Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किरण या धाग्यावर स्वागत
किरण या धाग्यावर स्वागत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
००३/०१८ : मधुबन खुशबू देता है सागर सावन देता है
जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है
भरत गाणं सहीच आहे. पण हे
भरत गाणं सहीच आहे. पण हे नाही..
क्ल्यु : या सिनेमाच्या शिर्षकाची पर्यटकांना विशेष आवड आहे.
००३/०१८ : जीवन से भरी तेरी
००३/०१८ : जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए
बरोबर भरत.. जीवन से भरी तेरी
बरोबर भरत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जीवन से भरी तेरी आंखे
मजबूर करे जीने के लिये
सागर भी तरसते रहते है
तेरे होंठ का रस पीने के लिये
किरण ... कोडं क्र. ००३ / ०१८
किरण ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कोडं क्र. ००३ / ०१८ :
जीवन से भरी तेरी आँखे, मजबूर करे जीने के लिये, जीने के लिये
सागर भी तरसते रहते है, तेरे रूप का रस पीने के लिये, पीने के लिये
कोडं क्र. ००३ / ०१९: 'अरे,
कोडं क्र. ००३ / ०१९:
'अरे, काय टक लावून पहातोयस मघापासून त्या मुलीकडे? स्वतः चप्पल खाशील आणि मलाही प्रसाद मिळेल. चल' अजय वैतागून सुभाषला म्हणाला.
'तिला कुठेतरी पाहिलंय मी'
'स्वप्नात पाहिलं असशील. उगाच भंकस करू नकोस हं'
'कसली भंकस करतो आहे सुभाष?'
'अग बघ ना, म्हणे त्या मुलीला कुठेतरी पाहिलंय....'
'ए स्नेहा, भंकस नाही ग. तिचा चेहेरा ओळखीचा वाटतोय.'
'वाटायचाच. एखादा सुंदर चेहेरा दिसला की तुम्हा मुलांना ओळखीचा वाटायचाच.'
'स्नेहा, ही प्रमिला माने आहे. आमच्या शाळेत होती'
'तर तर.....तोंडाला येईल ते नाव सांगशील तर काय आता. पण तिचं नाव क्ष्रिपा सावंत आहे.'
'शक्यच नाही. अगदी प्रमिला मानेसारखी दिसतेय ती. माझी खास मैत्रिण होती शाळेत असताना. मी विचारतो जाऊन.'
असं म्हणून अजय आणि स्नेहा नको नको म्हणताना सुभाष निघाला. आता हा नक्की थोबाडीत खाणार म्हणून त्या दोघांनी डोळे मिटून घेतले खरे. पण थोड्याच वेळात सुभाषच्या आणि त्या मुलीच्या हसण्याचा आवाज ऐकून ते थक्क झाले. सुभाषने आपला प्रश्न एका जुन्या हिंदी गाण्याच्या रुपाने विचारला होता. ओळखा ते गाणं.
कोडं क्र. ००३ / ०२०: ती
कोडं क्र. ००३ / ०२०:
ती प्रथितयश गायिका. जवळजवळ सगळ्या चित्रपटांच्या गाण्यात तिचाच आवाज. देशाच्याच काय पण जिथे जिथे भारतीय लोक आहेत त्या विदेशातही ऐकू येणारा. त्याचा संगीताच्या दुनियेशी एक श्रोता आणि तिचा चाहता याखेरीज संबंध नाही. पण दोघांचं प्रेम जमलं आणि ते लग्न करणार असं सगळे धरून चालले असतानाच दोघांत बेबनाव झाला. त्याने तिला सोडून जायचं ठरवलं - अगदी दूर विदेशात. निघायच्या आदल्या दिवशी दोघांची भेट ज्या रेडिओ कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली तोच ऐकताना तिने त्याच्यासाठी डेडिकेट केलेलं तिचंच एक गाणं त्याने ऐकलं. आणि ते ऐकून त्याने तिला सोडून जायचा आपला विचारच बदलला. कोणतं गाणं असेल ते?
क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे.
कोडं क्रम ००३/२० १. ओ दूर
कोडं क्रम ००३/२०
१. ओ दूर जानेवाले
२. न जाओ सैयां..
३. जानेवाले..कभी नही आते
कोडं क्र. ००३ / ०१९ तेरा
कोडं क्र. ००३ / ०१९
तेरा मुझसे है पहले का नाता कोई
यूं ही नही दिल लुभाता कही
जाने तू या जाने ना
माने तू या माने ना
००३/२० तुम मुझे युं भुला न
००३/२० तुम मुझे युं भुला न पाओगे
जब कभीभी सुनोगे गीत मेरे
संग संग् तुम भी गुनगुनाओगे
००३/२० नाम गुन जायेगा चेहरा
००३/२० नाम गुन जायेगा चेहरा ये बदल जायेगा ?
(तिला सोडून चालला होता पण तिच्या आवाजाला विसरणे शक्य नव्हते त्याला. आणि ती तर म्हणतेय की तिचा आवाज म्हणजेच ती. मग कसा सोडू शकणार तो तिला? मग देश सोडून जाण्यात तरी काय अर्थ?)
कोडं क्र. ००३ / ०२१: मुंबईतली
कोडं क्र. ००३ / ०२१:
मुंबईतली एक निम्नमध्यमवर्गीय वस्ती. त्या गल्लीच्या तोंडाशीच एक टिपीकल ज्युस सेंटर होतं - "जन्नत ज्युस सेंटर - प्रोप्रा. जावेद लियाकत मालिक" अशी पाटी त्यावर झळकत होती. जावेद हे ज्युस सेंटर चालवायचा - पण ते नावालाच. खरं तर तो दिवसभर स्वप्नरंजनात गुंगलेला असायचा. कधीनाकधी आपलीही शादी होईल, एक खुबसूरत परीसारखी बिबी असेल असे खयाली कबाब तो सतत पकवायचा. पण अहो आश्चर्यम! एका खर्याखुर्या परीचं त्याच्यावर प्रेम बसलं. पण हे तिच्या परीराज्यात कळताच हाहाकार उडाला. परीराणीनं तिची उडण्याची शक्ती काढूनच घेतली.
तर ती दु:खी परी कोणतं गाणं म्हणेल?
उत्तर कोडं ०३/२०: जाइये आप
उत्तर कोडं ०३/२०:
जाइये आप कहां जायेंगे, ये नजर लौट के फिर आयेगी
दूर तक आप के पीछे पीछे मेरी आवाज़ चली आयेगी
उत्तर कोडं ००३/०२१: पंख होते
उत्तर कोडं ००३/०२१:
पंख होते तो उड आती रे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रसिया ओ जालिमा
०२१च्या उत्तरात जालिम हवं.
०२१च्या उत्तरात जालिम हवं.
अक्षरी ग्रेट मामी तर ग्रेटर
अक्षरी ग्रेट मामी तर ग्रेटर ग्रेटेस्ट
००३ / ०२१: सुन सुन सुन
००३ / ०२१:
सुन सुन सुन जा(वेद) लि(याकत) मा(लिक)
प्यार हमको तुमसे हो गया
दिल से मिला ले दिल मेरा
तुझको मेरे प्यार की कसम
उत्तर कोडं ००३/०२१: पंख होते
उत्तर कोडं ००३/०२१:
पंख होते तो उड आती रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रसिया ओ जालिमा
>>>> बरोब्बर अक्षरी.
जावेद लियाकत मालिक >>>> आडनाव मलिक नसून मालिक आहे हे कृप्या लक्षात घ्या.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कोडं क्र. ००३ / ०१९: 'अरे,
कोडं क्र. ००३ / ०१९:
'अरे, काय टक लावून पहातोयस मघापासून त्या मुलीकडे? स्वतः चप्पल खाशील आणि मलाही प्रसाद मिळेल. चल' अजय वैतागून सुभाषला म्हणाला.
'तिला कुठेतरी पाहिलंय मी'
'स्वप्नात पाहिलं असशील. उगाच भंकस करू नकोस हं'
'कसली भंकस करतो आहे सुभाष?'
'अग बघ ना, म्हणे त्या मुलीला कुठेतरी पाहिलंय....'
'ए स्नेहा, भंकस नाही ग. तिचा चेहेरा ओळखीचा वाटतोय.'
'वाटायचाच. एखादा सुंदर चेहेरा दिसला की तुम्हा मुलांना ओळखीचा वाटायचाच.'
'स्नेहा, ही प्रमिला माने आहे. आमच्या शाळेत होती'
'तर तर.....तोंडाला येईल ते नाव सांगशील तर काय आता. पण तिचं नाव क्ष्रिपा सावंत आहे.'
'शक्यच नाही. अगदी प्रमिला मानेसारखी दिसतेय ती. माझी खास मैत्रिण होती शाळेत असताना. मी विचारतो जाऊन.'
असं म्हणून अजय आणि स्नेहा नको नको म्हणताना सुभाष निघाला. आता हा नक्की थोबाडीत खाणार म्हणून त्या दोघांनी डोळे मिटून घेतले खरे. पण थोड्याच वेळात सुभाषच्या आणि त्या मुलीच्या हसण्याचा आवाज ऐकून ते थक्क झाले. सुभाषने आपला प्रश्न एका जुन्या हिंदी गाण्याच्या रुपाने विचारला होता. ओळखा ते गाणं.
उत्तरः
तेरा मुझसे है पहले का नाता कोई
यूं ही नही दिल लुभाता कही
जाने तू या जाने ना
माने तू या माने ना
किरण, बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ००३ / ०२०: ती
कोडं क्र. ००३ / ०२०:
ती प्रथितयश गायिका. जवळजवळ सगळ्या चित्रपटांच्या गाण्यात तिचाच आवाज. देशाच्याच काय पण जिथे जिथे भारतीय लोक आहेत त्या विदेशातही ऐकू येणारा. त्याचा संगीताच्या दुनियेशी एक श्रोता आणि तिचा चाहता याखेरीज संबंध नाही. पण दोघांचं प्रेम जमलं आणि ते लग्न करणार असं सगळे धरून चालले असतानाच दोघांत बेबनाव झाला. त्याने तिला सोडून जायचं ठरवलं - अगदी दूर विदेशात. निघायच्या आदल्या दिवशी दोघांची भेट ज्या रेडिओ कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली तोच ऐकताना तिने त्याच्यासाठी डेडिकेट केलेलं तिचंच एक गाणं त्याने ऐकलं. आणि ते ऐकून त्याने तिला सोडून जायचा आपला विचारच बदलला. कोणतं गाणं असेल ते?
क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे.
उत्तरः
जाइये आप कहां जायेंगे, ये नजर लौट के फिर आयेगी
दूर तक आप के पीछे पीछे मेरी आवाज़ चली आयेगी
अक्षरी बरोबर
भरत, तुझं गाणंही चपखल बसतं. पण माझ्या मनात हे होतं.
कोडं क्र. : 003/22 फेसबुक
कोडं क्र. : 003/22
फेसबुक वरच्या बहार नाव असलेल्या मुलींच्या ग्रुपचं स्नेहसंमेलन जंगलात घेण्याचं ठरतं. पण अर्थातच त्यात काही पुरूषही बहार बनून सामील झालेले असतात. त्यांना या संमेलनाचा पत्ता लागल्यावर ते ही तिथं जाऊन लपून बसतात.
काही वेळाने एकेक बहार तिथं जमा व्हायला लागतात. खरंच त्या नावाप्रमाणे सुंदर असतात. एकमेकींना भेटून ओळखी झाल्यावर आणि खिदळणं झाल्यावर त्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतात. एका लपलेल्या तरूणाला राहवत नाही आणि तो त्यांच्यात जातो. त्याला तिथं आलेला पाहून सगळ्याच चमकतात. पण त्यातली एक मार्शल आर्ट प्रवीण असते. ती त्या पुरूष बहारला चोप देते. त्याबरोबर बाकिच्याही त्याच्यावर तुटून पडतात. त्या मारहाणीत त्याचा विग त्यांच्या हातात येतो. मग काय सगळ्याच चेकाळतात..
टक्कल उघडं पडल्याने आधीच खजील झालेला तो बहार शेरेबाजीने पुरताच घायाळ होतो. त्यात त्याला सखी, मैत्रीण म्हणून हाका मारायला लागतात. त्यातली एक चुकचुकत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते .. अरेरे, आपल्या या मैत्रिणीचे केस शिशिरात गळाले गं.. त्यावर सगळ्या हसायला लागतात.
अशा पद्धतीने संपूर्ण खच्चीकरण झाल्यावर तो कुठलं गाणं म्हणेल ?
किरण ... बहारोंने मेरा चमन
किरण ...![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
बहारोंने मेरा चमन लूटकर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खिजा को ये इल्जाम क्यों दे दिया
किरण कोड्याला क्रमांक द्या
किरण कोड्याला क्रमांक द्या प्लीज.
००३/०२२: बहारों ने मेरा चमन लूटकर खिजा को ये इल्जाम क्यों दे दिया?
किसी ने चलो दुश्मनी की मगर इसे दोस्ती नाम क्यों दे दिया?
येस्स येस्स मामीसा
येस्स येस्स मामीसा ..
बहारोंने मेरा चमन लुटकर
खिजाओं को ये इल्जाम क्यों दे दिया
किसीने चलो दुश्मनी की मगर
इसे दोस्ती नाम क्यों दे दिया
खिजा = पानगळ
वरच्या कोड्याला क्रमांक टाकायचा राहिला
००३/२२![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत अगदी बरोब्बर !
भरत अगदी बरोब्बर !
कोडं क्र. ००३ / ०२३: ''वानी''
कोडं क्र. ००३ / ०२३:
''वानी'' ब्रँडच्या उत्तमोत्तम साड्यांचा मोठा व्यापारी एकदा भरपूर माल भरून समुद्रातून दुसर्या देशात तो माल विकायला जात असतो. वाटेत मोठे वादळ होते. व्यापारी कसाबसा लाईफबोटमध्ये बसतो पण त्याच्या डो़ळ्यादेखत त्याच्या सगळ्या साड्या वाहून जातात. घळाघळा वाहणारे अश्रू कसेबसे आवरत तो समुद्रदेवाला मनापासून प्रार्थना करतो की "देवा समुद्रा माझ्या साड्या मला परत मिळू देत. मी तुझे उपकार जन्मात विसरणार नाही." त्याची मनोभावे केलेली प्रार्थना समुद्रदेवापर्यंत पोहोचते आणि तो सगळ्या साड्या त्या व्यापार्याला सहीसलामत परत देतो.
व्यापारी अर्थातच अत्यंत आनंदित होतो आणि समुद्राचे आभार मानतो. आणि साड्यांचं ब्रँडनेम वानीऐवजी यापुढे समुद्राचे नाव देण्याची परवानगी त्याच्याकडे मागतो. याकरता तो कोणतं गाणं म्हणेल?
मामी, साधुवाण्याचीच कथा ही !
मामी, साधुवाण्याचीच कथा ही !
मामी शरणागती कोळीगीत आहे का
मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शरणागती
कोळीगीत आहे का ? मराठी कि हिंदी ?
कोडं क्र. ००३/ २४ : एका
कोडं क्र. ००३/ २४ : एका मुलीला मार्केट मधे फिरताना एक पेट शॉप दिसतं. बरेच दिवसांपासून तिला कुत्र्याचं पिलू हवंच असतं. आत जाऊन पाहते तो काय.. त्या दुकानात चक्क हिरव्या रंगाचं एक पिलू असतं. ती आश्चर्यचकित होऊन विचारते कि हिरव्या रंगाचं पिलू कसं काय आहे हे ?
तर दुकानदार म्हणतो कि हे साधं पिलू नाही. त्याला गाऊन दाखवलं तर ते बोलतं पण ! ती चटकन ते कुत्र्याचं पिलू घेऊन घरी येते. बराच वेळ गप्पा मारल्यावरही ते काही बोलतच नाही. तिला वाटतं आपल्याला फसवलं.. पण अचानक तिला आठवतं कि अरे गाणं म्हणायचंय नाहि का याला..
तर ती कोणतं गाणं म्हणेल ?
कोडं क्र. ००३ / ०२४: बोले रे
कोडं क्र. ००३ / ०२४:
बोले रे पपीहरा का?
Pages