निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूआज्जी, बाळाची काळजी घ्या.

मामी, बरेच माहितीपट घेऊन येतोय, मेमरी ठेवा सगळ्यांनी राखून.
गेले महिनाभर या नादापायी मी चित्रपट देखील बघितलेला नाही. काल भूमध्य समुद्राच्या तळाशी सापडलेल्या
एका यंत्राबद्दलचा माहितीपट बघत होतो. आधी ते काय असावे याचाच अंदाज येत नव्हता तर अनेक अभ्यासू
लोकांनी, ते प्राचीन नसावेच असे मत दिले. पण एका शास्त्रज्ञाने नेटाने त्याची प्रतिकृती तयार केली, इतकेच नव्हे
तर ती चालवून दाखवली... आणि असे लक्षात आले कि ते तास, दिवस, महिना, वर्ष, चंद्रकला दाखवणारे
घड्याळ होते आणि ते देखील पाण्यावर चालणारे !

बरेच माहितीपट घेऊन येतोय,>>>. अरे वा दिनेशदा, केव्हा येताय ???

घड्याळ होते आणि ते देखील पाण्यावर चालणारे !>>>> लिंक देऊ शकाल का दिनेशदा याची.........

एन्शियंट डिस्क्व्हरीज-- अशी सेरिज आहे ती, शशांक.

फक्त सर्वानी एखादा एफ एल व्ही रेकॉर्डर डाऊनलोड करुन ठेवा. Freecorder 4 या नावाने आहे एक.

आणि असे लक्षात आले कि ते तास, दिवस, महिना, वर्ष, चंद्रकला दाखवणारे
घड्याळ होते आणि ते देखील पाण्यावर चालणारे >>> वा मस्त बघायलाच पाहीजे हा माहिती पट
अरे वा दिनेशदा, केव्हा येताय ??? +१ Happy

जागुताई अभिनंदन Happy
इंद्रा, गोळेकाका,दिनेशदा, शशांकजी - प्रचि मस्तच Happy

प्रज्ञा. मस्त जमलेत ! मला ओल्या मटाराचे पदार्थ बघितले की श्रावणाची आठवण येते.

जागू, चला तयारीला लागा, पुढच्या भागाच्या.

मस्त जमलेत >> कॉपी पेस्ट करायला की बनवायला? Wink Light 1

जागू आठवे सहस्त्रक आणि नात्/नातवाची खूषखबर - एक जंगी मेजवानी झाली पाहिजे. आणि अहिंसा धर्मपालन करणारी मेजवानी असल्यास अधिक चांगले Happy

<<<मस्त जमलेत >> कॉपी पेस्ट करायला की बनवायला?>>>> Happy
माधव, हे पॅटीस चक्क मी स्वतः बनवलेत . Proud

जागू, चला तयारीला लागा, पुढच्या भागाच्या.>>>>.१०० मोदक. Happy अभिनंदन! (९व्या भागाबद्दल. :डोमा:)
जागूआजी अभिनंदन! Happy

अहिंसा धर्मपालन करणारी मेजवानी असल्यास अधिक चांगले

अहिंसकच पार्टी असणार... हिंसा कोंबडीवाल्याने/कोळ्याने किंवा अजुन कोणीतरी दुस-याने केली असणार... आपण फक्त हाती आलेल्या जिन्नसाला मस्त सजवुन वाढायचेह ताटात. आपण थोडीच हिंसा करायला जाणार??? ते काम आपले नाही हो... Wink

साधना, मारणारा पण असेच म्हणतो, खाणारे खाताहेत म्हणून मला मारावे लागतेय, पाप त्यांच्या डोक्यावर..

हलकेच घ्या, Happy नाहीतर शा. वि. मां. वाद कराल, जे आपल्या नि.ग. वर कदापि खपवून घेतले जाणार नाही.

लहानपणी पावसाळ्यात रंगीबेरंगी तेरडा फुलायचा.. त्याचे इतके वेड लावणारे विविध रंग असत..
कुणाकडे आहेत का फोटो, .. अनेक युगं लोटल्यासारखी वाटतायेत ही सुर्रेख फुलं पाहून..
तेरड्याच्या शेंगा(?) वाळल्या कि ट्विस्ट होऊन त्यातून बिया बाहेर पडत, वेलचीच्या दाण्यासारख्या..आपोआपच रुजत.. ,कोणत्याही प्रकारच्या मानवसेवेची वाट न पाहता कुठेही उकिरड्यावर, दुर्लक्षित माळावर, नैनसुख देणारी अगणित फुलं उमलत आणी पूर्ण परिसराला शोभिवंत बनवून टाकत..
या वाळक्या शेंगांना दोन बोटांच्या चिमटीत पकडून हलकेच दाबले कि सुर्रकन कर्ल होत ,आतील बिया बाहेर पडत.. ही कर्ल होण्याची गंमत पाहण्यात तासनतास जात..>>>>>>>>>>>>>अगदी अगदी. आणि ती वळलेली शेंग, 'कानातले डूल 'म्हणून आम्ही कानात अडकवायचो. Happy

हे शा. वि. मां. वाद काय आहे म्हणे ? मा बो वर हे असले शॉर्ट फॉर्म्स शोधायचे म्हणजे जरा कल्हईच होते डोक्याला.......
शाळेतले विद्यार्थी - हे बरोबर आहे का ?

मी आज राहिलेल वाचतेय आणि प्रतिसाद देतेय. उशीरा बद्दल क्षमस्व. Happy
गोळे काका, जिप्स्या, फ़ोटो मस्तच.
दिनेशदा, गुलबक्षी, छानच आहे. माझ्याकडे सध्या त्या दोन फ़ुलातला जो गडद रंग आहे ना? ती फ़ुले फ़ुलतायत. कोकणात मात्र तुम्ही दुसरा फ़ोटो दिलाय ना तसली व विविध रंगी गुलबक्षी होती. आई आम्हाला त्याच्या वेण्याकरून द्यायची. आम्ही पण शिकलो होतो, देठ एकमेकात गुंफ़ून वेणी करायला. Happy (बालपण दे गा देवा. )

व्वा! दिनेशदा, कधी येताय? Happy
दिनेशदा या वरील गुलबक्षीच्या बीया आणाल का येताना? काय मस्त आहेत त्या शेडस.>>>>>>>>>>मला पण. Happy

फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या रचना आपल्याकडेच जास्त दिसतात. इथे फक्त नववधूच्या हातात किंवा
लग्नाच्या गाडीवर असते सजावट. नाहीतर चर्च मधे.

Pages