गवारीची भाजी- बेसनाचे कोफ्ते घालून - फोटोसह

Submitted by maitreyee on 1 June, 2012 - 16:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर

गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद

क्रमवार पाककृती: 

फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये Happy
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्‍या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात Happy उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते Lol
** फोटो :
gawar2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करून बघितली. मस्त झालीय.
गोळ्यांमधे गावरान कोथिंबीर घातली. गवारीच्या भाजीत मी नेहमी दूध घालते,
आणि गवारीच्या तुकड्यांचा उभा सेक्शन घेते (गवार अगदी कोवळी नसली तर)

मीही करून पाहिली. मी डाळीच्या पिठाची पोळी लाटून छोटे छोटे शंकरपाळे करून मग ते भाजीत घातले. त्यामुळे पटकन शिजली...एकदम छान वाटली नव्या चवीची गवारीची भाजी.

फ्रोजन गवार वापरुन बरी होईल का मैत्रेयी? आम्हाला ताजी नाही मिळत. किंवा असच विचार करत आहे की गवारीऐवजीच अजुन काय वापरता येईल?

फ्रोजन गवार ट्राय केली होती मागे. पण त्याच्या शिरा काढलेल्या नसतात अगं, सारख्या तोंडात येतात Sad
वालपापडी ट्राय करून पहा.

वेगळाच प्रकार दिसतोय. करून बघायला हवा.

गोळे करण्यापूर्वी बेसन कोरडे भाजून घेतले तर, गोळे अगदी पटकन शिजतील असे वाटते.

gawaar_kofte.JPG

भार्री होते ही भाजी. गवारीसारख्या बोरिंग भाजीचा मेकओव्हरच एकदम! Happy

फक्त करून ठेवली की कोफ्ते रस पितात असं वाटलं. पुढच्या वेळी करताना थोडा जास्त रस ठेवीन भाजीत. तसंच ते शिजले की थोडे फुलतातही असं लक्षात आलं.

मी गवारीची (खरंतर कुठल्याही बीन्स - घेवडा इ.ची) भाजी करताना फोडणीतही थोडा ओवा घालते आणि दाण्याचं कूट घालते भाजी मिळून येण्यासाठी. गवार शिजताना थोडं दूधही घालतात. छान स्वाद येतो त्याने.

सुनिधी, मी फ्रोझन गवार (दीपची) वापरूनच केली. छान होते.

अरे वा, मस्त आलाय फोटो! आज करायचा प्लॅन करत आहे. रस्सा जरा जास्त ठेवण्याबद्दल सहमत. त्या गोळ्यांमधे थोडा रस्सा अ‍ॅब्सॉर्ब झाल्यावर अजून छान चव येते.
दीप ची फ्रोझन गवार तू सांगितल्यानंतर ट्राय केली, बेस्ट आहे. हल्ली तीच वापरते मीही.

गोळे न तळताच घालायचे आहेत? जर आयत्या वेळी भाजीत घालायचे म्हटले तर शिजणार नाहीत मग.
फ्रोजन गवार बरी वाटते. वेळ वाचतो मोडायचा. तरी ताज्या गवारीची आठवण येतेच येते.

गवारीची भाजी मला कशीही प्रियच आहे. माझी बहिण गवारीच्या कोवळ्या शेंगांचे फक्त टोक काढून घेते आणि नंतर पोळ्या करुन झाल्यात की गरम तव्यावर तेल टाकून शेंगा अरतपरत करते. शेवटी मीठ भुरभुरते. अशा शेंगा कुरकुरीत होतात आणि जेवणाची लज्जत वाढवतात.

मै, मी अरुन पाहीन ही कृती सवडीने Happy मागे कशी एकदा तुझ्या पद्धतीची पावभाजी केली होती तशी Happy

सायो, व्यवस्थित शिजतात गोळे. साधारण शेंगदाण्याच्या आकाराचे गोळे करायचे. एकदम मोठे नकोत. भाजी फोडणीला टाकली , मीठ , मसाला, पाणी इ. घातले की लगेच गोळे पण टाकायचे आणि गवार आणि गोळे एकदम शिजू द्यायचे झाकण लावून. गवार शिजते तोवर गोळे पण मस्त शिजतात. करून पहा.

एक व्हेरिएशन सुचवते (मी ही भाजी अजून केली नाहीये).
बेसनाच्या जागी मटर डाळ (वाटाण्याची डाळ असते) थोडा वेळ भिजवून भरड वाटून त्याचे गोळे केले तर जास्त खुसखुशीत लागतात. हे असे गोळे (अर्थातच तळून घेऊन) बरेच वेळा बंगाली पद्धतीच्या रस्साभाजीत वापरतात. फक्त आमच्याकडे त्यात तिखट आणि ओव्याऐवजी कलौंजी घालतात

ओह अशी वापरतात होत ती डाळ, मागे एकदा मी ती डाळ चुकून आणली होती. त्या डाळीच्या वेगळ्याच वासामुळे त्याचे काय करायचे ते न कळून तशीच पडून राहिली अन टाकून द्यावी लागली होती!

गवार-भोपळा हे काँबिनेशन सही लागतं .. +१ यात ओवा, हिंग, काळा मसाला, गूळ, सुके खोबरे मस्ट वाटते मला (लसूण टाकून उग्र वाटते भाजी) पण गोळे ऑलवेज वेलकम...

स्वाती, ओवा घालून छान लागतेच. जोडीला मोहरीनंतर थोडे मेथीदाणे आणि ते लालसर झाले की मग लाल मिर्च्या घालून फोडणी करायची. मग ओवा, कढीपत्ता वगैरे. सुकीच छान लागते. ... अतिशय रुचकर होते.

यात बटाट्याच्या चकत्या किंवा लाल भोपळा घालूनही मस्त लागतो. माझी आई लाल भोपळ्याच्या जाड साली काढून त्या बारीक कापून गवारीच्या भाजीत घालते. शिवाय शिजवताना थोडं दूध घालते. पण मेथी-लाल मिर्च्यांची फोडणी मस्ट!

अशी गवारीची भाजी, गरमागरम चपात्या आणि घट्ट दही मस्त लागतं.

>> माझी आई लाल भोपळ्याच्या जाड साली काढून त्या बारीक कापून गवारीच्या भाजीत घालते.
ओह मस्त आयडिया आहे, पुढच्या वेळी नक्की. Happy

Lol डीव्हीडी तिथून हलवून पोस्टात टाकायची कुणी? हा तत्त्वाचा प्रश्न आहे.

>>उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते Lol
इकडे मारामारी तर नाही, पण फोटोपुरते ३ गोळेतरी उरवा अशी रीक्वेश्ट केल्या गेली.

गोळे लहान आहेत. शेंगदाणा आकाराचे त्यामुळे डायरेक्ट भाजीत टाकले तरी शिजतील. ही आयडिया छान आहे. बेसन पीठ फॅन क्लबाने नोंद घ्यावी.

मी केली ही भाजी . एकदम मस्त झाली.... कधीही गवार न खाणार्‍या नवर्‍याने चाटुन पुसुन खाल्ली....

धन्स ग बाई...

मी पण आज गवारीची भाजी अशीच बेसनाचे कोफ्ते घालून केली आहे. दुपारी खाल्ली की लिहिते कशी झाली होती ते Wink

Pages