Submitted by मंदार-जोशी on 9 August, 2011 - 07:53
झोप लागे ज्यावर तो पलंग द्याना
का देत मजला तो खाट नुसता?
जाहली ढेकणे तयावरी उदंड
चावणे तयांचे हा त्रास नुसता
मारण्या तयांना बेगॉन मारले
भयानक तयाचा येई वास नुसता
सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता
होत सुटका शेवटी रामप्रहरी जरी
भूक त्यांची मिटे आपुला भास नुसता
का दिली तरही ही तुम्ही मला
ही रचना गझल? हा पझल नुसता.
गुलमोहर:
शेअर करा
हझल नि प्रतिसाद दोन्ही
हझल नि प्रतिसाद दोन्ही भन्नाट्च की
कैतरीच कैच्याकै
कैतरीच कैच्याकै
सुप्रिया धन्यवाद. पण हझल
सुप्रिया धन्यवाद. पण हझल म्हणजे गझलेचाच प्रकार असतो ना? मला त्यातलं काहीएक कळत नाही. म्हणूनच काहीच्या काही विभागात टाकली आहे ही.
ही हझल नाही.
ही हझल नाही.
हो मी तेच म्हणत होतो.
हो मी तेच म्हणत होतो.
शेवटचे कडवे सोडून बाकी जमल्या
शेवटचे कडवे सोडून बाकी जमल्या सारखं वाटतंय
ही रचना गझल? हा पझल
ही रचना गझल? हा पझल नुसता.>>
'ही रचना गझल की अट्टाहास नुसता'
असं चालेल का..?
ह्म्म्म सारीका, धन्स, ते चपखल
ह्म्म्म सारीका, धन्स, ते चपखल बसलं असतं
मंदार कैच्याकै अशक्य हसतेय
मंदार कैच्याकै अशक्य हसतेय
(No subject)
चावले जरी तुला ढेकूण
चावले जरी तुला ढेकूण कितीही
का म्हणा वाचकांस त्रास नुसता?????
(No subject)
(No subject)
Pages