आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< तोपर्यँत " सहारा प्रणाम " >> ' सहारा हो तो ऐसा हो ! ', ह्या ओळी मात्र गुणगुणूं नका; नाही
तर पुढच्याही वर्षीं पुनश्च .... !!!

>>काही कळत नाहि. ज्या बॉलरना एरवी तो डोळे मिटून खेळत असे त्यांना स्लो मोशनमधे पण खेळत नाहि.

असामी,
कारण सोप्पे आहे- सचिनला आजकाल (यात जवळ जवळ अख्खे वर्ष आले!) बॉल रीड करायला पूर्वी एव्हडे जमत नाही, बराचसा रिफ्लेक्सेस वर खेळतोय.. पण तेही कमीच होत जाणार.. किंबहुना संपूर्ण हंगामात द्रविड (सचिन, गांगुली पेक्षा) अधिक "स्थिर, सक्षम" वाटला.
मी आधीही हेच म्हटले होते.. "वय" विशेषतः क्रिकेटपटूंना चुकत नाही. वय, फिटनेस, रिफ्लेक्स, एकाग्रता हे सर्व एकमेकांशी संबंधीत/गुंतलेले आहेत. "मला क्रिकेट खेळायला आवडते तोपर्यंत मी खेळणार" हा त्याचा युक्तीवाद त्याच्यापुरता ठीक असेल पण ईथे "पहावत नाही आता आवरा..." अशी सचिनच्याच पंख्यांची अवस्था झालीये त्याचे काय...? शेवटी पाय मातीचेच!

आयपिल इ़ज "एंटरटेनमेंट.." मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर देखिल.. तेव्हा मजा पहात रहाणे. गेल, रहाणे, टेलर यांची फलंदाजी व स्टेन, नरीन, मॉर्कल, यांची गोलंदाजी मात्र हमखास अस्सल क्रिकेट चा आनंद देते.

असो.

कालच्या मॅचनंतर गांगुलीला जेंव्हा विचारले की पुढचा प्लॅन काय आहे तेंव्हा पठ्ठ्या म्हणाला की अजुन काही ठरवलेले नाही.... अजुन खेळायचेय बहुतेक त्याला Sad

द्रवीड कदाचित आजच्या मॅचनंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल.... तशी त्याने करु नये असे फार वाटतय पण एकंदरीत फारश्या मॅचप्रॅक्टीसशिवाय पुढच्या आयपीएलमध्ये खेळून तो स्वताचा गांगुली तरी होउ देणार नाही!

सध्याच्या फॉर्मनुसार माझी ड्रीम टीम:
ख्रिस गेल (परदेशी)
विरेंद्र सहवाग
गौतम गंभीर
अजिंक्य रहाणे
शिखर धवन
विराट कोहली
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार)
सुनील नरीन (परदेशी)
मॉर्नी मोर्केल (परदेशी)
लसिथ मलिंगा (परदेशी)
झहीर खान

धोनी? कर्णधार?
झहीरपेक्षा उमेश यादवची कामगिरी सरस आहे. कदाचित त्याला हाणामारीच्या षटकांत जास्त गोलंदाजी करावी लागली नसेल.

स्वरुप... अरे ५ - ५ ओपनर्स... कसं होणार टीमचं अशाने.... एखादा मधल्या फळीतला फलंदाज नको का.. द्रवीड सारखा... Happy

सध्याच्या फॉर्मनुसार विराट कोहली संघात? त्याच्या जागी राहुल द्रविड - कर्णाधार म्हणून. विकेटकीपर उथप्पा चालेल.

द्रविडने खेळावे असे मलाही वाटते. पण तो जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला तेव्हा तो आयपीएल खेळत राहणार म्हंटला की फक्त यावर्षीची स्पर्धा खेळणार म्हंटला ते लक्षात नाही.

गेल्या काही दिवसांत जे काही चाललेले बाहेर आले आहे त्यावरून द्रविडसारख्यांना बरेच अधिकार देऊन आयपीएल च्या बोर्डावर बसवायला पाहिजे.

>>सध्याच्या फॉर्मनुसार विराट कोहली संघात? त्याच्या जागी राहुल द्रविड - कर्णाधार म्हणून. विकेटकीपर उथप्पा चालेल.

चालेल भरतजी... उद्याच बोलावुन घेतो सगळ्यांना वाड्यावर... नाव काय ठेवुया टीमचे? Proud

>>स्वरुप... अरे ५ - ५ ओपनर्स... कसं होणार टीमचं अशाने
अरे सगळे ओपनरच चांगले खेळतायत त्याला काय करु.... आणि असेही आपल्या प्लेयर्सची संघहितासाठी कुठल्याही नंबरवर खेळायची तयारी असते Proud

.>>एखादा मधल्या फळीतला फलंदाज नको का.. द्रवीड सारखा...
पुर्ण सीझनमध्ये नियमितपणे ओपनिंगला खेळणार्‍या द्रवीडला तू मधल्या फळीतला फलंदाज म्हणतोस?

>>गेल्या काही दिवसांत जे काही चाललेले बाहेर आले आहे त्यावरून द्रविडसारख्यांना बरेच अधिकार देऊन आयपीएल च्या बोर्डावर बसवायला पाहिजे.

अरे हे लोक त्याला पण बळीचा बकरा बनवायला कमी करणार नाहीत... आणि द्रवीड तसाही अधिकार गाजवणार्‍यातला नाही आहे.... त्याची कुचंबणाच होईल तिथे.... तिथे कुंबळेला बसवायला पाहिजेल!

द्रवीडने मस्त अ‍ॅकेडमी काढावी, कोचिंग करावे, तो समालोचन पण मस्त करेल Wink

आयपीएलच्या संदर्भात उघडकीला येणारे घोटाळे / फिक्सिंग आणि भानगडी याबरोबरच प्रचंड घसरलेला टी आर पी या सर्व कारणामुळे आयपीएल पुढच्या वर्षीपासून बंद करावी किंवा दर २ वर्षांनी एकदा घ्यावी ,åअसेååमाझ åमत आहे

आज बेंगलोर वि. डेक्कन सामना बादफेरीत स्थान मिळवण्यासाठी निकडीचा होता. बघूं नाही शकलो पण 'लो स्कोअरींग' - १३२ व १२३ - झाला व खास अटीतटीचा नसावा झाला. बेंगलोर बाहेर गेल्याने गेलचा झंझावात आतां या वर्षीं तरी नाही पहायला मिळणार; टीआरपी आणखीही घसरण्याचीच शक्यता !

<< खरच आता युक्तीवाद थांबवावा हीच बहुतेक चाहत्यांची इच्छा आहे. >> सचिन दबावाखाली खेळतोय असं मीच म्हणालो असलो तरीही उल्लेख केलेल्या ' बहुतेक चाहत्यां'सारखी अजून तरी माझी अशी इच्छा नाही झालीय; निदान आयपीएल -५ संपेपर्यंत तरी मीं आशा धरून रहाणार आहेच आहे ! [ << आयपीएल इ़ज "एंटरटेनमेंट.." मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर देखिल.. >> अगदीं बहर ओसरला असला तरीही सचिनला खेळताना पहाणं, त्याची विकेट मिळाली कीं गोलंदाजाच्या चेहर्‍यावरचा आनंद पहाणं ही देखील एक न्यारी 'एंटरटेनमेंट'च जर वाटत असेल माझ्यासारख्याना, तर काय हरकत आहे अशी आशा करायला !! त्या दिवशीं कालिसला त्याने थर्डमॅनच्या दिशेने मारलेला षटकार, ऑफ स्टंपबाहेरचे चेंडू स्क्वेअरलेग ते लाँगलेग या भागात फटकावण्याचं त्याचं कसब व शैली इ.इ. टी-२०ची खासियत अजून आहेच ना त्याच्याकडे !!! ]

त्या दिवशीं कालिसला त्याने थर्डमॅनच्या दिशेने मारलेला षटकार, ऑफ स्टंपबाहेरचे चेंडू स्क्वेअरलेग ते लाँगलेग या भागात फटकावण्याचं त्याचं कसब व शैली इ.इ. टी-२०ची खासियत अजून आहेच ना त्याच्याकडे !!!>> बरोबर. ह्या वेळीही तो काहितरी pre-planned खेळतोय असे वाटते. काहितरी cute करायचा प्रयत्न तो करतोय. तो जेंव्हाही असे करतो तेंव्हा चाचपडतो असे वाटते.

बेंगलोर अचूकपणे बाहेर गेले. नुसत्या form नि consistency ह्याच्या बळावर बघायचे तर KKR किंवा DD जिंकले पाहिजेत. नेहमीप्रमाणेच CSK अगदी हवे तेंव्हा peak होउ लागलेत.

बाकी सगळ्या टीम्स इमानदारीत आपापल्या मॅचेस हारुन चेन्नईला मदत करतायत असे नाही वाटत का?

गांगुलीला रिटायर व्हायला सांगणारे द्रविडकडून पुढच्या वर्षी खेळायच्या अपेक्षा ठेवतायत
How Funny?
पुण्याकडे असणारे इतर लोकल टॅलेंट बघता पुढच्या वर्षी पण गांगुलीला खेळवण्याशिवाय पर्याय नाही हे नक्की

मुळात पुण्याच्या सर्वसाधारण टीमला गांगुलीने चांगले चार्ज केले होते पण दिंडा जखमी झाला, नेहरा, राहुल शर्मा धुतले गेले, सुरुवातीच्या मॅचेसनंतर रायडर पण फ्लॉप गेला त्याला गांगुली काय करणार?

भाऊ,

ते सगळे ठीक आहे.. पण एखाद्या दुसर्‍या तरूण युवकाला त्याच्या जागी संधी देता आली असती ना.. आणि थोडे पैसेही कमावले असते दुसर्‍याने.. Happy
असो.. आता आजाच्या inconsequential match मध्ये सचिन ५० करेलच.

राजस्थान फारच नीरस फिल्डींग करतेय.... मुंबई आरामात जिंकणार असे दिसतय!

लोकप्रिय,
द्रवीडचा आत्ताचा खेळ बघून त्याने खेळणे थांबवावे असे वाटत नाही पण गांगुली आत्ताच किती थकेला वाटतोय उगाच त्याला जमत नसताना खेळवत राहण्यात काय पॉइंट आहे?
पण केवळ गांगुलीसाठी मैदानावर सामना बघायला येणारे खुप आहेत त्यामुळे केवळ तेव्हढ्यासाठी त्याला खेळायला भाग पाडण्यात येउ शकते पण आता त्याचा त्यानेच सुज्ञपणे निर्णय घेउन अधिक मानहानी टाळली पाहिजेल

आज स्मिथ धमाल खेळला ; 'कॅलिप्सो शॉट्स' म्हटलं कुणीतरी, अगदीं खरंय !!! मुख्य म्हणजे तो स्वतःही खेळाचा मनमुराद आनंद लुटत होता. ' inconsequential match ' होती हें संदर्भहीन असतं अशा खेळींबद्दल, विशेषतः 'एंटरटेनमेंट' हाच उद्देश मानला 'आयपीएल'चा कीं, नाहीं का !!!

भाऊ व असामी शी सहमत. विशेषतः असामीसारखेच मलाही वाटले. "व्ही" मधे पंचेस मारणारा तेंडुलकर सर्वात प्रेक्षणीय दिसतो. उगाच इकडचे बॉल तिकडे करणारा नाही.

पण केवळ गांगुलीसाठी मैदानावर सामना बघायला येणारे खुप आहेत >> बुमरँग हा महत्त्वाचा आहे टीम मालकांसाठी. दादा व सचिन ची अजून पब्लिक खेचायची प्रचंड ताकद आहे.

लोकप्रिय, या बाफवरचे आर्काईव्हज पाहिलेत तर मी दादाची बाजू घेतलेल्या शंभर एक तरी पोस्ट मिळतील. पण आता तो थकला आहे हे स्पष्ट दिसते. कप्तान म्हणून सुद्धा ७-८ मॅच सलग हरल्यावर वॉरियर्सना आता खेळाडूतरी बदलायला हवेत किंवा ते जमणार नसेल तर कप्तान तरी. काहीतरी बदलल्याशिवाय वेगळा निकाल कसा मिळणार.

याउलट द्रविड अजूनही चांगला खेळतोय. आणि मुळात द्रविडला सपोर्ट करणारे दादाच्या विरोधात असण्याचे काहीच कारण नाही. हे दोघे व इतर तीन मिळून पाच जणांचे भारतीय क्रिकेटमधले योगदान निर्विवाद राहणार आहे. पण सध्याच्या फॉर्मवर दादाला फलंदाज म्हणून सपोर्ट करणे अवघड आहे.

आता दोन दिवस ब्रेक असल्याने आयपीएल मधल्या लफड्यांची चर्चा करायला हरकत नाही ना Happy

चार दिवसांत चार लफडी! कदाचित लीग गेम्स संपल्याने चर्चेत राह्यला हे उद्योग चालू झालेत की काय Happy

पहिले चार खेळाडूंची नावे स्पॉट फिक्सिंग मधे. त्यातील दोन तीन बाहेर गेले सुद्धा बहुधा. या स्पर्धेत बर्‍याच जणांचा खेळ कधीकधी अनाकलनीय वाटला आहे. बर्‍याच वेळेस हवेत मारलेले फटके बाउंडरीवरच्या फिल्डर्स कडे थेट हातात गेलेले दिसतात. खूप पळून वगैरे कोणाला कॅच पकडावे लागलेले दिसले नाहीत.

मग मुंबईत शाह रूख चे भांडण. त्याची चर्चा गेले दोन तीन दिवस राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखी चालू आहे. पण लोकांना त्यात फारसा रस नाही असेच दिसते. त्याच्या बरोबरच्या मुलांना खरोखरच जर सुरक्षारक्षकांनी नीट वागणूक दिली नसेल तरच त्याची शिवीगाळ समजू शकतो. त्यातही मुलांशी एकूणच (पीटीचे शिक्षक किंवा कोचेस वागतात तसे) "रफ" वागणे आणि गैरप्रकारे वागणे यात फरक आहे. येथे नक्की काय करत होते ते स्पष्ट नाही. नुसते रफ वागले असतील तरी एवढी शिवीगाळ करण्याची गरज नाही. तेथे जरा माज असू शकतो. मात्र एक आश्चर्य वाटते - अशा वेळेस "सगळे बडे लोक" एकत्र येउन प्रकरण दाबले जाते व त्यातील सामान्यांची बाजू घेतली जात नाही. येथे एमसीए चे लोक ठामपणे एकत्र आहेत, अजूनही. पण एकूण नक्की प्रकार काय आहे कळत नाही. अपेक्षेप्रमाणे फिल्मी लोकांनी शाहरूख ची बाजू घेतली आहे.

मला यात एक आश्चर्य वाटले की मैदानावर हजार कॅमेरे असतात, त्यातील कोणत्याच कॅमेर्‍यात याचे काही पुरावे कसे नाहीत? शाहरूख मैदानावर आलेला असताना एकही कॅमेरा त्याच्यावर नव्हता? त्याचा भाव फारच उतरला म्हणजे मग Happy

तिसरा प्रकार तो पॉमर्सबॅच चा. त्यात तो दोषी असेल तर कायद्याने काय शिक्षा व्हायची ती होईल. पण त्याहीपेक्षा राग आला तो सिद्धार्थ मल्ल्याने जो त्या मुलीसंबंधी "ट्विट" केला त्याबद्दल. ती म्हणे पार्टीभर त्याच्याशी (मल्ल्याशी) फ्लर्ट करत होती, म्हणून तो असे सुचवत होता की तिची तक्रारच खोटी असेल. त्याच्या आजच्या खुलाशातही त्याबद्दल काही चुकीची कबुली वगैरे नाही.

आणि आज चौथी बातमी म्हणजे जुहूला रेव्ह पार्टीत सहा आयपीएल खेळाडू होते म्हणे, आणि त्यातील दोन पोलिसांनी पकडले ही आहेत. त्याबद्दल जास्त माहिती उद्यापर्यंत येइल बहुधा.

पण केवळ गांगुलीसाठी मैदानावर सामना बघायला येणारे खुप आहेत >> बुमरँग हा महत्त्वाचा आहे टीम मालकांसाठी. दादा व सचिन ची अजून पब्लिक खेचायची प्रचंड ताकद आहे.>> +१. ह्या कारणासाठी दादाची गरज होती हे पूर्णपणे खरय. फक्त शेवटच्या काहि सामन्यांमधे इतरांनाही घ्यायला हवे होते.

त्यातील सामान्यांची बाजू घेतली जात नाही. येथे एमसीए चे लोक ठामपणे एकत्र आहेत, >> खरी गोच इथेच असावी.

सिद्धार्थ मल्ल्याने जो त्या मुलीसंबंधी "ट्विट" केला त्याबद्दल>>एकूणच मल्ल्या पुत्र दिडशहाणा असावा ह्यावर शिक्कमोर्तब करायला हरकत नाहि. मागे किंगफिशरबद्दल कोणीतरी आवाज उठवल्यावरही त्याने असेच काहि बरळल्याचे आठवते.

आता आजाच्या inconsequential match मध्ये सचिन ५० करेलच.>>तसे नाहि रे. त्याला बघायला ज्यांनी आधी तिकिटे घेतली आहे त्यांच्यासाठी काहि उत्तरदायित्व नको का ? समजा आज बाहेर बसला असता तर त्याबद्दल पण आरडा ओरड नसती का ?

पण एखाद्या दुसर्‍या तरूण युवकाला त्याच्या जागी संधी देता आली असती ना.. आणि थोडे पैसेही कमावले असते दुसर्‍याने..
तुम्ही काय कम्युनिस्ट काय हो?
'ज्याच्या जागी' दुसर्‍याला घ्यायचे म्हणता 'त्याच्या' मुळेच मालकांना पैसे मिळतात. नि पैसे मिळण्यासाठी ते आय पी एल सारखे करमणुकीचे कार्यक्रम घडवतात. शिवाय 'ज्याच्या जागी' घ्यायचे तो कशाला सुखासुखी पैसे घ्यायचे नाकारेल? लोक काय म्हणतील, हसतील असले विचार करण्यात काय अर्थ आहे, पैसे मिळायचे थांबले तर लोक येणार आहेत का पोसायला?
शेवटी अशी वेळ येईलच जेंव्हा निवडसमिती घेणार नाही, लोक पैसे देणार नाहीत, तेंव्हा आहेच घरी बसणे!
इथल्या ''टाईम" मासिकात सचिनबद्दल लेख आला आहे, त्यात तो म्हणतो - ' Critics haven't taught me cricket, and they don't know what my body and mind are up to. when he feels ' unable to serve India, I will stand down and give it all up.' तेच गांगुली व इतरांच्याहि बाबतीत लागू पडते.

अगदी पहिल्यापासून शाहरुख खान आवडत नाही असे कित्येक लोक असतील, पण म्हणून त्याने सिनेमात काम करायचे सोडले असते, तर झाला असता का आजच्या इतका लोकप्रिय नि श्रीमंत???
असो. हे आपले माझे विचार. माझ्या भावना यापैकी कुणाच्याहीत गुंतलेल्या नाहीत.

केवळ मल्ल्या मालक असल्यामुळे आज बेंगलोर हरल्याचे समाधान वाटले. असल्या माजुरड्या मालकाचा संघ हरलेलाच बरा.
मल्ल्या, pomersbach किंवा ती पोरगी यातल्या कोणाबद्दलही सहानुभूती नाहीये पण ती ट्विट डोक्यात गेली. एकंदर प्रकरण सुद्धा फुसका बार निघणार असे दिसते.
शाहरुखच्या भांडणाची transcript वाचली. त्याला उचकावायाचा प्रयत्न चालू होता असे वाटले. त्याच्याविरुद्ध घेतलेल्या एकंदर MCA च्या भूमिकेने त्यांनीसुद्धा सहानुभूती घालवली. सगळेच नखरे.
बाकी राजस्थानने आज अगदी टाईमपास करत मॅच घालवली...... मुंबई जिंकण्यासाठी तरी खेळत होती. राजस्थान बागेत फिरत होते.
सचिन फक्त या फॉर्ममध्ये असा खेळतोय असे वाटले. त्याचे रिफ्लेक्सेस किंवा इतर technicality वर शंका घेण्याचे इतक्यात कारण नाही. बाकी निवृत्तीबद्दल काय बोलणार!!!!!!!!! सचिनचा कपिल होऊ नये इतकीच भाबडी इच्छा.......... बाकी सचिन तेंडूलकर या नावामागे जितकी brand value , पैसा आणि glamour आहे ते पाहता त्याची इच्छा असली तरी तो रिटायर होऊ शकेल का हासुद्धा प्रश्न कधीकधी पडतो.
तो आता क्रिकेटर नाही, तो आता एक sportsman आहे.......

बर्‍याच दिवसानी इथं झक्कीसाहेबांची फटकेबाजी पहायला मिळाली. सौ सोनारकी, एक लोहारकी . बरं वाटलं.
<< आता दोन दिवस ब्रेक असल्याने आयपीएल मधल्या लफड्यांची चर्चा करायला हरकत नाही ना >> कालच एका टीव्ही चॅनेलवर यावर चर्चा ऐकली. किर्ती आझाद यानी आयपीएल बंद करावी असं म्हटलंय यावर कपिलचं मत भावलं; सारांश -' क्रिकेटमधे या गोष्टी होतात हें वाईट असलं तरी आयपीएल बंद करणं हा उपाय नाही; लोकसभेतही असे प्रकार होतात पण म्हणून ती बरखास्तच करावी असं कुणी म्हणत नाही ! आयपीएल मधे असे प्रकार होऊं नयेत व क्रिकेटला अधिक महत्व मिळावं यासाठी संघांचे मालक, संयोजक व मिडीया या सर्वानी कसोशीने प्रयत्न करणं महत्वाचं. पूर्वी १५-२० खेळाडूच लोकाना माहित असत. आज शंभराहून अधिक खेळाडू त्यांच्या नजरेसमोर येतात, याचं श्रेय 'आयपीएल'ला आहेच '
कपिलला आयपीएलबद्दल खुन्नस असणं स्वाभाविक असूनही त्याने असं मत व्यक्त करणं हें खास कौतुकास्पद !

आयपीएल मध्यल्या फिक्सिंगबद्दल चर्चा करा आधी.... गेल्या पाचही मॅचेस मधले निकाल बघता चेन्नै बाहेर जाण्याची शक्यता असताना ते अगदीच आरामात आत आहेत... डेक्कन आधीच्या सगळ्या मॅचेस मध्ये भंगार खेळून बरोबर शेवटच्या दोन मॅचेस जीवावर उदार होऊन खेळले आणि जिंकले.. कुठेतरी नक्कीच पाणी मुरतय..

>>> सचिन दबावाखाली खेळतोय असं मीच म्हणालो असलो तरीही उल्लेख केलेल्या ' बहुतेक चाहत्यां'सारखी अजून तरी माझी अशी इच्छा नाही झालीय; निदान आयपीएल -५ संपेपर्यंत तरी मीं आशा धरून रहाणार आहेच आहे !

सचिनचा मी भक्त आहे, पण त्याचं काहीतरी हुकलंय. काल त्याने स्क्वेअर कट मारायाचा ७-८ वेळा अयशस्वी प्रयत्न केला. टेटला तर त्याने लागोपाठ ३ चेंडूंवर स्क्वेअरकट मारायचा अयशस्वी प्रयत्न केला. हा फटका मारल्यावर चेंडूचा टप्पा बॅटपासून ८-१० फुटावर पडून पॉईंटच्य दिशेने जायला पाहिजे. पण सचिनच्या कालच्या सर्व प्रयत्नात चेंडू बॅटच्या खालच्या कडेला लागून बॅटच्या खालीच जाऊन आदळत होता. सचिनसारख्या स्क्वेअरकट एक्सपर्टचे एकाच सामन्यात लागोपाठ इतके स्क्वेअरकट फसल्याचे पूर्वी पाहिले नव्हते. कालचे त्याचे इतर अनेक फटके मिसटाईम होते. त्याचे केवळ ३-४ चौकार प्रेक्षणीय होते आणि बाकी सारी धडपड होती.

>>> पुण्याकडे असणारे इतर लोकल टॅलेंट बघता पुढच्या वर्षी पण गांगुलीला खेळवण्याशिवाय पर्याय नाही हे नक्की

गांगुलीचा संताप आलेला आहे. स्वतः सर्व क्षेत्रात पूर्ण अपयशी असताना हावरटासारखा प्रत्येक सामना खेळत बसला. स्वतःबरोबर उत्तप्पा, पार्नेल, नेहरू, मनिष पांडे, राहुल शर्मा इ. फ्लॉप्सना त्याने भरपूर संधी दिली. लागोपाठ ९ सामने हरल्यावर सुद्धा स्वतः आणि इतर फ्लॉप्सना बाहेर काढून उरलेल्यांना संधी द्यावी असा सूज्ञ विचार त्याने शेवटपर्यंत केला नाही. खडीवाले सारखे स्थानिक खेळाडू आणि नेथन मॅकलमसारखा गुणी अष्टपैलू त्याने शेवटपर्यंत कुजवला.

>>> केवळ मल्ल्या मालक असल्यामुळे आज बेंगलोर हरल्याचे समाधान वाटले. असल्या माजुरड्या मालकाचा संघ हरलेलाच बरा.

+१

आता माजोरड्या शाहरूखचा कलकत्ता संघ हरावा ही तीव्र इच्छा आहे.

आता माजोरड्या शाहरूखचा कलकत्ता संघ हरावा ही तीव्र इच्छा आहे.
>> हजार मोदक.

आयपीएल हा परदेशी खेळाडूसाठी सध्या पेड व्हेकेशन ठरतोय असं वाटत नाही का?

Pages