वैधानिक इशारा
ह्या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्ती तसेच इतर माबोकरानी हा लेख हलके घ्यावा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूनम ताईवर लेख लिहून झाला आणि प्रतिक्रियेत श्री. रा. रा. लेख-हायज्याकेश्वर उर्फ बेफिकीर यांनी प्रतिलेख लिहिला, त्यानंतर श्री हह यांचे समाधान झाले नाही, त्यांनी श्री. रा. रा. लेख-हायज्याकेश्वर उर्फ बेफिकीर यांनी हायज्यक केलेल्या प्रतीलेखाचा उर्वरित कोथळा काढला तरीही थोडीसी अंगात धुगधुगी शिल्लक होती. सरतेशेवटी श्री किरण यांनी पूनम साडी सेंटर काढलं मग मात्र अवसान गळालं, उरल्या सुरल्या आशा संपल्या
तडक मंदिरात गेलो. चिखलेश्वर महाराजांना म्हणालो आवरा............
फाड फाड फाड......
"पण मी".....
आणि पुन्हा एकदा फाड फाड फाड.....
कानफटाखाली जाळ....
महाराज हसत हसत म्हणाले आवरा........
मी माझे दोन्ही गाल चोळत होतो...
महाराजांनी आदेश दिला निघा आता...
प्रसाद मागायला गेलो तर तो कानाखाली मिळाला.
घरी गेलो तर,
"आज कुठे खपायला गेला होता?" इति आई.
बाबा, "कार्ट्या मुस्काट फोडेल पुन्हा त्या टवळीवर काही लेख लिहिला तर!"
आजकाल हे असं चाललंय.
पण अचानक पाउस पडतो आणि वातावरण प्रसन्न प्रसन्न होतं, मन बाग बाग होतं, रेडीओवर किशोर कुमारचं मस्त गाणं चालू असतं आणि अशा उर्मीत खिशातला कागद आणि पेन बाहेर पडतात, ग्यालरीत वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत जे सुचलं ते खाली लिहिलंय...
-----------------------------------------------------------------------------------------------
जिथे मृत्यूलाही जीवनाचे स्वप्न पडते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे रात्रीच्या काळोखाला जाग येते
आणि ग्रहणालाही प्रकाश ग्रासतो
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे दुष्काळालाही तहान लागते
आणि वादळही आसरा शोधते
तिथे मी राहतो तिथे मी राहत
जिथे वादही सुंसवाद साधतो
आणि अबोलाही निशब्द बोलून जातो
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे निराशेला आशेचे अंकुर फुटतात
आणि शेवटही सुरुवात करतो
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे वटलेल्या वृक्षालाही पालवी फुटते
आणि मदिरेलाही नशा चढते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे प्रश्नालाही उत्तर सुचते
आणि वृद्धत्वाला तारुण्याचे अंकुर फुटते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे पैश्यालाही किमत कळते
जिथे दानवही देवाला भजतो
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे मृत्यूलाही जीवनाचे स्वप्न पडते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कविता पूर्ण लिहून झाली, आणि मायबोलीवर टाकायचा विचार केला पण दुसरा मन काही शांत होत नाही. म्हणून त्याच्या शांतीसाठी आणि मायबोलीवरील लेख-चिरफाड क्रांतीत माझाही थोडा सहभाग असावा हा विचार मनात आला. म्हणलं आपणच आपली कविता हायज्यक करायला काय हरकत आहे. म्हणून कवितेचं विडंबन केलं.
जिथे स्वप्नातही झोपच येते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे सकाळ पेंगू लागते
आणि सुर्यालाही आळस येतो
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे माठालाही तहान लागते
आणि फ्रीज मध्ये झुरळ आसरा शोधते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे मोबाईल आउट ऑफ रेंज जातो
आणि ब्याटरीही डाऊन होते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे प्रगतीही प्रगतीपथावर असते
आणि फाईलीवर फाईली साचतात
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे सिंक मध्ये भांडे साचतात
आणि जमिनीवर धूळ साचते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे लाईट गायब असते
आणि टिव्ही वर मात्र क्रिकेट म्याच असते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
जिथे स्वप्नातही झोपच येते
तिथे मी राहतो तिथे मी राहतो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता याउप्पर जर कुणाला कवितेवर कविता, विडंबनावर विडंबन, कवितेवर विडंबन, विडंबनावर कविता, सादावर प्रतिसाद, प्रतिसादावर वाद, वादावर सुसंवाद, सुसंवादावर विसंववाद, दंगल, जाळपोळ, जाहीर निषेध, भंकस, मस्ती, टाईमपास इत्यादी इत्यादी करायचे असल्यास हर हर महादेव...
अगं बाब्बो.. झोपला नाही का ?
अगं बाब्बो..
झोपला नाही का ? रात्रीचे ३ वाजलेत.
( मी उठलोय शुक्राचं ग्रहण पहायला )
किरण नाय झोपलो अजुन, वेळ
किरण
नाय झोपलो अजुन, वेळ आहे.
बाकी नक्की शुक्राच ग्रहण बघतोय कि दुसरच काही चालु आहे?
स्वतःशीच संवाद साधण्यासाठी
स्वतःशीच संवाद साधण्यासाठी मायबोलीहून दुसरे 'युझर फ्रेन्डली' अॅप्लायन्स काय असणार
अरे पोपट झाला लवकर उठून (
अरे पोपट झाला लवकर उठून
( सूर्य उगवल्याशिवाय कै उपयोग नाही :फिदी:)
बेफ़िकीर एक नम्बर...
बेफ़िकीर
एक नम्बर...
बेफिकीर एकदम खरं बोललात बघा (
बेफिकीर
एकदम खरं बोललात बघा
( आता येऊद्या टोल्या, रिया, झंपी, सानी, चातक, टुणटुण, कावळा इ. इ. )
किती तो 'दुर्बोधते'बाबतचा
किती तो 'दुर्बोधते'बाबतचा संताप
गंभीर समीक्षकांना पण
गंभीर समीक्षकांना पण बोलवा..
झालंच तर -हस्व, दीर्घ
कळलाच नाही वाटतं प्रतिसाद
कळलाच नाही वाटतं प्रतिसाद
जिथे जुलाबालाही हगवण
जिथे जुलाबालाही हगवण लागते,
आणि दुर्गंधीला सुवास येतो,
तेथे "--" राहतो, तेथे "--" राहतो.
पाकिपुंगा साष्टांग
पाकिपुंगा
साष्टांग प्रणिपात...
स्वतःलाच साष्टांग प्रणिपात
स्वतःलाच साष्टांग प्रणिपात म्हणजे वगैरे
बेफिकीर एकदम खरं बोललात बघा
बेफिकीर
एकदम खरं बोललात बघा
( आता येऊद्या टोल्या, रिया, झंपी, सानी, चातक, टुणटुण, कावळा इ. इ. )
>>>
माझा काय संबंध इथे?
पाकिपुंगा, >> जिथे जुलाबालाही
पाकिपुंगा,
>> जिथे जुलाबालाही हगवण लागते,
>> आणि दुर्गंधीला सुवास येतो,
माझं म्हणणं नम्रपणे मांडू इच्छितो. जुलाबाला हगवण लागली तर दुर्गंधाचा सुवास कसा होणार? गझलेत वा कवितेत अशास्त्रीय काही नसावे. या शेरात अर्थोत्पत्ती नीटशी होत नाही. पहिल्या ओळीत जुलाबाला हगवण लागणे ही अतिशयोक्ती आहे, तर दुसर्या ओळीत दुर्गंधीचा सुवास हा विरोधाभास आहे. त्यामुळे शेराचा रसभंग होतो. म्हणून याला पर्यायी शेर सुचवू इच्छितो.
पिवळ्यास दुर्गंधी न ये हगवणीची
आणि जुलाबी कुंथून गुलाबी होतो
तिथे * राहतो, तिथे * राहतो
पर्यायी शेराबद्दल थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. जुलाब होताहेत असे वाटणारा तो जुलाबी. त्याच्यासमोर (की त्याच्यामागे?) पिवळं काहीतरी पडलं आहे. मात्र त्याला हगवणीची दुर्गंधी येत नसल्याने तो नक्की काय प्रकार आहे ते कळत नाही. म्हणून जुलाबी कुंथत बसतो. हे कुंथणे नायकाची शारीरिक आणि वैचारिक दोन्ही स्तरांवरची प्रगल्भता दाखवते. भले कुंथून गुलाबी झालो तरी चालेल, पण जुलाबाचा सर्वांगीण अनुभव घेईनच असा कठोर निर्धार दुसर्या ओळीतून सूचित होतो आहे.
म्हणून मला पर्यायी शेर अधिक समर्पक वाटतो.
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : हा प्रतिसाद वाचून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यास कुंथणे असे समजले जाईल.
गा.पै. त्यापेक्षा सरळ सोपं
गा.पै.
त्यापेक्षा सरळ सोपं करा ना
जिथे जुलाबालाही हगवण लागते,
आणि दुर्गंधीही नाकाला रुमाल लावते
आशिगो, सगळंच जर सरळधोप केलं
आशिगो, सगळंच जर सरळधोप केलं तर कुंथणार कोण?
आ.न.,
-गा.पै.
लैच वेळा यंग्राट लिवलंय
लैच वेळा यंग्राट लिवलंय बगा... (ही माजी श्टाइल न्हाय...)
लै भारी बेफी आनि गाना लक्षार
लै भारी बेफी आनि गाना
लक्षार आलं. माज असाच उतरवतात
जियो
जियो
छान चाललय. एखाद्या गोष्टिचा
छान चाललय.
एखाद्या गोष्टिचा सोयिस्कर, हवा तसा अर्थ काढुन नसलेला माज उतरवायची छान पद्धत आहे.
विनोदी लेखाकडे विनोदनेच बघायला हवे होते. लेख नीट वाचला असेल तर, मीच माझी यथेच्च थट्टा केली आहे, हे जाणवले असते.
असुद्या. सगळ्यांनाच नाही जमत हे.
तसे तुम्ही सगळेच अनुभवी, थोर आहात, माझे आधिच उघडे असलेले डोळे उघडले, आणि हो, नसलेला माज उतरवल्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद.
समाप्त...
चिखल्या, तो ता.बा.चा प्रतिसाद
चिखल्या, तो ता.बा.चा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता.
निदान माझा तरी असाच समज आहे! बाकी तुमचं कार्य मात्र महान आहे बरंका!
आ.न.,
-गा.पै.