'आई' तुझंही आता रुप बदलतंय...!!

Submitted by बागेश्री on 28 May, 2012 - 08:20

कवडश्यांनी सजवलेली मैफिल,
तुझ्या घरात डोकावणार्‍या निसर्गाचं लक्षण होतं...

सूर्यकिरणांच्या त्या तिरिपेने वाहून आणलेल्या धूळीच्या कणांची रांग मोडण्याचा,
लाडका खेळ खेळण्यात घरातलं इवलं पाऊल अगदी रमून जायचं...
त्या इवल्या हातांनी कवडसे गच्च धरल्याच्या आनंदात,
घराला, कित्येकदा गोंडस हसण्याने न्हाऊ घातलं

पण महत्त्वाकांक्षांना तरलता उमजते का?

अंगणातली माती, त्या रांगणार्‍या गुडघ्यांनी घुसळून निघाली..
त्याच गुड्घ्यांना हलक्या हाताने खोबर्‍याचे तेल लावतांना, डोळे पाणावले तुझे!
तुझं पाणी पाहून कावरं बावरं ते, अजूनच बिलगत असे तुला..
ती वेडी भाषा तुलाच कळत असे..

पण; त्या भाषेला वेळेचं बंधन होतं?

वाटीत भरून ठेवलेला आंब्याचा रस
अगदी त्याच्या हाताने त्याला खायचा असताना
तोंडापर्यंत चिमुकल्या हाताने नेलेला चमचा, अगदी ओठांजवळच उलटत होता
तेव्हा रसाळलेल्या कपड्यांकडे पाहत, कौतुक दाटत असे डोळ्यांत तुझ्या

तेव्हा स्वच्छतेची इच्छा, घराचा नियम होता...?

लहानग्या त्या जीवाने रडून कोलाहल केला की,
आजी- आबांचा जीव पार डोळ्यांत येऊन बसे-
हे करू की ते, म्हणत सारा अनुभव पणाला लावत
त्याचे गोंडस हसू परतावे म्हणून, प्रयत्नांची पराकाष्ठा...

माणसांचे घरात असणे, आतासारखे जड होते?

सणावाराला, ते इवलं रुपडं
तुझ्या मनाला येईल तसं सजवणं, आणि त्यानीही ते मिरवणं
ह्यांत, 'नजर ना लागो' म्हणत, तुझ्या डोळ्यांतलं काजळ हलकेच वेगळं होई

डोळ्यांतल्या लेन्स मुळे आता काजळालाच जागा कुठाय?

'आई' तुझंही आता रुप बदलतंय...!!

आता-
जमतंय,
जगणं जमतंय...!!
नव्या नव्या सुविधांनी घर सिद्ध असावं म्हणून तरलतेचा, वेळेचा, प्रसंगी 'जबाबदारी' म्हणून उरलेल्या जून्या लोकांचाही बळी, जमतोय...

इवल्यांच बालपण गोंजारण्यास "सवड" कुणास आहे...
दिमतीस पाळणाघराची 'घराजोगी' सेवा आहे...

आई,
आई मी बस मोठा होतो आहे!!

गुलमोहर: 

आगाऊ | 29 May, 2012 - 14:09
भूषणराव, मी केवळ उत्सुकतेपोटीच विचारतो आहे याची खात्री बाळगा, बाकी तुमची मर्जी.
>>>

साटोसं = सामुहिक टोळीबचाव संघटना

साटोसं = सामुहिक टोळीबचाव संघटना
>>>>>>>>>>
'कैच्याकै
टोळी हा समुहवाचक शब्द ..... आता टोळीचा बचाव पण समुहाने करायचा.... मग टोळीतले काय करणार राव Uhoh
त्यासाठी वेगळी संघटना Lol अवघडे Proud

विचार कळला काही अंशी पटला; पण मांडणी गंडलीये की काय अशी शंका येऊन तीन चार वेळा वाचली>>>

हे ललित आहे, वाचले म्हणायचे आहे का? Wink Light 1

ते वात्सल्य, तो जिव्हाळा संपलाय असं म्हट्लंच नाहीये, त्याचं वरकरणी बदललेलं रूप मात्र व्यक्त केलंय,

अग्दि बरोबर ,

mala ter khup avadli

Pages