योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.
जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..
आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...
पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs
ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE
रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3
पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm
पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4
पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg
अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949
www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059
मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
उत्सुकता आहे या मालिकेबद्दल,
उत्सुकता आहे या मालिकेबद्दल, पण आमचं रविवारी वर्कींग असते त्यामुळे मी नाही पाहू शकत. याचे रिपिट टेलिकास्ट आहेत का?
खूप छान आहे ही मालिका!!!
खूप छान आहे ही मालिका!!!
मालिकेसंदर्भात जे जे प्रोमोज
मालिकेसंदर्भात जे जे प्रोमोज दाखविण्यात आले होते तसेच खुद्द आमीरने ज्या उत्साहाने वा प्रेरणेने मालिकेतील विविध विषयांसाठी भारतभ्रमण केल्याच्या वार्ता येत होत्या, त्या किती सार्थ होत्या ते या पहिल्या भागाने सिद्ध केले असे म्हणावे लागेल.
आमीर खान हा केवळ एक कचकड्याच्या बाहुल्यासारखा दिसणारा फिल्मी कलाकार नसून सामाजिक जाणीव सातत्याने उराशी बाळगून चित्रपट माध्यमाद्वारे त्या सर्वसामान्यांपर्यंत कशारितीने पोच कराव्यात हे तो जरूर जाणतो. आता त्याने टीव्ही माध्यम निवडले आहे आणि तिथेही तो आपला असा खास ठसा उमटविणार याची ग्वाही 'सत्यमेव जयते' देत आहे. 'स्टार प्लस' ने त्याच्या या महत्वाकांक्षी अभियानाला वेळेचे बंधनही घातलेले नाही हे उचीत वाटते (तब्बल दीड तासाचा कार्यक्रम आहे हा).
त्यातही आजचा 'कन्या' संदर्भातील प्रथम भाग सर्वांच्या हृदयाला स्पर्शून गेला हे नि:संशय. राजस्थानमधील ते 'भ्रूणहत्या कांड' पूर्वी सहारावर पाहिले होतेच, पण आज त्या दोन पत्रकारांना आमीरने थेट स्टुडिओत बोलावून त्यांच्या गेल्या ७ वर्षातील या संदर्भातील लढा समोर मांडला त्यावेळी समजून चुकले की अगदी थेट राष्ट्रपती तसेच पंतप्रधान कितीही तावातावाने 'गर्भपात विरोधी' कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल बोलू देत, परिस्थितीत यत्किंचितही फरक पडलेला नाही. इतके जबरदस्त स्टिंग ऑपरेशन होऊनसुद्धा आजही राजस्थानमधील त्या शेकडो डॉक्टरांतील एकावरही मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने कसलीही कारवाई केलेली नाही (हे कार्यक्रमात आलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टर आणि एक प्रसिद्ध वकिल यानीच सांगितले)....ना तेथील कोर्टाने काही पाऊल उचलले. आजही हा गर्भपाताचा कारभार तिथे राजरोस चालतो हे पाहून खुद्द आमीरखानही सुन्न झाल्यासारखा दिसला.
पस्तिशी ओलांडून गेलेल्या कुरुक्षेत्र येथील 'युवां' चा एक जथ्था आमीरने दाखविला आणि गावात मुलीच नसल्याने आमच्यावर ही सक्तीची 'कुंवारपणा' ची पाळी आली असल्याचे त्यांच्या मुखियाने प्रेक्षकांना सांगितले त्यावेळी तर सारा स्टुडिओ अचंबित झाल्याचे दिसले.
आमीरखान टीमने सादरीकरणही असे काही तालेवार केले आहे की प्रेक्षक टीव्हीसमोरून हलू शकला नाही.
चांगला उपक्रम....चुकवू नये असाच. थीम साँगदेखील तितकेच देखणे आहे.
अशोक पाटील
हो मी पण ह्या मालिकेविषयी इथे
हो मी पण ह्या मालिकेविषयी इथे खूप ऐकले आहे. असे कळले की अमिर खानने खास मराठी सामाजिक साहित्याचा अभ्यास करुन काही भाग बनवले आहे. त्यातील काही भाग विभावरी शिरुरकर ह्यांच्या कळ्यांचे नि:श्वास ह्या पुस्तकातील काही कंथावर आधारीत आहेत.
थीम साँगदेखील तितकेच देखणे
थीम साँगदेखील तितकेच देखणे आहे.>>+१
@ आबासाहेब आणि अन्य....ज्याना
@ आबासाहेब आणि अन्य....ज्याना 'वर्किंग संडे' मुळे हा भाग पाहता आला नाही त्यांच्यासाठी खालील लिंकवर हा भाग उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs#!
जरूर पाहा.....अगदी सवडीने
अशोक पाटील
@आबासाहेब- रिपीट टेलिकास्ट
@आबासाहेब- रिपीट टेलिकास्ट रात्री दहा वाजता.
खरं तर हा धागा काढण्यासाठीच मी लॉगिन केले होते.
पहिला भाग सुरेख झाला. कसलाही दिखाऊपणा नाही, बॅकग्राऊंड म्युजिक नाही, इमोशनल प्रसंग उगीच स्लो मोशनमधे दाखवणे नाही की काही नाही. जे आहे, ते जसेच्या तसे समोर ठेऊन विचार करायला भाग पाडणारा हा कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. आमिर खानकडून ज्या दर्जाची अपेक्षा होती, त्याला न्याय दिला गेला आहे, याचा आनंद वाटतो. प्रक्षेपणासाठी रविवार सकाळची वेळ निवडणेही कल्पक !
सध्याच्या टीव्ही कार्यक्रम आणि रिएलिटी शोजच्या भाऊगर्दीत अजिबात चुकवू नये असा कार्यक्रम सादर केल्याबद्दल आमिरच्या टीमचे कौतुक, आणि स्टार वाहिनीचे आभार.
कार्यक्रमाबद्दल अनेकांनी
कार्यक्रमाबद्दल अनेकांनी लिहिलेच आहे. आमीरच्या प्रस्तावनेतला प्रत्येक शब्द मोजून मापून नेमका. ती प्रस्तावना वृत्तक्षेत्रातील (छापील किंवा इलेक्ट्रॉनिक) प्रत्येकाने आणि कधी कधी आपणही (इंटरनेटमुळे आपल्यालाही लोकांसमोर काहीतरी ठेवायची संधी सहज मिळते, म्हणून) प्रतिज्ञा म्हणून वाचावी अशी होती.
कार्यक्रमादरम्यानच्या जाहिराती ही वेगळेपणाला साजेशा होत्या.
@आबासाहेब- रिपीट टेलिकास्ट
@आबासाहेब- रिपीट टेलिकास्ट रात्री दहा वाजता.
>>>> ज्ञानेश आभारी आहे नक्कीच पाहणार.
old wine in new bottle
old wine in new bottle
"कार्यक्रमादरम्यानच्या
"कार्यक्रमादरम्यानच्या जाहिराती ही वेगळेपणाला साजेशा होत्या......"
सहमत....विशेषतः नीता अंबानी यांनी केलेली 'रीलायन्स ट्रस्ट' ची.
आज अमिरच भाष्य होतं की
आज अमिरच भाष्य होतं की तुम्हाला मुलगी होत असेल तर ती आईची चुक नसुन वडिलांची चुक असते. जे देवाने आपल्या पदरात दिलय त्याला आपण शांतपणे स्विकारलं पाहिजे. मुळात मुलगी होणं ही चुक कशी असु शकते? आणि शांतपणे स्विकारण्याचा प्रश्न येतोच कुठे?
मुलगी असण्यात काय गैर आहे? चुकीचे विचार पसरवला गेला. मला पटला नाही..
हे माझं मत आहे सगळ्यांना पटावं अस नाही
पाघळपुंगी कार्यक्रम आहे
पाघळपुंगी कार्यक्रम आहे
@रिया- "मुलगी होण्याचा दोष
@रिया-
"मुलगी होण्याचा दोष कोणाला द्यायचाच असेल, तर तो पुरूषाला दिला गेला पाहिजे, स्त्रीला नव्हे. आणि माझ्या मते तर जी निसर्गाने दिलेला देणगी आहे, ती स्वीकारली पाहिजे." असे ते विधान होते. एकंदर कार्यक्रमाचा सूर / पवित्रा पाहता चुकीचा संदेश जाईल असे मला वाटले नाही.
@ईआर रोहित-
तुमच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे, अभिनंदन.
अप्रतिम, हृदयस्पर्शी ,ग्रेट
अप्रतिम, हृदयस्पर्शी ,ग्रेट
आश्चर्य म्हणजे हा कार्यक्रम एकाच वेळी स्टार प्लस ,दूरदर्शन आणि स्टार च्या प्रादेशिक वाहिन्या यांच्यावरही एकदम दाखवला गेला ...............
आमिरला सलाम !
नकारात्मक दृष्टीच ठेवायची असेल तर प्रत्येक चांगल्या गोष्टीत काहीतरी वाकडे दिसतेच -त्यालाच काक दृष्टी असे म्हणतात .................जाउदे
जय हिंद...सत्यमेव जयते !
गर्भाचे लिंग पित्याकडून
गर्भाचे लिंग पित्याकडून येणार्या गुणसूत्रावर ठरते हेच आमिरने सांगितले.
लगेच पुढच्या वाक्यात त्यात दोष देण्यासारखे काही नाही असे म्हटले.
संपूर्ण कार्यक्रम स्त्रीभ्रूण हत्येविरोधात असताना एवढे एकच वाक्य खटकण्याचे कारण नसावे. जनमानसात असलेल्या अनेक सोयीस्कर गैरसमजुतींवर आघात केला गेला.
उत्तम कार्यक्रम , उत्तम
उत्तम कार्यक्रम , उत्तम सादरीकरण!
आज अमिरच भाष्य होतं की
आज अमिरच भाष्य होतं की तुम्हाला मुलगी होत असेल तर ती आईची चुक नसुन वडिलांची चुक असते.
खरं तर वडिलांची सुद्धा चूक नसते.... वडिलांच्या/पुरुषाच्या अखत्यारित असतं,तर सगळे ''वाय'' उत्सर्जित केले असते. हे सारं काही निसर्गावर अवलंबून असतं. असो...
मात्र स्त्रीची चूक मुळीच नसते हे अधोरेखीत व्हावं या करिता आमिर हे बोलला असावा.
पस्तिशी ओलांडून गेलेल्या कुरुक्षेत्र येथील 'युवां' चा एक जथ्था आमीरने दाखविला आणि गावात मुलीच नसल्याने आमच्यावर ही सक्तीची 'कुंवारपणा' ची पाळी आली असल्याचे त्यांच्या मुखियाने प्रेक्षकांना सांगितले त्यावेळी तर सारा स्टुडिओ अचंबित झाल्याचे दिसले.
त्यातल्या एकाने ,''आमच्या टीमचं नेतृत्व करायला सलमानला पाठवा'' असे म्हटल्यावर आमिरसुद्धा आपलं हसू लपवू शकला नाही.
ढासळत्या
ढासळत्या स्त्रीपुरुषप्रमाणाच्या संतुलनामुळे होत असलेले ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याने घेतलेले अत्यंत विकृत भयानक रूप हा माझ्यासाठी खूप धक्कादायक भाग होता. मातृभूमी नावाच्या एका चित्रपटात या विषयाला हात घातला गेला होता, पण ते वास्तव असेल, इतक्या लवकर आकाराला येईल याची कल्पना नव्हती.
मुंबईतील अॅडमीन गटगमुळे हा
मुंबईतील अॅडमीन गटगमुळे हा कार्यक्रम हुकला. इथल्या माहितीबद्दल आणि लिंकबद्दल आभार. आज रात्री दहाला बघेन.
मी हा कार्येक्रम पाहात असताना
मी हा कार्येक्रम पाहात असताना आमच्या भांडीवाल्या काकु सोबत होत्या
त्या खुप सहज म्हणुन गेल्या
"हो मुलगी होणं ही बापाचीच चुक असते.त्यामुळे मुलगी झाली तर बापाने स्वतःला शिक्षा करुन घ्यायला हवी"
त्यावर मी त्यांना म्हणाले "काकु मुलगी होणं ही चुक कशी असु शकते? त्यामुळे मुळात कोणी कोणाला शिक्षा करायचा प्रश्नच येत नाही"
तर त्या म्हणाल्या तू गप्प बस तो अमिर खान स्वत: सांगतोय नीट ऐक. तो काय चुकीच सांगेल का?
आता हे सर्व एका अशिक्षित व्यक्तीकडुन प्रत्यक्षात ऐकल्यावर माझ्या मनात उमटलेली ती पहिली प्रतिक्रिया होती. मला वाटतं खुप कमी सुशिक्षित लोक असं काही करत असतील. हे सगळं मुळात ज्यांना कळायला हवं ते असा अर्थ घेत असतील तर चुकीच आहे ना?
त्यानंतर मी टिव्हीच बंद केला त्यामुळे पुढे काय झालं ते मला माहित नाही
डॉ.कैलास... "...खरं तर
डॉ.कैलास...
"...खरं तर वडिलांची सुद्धा चूक नसते...."
~ नेमके असेच काहीसे वाक्य आमीरने तातडीने पुढील मिनिटात केले. अपत्याचे लिंग पुरुष बिजावर अवलंबून असते असे मेडिकल सायन्स सांगते असे त्याचे म्हणणे होते, मात्र ती बाबही पुरुषावर अवलंबून नसल्याने मुलगा की मुलगी यामध्ये वडील घटकांचा संबंध फक्त बीज रीले करण्यापुरताच मर्यादित असतो.
मुलगी (च) झाली तर त्याचे असलेले नसलेले खापर त्या एकट्या मातेवर फोडण्याची जी तिडीक आणणारी बाब आपल्या समाजात आहे त्यावर आमीर प्रेक्षकांचे लक्ष केन्द्रीत करीत होता.....
मुलाच्या हव्यासापोटी एकापाठोपाठ सहा मुलींची गर्भाशयातच हत्या.... अंगावर अक्षरशः शहारे आणणारा तो अनुभव.
<मला वाटतं खुप कमी सुशिक्षित
<मला वाटतं खुप कमी सुशिक्षित लोक असं काही करत असती<>
तुम्ही कार्यक्रम पाहिलात ना? सुसिक्षित, उच्च आर्थिक गटात याचे प्रमाण जास्त आहे हेच दाखविले. अगदी परदेशी असलेल्या भारतीय तरुणीही याला बळी पडतात.
कार्यक्रमात आलेल्या दुसर्या महिलेचा(जिला जुळ्या मुली झाल्या) पती ऑर्थोपेडिक सर्जन आहे, सासरचे सगळे अतिशिक्षित आहेत.
chan ahe , avadela.
chan ahe , avadela.
भरतजी मला जे म्हणायचं आहे
भरतजी
मला जे म्हणायचं आहे तेवढं समजुन घ्या
माझा स्वतःच काही म्हणणंच नाहीये हो
मी फक्त जे माझ्यासमोर घडलं ते सांगायचा प्रयत्न केला
मात्र स्त्रीची चूक मुळीच नसते
मात्र स्त्रीची चूक मुळीच नसते हे अधोरेखीत व्हावं या करिता आमिर हे बोलला असावा.>>>>>
बरोबर डॉ. कैलास.
रीया,
तुम्ही आमिरने तो शब्द कुठल्या संदर्भात वापरला होता हे लक्षात घेतले असते तर तुम्हाला कदाचित ते ऑड वाटले नसते. असो.
कार्यक्रमाचे नियोजन अतिशय विचारपुर्वक केले गेले असल्याने (आणि त्यातील कॉमेंट्स तोलुन मापुन वापरल्या गेल्या असल्याने) आमिर असे काही आततायी बोलेल असे वाटत नाही. आणि मला तरी ते ऑफेन्सिव वाटले नाही.आणि त्याच्या प्रत्येक वाक्याचा किस पाडण्याऐवजी त्यात अधोरेखित केलेला विचार महत्वाचा नाही का?
आमिरने सुरुवातीला केलेल्या चिंतनात म्हटल्याप्रमाणे "मला काय करायचेय, माझे आयुष्य व्यवस्थित सुरु आहे ना" असा विचार न ठेवता आपण या सगळ्याचा एक भाग आहोत हा विचार करुन त्याने सुरु केलेल्या या कार्यक्रमाबद्दल त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
हा कार्यक्रम पाहुन एक चिमणा जीव वाचला तरी हा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणावे लागेल.
Whoever saves one life, saves the world entire.
मुलगी (च) झाली तर त्याचे
मुलगी (च) झाली तर त्याचे असलेले नसलेले खापर त्या एकट्या मातेवर फोडण्याची जी तिडीक आणणारी बाब आपल्या समाजात आहे त्यावर आमीर प्रेक्षकांचे लक्ष केन्द्रीत करीत होता.....
अगदी बरोबर.
हा कार्यक्रम संपल्या संपल्या,सोनीवर क्राईम पेट्रोल ला फिमेल फिटीसाइडचा सांगली/ तासगावातला एपिसोड दाखवण्यात आला.शहराबाहेरील नदीत पुलावरुन मृत अर्भके टाकण्यात यायची आणि कुत्रे त्यांचे लचके तोडायची. सारं काही अंगावर शहारे आणणारं आहे.
रीया ~ एक मुलगीच स्वत:चा या
रीया ~
एक मुलगीच स्वत:चा या बाबतीतील अनुभव सांगत होती....तिचा नवरा सी.ए.; सासरे गणितातील पीएच.डी.; सासू हेड मिस्ट्रेस, नणंद डॉक्टर, नणंदेचा नवरा डॉक्टर.... इतक्या मोठ्या प्रमाणात घरातील वातावरण 'सुशिक्षित' आहे....आणि मुलगाच हवा म्हणून जुळ्या झालेल्या दोन मुलींबाबत त्यांची वर्तणूक....!
एरव्ही अविश्वसनीय वाटणारे हे चित्र...पण सत्यच.
आमिरकडुन अजून अपेक्षा आहेत,
आमिरकडुन अजून अपेक्षा आहेत, अर्थात येणार्या प्रत्येक नविन भागात तो नविन समस्यांना वाचा फोडेल आणी त्यातुन लोकांच्या मानसिकतेत काही सुधारणा झाली तर ते खूपच आशादायक असेल.
मुलगा होवो अथवा मुलगी दोष ना स्त्रीचा ना पुरुषाचा. निसर्गाने दिलय नां. निसर्ग भेद भाव करतो का ? मग माणसालाच का दुर्बुद्धी व्हावी भेदाभेद करण्याची? जात, धर्म, लिंग यापलिकडे पोहोचु शकलो तरच आम्ही महासत्ता होवु.
अमीर सुशिक्षीत आहे, आतापर्यंत त्याने सामाजिक जाणिवा बाळगुनच काम केलेय,आणी त्याचा तरुन वर्गावर चांगला प्रभाव आहे, त्यातुनच काही चांगले घडावे.
रीया, आमिरने कार्यक्रमाच्या
रीया, आमिरने कार्यक्रमाच्या शेवटा सांगितले की याबाबत कृती करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.
Pages