आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
मास्तुरे.. किती उशीरा संशय
मास्तुरे.. किती उशीरा संशय व्यक्त करताय....
माझी ही पोस्ट बघा
हिम्सकूल | 21 May, 2012 - 12:34
आयपीएल मध्यल्या फिक्सिंगबद्दल चर्चा करा आधी.... गेल्या पाचही मॅचेस मधले निकाल बघता चेन्नै बाहेर जाण्याची शक्यता असताना ते अगदीच आरामात आत आहेत... डेक्कन आधीच्या सगळ्या मॅचेस मध्ये भंगार खेळून बरोबर शेवटच्या दोन मॅचेस जीवावर उदार होऊन खेळले आणि जिंकले.. कुठेतरी नक्कीच पाणी मुरतय..
२१ तारखेलाच मी ही शंका व्यक्त करुन टाकली होती...
जिथे विश्वचषक फिक्स होतो तिथे
जिथे विश्वचषक फिक्स होतो तिथे आयपीएलबद्दल कसली चर्चा करताय? आयपीएल म्हणजे शुद्ध धंदा आहे आणि सगळे धंदेवाईक लोक मिळून सामान्य जनतेला मामा बनवून(आता अजून काय राहिलंय म्हणा बनवायचं?) आपापल्या पोळीवर तूप ओतून घेताहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लहानपणी भातुकली खेळला असाल ना तर ती आठवून पाहा...तिथे कशा भूमिका वाटून घेतल्या जायच्या...कुणी बाबा,कुणी आई,कुणी डॉक्टर वगैरे...ते सगळं कसं लुटुपुटीचंच होतं ना...आयपीएलही तसंच आहे.
उगाच आपला वेळ,श्रम,पैसा कशाला फुकट घालवताय...आपलं...घातलात त्यावर.
>>> २१ तारखेलाच मी ही शंका
>>> २१ तारखेलाच मी ही शंका व्यक्त करुन टाकली होती...
मी वाचला होता तुमचा हा प्रतिसाद. त्यावेळी जरा संशस्पास्पद वाटले होते पण इतकी पाल चुकचुकली नव्हती. दिल्लीच्या सामन्यानंतर खात्रीच झाली.
इतरांच्या कामगिरीवर स्वतःच्या भवितव्याची वाट बघत बसलेल्या चेन्नईच्या बाजूने उरलेल्या सर्व ५ सामन्यांचे निकाल लागले हा नक्कीच योगायोग नाही. बंगळूरने पंजाबला हरवून पंजाबची वाट बंद करणे, तळाच्या डेक्कनने राजस्थानला अत्यंत कमी धावसंख्येत हरवून त्यांचा मार्ग बंद करणे, तळाच्या डेक्कनने बंगळूरला अत्यंत कमी धावसंख्येत हरवून त्यांचा मार्ग बंद करणे, नंतर मुम्बईने संघनिवडीचा व नाणेफेकीचा निकाल चेन्नईला अनुकूल असा घेऊन सामना गमाविणे आणि आता दिल्लीने सुद्धा संघनिवडीचा व नाणेफेकीचा निकाल चेन्नईला अनुकूल असा घेऊन सामना गमाविणे . . . या इतक्या सर्व गोष्टी नक्कीच योगायोगाच्या किंवा क्रिकेटच्या वैभवशाली अनिश्चततेच्या वाटत नाहीत. मटामधल्या थिअरीप्रमाणे, बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई संघाचा मालक ही एकच व्यक्ती आहे हा योगायोग नव्हे.
पण इतक्या सगळ्या संघांना आणि
पण इतक्या सगळ्या संघांना आणि महत्वाचे म्हणजे खेळाडूंना एका वेळी फिक्स करता येत असेल?
स्पॉट फिक्सिंग वगैरे ठीक आहे पण आख्खी मॅच फिक्स करायला किमान कर्णधार आणि ३-४ इम्पॅक्ट प्लेयर्सना तरी मॅनेज करावे लागत असेल.... हरलेले संघ आणि त्यातील इम्पॅक्ट प्लेयर्स बघून ते मॅनेज होणार्यातले आहेत असे वाटते?
बर ते जाऊदेत... आज काही
बर ते जाऊदेत...
आज काही कारणास्तव मिस्टेरियस मॅन नरीन ला "बसवला" तर काय प्रतिक्रीया असतील ?
आता नरीन फॉर्मातच नव्हता असे कुणी म्हणू नये. सचिन व ईतर भल्या भल्या ना देखिल ज्याने व्यवस्थित मामा बनवले आहे त्याच्या फॉर्म/टॅलेंट बद्दल शंका नसावीच..
आणी नाणेफेक गंभीर ने जिंकल्यावर त्याने देखिल आधी गोलंदाजी घेतली तर..? (विचार करा ज्या कोलकत्ता ची भक्कम बाजू विशेषतः गोलंदाजी आहे). चेन्नई ने गेल्या दोन्ही सामन्यात पहिले फलंदाजी करून तिथेच सामना आपल्या बाजूने वळवलाय हे काही वेगळे सांगायला नकोच.
असो भोपळा फुटेलच लवकर...
भाऊंना अनुमोदन. स्पॉट
भाऊंना अनुमोदन.
स्पॉट फिक्सिंग वगैरे ठीक आहे पण आख्खी मॅच फिक्स करायला किमान कर्णधार आणि ३-४ इम्पॅक्ट प्लेयर्सना तरी मॅनेज करावे लागत असेल.... हरलेले संघ आणि त्यातील इम्पॅक्ट प्लेयर्स बघून ते मॅनेज होणार्यातले आहेत असे वाटते? >> बरोबर. एव्हढ्या मोठ्या स्तरावर मॅनेज केले गेले असेल तर कुठे तरी बाहेर येणे साहजिक आहे.
योग नरिनला बसवले नाहिये नि CSK ने टॉस जिंकून फलंदाजी घेतली आहे. मॅच फिक्स आहे हे कसे सिद्ध करशील ? mucmullam ला बाहेर ठेवले म्हणून ना
.. मला आता तुझाच संशय यायला लागलाय फिक्सिंगबद्दल ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बर, आता ते सगळ सोडा आणि मस्त
बर, आता ते सगळ सोडा आणि मस्त चेन्नईच्या बॅटींगची मजा लुटा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चेन्नई ८८-१ [१०.३ षटकं]; इथं
चेन्नई ८८-१ [१०.३ षटकं]; इथं टाकाऊ ठरवलेला विजय गेल्या सामन्यातल्या शतकानंतर आज आत्ताच ४२ धांवा काढून बाद झाला. विकेट संथ आहे व धांवा जमवणं कठीण आहे असं टीव्हीवरच्या तज्ञांच मत . कोलकताचे गोलंदाज चेन्नईच्या फलंदाजाना फटके मारूं द्यायला 'हलवे' टाकत होते असं मला तरी नाही वाटलं.
चेन्नई १३०-१ [१४.२ षटकं] रैना
चेन्नई १३०-१ [१४.२ षटकं] रैना १६ चेंडूत ३० ! हे तर रैना कडून 'नि:संशय' अपेक्षितच !
Awasome Raina Vijay taakuch
Awasome Raina
Vijay taakuch Aahe. Keval gallitlya matches madhe ran kadhto. He have had many opportunities in international cricket.
<< Vijay taakuch Aahe >>
<< Vijay taakuch Aahe >> Sorry, I beg to differ; मुरली विजय हा कसोटीकरता सलामीचा फलंदाज म्हणून निवडला गेला. १२ कसोटी [ २० इनिंग्ज] मधे तो खेळला व ३०.५ च्या सरासरीने त्याने ६०९ धांवा केल्या [ १शतक व २ अर्ध शतकं]. मुख्य म्हणजे सलामीसाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूत कसोटी सामन्यांसाठी वसिम जफारनंतर त्यांतल्या त्यांत तंत्रशुद्ध तोच वाटतो . १२ कसोटी व ११ ओडीआय सामने म्हणजे << He have had many opportunities in international cricket >> असं दुसरा उत्तम पर्याय नसेल तर म्हणतां येईल का ? शिवाय, भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात निखळ प्रतिभा, तपश्चर्या व तीव्र खुल्या स्पर्धेला तोंड दिल्याशिवाय कुणीही आयपीएलसाठीही निवडला जाऊं शकत नाही; अशा परिस्थितीत नवोदित खेळाडूंच्या कामगिरीविषयीं मत व्यक्त करणं ठीक आहे पण त्यांची सुरवातीलाच हेटाळणीपूर्वक अवहेलना करणं अन्यायकारक आहे असं मला मनापासून वाटतं. आयपीएलमधे त्याने झंझावाती शतक झळकावलं तर करूंया ना त्याचं कौतुक. May be he has now come into his own and will serve India better; who knows !
या खेळपट्टीवर १८० नक्कीच
या खेळपट्टीवर १८० नक्कीच पाठलाग करता येवू शकेल.. खेळपट्ट्टी व खेळ एकंदर वर्णन पाटा वरवंटा असे करता येईल. मला वाटते युसुफ पठाण ची खेळी या खेळपट्टीवर निर्णायक ठरू शकेल. फ्रंट फुट ला खेळल्यास या खेळपट्टीवर भरपूर धावा काढता येवू शकतील.. बाऊंस अगदी व्यवस्थित आहे, टर्न जवळ जवळ शून्य... कॅलिस १४ षटकापर्यंत टिकला आणि मग युसूफ आला तर कलकत्ता हा सामना अगदी सहज खिशात घालेल असे वाटते. माझा पाठींबा नक्कीच कलकत्ताला.. करबो लरबो जितबो रे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
७ षटकांत ६९ म्हणजे १० ची
७ षटकांत ६९ म्हणजे १० ची सरासरी सुरवातीपासून ठेवायचा कोलकताचा निश्चय दिसतोय; कालिसची खेळी आज खूप महत्वाची !
भाऊ, तूर्तास ना कालिस ना
भाऊ,
तूर्तास ना कालिस ना युसुफ, बिसला एकहाती कुटतोय.. मस्तच.... the ease with which all batsmen have played on this track, i am sure Shukla, Shakib, Yusuf, Tiwary all will enjoy batting on this pitch.. I would say this is for KKR to lose from here on.. (97/1)
I thouught CSK should have scored 200 plus.. they are 20 good runs short..?
>>> मुरली विजय हा कसोटीकरता
>>> मुरली विजय हा कसोटीकरता सलामीचा फलंदाज म्हणून निवडला गेला. १२ कसोटी [ २० इनिंग्ज] मधे तो खेळला व ३०.५ च्या सरासरीने त्याने ६०९ धांवा केल्या [ १शतक व २ अर्ध शतकं]. मुख्य म्हणजे सलामीसाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूत कसोटी सामन्यांसाठी वसिम जफारनंतर त्यांतल्या त्यांत तंत्रशुद्ध तोच वाटतो .
मुरली विजयला गेल्या वर्षी विंडीजविरूद्ध विंडीजमध्ये संपूर्ण मालिकेत खेळवले होते. त्या मालिकेतल्या ३ कसोटीतल्या पहिल्या ५ डावात तो पूर्ण अपयशी होता व ६ व्या डावात त्याने ४५ धावा केल्या. त्याच्या गेल्या ६ कसोटीतल्या १२ डावातील कामगिरी अशी आहे. ४५, ५, ३, ११, ०, ८, ९, १९, ३७, १३९, २७, १४. त्याने या १२ डावात केवळ एक शतक केले आहे व त्यानंतरची त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे ४५. १२ डावात एकूण ३१७ धावा, सरासरी - २६.४१, शतक - १, अर्धशतके - ०. एकंदरीत तो कसोटीसाठी सुमार फलंदाज आहे.
>>> पण इतक्या सगळ्या संघांना
>>> पण इतक्या सगळ्या संघांना आणि महत्वाचे म्हणजे खेळाडूंना एका वेळी फिक्स करता येत असेल?
स्पॉट फिक्सिंग वगैरे ठीक आहे पण आख्खी मॅच फिक्स करायला किमान कर्णधार आणि ३-४ इम्पॅक्ट प्लेयर्सना तरी मॅनेज करावे लागत असेल.... हरलेले संघ आणि त्यातील इम्पॅक्ट प्लेयर्स बघून ते मॅनेज होणार्यातले आहेत असे वाटते?
दिल्ली वि चेन्नई या सामन्यात खेळाडूंना फिक्स केलेले नसून इतर निर्णय फिक्स केल्यासारखे वाटतात. नाणेफेकीच्या कौलानंतर क्षेत्ररक्षण करणे, मॉर्केलला न खेळविणे, सनी गुप्ता सारख्या सुमार गोलंदाजाला घेऊन त्याला थेट पहिले षटक देणे, स्वतः सलामीला न येणे इ. गोष्टींचा आणि प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीचा संबंध नाही. सनी गुप्ताचे पृथक्करण होते ३-०-४७-० आणि सेहवागचे होते १-०-२१-०. या दोघांनी मिळून ४ षटकांत ६८ धावा दिल्या व एकही बळी घेतला नाही. मॉर्केल असता तर त्याचे पृथक्करण नक्कीच ४-०-६८-० इतके वाईट नसते.
कोलकाता जिंकले. (यंदा
कोलकाता जिंकले.
(यंदा त्यांचाच टर्न होता हे आता सिद्ध झाले
)
चला, कोलकताचं घोडं अखेर गंगेत
चला, कोलकताचं घोडं अखेर गंगेत न्हालं !! अभिनंदन !!
>>> कोलकाता जिंकले. कलकत्ता
>>> कोलकाता जिंकले.
कलकत्ता जिंकल्याचे फारसे दु:ख नाही, पण आता शाहरुख सोकावणार.
कोलकोत्ता शाहरुख रेलिन्गवरन
कोलकोत्ता![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
शाहरुख रेलिन्गवरन उडी मारायला निघाला होता!
कोलकाता जिंकले. (यंदा
कोलकाता जिंकले.
(यंदा त्यांचाच टर्न होता हे आता सिद्ध झाले>> आता शारुक पुढच्या वर्षी टीम विकायला रिकामा झाला.
<< शाहरुख रेलिन्गवरन उडी
<< शाहरुख रेलिन्गवरन उडी मारायला निघाला होता! >> कोणत्या मूर्खाने अडवला त्याला ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मुंबईतल्या आपल्या वर्तणुकीबद्दल शाहरुखने आतां जाहीर माफी मागितलीय; ' तुम्ही मला कप जिंकू द्या, मीं तुम्हाला जाहीर माफी देतो ', असा कांही करार झाला नव्हता ना !
बिस्ला काय खेळला राव. धोनीला
बिस्ला काय खेळला राव. धोनीला चेहर्यावरची घडी मोडू न देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली
kaarthik, patel ह्यांच्याऐवजी बिस्लाला संधी देण्यास हरकत नसावी. साहा एकही गेम खेळला नसल्यामूळे त्याच्यावर अन्यायच झाला म्हणायचा.
मॅक्मिलनच्या जागी बिस्ला खेळवणे नि त्याने सामना जिंकून देणे, कसले जबरदस्त फिक्सिंग असेल![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भाऊ विजयबद्दल तुम्हाला अनुमोदन पण त्यात एक मह्त्वाचा भाग तुम्ही विसरता आहात. तुमची पोस्ट हि भूतकाळातली हवी. IPL 1/2 मधे खेळल्यापासून त्याची तंत्रशुद्धता हरवली आहे. जेंव्हापासून त्याने मिड्विकेट cross bat pull shot खेळायला सुरूवात केली तेंव्हापासून तो टेस्ट नि short format cricket मधला फरक विसरल्यासारखा खेळतोय. थोडक्यात मास्तुरेने दिलेल्या stats चे कारण हे असावे असे मला वाटते.
मी तर सगळे सामने, नाटक किंवा
मी तर सगळे सामने, नाटक किंवा चित्रपट असल्यासारखे पहातो. त्यात तर सगळेच नुसतेच 'ठरवलेले' नसते तर सराव करून करून अगदी तस्सेच घडेल याचा प्रयत्न केलेला असतो.
आणि नाटकात किंवा चित्रपटात जशी एखादी अनपेक्षित घटना घडते, तसेच प्रकार सामन्यातहि होत असतात.
अश्या अनपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत तर 'नाट्य' ते काय? नि काय होणार हे माहित असले किंवा अपेक्षित असेल तेच घडले तर ते नाटक नि सिनेमा बघायचा कशाला? त्यात थोडे हास्यविनोद नसतील तर कंटाळा नाही का येणार?
आणि जरी सगळे माहित असले तरी आपण जसे नाटक किंवा सिनेमा त्यातल्या अभिनय, दिग्दर्शन इ. साठी बघतो, तसेच सामनेहि!
शेवटी करमणूक हेच खरे. - बोलो: इना मिना डिका...ढाम टडाम ढाम ढाम.. .. ये आय पी एल है भै!...
आता या शनिवारी वेस्ट ईंडिजमधे भारत - अनधिकृत आहे म्हणे. मग नवीन धागा काढणार का आपले जनरल क्रिकेट-२ या धाग्यावर?
असामी, फारेंडा, भारतीय संघाला अमेरिकेत आणणार का? एक मॅच न्यू जर्सीत (शक्यतो उत्तर जर्सीत) व एक सान होजे ला. लै पैका मिळेल बघा. अगदी मी सुद्धा तिकीट काढून बघायला जाईन!!
झक्की, तो अनधिकृत संघ नव्हे -
झक्की, तो अनधिकृत संघ नव्हे - "ए" टीम. आणि अमेरिकन अर्थाने ए टीम म्हणजे सर्वोत्तम संघ असे नव्हे, उलट तसा दुय्यम संघ, जे मुख्य संघाचे दार ठोठावत आहेत असे खेळाडू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी भारतीय संघाला कोठे घेउन जाऊ शकत असतो तर गेल्या अनेक वर्षांत संघ स्वित्झर्लंड पासून ते रावसाहेबांच्या बारा गडगड्यांच्या विहीरीपर्यंत फिरून आला असता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< .. विजयबद्दल तुम्हाला
<< .. विजयबद्दल तुम्हाला अनुमोदन पण त्यात एक मह्त्वाचा भाग तुम्ही विसरता आहात.... IPL 1/2 मधे खेळल्यापासून त्याची तंत्रशुद्धता हरवली आहे >> विजयची चूक अशी असावी कीं कसोटीत बस्तान बसवण्याआधीच मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीही ' हम भी कुछ कम नही' हें दाखवण्याचा त्याने अट्टाहास केला ; पण आज परिस्थितीच अशी आहे कीं मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचं 'स्पेश्यलायझेशन' याला 'फक्त कसोटीवीर' होण्यापेक्षां निर्विवाद महत्व आलं आहे ! कसोटीसाठी विजय एक अफलातून सलामीवीर आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीय; पण भारताची त्या स्थानाची निकड भागवायला तो उपलब्ध असलेला एकच बर्यापैकीं पर्याय आहे व म्हणूनच हेटाळणीपेक्षां त्याला सबूरीची व प्रोत्साहनाची गरज आहे, एवढंच . माझं हें मत पूर्वीही इथल्याच चर्चेत मी मांडलं होतं पण तें १००% टक्के बरोबरच आहे असा मात्र माझा दुराग्रह नाही. आणि असलाच, तरी त्याला विचारणार आहे कोण म्हणा !!
पण आज परिस्थितीच अशी आहे कीं
पण आज परिस्थितीच अशी आहे कीं मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचं 'स्पेश्यलायझेशन' याला 'फक्त कसोटीवीर' होण्यापेक्षां निर्विवाद महत्व आलं आहे ! >> बरोबर, पण आपले मूळ शक्तिस्थान हरवणे हा प्रकार झेपत नाहि. राहाणे एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येतो आहे. तसेच मनदिप सिंग, अभिनव मुकुंद हेहि आहेतच.
<< राहाणे एक उत्तम पर्याय
<< राहाणे एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येतो आहे. तसेच मनदिप सिंग, अभिनव मुकुंद हेहि आहेतच. >> चांगले पर्याय असतील तर विजयने स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली , असंच म्हणावं लागेल !!
आज इडनगार्डनवर 'ममता'चा
आज इडनगार्डनवर 'ममता'चा महापूर आला आहे... खुद्द आयपील पेक्षा ते सेलिब्रेशनच फार मनोरंजक आहे. :p
जर पुणे वॉरिअर्स विजेते असते
जर पुणे वॉरिअर्स विजेते असते तर पृथ्वीराज चव्हाणांनी 'हा महाराष्टाचा विजय आहे' असे सांगून गहुंजे मैदानावर असा सोहळा केला असता का?
Pages