'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
बघुन तरी वाटते तशी. पण आत
बघुन तरी वाटते तशी. पण आत कारंजे वगैरे होते हे ऐकल्यावर मला तरी काही शतकांपुर्वी तो भाग मोकळा असावा आणि मग नंतर दरड वगैरे कोसळून गुहा बनल्या असाव्यात असे वाटते. त्याच्या बरच्या भागावर दाट जंगल आहे.
नितीन, सरपटत जाता येईल एवढीच
नितीन, सरपटत जाता येईल एवढीच उंची आहे आणि त्यातही पाणी असते.
आता खरे तर रिमोट कॅमेरा वापरुन या गुहांचा शोध घेता येईल. त्यासाठी जीव धोक्यात घालायला नको.
वेबदुनिया, मराठी आवृत्ती मधे पर्यटन विभागात आहे हि माहिती.
साधना गुहेची माहीती मस्त.
साधना गुहेची माहीती मस्त.
ह्या नारळात भरपूर पाणी भरत. शहाळ्याचेच आहे. जाड खोबर होत नाही.
साधना, गुहेचं वर्णन मस्त.
साधना, गुहेचं वर्णन मस्त. कारंजं वगैरे सापडलं म्हणजे पूर्वी तिथे मानवी वस्ती असण्याची शक्यता असणार ना? दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे रिमोट कॅमेरा वापरून शोध घेता येतील अशा गुहांचे.
तो गावठी कुत्र्यांवर प्रेम करतो पाहुण्यांवर नाही.>>>>>>>>>>:हाहा:
मानुषीकडचं पात्र मस्त!
दुष्यंत!!............:हहगलो:
ईन मीन ते गावठी पिल्लू गोड आहे. डोळे किती छान आहेत नै!!
साधना, मागे दिनेशदांनी List of Tree Species in Rani Baug दिली होती त्यात तू म्हणतेस त्याप्रमाणे भीमाच्या वेलीचा उल्लेख नाहीये. पण Beaumontia jerdoniana असं गूगलवर सर्च केलं तर अशाच प्रकारची फुलं दिसताहेत. आता तर उत्सुकता लागून राहिली आहे; ही फुलं नक्की कोणती आहेत? दिनेशदा.................प्लीज, सांगा ना..........
जागू, ही शहाळी (म्हणजे माडच) कमी मलई आणि पाणी जास्त असलेली अशी वेगळ्या जातीची असतात का? इथे पुण्यात अशी स्पेशल शहाळं मागितलं की देतात; पण पाणी कधी कधी जरा कमी गोड असतं.
दुष्यंत धाकटीच्या भावाला
दुष्यंत
धाकटीच्या भावाला ज्यांनी अॅडॉप्ट केले त्यांनी त्याचे छोटेसे 'बो' हे नाव बदलून Montgomery Emerson (उर्फ माँटी) ठेवले.
अळकुड्या पेरल्या पहिल्यांदाच. कोणती बाजू वर ठेवायची? माहीत नसल्याने एकदा निमुळती वर एकदा बसकी अश्या लावल्या.
लोला बरोबर लावल्यास
लोला बरोबर लावल्यास म्हणजे.
शांकली ह्यांच पाणी गोड आहे. खास शहाळ्याचीच आहे ही जात.
सुप्रभात.
सुप्रभात.
माधव ते Beaumontia jerdoniana
माधव ते Beaumontia jerdoniana च वाटतय. भीमाची वेल या दिवसात फुलत नाही.
झाडाचे वर्णन केले तर पुढे संदर्भासाठी उपयोगी पडेल. तसेच यापुढे आपण सर्वांनी, फुलाला गंध होता का, ते पण लिहून ठेवू या.
जागू रातराणीने सुप्रभात? हो
जागू रातराणीने सुप्रभात?
हो दिनेश दिसायला तसेच वाटतय ते. पण राणीच्या बागेतली वेल होती शांकलीने दिलेले नाव गुगलल्यावर दिसतय ते झाड वाटतय. राणीच्या बागेतल्या फुलाला गंध बिलकुल नव्हता.
अंजलीताई, थांक यू!
अंजलीताई, थांक यू!
माधव काल साहेब जाम खाताना
माधव
काल साहेब जाम खाताना कॅमेर्याने पकडले.
जागू, माझा बरीच वर्षे गैरसमज
जागू, माझा बरीच वर्षे गैरसमज होता कि पक्षी चोचीच्या पुढच्या भागाने फळे खातात. पण
माझ्या ऑफिसच्या खुर्चीच्या मागे जे पेरुचे झाड आहे. त्यावरचे पेरू, बुलबुल चोचीच्या बाजूने (कडेने) पेरु खाताना बघितला. पोपट, पेरुतल्या बियाच खातो पण बुलबुल मात्र गर खात होता. शिवाय तो बिया खाणे,
कटाक्षाने टाळत होता.
(झाड जवळच आहे, आणि रंगीत काचेमूळे पक्ष्यांना मी दिसत नाही, त्यामूळे नीट निरिक्षण करता येते.)
नि.ग. वाले गेले कुठे आज सगळे
नि.ग. वाले गेले कुठे आज सगळे ? पाउस पडायला लागला की काय सगळीकडे ?
सर्व दुष्यंत, एलिझाबेथ, इ. -
सर्व दुष्यंत, एलिझाबेथ, इ. - अतिशय सुरेख, देखणे - त्यांचे मालक / मालकीणबाई खरंच खूप प्रेमाने सांभाळताना दिसत आहेत -
जागू - ते भेंडीचे झाड म्हणजेच परसपिंपळ. पारोसा /पार्श्वपिंपळ ना ? फोटो सुरेख...
जागू डॅनी कसला हँडसम आहे..>>> रच्याकने, कुठले ब्रीड आहे हे?
इतरही सर्व फोटो / माहिती सुंदरच.....
ते झाडांच्या नावाबाबत "संशयकल्लोळ" वाढतच असल्याने मी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षच करतो आहे.......
आमच्याकडील मांजरांच्या पिल्लांमागे बोके लागल्याने पहाटे-पहाटेच मागील बंगल्यातील कुत्र्याने भुंकून भुंकून मला जागे केले व त्या बोक्यांना मी हाकल्यावरच ते भुंकायचे थांबले - कुत्राच रक्षण करतो आहे - शेजार्यांकडील मांजरांचे - किती किती सौहार्द का काय ते........;)
काल साहेब जाम खाताना
काल साहेब जाम खाताना कॅमेर्याने पकडले, रातराणी >> वा मस्त आहे प्रचि
ती शहाळी - सुखावुन गेली
बुलबुल चोचीच्या बाजूने (कडेने) पेरु खाताना बघितला. >> दा छान निरीक्षण आहे
शशांकजी - संशयकल्लोळ माझा पण - या झाडाला भेंडे हे नाव का असेल , याचे फुल भेंडी ( भाजी)च्या सारखे आहे म्हणुन का ?
हो नितीन, तेच कारण
हो नितीन, तेच कारण आहे.
कोकणात तो सहसा घराच्या मागे लावतात. म्हणुन तो परस पिंपळ. पारोसा हा अपभ्रंश.
शंशांक, कधी कधी जूने कुत्रे आपल्याकडे नेतेपद घेतात. तसे उदाहरण दिसतेय हे.
जागु, सर्व फोटो छान,मस्त
जागु,
सर्व फोटो छान,मस्त टिपलेत....
दिनेशदा/शशांकजी,
कुत्रा या प्राण्यांबाबत एक शंका ....
शहरातले पाळीव असलेले,नसलेले सहसा कुणावर (माणसावर) भुंकताना किंवा गुरगुरताना दिसत नाहीत.
पण गावाकडे मात्र माणुस नविन दिसला तर कुत्रा नक्की भुंकणार,तर धडकी भरवणार, नाहीतर गुरगुरणार तरी नक्की. हा फरक का असेल ?
निर्सगाची
निर्सगाची किमया,
प्रतिबिंबासारखे दिसणारे हे डोंगर ( कात्राबाई कडा), आजचे हे रुप घडवायला पाऊस आणि वार्याला हजारो वर्ष लागली आहेत, हे कडे म्हणजे पुर्वीचा एकसंद डोंगर असु शकतो का?
दिनेशदा, शशांकजी ,इतर जाणकारांनी क्रुपया यावर काही सांगा ना
१८/१९/२० पानांवर भाताची लावणी
१८/१९/२० पानांवर भाताची लावणी या विषयावरची चर्चा वाचली. भाताची आधी रोपे तयार करून नंतर त्यांची लावणी करण्याची पद्धत पूर्वापार आहे. साधारणतः सखल आणि ओलसर (उन्हाळ्यात सुकत आलेली तळी वगैरे) भागात आधी भात पेरून पेरणी केली जाते. हे काम पावसाचा अचूक अंदाज घेऊन पावसाच्या थोडे आधी करायचे असते. जमिनीतल्या ओलीमुळे किंवा भिजवणीमुळे रोपे वाढतात. मृगाचा पहिला पाऊस पडला की ताबडतोब, अगदी रातोरातसुद्धा ही रोपे उपटावी लागतात. नाहीतर शेतात पाणी भरून रोपे वाहून जातात. ह्या रोपांना आवण किंवा तरवा म्हणतात.तोपर्यंत दुसरी शेते नांगरून तयार असतात. त्यात चिखल तयार होतो. या चिखलात रोपांच्या जुड्या टोचणे सोपे जाते.असे केले नाही तर रोपे कमजोर राहातात आणि माना टाकतात.भाताचे पीक साधारणतः अति पावसाच्या प्रदेशात घेतले जाते.शेतातल्या चिखलात यांत्रिक शेती करता येत नाही. अर्थात अलीकडे पाणी शिंपूनही भात घेतले जाते. काही भरडी भाते आवणीशिवायही होतात. उदा.खाजणात उगवणारे खारे भात,राते भात(पटणी) वगैरे. ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली पद्धत आहे. संपूर्ण दक्षिण भारतात हीच पद्धत चालत आलेली आहे. उत्तर भारताविषयी माहिती नाही.
इरल्याचाही उल्लेख वाचला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यात `झाडांचीं भिजलीं इरलीं रे` अशी ओळ आहे.इरले म्हणजे बांबूच्या कामट्यांचा लांबट अर्धगोल समोरून उघडा असा आकार विणून तो कामट्यांनी आणि झावळ्यांनी गच्च भरून घेऊन तयार झालेले छत्रीसमान आच्छादन.अलीकडे सर रास प्लास्टिक शीट्स वापरतात.ही खोळ इतकी भक्कम असे की त्यातून अजिबात भिजायला होत नसे.
हीरा, छान माहिती. अनिल,
हीरा, छान माहिती.
अनिल, गावातली कुत्री सहसा पाळीव नसली तर निदान भटकी तरी नसतात. त्यांना गावातले लोक काहीबाही
खायला देतात, त्यामूळे त्यांची बांधिलकी असते गावाशी.
शहरातली सध्याची तरी भटकीच आहेत. त्यांना कुणी मुद्दाम खायला घालत नाही. ती उकिरड्यावरच जगतात.
त्यामूळे सदा घाबरलेली असतात. त्यांची कुणाशीच बांधिलकी नसते. पण शहरातील पाळीव कुत्रे मात्र, नक्कीच
भुंकतात.
नितीन,
यासाठी मी मेन ऑफ रॉक्स हा तीन भागातला माहितीपट बघायचा सल्ला देईन. साधारणपणे भूगर्भाच्या
हालचालीनी डोंगरात जर काही बदल झाले असतील तर त्यात थरावर थर दिसतात (उभे किंवा आडवे.) जर
नदी वगैरे कारणानी डोंगर कापले गेले असतील तरी तिच्या काठाने असे थर दिसतात. ज्वालामुखी ने
काही झाले असेल, तर विवरे दिसतात. मला नाही वाटत, सह्याद्रीमधे असे काही झालेय. हे डोंगर जसे निर्माण
झाले तसेच आहेत. त्यावेळी जे आकार तयार झाले तसेच आहेत ते.
हिराजी धन्यवाद छान माहीती
हिराजी धन्यवाद छान माहीती -नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यात `झाडांचीं भिजलीं इरलीं रे, हे तर मी विसरलोच होतो.
धन्यवाद दा
धन्यवाद दा
जागू, जाम खाणारे साहेब जामच
जागू, जाम खाणारे साहेब जामच आवडले!!
दिनेशदा, तुमचं किती बारीक निरिक्षण आहे.. पक्षी फळं खाताना इतकं नीट निरिक्षण खूप कमी लोकांनी केलं असेल. मान गये आपको! (अर्थात ही नेहेमीचीच गोष्ट आहे म्हणा!)
नितीन, त्या डोंगररांगा फारच सही दिसताहेत.
हीरा यांनीपण भात लावणीची किती सविस्तर आणि छान माहिती दिलीये. खूप खूप धन्यवाद!
दिनेशदा आणि माधव.. Beaumontia jerdoniana हे भीमाच्या वेलीचंच बोटॅनिकल नाव आहे. पण दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे ही (भीमाची वेल) आत्ता उन्हाळ्यात फुलत नाही तर हिवाळ्यात साधारणत: दिवाळीनंतर फुलते. मग ही (राणीबागेतली) वेल कोणती?
हीरा ह्यांनी
हीरा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व दृश्य जसच्या तसं डोळ्यासमोर ऊभे राहिले. त्यावेळी मी लहान होते. पण मला आठवतेय हे सर्व मी खूप जवळून पाहिलेय. गंमत म्हणून मी थोडीशी भात लावणी पण केलेय. .
जागू, तू त्या साहेबांची
जागू, तू त्या साहेबांची तंद्री भंग केलीस म्हणून कसले रागाने पाहातायत तुझ्याकडे
हिरा छान सांगितलत. रात्याचा
हिरा छान सांगितलत. रात्याचा उल्लेख करून अजून आठवणीत नेलत. पुर्वी आमच्याकडे राता भातच होत. हा तांदूळ लाल असतो. पटणी हे दुसरे नाव त्या तांदळाचे. हया तांदळाचा भात गोड लागतो. भाकरी बाजरीच्या भाकरीसारखी दिसते व चवीला छान लागते. पण आता पटणी दिसेनाशी झाली आहे. कालांतराने कोलम, जया सारखे बियाणे पंचायत समितीत कमी भावात मिळू लागले आणि हा राता तांदूळ नाहीसा झाला.
नितीन डोंगर रांगा मस्तच.
शशांक आमचा डॅनी ग्रेट डेन आहे.
अनिल, नितीन, शांकली प्रज्ञा धन्यवाद.
दिनेशदांच्या निरिक्षणाबाबत कौतूक करावे तेवढे कमीच आहे.
सुप्रभात मंडळी माझ्या
सुप्रभात मंडळी
माझ्या सिटाउटमधल्या कुंडीत सुरूचे झाड आहे. आता साडेचार फूट उंच आहे. ते कुंडीतून काढून खाली अंगणात लावावे का? असं ऐकलंय की याची मुळं खूप भराभर पसरतात आणि इकडे तिकडे खोलवर घुसतात. आता सध्या ते अगदी कॉर्नरमधे आहे. पण त्याच्याफाद्यांची लांबी वाढत चाललीये तसं ते पुढे ओढायला लागतंय.
सुप्रभात. मानुषी ते झाड तुला
सुप्रभात.
मानुषी ते झाड तुला खालीच लावाव लागेल कारण खुप उंच होत ते झाड.
जागू, पटणीप्रमाणे राळे असे
जागू, पटणीप्रमाणे राळे असे पण एक धान्य असते. राजगिर्यासारखेच दिसते, पण चवीला जरा वेगळे लागते.
त्याचा पण भात करतात. कोल्हापूरला मिळायचे ते.
पण जागू त्याची मुळं घराच्या
पण जागू
त्याची मुळं घराच्या पायाखाली जाऊन काही नुकसान करतात का?
Pages