गवारीची भाजी- बेसनाचे कोफ्ते घालून - फोटोसह

Submitted by maitreyee on 1 June, 2012 - 16:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर

गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद

क्रमवार पाककृती: 

फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये Happy
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्‍या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात Happy उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते Lol
** फोटो :
gawar2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला मामी, तू २०१२ मधे पहिल्या पानावर लिहिले होतेस मी करणार आहे म्हणून अन शेवटी ८ वर्षांनी मुहूर्त काढलास होय?! >> अर्रर्र असं आहे का? बेटर लेट दॅन कधीच नाही.

कुठे चुक झाली तेच आठवतीये.. :D, पण जशी कृती दिलीये तशीच केल्याच आठवतंय.. आईने रात्री लालतिखट घालुन थोडीशी झणझणीत केली तेव्हा भाजी संपली..

अर्रर्र असं आहे का? बेटर लेट दॅन कधीच नाही. >>> Biggrin

'मी तिसरी' म्हणत उत्साहानं प्रतिसाद देऊन मी पण अजून केली नाहीये. प्रतिसादांत जाऊन खात्री करावी लागेल पण आठवत तर नक्कीच नाही केल्याचं Biggrin

अहाहा नक्की करणारच मै!!
आज केलेले व्हर्शन वेगळे होते. त्यात गोळ्यांत ओवा नव्हता तर दाण्याचे कूट + लिंबु होते. तसेच लसूण नव्हता. शिवाय गोळे गव्हाच्या पीठाचे व बेसनाचे होते.
पुढच्या वेळेस ओवा घालून, लसूण घालून करुन पाहीन.
काळा मसाला व गवार तर मेड फॉर इच अदर असतातच.

Pages