निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद इन मिन तीन,
खरच वाढली की हो सापेक्षपृथकता!

धन्यवाद दिनेशदा.
अरे वा! पिवळ्या फुलांच्या सिल्वर ओक नावाच्या झाडाचा आपण सपुष्प फोटो काढला हे समजून मला फारच धन्य वाटले.

सिल्व्हर ओक - हे बरेच प्रसिध्द नाव आहे बर्‍याच बंगल्यांना याच नाव असत.

नाव ओक असले तरी इंग्लिश ओक शी संबंध नाही. (पाने खालून चंदेरी असतात. आणि लग्नातील नवरानवरीच्या हातातले गुच्छ बहुदा, या पानात गुंडाळलेले असतात.)
ते ओकचे झाड म्हणजे अनेक प्राणी, पक्षी, किटक यांचे आश्रयस्थान असते. त्यातही दोन मुख्य प्रजाती आहेत. त्याच्या बिया म्हणजे खारीसारख्या प्राण्यांचा अतिप्रिय खाऊ. मी मुद्दाम खाऊन बघितला, पण अजिबातच चवदार लागला नाही.

मुंबईत माझ्या बघण्यातले एकमेव ओकचे झाड, कमला नेहरु पार्काच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेचे जे कंपाऊम्ड
आहे, त्याच्या खाली आहे. अजून लहान आहे ते, फळे धरत नसावीत.

आता मी हेच लिहिणार होतो सिल्हर ओक का गोल्डन ओक हवे होते पिवळी फुले आहेत ना पण चंदेरी पाणांनी हा प्रश्न संपवला. Happy

मुंबईत माझ्या बघण्यातले एकमेव ओकचे झाड, कमला नेहरु पार्काच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेचे जे कंपाऊम्ड
आहे, त्याच्या खाली आहे. अजून लहान आहे ते, फळे धरत नसावीत.
>>

दा तुमच्या स्मरणशक्तीची कमाल आहे दाद द्यावीशी वाटते माझा तर सलामच _/ Happy

साधना, नक्की का ? झाडावर राहिलीत, म्हणजे नवलच आहे.
सिल्ह्वर ओकची सावली तेवढी दाट नसते आणि त्याचा विस्तार ऊभा असतो म्हणून असेल. कॉफी प्रमाणेच, चहाला पण सावली लागते.

-------------------------
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली..

सकाळच्या अपुर्‍या उजेडात फोटो नीट नाही काढता आलेत.

मला एक मदत हवी आहे..

मी मेथी लावते आहे गेले दोन आठवडे. एकदा वाळुत आणि एकदा मातीत लावली..

दोन्ही वेळी उगवली नाही.. Sad

बुरशी आली..काय कारण असेल्....छोट्या आइसक्रीमच्या डब्यात लावते..

मेथीदाणे जूने असतील किंवा ऊन कमी मिळाले असेल. (सध्या ढगाळ हवामान आहे का ?)
बाहेर दाणे पाण्यात भिजत घालून, मग पेरले तर उगवतील.

ढगाळ नाही अजुन तरी....मध्ये मध्ये ढग असतात.पाण्यात भिजत घालुन बघते...

देवा थोडे दिवस ढग नको.. माझा छुंदा उन खातोय :-)..
दिनेशदा..इथेच विचारते..जर उन नाही मिळालं तर नंतर छुंदा शिजवला तर चालतो का?

सध्या मोगर्‍याचा हंगाम (सुगंधाची लयलूट) चालू आहे - यावरुन एक गोष्ट आठवली की स्त्रिया जी सुगंधी फुले केसात माळतात त्यामुळे केसांचे एक प्रकारचे "पोषण" होते असे कुठेतरी वाचल्याचे आठवतंय..... कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा......

सध्या मोगर्‍याचा हंगाम (सुगंधाची लयलूट) चालू आहे>>>>>येस्स शशांक अगदी हेच लिहायला आलो होतो. Happy आमच्या घरातही (पुन्हा एकदा) मोगरा बहरला. गेल्या महिन्यातला बहर येऊन गेल्यावर मी फांद्या कापल्या होत्या त्या सगळ्या फांद्या आत्ता कळ्याफुलांनी पुन्हा बहरल्यात. त्याचप्रमाणे एका कुंडीत लावलेल्या लाल सदाफुलीच्या बिया दुसर्‍या कुंडीत पडुन तेथे आता ४-५ झाडे आली आहेत ती सगळी लाल फुलांनी डवरली आहेत. Happy लाल-सफेद फुलांन मस्त वाटतंतय. मात्र जास्वंदीची किड अजुन पूर्णपणे गेली नाहीये. Sad

मोगर्‍याबद्दल जिप्सी आणि शशांक ला +१००
माझ्याही मोगर्‍याला बहार आला आहे. पण मला तो मदनबाण आहे की मोगरा याबद्दल शंका आहे.
कॅमेरा दुरुस्तीला गेलाय व नवीन सेलफोनातले फोटो कॉम्पवर कसे अपलोड करायचे अजून समजलेले नाही. (घोर अज्ञान!!!!!!!!!!!)
त्यामुळे खूप फोटो थटलेले आहेत.

माझ्याकडेही कतरी जास्वंद, लाल जास्वंद, मोगरा व्यवस्थित फुललाय.. एखाद्या दिवशी पाणी घातलं नाही तर दुसर्‍या सकाळी रुसुन कमी फुलतात... Happy

maanuShI sadhyaatari un aahe. maave naahI. un nasalach tar shijavayachaa kat aahe ;-). kitI divas un dakhavaav laagata?

निकिता कडक उन्हात काचेच्या बरणीत तोंडाला दादरा(अर्थातच बरणीच्या!) बांधून ८/१० दिवसात व्हायला हवा छुंदा. चमचा फिरवून बघ. अगदी शिजवल्यासारखा घट्ट लागेल.

दा -गुलबक्षीचे अनोखे रंग सुंदर तो फिकट गुलाबी खासच Happy

साधनाताई - रुद्राक्षाच्या लिंक बद्द्ल धन्यवाद , मस्त माहीती.
जिप्सि - लाल सदाफुलीच्या बिया थोड्या माझ्यासाठी पण. Happy
जास्वंदीची किड अजुन पूर्णपणे गेली नाहीये त्यावर काय उपचार केलेस ?

जास्वंदीची किड अजुन पूर्णपणे गेली नाहीये >> तंबाखुचे पाणी मारलेस का?

त्या बीया मला पण. आमच्याकडच्या गुलाबी सोडल्या तर सदाफुलीच्या सगळ्या छटांच्या झाडांनी मान टाकली. Sad

हो बघतो मोनाली,

खरं तर ती झाडे, रस्त्याच्या कडेला गटारात आहेत. खास करुन बागेत लावण्याइतके महत्व नाही तिला इथे.

म्हणून फुले हातात घेऊन फोटो काढले आहेत Happy

Pages