नुसता [(तरीही) पझल]

Submitted by मंदार-जोशी on 9 August, 2011 - 07:53

झोप लागे ज्यावर तो पलंग द्याना
का देत मजला तो खाट नुसता?

जाहली ढेकणे तयावरी उदंड
चावणे तयांचे हा त्रास नुसता

मारण्या तयांना बेगॉन मारले
भयानक तयाचा येई वास नुसता

सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता

होत सुटका शेवटी रामप्रहरी जरी
भूक त्यांची मिटे आपुला भास नुसता

का दिली तरही ही तुम्ही मला
ही रचना गझल? हा पझल नुसता.

सुप्रिया धन्यवाद. पण हझल म्हणजे गझलेचाच प्रकार असतो ना? मला त्यातलं काहीएक कळत नाही. म्हणूनच काहीच्या काही विभागात टाकली आहे ही. Happy

ही रचना गझल? हा पझल नुसता.>>
'ही रचना गझल की अट्टाहास नुसता'
असं चालेल का..? Happy

Pages