा तांब्याने टबात बाजुने पाणी ओत. टब पुर्ण भरुदे. कमळे कायम पाण्यातच राहावी लागतात.
पाण्याने भरलेल्या टबात डबा ठेवायला गेलीस तर माती वर येणार. म्हणुन आधी रिकाम्या टबात डबा ठेवायचा आणि मग पाणी भरायचे. आणि हे सगळे लवकर कर. मला तर त्याने प्लेस्टिकमध्ये माती घालुन त्यात कमळ आणि मग एका मोठ्या प्लेस्टिकमध्ये पाणि भरुन त्यात लहान प्लेस्टिक असे करुन दिले होते. कमळे पाण्याबाहेर टिकत नाहीत.
अगं मी दोन फुट व्यासाचे
अगं मी दोन फुट व्यासाचे मातीचा गोल टब आणलाय, त्यात कमळ लावलेय. गावी कधी नेणार ते माहित नाही.
धन्स साधना. त्यांनी मला मोठी
धन्स साधना. त्यांनी मला मोठी मुळेच दिली आहेत. उद्याच करते आता हे उद्योग.
हो दीनेश दा काकडी नर फुलेच
हो दीनेश दा काकडी नर फुलेच येतात काहि उपाय सान्गा न प्लीज ????
आणी जास्व्दाला कीड लाग्ली आहे काय करु ?
ही माहिती नवव्या भागात हलवली
ही माहिती नवव्या भागात हलवली आहे.
Pages