गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर
गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद
फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते
** फोटो :
मै: रेसिपी मस्तच ..नवीनच
मै: रेसिपी मस्तच ..नवीनच कळली..मी तिळाचं कूट लावून करायची.. आत ही पद्धत करून बघेन.
मस्तच गं मैत्रेयी. लवकरात
मस्तच गं मैत्रेयी. लवकरात लवकर करुन बघणार. धन्यवाद रेसिपी लगेच लिहिल्याबद्दल
मी तिसरी गोळ्यांची आमटी +
मी तिसरी
गोळ्यांची आमटी + गवार असे काँबो आहे. गवार अती आवडती असल्याने नक्की करुन बघणार.
वॉव.. आज उद्याच करून बघते.
वॉव.. आज उद्याच करून बघते. यम्मी वाटतीय रेस्पी वाचूनच!
छान आहे रेसिपी .. सोपी आहे
छान आहे रेसिपी .. सोपी आहे ..
तळले तरच कोफ्ते म्हणता येइल का त्या गोळ्यांनां? तसंच रस मिळून येण्यासाठी काही घालावं लागत नाही का? की बेसनाचे गोळेच ते काम करतात?
वेगळीच आहे ही रेसिपी. नक्की
वेगळीच आहे ही रेसिपी. नक्की करून बघणार.
सशल , मी काहीच एक्स्ट्रा घालत
सशल , मी काहीच एक्स्ट्रा घालत नाही रस मिळून यायला. बहुधा गोळ्यांमुळे मिळून येत असेल. तसेही रस फार ठेवायचा नसतो याला.
गवार आवडतेच त्यामुळे जरा
गवार आवडतेच त्यामुळे जरा वेगळा प्रकार म्हणून नक्की करुन बघेन.
मस्तं पाकृ! भाजणीचे गोळे
मस्तं पाकृ!
भाजणीचे गोळे घालू का?
जामच वेगळी रेसिपी. करेन की
जामच वेगळी रेसिपी. करेन की नाही माहीत नाही
<< तळले तरच कोफ्ते म्हणता येइल का त्या गोळ्यांनां
खरंय सशल , तळले तरच कोफ्ते म्हणता येईल
मैत्रेयी धन्यवाद! गवार-भोपळा
मैत्रेयी धन्यवाद!
गवार-भोपळा हे काँबिनेशन सही लागतं .. मग त्या बेसनाच्या गोळ्यात भोपळा किसून घातला तर? :p (मी मृ चा मूड (की मोड?) कंटिन्यु करतेय ..)
बरं कोफ्ते न म्हणता बाँब्ज
बरं कोफ्ते न म्हणता बाँब्ज म्हणा चालत असेल तर
खरे तर बेसनाचे गोळेच म्हणायचं
खरे तर बेसनाचे गोळेच म्हणायचं होतं पण टायट्ल मधे ते तेवढं अॅपटायझिंग वाटेना
Mastach!! Nakki karnar. Gavar
Mastach!! Nakki karnar. Gavar atyant avadati bhaji ahe ani ha prakar kadhinkhalla navta.
मी गवारीच्या रसदार भाजीला
मी गवारीच्या रसदार भाजीला खोबर्याचे वाटण लावुन त्यात मेथीचे मुठीये -कणीक+१/२बेसन+मोहनासाठी तेल्-ओवा-तीळ+मेथी भाजी -घालुन करते.वन डिश मील तयार होते.वरुन तूप घालुन खायची .चवदार लागते.
वेगळी पध्दत आवडली. नक्की करुन
वेगळी पध्दत आवडली. नक्की करुन बघणार.
माझी अत्यंत आवडती भाजी
माझी अत्यंत आवडती भाजी (साहित्यात गुळ नाही ते जरा खटकले होते, पण नंतर कृतीत आहे. गूळ आणि काळा मसाला याशिवाय गवार होणे नाही.) शिवाय गोळ्याच्या आतमधे शेंगदाणा असतो, आमच्याकडे. मस्त लागतो.
माझ्या साबा भाजीत गोळे तळून
माझ्या साबा भाजीत गोळे तळून घालतात .आता अशी सांगेन
पण एक भा प्र. : गोळे विरघळत किंवा मोडत नाहीत?
स्वस्ति, नाही गोळे अजिबात
स्वस्ति, नाही गोळे अजिबात विरघळत नाहीत. तसे पातळ नसतातच ते. पोळीच्या कणकेच्या इतपत घट्ट असतात, अन भाजीत शिजताना अजून थोडे घट्ट होतात नंतर.
दिनेशदा हो साहित्यात राहिल्याच काही काही गोष्टी लिहायच्या .
शेवटी आज केलीच ही भाजी फोटो
शेवटी आज केलीच ही भाजी फोटो टाकलाय..
छान दिसते आहे.
छान दिसते आहे.
छान आहे रेसिपी गवारीच्या
छान आहे रेसिपी
गवारीच्या रसदार भाजीला खोबर्याचे वाटण लावुन त्यात मेथीचे मुठीये -<< सुलेखाताई, माझी अहमदाबादची आत्या अशी भाजी नेहमी करायची. थोडी गोडसर गुजराथी चव आणि ओव्याचा स्वाद... मस्त मस्त!!!
मस्त. करणार नक्की. धन्यवाद
मस्त. करणार नक्की. धन्यवाद मैत्रेयी.
लिंगनिरपेक्षतेची नोंद घेतली आहे. त्यासाठी विशेष कौतुक.
गवार आवडतेच. आता ही गोळेवाली
गवार आवडतेच. आता ही गोळेवाली गवार करून बघेन.
मैत्रेयी छान आहे रेसिपी. मी
मैत्रेयी छान आहे रेसिपी.
मी साधारण याच पध्द्तिने करते, थोडे बदल..
गवार निवडुन ई ई आणि ते गोळे बनवुन सगळे एकत्र कुकरच्या डब्यात वाफवुन घेते एकत्र आणि मग फोडणी घालते.
मी काल केली. जरा घोळ झाला.
मी काल केली. जरा घोळ झाला. बेसन भयानक चिकट निघाले. गोळा करताच येईना, मग भाजणी अॅड करून कसेतरी केले गोळे. या सगळ्या प्रकारात जास्तच पीठूळ झाले की काय. भाजी फर्मास झाली होती, पण गोळे दाढेने फोडावे लागत होते इतके वरून घट्ट/ कडक झाले. आत चांगले होते. (जास्त वेळ ठेवले का मी शिजवत?)
परत एकदा करून पाहायला पाहीजे..
बस्के, बेसन चिकट असतंच. तेल
बस्के, बेसन चिकट असतंच. तेल टाकयचं थोडं, अन पाणी अगदी जप्पून हळू हळू घालायचं. तुझी कन्सिस्ट्न्सी कशी झाली होती? फार घट्ट झाले का पीठ? पोळीच्या कणकेइतपतच घट्ट असावा गोळा. कमी जास्त शिजवल्याने कडक नाही होत गं. जमेल पुढच्या वेळी
गोळे मउ होण्यासाठी बेसन
गोळे मउ होण्यासाठी बेसन भिजवताना थोडा खायचा सोडा घातला तर ?
गोळे विरघळले तर गवारीचं पिठलं
गोळे विरघळले तर गवारीचं पिठलं व्हायची भीति !
अवनी, नाही विरघळत
अवनी, नाही विरघळत अजिबात.परिणीता, मी तरी नाही घातला सोडा, तुम्ही प्रयोग केलात तर इथे अपडेट करा कसे वाटातेय ते.
Pages