गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर
गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद
फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते
** फोटो :
करून बघितली. मस्त
करून बघितली. मस्त झालीय.
गोळ्यांमधे गावरान कोथिंबीर घातली. गवारीच्या भाजीत मी नेहमी दूध घालते,
आणि गवारीच्या तुकड्यांचा उभा सेक्शन घेते (गवार अगदी कोवळी नसली तर)
मीही करून पाहिली. मी डाळीच्या
मीही करून पाहिली. मी डाळीच्या पिठाची पोळी लाटून छोटे छोटे शंकरपाळे करून मग ते भाजीत घातले. त्यामुळे पटकन शिजली...एकदम छान वाटली नव्या चवीची गवारीची भाजी.
फ्रोजन गवार वापरुन बरी होईल
फ्रोजन गवार वापरुन बरी होईल का मैत्रेयी? आम्हाला ताजी नाही मिळत. किंवा असच विचार करत आहे की गवारीऐवजीच अजुन काय वापरता येईल?
फ्रोजन गवार ट्राय केली होती
फ्रोजन गवार ट्राय केली होती मागे. पण त्याच्या शिरा काढलेल्या नसतात अगं, सारख्या तोंडात येतात
वालपापडी ट्राय करून पहा.
वेगळाच प्रकार दिसतोय. करून
वेगळाच प्रकार दिसतोय. करून बघायला हवा.
गोळे करण्यापूर्वी बेसन कोरडे भाजून घेतले तर, गोळे अगदी पटकन शिजतील असे वाटते.
भार्री होते ही भाजी.
भार्री होते ही भाजी. गवारीसारख्या बोरिंग भाजीचा मेकओव्हरच एकदम!
फक्त करून ठेवली की कोफ्ते रस पितात असं वाटलं. पुढच्या वेळी करताना थोडा जास्त रस ठेवीन भाजीत. तसंच ते शिजले की थोडे फुलतातही असं लक्षात आलं.
मी गवारीची (खरंतर कुठल्याही बीन्स - घेवडा इ.ची) भाजी करताना फोडणीतही थोडा ओवा घालते आणि दाण्याचं कूट घालते भाजी मिळून येण्यासाठी. गवार शिजताना थोडं दूधही घालतात. छान स्वाद येतो त्याने.
सुनिधी, मी फ्रोझन गवार (दीपची) वापरूनच केली. छान होते.
अरे वा, मस्त आलाय फोटो! आज
अरे वा, मस्त आलाय फोटो! आज करायचा प्लॅन करत आहे. रस्सा जरा जास्त ठेवण्याबद्दल सहमत. त्या गोळ्यांमधे थोडा रस्सा अॅब्सॉर्ब झाल्यावर अजून छान चव येते.
दीप ची फ्रोझन गवार तू सांगितल्यानंतर ट्राय केली, बेस्ट आहे. हल्ली तीच वापरते मीही.
गोळे न तळताच घालायचे आहेत? जर
गोळे न तळताच घालायचे आहेत? जर आयत्या वेळी भाजीत घालायचे म्हटले तर शिजणार नाहीत मग.
फ्रोजन गवार बरी वाटते. वेळ वाचतो मोडायचा. तरी ताज्या गवारीची आठवण येतेच येते.
गवारीची भाजी मला कशीही प्रियच
गवारीची भाजी मला कशीही प्रियच आहे. माझी बहिण गवारीच्या कोवळ्या शेंगांचे फक्त टोक काढून घेते आणि नंतर पोळ्या करुन झाल्यात की गरम तव्यावर तेल टाकून शेंगा अरतपरत करते. शेवटी मीठ भुरभुरते. अशा शेंगा कुरकुरीत होतात आणि जेवणाची लज्जत वाढवतात.
मै, मी अरुन पाहीन ही कृती सवडीने मागे कशी एकदा तुझ्या पद्धतीची पावभाजी केली होती तशी
सायो, व्यवस्थित शिजतात गोळे.
सायो, व्यवस्थित शिजतात गोळे. साधारण शेंगदाण्याच्या आकाराचे गोळे करायचे. एकदम मोठे नकोत. भाजी फोडणीला टाकली , मीठ , मसाला, पाणी इ. घातले की लगेच गोळे पण टाकायचे आणि गवार आणि गोळे एकदम शिजू द्यायचे झाकण लावून. गवार शिजते तोवर गोळे पण मस्त शिजतात. करून पहा.
एक व्हेरिएशन सुचवते (मी ही
एक व्हेरिएशन सुचवते (मी ही भाजी अजून केली नाहीये).
बेसनाच्या जागी मटर डाळ (वाटाण्याची डाळ असते) थोडा वेळ भिजवून भरड वाटून त्याचे गोळे केले तर जास्त खुसखुशीत लागतात. हे असे गोळे (अर्थातच तळून घेऊन) बरेच वेळा बंगाली पद्धतीच्या रस्साभाजीत वापरतात. फक्त आमच्याकडे त्यात तिखट आणि ओव्याऐवजी कलौंजी घालतात
हो, करून पाहीन नक्की. वरदा,
हो, करून पाहीन नक्की.
वरदा, मटर डाळ म्हणजे कोणती? इथे मिळते की नाही कल्पना नाही.
ओह अशी वापरतात होत ती डाळ,
ओह अशी वापरतात होत ती डाळ, मागे एकदा मी ती डाळ चुकून आणली होती. त्या डाळीच्या वेगळ्याच वासामुळे त्याचे काय करायचे ते न कळून तशीच पडून राहिली अन टाकून द्यावी लागली होती!
हो त्या डाळीचा वास थोडा वेगळा
हो त्या डाळीचा वास थोडा वेगळा असतो. पण कैरी घालून आंबटगोड वरण करायलाही आमच्याकडे हीच डाळ वापरतात.
गवार-भोपळा हे काँबिनेशन सही
गवार-भोपळा हे काँबिनेशन सही लागतं .. +१ यात ओवा, हिंग, काळा मसाला, गूळ, सुके खोबरे मस्ट वाटते मला (लसूण टाकून उग्र वाटते भाजी) पण गोळे ऑलवेज वेलकम...
स्वाती, ओवा घालून छान लागतेच.
स्वाती, ओवा घालून छान लागतेच. जोडीला मोहरीनंतर थोडे मेथीदाणे आणि ते लालसर झाले की मग लाल मिर्च्या घालून फोडणी करायची. मग ओवा, कढीपत्ता वगैरे. सुकीच छान लागते. ... अतिशय रुचकर होते.
यात बटाट्याच्या चकत्या किंवा लाल भोपळा घालूनही मस्त लागतो. माझी आई लाल भोपळ्याच्या जाड साली काढून त्या बारीक कापून गवारीच्या भाजीत घालते. शिवाय शिजवताना थोडं दूध घालते. पण मेथी-लाल मिर्च्यांची फोडणी मस्ट!
अशी गवारीची भाजी, गरमागरम चपात्या आणि घट्ट दही मस्त लागतं.
>> माझी आई लाल भोपळ्याच्या
>> माझी आई लाल भोपळ्याच्या जाड साली काढून त्या बारीक कापून गवारीच्या भाजीत घालते.
ओह मस्त आयडिया आहे, पुढच्या वेळी नक्की.
भोपळ्याच्या साली ? कडू नसतात
भोपळ्याच्या साली ? कडू नसतात का त्या ? हे नविनच ऐकले. बघायला पाहिजे ट्राय करून!
नाही, पातळ साल असेल तर चटणीही
नाही, पातळ साल असेल तर चटणीही करतात ना. त्याऐवजी भाजीत.
मेथीदाणे आणि लाल मिर्च्या
मेथीदाणे आणि लाल मिर्च्या विसरू नका. गवारीकरता आणि लाल भोपळ्याकरता ते मस्ट!
मला ते गवार-लाल भोपळा काँबि
मला ते गवार-लाल भोपळा काँबि फारसे आवडले नव्हते. गवार-बटाटा खायची सवय असल्याने असेल कदाचित.
अरे.. मैत्रेयी, स्वाती
अरे.. मैत्रेयी, स्वाती थँक्स.. प्रतिसाद आज पाहिले. फ्रोजन वापरुन करणार.
आत्ताच ही भाजी केली. भन्नाट
आत्ताच ही भाजी केली. भन्नाट लागतेय. सगळ्यांना आवडली. उरली तर फोटो टाकते.
थँक्स मै.
(No subject)
नेटफ्लिक्सवाल्यांना भाजी
नेटफ्लिक्सवाल्यांना भाजी पाठवलीत आणि डिव्हिडी कुठे फ्रिजमध्ये?
डीव्हीडी तिथून हलवून पोस्टात
डीव्हीडी तिथून हलवून पोस्टात टाकायची कुणी? हा तत्त्वाचा प्रश्न आहे.
>>उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते
इकडे मारामारी तर नाही, पण फोटोपुरते ३ गोळेतरी उरवा अशी रीक्वेश्ट केल्या गेली.
मस्त दिसतेय रसाळ भाजी.
मस्त दिसतेय रसाळ भाजी.
गोळे लहान आहेत. शेंगदाणा
गोळे लहान आहेत. शेंगदाणा आकाराचे त्यामुळे डायरेक्ट भाजीत टाकले तरी शिजतील. ही आयडिया छान आहे. बेसन पीठ फॅन क्लबाने नोंद घ्यावी.
मी केली ही भाजी . एकदम मस्त
मी केली ही भाजी . एकदम मस्त झाली.... कधीही गवार न खाणार्या नवर्याने चाटुन पुसुन खाल्ली....
धन्स ग बाई...
मी पण आज गवारीची भाजी अशीच
मी पण आज गवारीची भाजी अशीच बेसनाचे कोफ्ते घालून केली आहे. दुपारी खाल्ली की लिहिते कशी झाली होती ते
Pages