कवडश्यांनी सजवलेली मैफिल,
तुझ्या घरात डोकावणार्या निसर्गाचं लक्षण होतं...
सूर्यकिरणांच्या त्या तिरिपेने वाहून आणलेल्या धूळीच्या कणांची रांग मोडण्याचा,
लाडका खेळ खेळण्यात घरातलं इवलं पाऊल अगदी रमून जायचं...
त्या इवल्या हातांनी कवडसे गच्च धरल्याच्या आनंदात,
घराला, कित्येकदा गोंडस हसण्याने न्हाऊ घातलं
पण महत्त्वाकांक्षांना तरलता उमजते का?
अंगणातली माती, त्या रांगणार्या गुडघ्यांनी घुसळून निघाली..
त्याच गुड्घ्यांना हलक्या हाताने खोबर्याचे तेल लावतांना, डोळे पाणावले तुझे!
तुझं पाणी पाहून कावरं बावरं ते, अजूनच बिलगत असे तुला..
ती वेडी भाषा तुलाच कळत असे..
पण; त्या भाषेला वेळेचं बंधन होतं?
वाटीत भरून ठेवलेला आंब्याचा रस
अगदी त्याच्या हाताने त्याला खायचा असताना
तोंडापर्यंत चिमुकल्या हाताने नेलेला चमचा, अगदी ओठांजवळच उलटत होता
तेव्हा रसाळलेल्या कपड्यांकडे पाहत, कौतुक दाटत असे डोळ्यांत तुझ्या
तेव्हा स्वच्छतेची इच्छा, घराचा नियम होता...?
लहानग्या त्या जीवाने रडून कोलाहल केला की,
आजी- आबांचा जीव पार डोळ्यांत येऊन बसे-
हे करू की ते, म्हणत सारा अनुभव पणाला लावत
त्याचे गोंडस हसू परतावे म्हणून, प्रयत्नांची पराकाष्ठा...
माणसांचे घरात असणे, आतासारखे जड होते?
सणावाराला, ते इवलं रुपडं
तुझ्या मनाला येईल तसं सजवणं, आणि त्यानीही ते मिरवणं
ह्यांत, 'नजर ना लागो' म्हणत, तुझ्या डोळ्यांतलं काजळ हलकेच वेगळं होई
डोळ्यांतल्या लेन्स मुळे आता काजळालाच जागा कुठाय?
'आई' तुझंही आता रुप बदलतंय...!!
आता-
जमतंय,
जगणं जमतंय...!!
नव्या नव्या सुविधांनी घर सिद्ध असावं म्हणून तरलतेचा, वेळेचा, प्रसंगी 'जबाबदारी' म्हणून उरलेल्या जून्या लोकांचाही बळी, जमतोय...
इवल्यांच बालपण गोंजारण्यास "सवड" कुणास आहे...
दिमतीस पाळणाघराची 'घराजोगी' सेवा आहे...
आई,
आई मी बस मोठा होतो आहे!!
वर्किंग वुमन आणि बदलत्या
वर्किंग वुमन आणि बदलत्या काळातलं संगोपन, त्या आईच्याही मनात खोल दडून राहिलेली व्यथा- गोजिर्याचं बालपण न उपभोगता आल्याचा सल तिलाही खुपतोच, तोच जरा तिच्या गोजिर्याच्या नजरेतून... आज घराला तन-मन आणि धन देताना, तिला बदलावं लागलं आहे.. त्या बदलण्याचे काही साईड इफेक्टसही.. तेच काहीसे टिपलेत.
नाही आवडलं. प्रत्येक
नाही आवडलं.
प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक निर्णयाला आपला एक कंगोरा असतो. कदाचित एग्झॅटली याच फेज मधून सध्या जातेय त्यामुळे खूप संमिश्र भावना मनात आहेत. एकाच पोस्टीत नीट मांडू शकेन की नाही माहीत नाही. त्यामुळे प्रयत्न ही करायचा नाहीये.
इवल्यांच बालपण गोंजारण्यास "सवड" कुणास आहे... >>>>
नव्या नव्या सुविधांनी घर सिद्ध असावं म्हणून तरलतेचा, वेळेचा, प्रसंगी 'जबाबदारी' म्हणून उरलेल्या जून्या लोकांचाही बळी, जमतोय... >>>
नाही पटते आहे!
निंबे पटावं असा अट्टहास
निंबे पटावं असा अट्टहास नाही.. काही गोष्टी एक्स्ट्रीमही असतील.. पण असं आहे सुद्धा..
भापो
भापो
आई' तुझंही आता रुप
आई' तुझंही आता रुप बदलतंय.....>>
आई कालही तशीचं
आई आजही तशीचं
सारं बदलू दे जग
आई आहे रे तशीचं..............
सुरूवात खूप रमणीय झाली
मात्र... >>>
नव्या नव्या सुविधांनी घर सिद्ध असावं म्हणून तरलतेचा, वेळेचा, प्रसंगी 'जबाबदारी' म्हणून उरलेल्या जून्या लोकांचाही बळी, जमतोय...>>> एकांगी विचार वाटला, फक्त घरातील सुखसोईंसाठी कुणी असं करत नाही वैचारीक मतभेद किंवा अर्थीक कमजोरीही याचं कारण असते.
आई मी बस मोठा होतो आहे>>>> तुझ्याशिवाय... असं अधोरेखित असलं तरी संदर्भीत होत नाही.
.............................पु.ले.शु
बाग्ज, काय म्हणु तेच कळत
बाग्ज, काय म्हणु तेच कळत नाहीए. पटलं पण आणि नाही पण.
थोडंसं पटलं ते जबरी टोचलं. अगदी डोळे ओलसर झाले एवढं. तो एकटाच मोठा होतो आहे हे बाळाचं दु:खं पण आईचंही दु:खच.
जे पटलं नाही त्याचं कारण आईचं बाह्यरुप बदललं असलं तरी मनातुन आई तीच आणि अगदी तशीच आहे. फक्त व्यक्त करायची तर्हा बदलली असेल. पुर्वीची बाळं जशी आईच्या कुशीत वाढली म्हणुन जास्त लकी तशी पुर्वीची आईसुद्धा आजच्या आईपेक्षा याबाबतीत जास्त सुखी. बाळाला वाढताना बघायला मिळालं तिला.
अजुन खुप काही लिहायचं आहे ते नंतर चर्चेच्या ओघात लिहिनच.
मनिमाऊ तुला १००० मोदकं गं!!!
मनिमाऊ तुला १००० मोदकं गं!!! तो एकटाच मोठा होतो आहे हे बाळाचं दु:खं पण आईचंही दु:खच.
>> बागी, पहील्यांदाच तुझ्या लेखनाचा शेवट एकांगी वाटला! अदरवाईज तुझ्या लेखनाचा शेवट त्या संपूर्ण लेखाचा सरताज असतो...
दुसर्या अंगाने विचार करून स्वतंत्र लेख लिहीशील का प्लीज??? या अवस्थेतून जाईनच थोड्या दिवसांत... आधीच खूप अपराधी वाटतेय गं... पिल्लाला बाबाकडे सोपवून अर्धा तासच पार्लरमध्ये गेलेले... अर्ध्या तासात याने हैराण केलं... आल्यावर अक्षरशः केविलवाणा चेहरा करून घ्यायला सांगत होतं उ उ करून... नवरा म्हणाला, कित्ती सवय केलेस गं पिल्लाला; जड जाणारेय पुढे... कसं जमेल त्याला टाकून नोकरीवर जाताना.... नोकरी करावीच लागेल काय? नाईलाजाने हो... कसं जमणारेय मलाच माहीत नाही...
पिल्लाला बाबाकडे सोपवून अर्धा
पिल्लाला बाबाकडे सोपवून अर्धा तासच पार्लरमध्ये गेलेले >>>>> हॅटस् ऑफ !!
शामदादा दमत नाहितेत प्रतिसाद
शामदादा दमत नाहितेत प्रतिसाद देताना
पटले नाही. हा बराचसा तुमचाच
पटले नाही. हा बराचसा तुमचाच कल्पना विस्तार वाटतोय. अतिशय एकांगी आणि वास्तवाला धरून नाहीये.
नोकरी करणार्या आईच्या मोठ्या झालेल्या बाळाला विचारले पाहिजे. मागे याच विषयावर घमासान चर्चा होऊन गेलीये. तेव्हा इथल्या नोकरी करणार्या आयांच्या अता मोठ्या झालेल्या बाळांनी आपापल्या आईचे खूप कौतूक केले होते.
त्यांना आईच्या नोकरीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. उलट तिचा खूप अभिमान होता.
त्या चर्चेची लिन्क मिळाली तर टाकेन. त्या कवितेच नाव काहीतरी - आई अता मम्मी होतेय- असे होते. परत सगळे तेच तेच मुद्दे लिहायचे-वाचायचे कष्ट नकोत
>>>डोळ्यांतल्या लेन्स मुळे
>>>डोळ्यांतल्या लेन्स मुळे आता काजळालाच जागा कुठाय?
जागा आहे!! काँटॅ़क्ट्स वापरतानादेखिल चांगल्या प्रतीचं काजळ लावता येतं! आय मेकअपही करता येतो.
मृ
मृ
डेलिया +१००००००००००००००० आई
डेलिया +१०००००००००००००००
आई आता मम्मी होतेय प्रकारातलंच वाटलं.
मृण
नाही आवडलं.
नाही आवडलं.
डेलिया | 29 May, 2012 -
डेलिया | 29 May, 2012 - 06:59
पटले नाही. हा बराचसा तुमचाच कल्पना विस्तार वाटतोय. अतिशय एकांगी आणि वास्तवाला धरून नाहीये.
नोकरी करणार्या आईच्या मोठ्या झालेल्या बाळाला विचारले पाहिजे. मागे याच विषयावर घमासान चर्चा होऊन गेलीये. तेव्हा इथल्या नोकरी करणार्या आयांच्या अता मोठ्या झालेल्या बाळांनी आपापल्या आईचे खूप कौतूक केले होते.
त्यांना आईच्या नोकरीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. उलट तिचा खूप अभिमान होता.>>>
'मागे काय झाले होते' याचा या ललिताशी काहीही संबंध नाही. आणि 'तुमचाच कल्पनाविस्तार' म्हणजे काय? हा काय लेख आहे थोडाच? हे ललित आहे. ललित, कविता, कथा, विडंबने यात 'कल्पनाविस्तारच' असतो. लेख असता तर ती लेखिकेची स्वतःची मते आणि मते पटवून देण्याचा प्रयत्न ठरला असता. एखादी गोष्ट आधी झाली होती 'तेव्हाच ती योग्यप्रकारे' झालेली होती असे काहीच नसते. हाही एक अॅन्गल आहे, काही मुलांना, काही घरांना हेही जाणवत असेल.
एकांगी आणि वास्तवाला धरून नसणे हे मत कोणत्या संख्याशास्त्रीय डेटावर विसंबून लिहिलेले आहे? आया आपल्या मुलांना मारण्याची सुपारी देताना टीव्हीवर दाखवतात हल्ली. एखाद्याला स्वतःच्या आईबद्दल कोणतीही तक्रार नसणे हे 'सर्वांनाच आपापल्या आईबद्दल कोणतीही तक्रार नसणे' अशा अर्थाचे आहे हा समज चुकीचा आहे.
==========
या ललितातील मूळ मुद्दा बर्यापैकी नावीन्यपूर्ण आहे. प्रतिसाद (जसे स्वप्नसुंदरीचा, शामचा आणि डेलियांचा) मुद्देसूद आहेत. ( प्रतिसाद पटणे न पटणे वेगळे, पण डेलियांचा मुद्दा - नोकरी करणार्या आईबाबत मुलांचे विचार - हा ललिताशी सुसंबद्ध आहे असे माझे मत).
ललितातील खूपशी शब्दरचना लोभस आहे. उदाहरणे, वातावरण निर्मीती चांगली आहे पण प्रसंग लांबवल्यासारखे वाटले. सर्वसामान्य आईने वाचल्यास तिला खुपणारे, बोचणारे आणि उसळून टीका करावी असे वाटवणारे ललित. पण माझे स्पष्ट मत असे आहे की प्रभावी करण्याच्या प्रयत्नांत ललित अधिक वर्णनात्मक झाले असून पहिल्या दुसर्याच पॅरापासून आईचे 'हल्लीचे' बोचरे वेगळेपण शब्दबद्ध झाले असते तर खुमारी अधिक आली असती. वैम.
==========
अवांतर - बाकी साटोसं आपल्या धाग्यावर अवतरले की आपण चांगले लेखक बनू शकतो हे मानायला हरकत नाही
==========
-'बेफिकीर'!
नाहीच आवडल
नाहीच आवडल
निंबुडा यांना १००% अनुमोदन.
निंबुडा यांना १००% अनुमोदन.
एकांगी भावनिक चित्रण. तुमचे अनुभवविश्व तसेच वैचारिक चौकट वाढवायची नक्कीच गरज आहे.
ट्चकन डोळ्यात पाणी वगैरे आजिबात आले नाही.
सर्वांची मनापासून आभारी आहे
सर्वांची मनापासून आभारी आहे
आई आणि मूल आणि संगोपन- ह्या चे अनेकानेक पैलू आहेत... त्यातलाच हा एक..
एकांगीच आहे कारण "बाळाच्या बालपणाबद्दल" निसटत जाणारे क्षण आहेत- त्या एकट्या बाळाच्याच नजरेतून, उद्या हीच बाळं आईच कौतुक करतात- रादर त्यांनी करायलाच हवं (तेव्हा त्यांच्या जाणिवा आईचा त्याग त्यांच्या ध्यानी येतो) - कारण त्या मातृदेवतेनेही तेच बालपण उपभोगण्याच सुख गमावलेले असते, तेही घराला, त्या बाळाच्या भविष्याला आकार देण्यासाठीच. इथे फक्त जे बालपण निसटलय (जे त्या बाळालाही माहिती नाही कारण रांगत्या वयात स्मरणशक्तीने अजून जोर पकडायचाय) त्याचाच कल्पनाविस्तार आहे.
आज सकाळी एक फार सुंदर समस वाचला, त्याचा आशय असा होता- 'आपण अतिभावनिक असू तर आजकालच्या जगात टिकाव लागणे अशक्य आणि अति वास्तववादी असू तर नात्यांची संवेदना जपणे अशक्य..' हे ललित लिहीताना जरा बोचरं वास्तव आलं असेल, जरा काय बरंचसं... मॅकडी मधे जरा वेळ जाऊन बसा मैत्रिणींनो- सुंदर सुंदर बालिका (हो बालिका दिसाव्यात असेच त्यांनी स्वतःला मेन्टेन केलेले असते) आपल्या अपत्याला "फुल टाईम मेड" च्या गळ्यात बांधताना दिसते, त्याला भरवण्यासाठी, त्याला कडेवर उचलून धरण्यासाठी त्या मेड ला मॅकडीतही आणल्या जातं- आई सोबत असूनही ती मेड त्या राजसाचं सारं करते- हे बोचरं वास्तवंच आहे!
अर्थातच 'सरळसोट' प्रत्येकीला ह्याच कॅटेगरीत बसवलंय असेही नाही
आपण केलेला त्याग समर्थनीय असताना कुणी मनाला लाऊन घेण्याचे कारणही नाही
आणि ड्रीमस-
ह्याचाच दुसरा अँगल "आई, माझ्यासाठी तू किती करतेस" ह्या आशयाचा नक्कीच लिहीता येईल, तो रंगवणेही सोपे असेल, पण हा चितारलेला अँगल नक्कीच वेगळा वाटला, बोचरा वाटला आणि बराचसा खरा ही, म्हणून व्यक्त केला
कुणाला नकळत दुखावले असेल तर, क्षमा असावी.
बेफिकीर, तुमच्या प्रतिसादाशी चक्क सहमत
बेफिकीर, तुमच्या प्रतिसादाशी
बेफिकीर, तुमच्या प्रतिसादाशी चक्क सहमत >>>
साटोसं च्या एकांगी वर्तनाच्या विरोधात मी सारखाच असतो, जो धागा समोर आला आहे तो धागा स्वतंत्रपणे आस्वादावा अशा मताचा मी तरी आहे. हा धागा पटला नाही हे मत फोरमवर अगदी सहज देता येते. त्यास कोण विरोध करणार आणि का करावा? पण अनुभवविश्व आणि वैचारीक चौकट वाढवा हा सल्ला, काजळ आणि लेन्सवरचा विनोद हे अनावश्यक वाटले. त्यातही तसा सल्ला 'अमां'नी दिलेला पाहून नवल वाटले.
हे सगळे तुम्हाला आधी माहीत झाले असते तर तुमच्या इतर धाग्यांवरचे माझे आधीचेही प्रतिसाद नेमके काय आहेत ते तुम्हाला वेळीच समजले असते
असो, ओमंलाऑदरॉ टर्न्ड मी इन्टू अ (मोर) कडवट मॅन
<आई मी बस मोठा होतो आह> मी
<आई मी बस मोठा होतो आह>
मी तसाही मोठा होणारच. पण तू कायम लहानच राहिलीस तर बरं होईल.
बागे नाही आवडली
बागे नाही आवडली
आवडलं, नाही आवडलं, यापैकी
आवडलं, नाही आवडलं, यापैकी काहीच वाटलं नाही...
मागे याच विषयावर घमासान चर्चा
मागे याच विषयावर घमासान चर्चा होऊन गेलीये........... त्या कवितेच नाव काहीतरी - आई अता मम्मी होतेय- असे होते. >>> मलाही हा लेख वाचून अगदी त्याच कवितेची आठवण झाली होती. पण नाव आठवत नव्हते.
बरेचसे मुद्दे पटले
बरेचसे मुद्दे पटले नाही
प्रत्येकाची आई आपले बाळ सदैव हसरे असावे याचा प्रयत्नात अजुनही आहे राहील.
आज अंगण मूळात नाहीच सरळ फ्लॅट संस्कॄतीतील सिरॅमिक टाईल्स. बाळ तिथे रांगताना पडल तर आई हलकेच जवळ ओढुन लागलं का माझ्या छकुल्याला असे लाडीक बोलते.
काजळ तर सर्वत्र जणु कालबाह्य होत आहे.
एक शब्दरचना म्हणुन ठीक वाटते !
बागेश्री, हा ही एक अॅन्गल
बागेश्री, हा ही एक अॅन्गल आहे. असावा का असू नये ही चर्चा फारसं काही निष्पन्नात आणेल असं वाटत नाही.
आणि हा अॅन्गल लोभस (बेफिकीरचाच शब्दं) शब्दांत समोर आलाय.
आजच्या आपण बायका, काजळ घालत नाही... किंवा दृष्टं लागते ह्यावर विश्वासही नसतो... पण एखाद्या काकूनं, आज्जीनं 'दृष्टं काढुन टाक बाई...' म्हटलं की जे काय दृष्टं लागण्याजोगं बाळात आहे, त्याबद्दलचा अभिमान, प्रेम अगदी दोनच क्षण का होईना येत असेल उफाळुन... मग नंतर म्हणूही... 'दृष्टं-बिष्टं काही नस्तं हो.. आज्जी'
आजच्या आईला बाळाच्या ढोपरांना तेल लावायला लागतच नसेल... पण त्याजोगा दुसरा काळजी घ्यावा लागणारा उपचार असतोच की... पाळणाघरात राहुन दर पंधरवड्याआड सर्दी घरी आणणार्या बाळाचं नाक आजची आई, दर पंधरा दिवसांनीही तितक्याच हळुवारपणे पुसतेच... डोळ्यात पाणीही येत असणार.
आणि हे असं आई-बाळाचं एका हॄदयीचं दुसर्या हृदयी... चालूच आहे. त्याचा घाट बदलतोय, भाषा बदलतेय, रूप बदलतय पण जिव्हाळा?... अगदी इतकुसाही कमी नाही.
तो तू पक्का पकडलायस... आणि आपल्या आई बरोबरच्या तसल्या (वाडा, अंगण, धुराचे कवडसे इ.) क्षणांचीच शिदोरी घेऊन मोठा झालेला एखादा बाप आपल्या आजच्या पाळणाघरातून सर्दी घेऊन घरी आलेल्या लेकाकडे बघून, त्याचं दु:खं आपलं म्हणून मांडायला गेला, तर जसं मांडेल तस्सं उतरलय...
मला लेख आवडलाय...
दाद, अगदी!! ते वात्सल्य, तो
दाद, अगदी!!
ते वात्सल्य, तो जिव्हाळा संपलाय असं म्हट्लंच नाहीये, त्याचं वरकरणी बदललेलं रूप मात्र व्यक्त केलंय, जाणून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद!
प्रतिसाद देणार्या प्रत्येकाचे आभार..
बाकी साटोसं आपल्या धाग्यावर
बाकी साटोसं आपल्या धाग्यावर अवतरले की आपण चांगले लेखक बनू शकतो हे मानायला हरकत नाही>>> साटोसं म्हंजे काय? आणि ते धाग्यावर आले की आपण चांगले लेखक बनू शकतो हे कोणत्या 'संख्याशास्त्रीय डेटावर' विसंबून लिहिलेले आहे?
बाकी ललित कंटाळवाणं आहे, मजा प्रतिक्रियातच आहे!!!!!!
साटोसं म्हंजे काय? आणि ते
साटोसं म्हंजे काय? आणि ते धाग्यावर आले की आपण चांगले लेखक बनू शकतो हे कोणत्या 'संख्याशास्त्रीय डेटावर' विसंबून लिहिलेले आहे?>>>
ज्या वाक्यांपुढे डोळा मारण्याची स्मायली दिली जाते त्यांचा संख्याशात्रीय आधार विचारणे म्हणजे... जाऊदेत
साटोसं म्हणजे काय>>> आपला
साटोसं म्हणजे काय>>> आपला प्रतिसाद हे साटोसंचं लक्षण आहे
भूषणराव, मी केवळ
भूषणराव, मी केवळ उत्सुकतेपोटीच विचारतो आहे याची खात्री बाळगा, बाकी तुमची मर्जी.
Pages