अचाट आणि अतर्क्य गाणी

Submitted by slarti on 16 April, 2009 - 08:46

अ आणि अ गाण्यांसाठी हा बाफ. इथे गाण्याबद्दल सांगताना शक्यतो चित्रफितीचा दुवा द्या आणि दुवा घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल है कमाल है
कमाल है कमाल...

कर्ज मधील गुब्बारे वाले बाबा चं गाणं

स्लार्ट्या...
या बाफ बद्दल गिनीज...
_______
थोडा है थोडे की जरूरत है...
जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है!

मी पाहिलेल्या अ-अ गाण्यांमध्ये पुढील गाणे पहिल्या पाचात येते. अ-अ गाणे ठरवण्यासाठी मी तीन निकष ठेवतो - १. अ-अ शब्द, २. अ-अ चित्रीकरण आणि ३. अ-अ अभिनय
.
दरिया दिल या चित्रपटातील गाणे वरील तिन्ही निकषांची अगदी धोधो पूर्तता करते.
१. गाण्याचा रोमांचक मुखडा - 'तू मेऽऽरा सुपमॅऽऽन, तू मेरी (पॉज) लेऽऽडी, हो गया है अपना (पॉज) प्यार ऑलरेऽऽडीऽऽ'... पॉजेसची जागा अत्यंत सूचक आहे.
.
२. तू मेरा सुपमॅऽऽन
चित्रफीत पुरेशी बोलकी आहे तरीही काही नोंदी :
अ) मी पाहिलेले पहिलेच आंतरसुपरहीरोजातीय प्रेम. हे पुरोगामीत्व बघून डोळ्यांत पाणी उभे राहिले.
ब) हात वर करणे = उडणे. गोविन्दा जेव्हा किमीला धरून उडतो, तेव्हा फक्त गोविन्दाचा हात वर आहे. हवेतच असताना ते दोघे 'साईडवॉक' करत एकमेकांपासून दूर जातात. किमी ज्या क्षणी गोविन्दापासून दूर होते, त्या क्षणी ती तिचाही एक हात वर करते. तो हवेतील नाच प्रत्येकी एक हात वर करुनच आहे. ते जेव्हा परत जवळ येतात, त्यावेळी किमी परत तिचा हात खाली करते, कारण गोविन्दाने तिला धरले आहे. असे कठोर तर्कशुद्ध नृत्य पाहून माझ्या डोळ्यांत परत पाणी उभे राहिले.
क) बागेतील मारामारीमध्ये गोविंदा एकाला वर धरून गरगर फिरवतो. गोविंदाने त्या गुंडाला जसे धरले आहे ते पाहून परत डोळ्यांत पाणी उभे राहिले. ते पूर्णपणे हास्याचे नव्हते. टीप : गोविंदाने त्याला फिरवणे थांबवल्यावरही तो माणूस तसाच हवेत गरगर फिरत राहतो.
ड) या चित्रफितीत आणखी थरार आणण्यासाठी हे पहा -
तू मेरा सुपमॅऽऽन
.
३. किमीगोविंदाच्या अभिनयाकडे लक्ष जातच नाही, कारण त्यांचे कपडे. दोघेही घट्ट कपड्यांमध्ये असूनही गोविंदाकडेच राहून राहून लक्ष जात असेल तर बावचळून जाऊ नका, कारण गोविंदाचे कपडे किमीच्या कपड्यांपेक्षा जास्त घट्ट आहेत.
.
एकंदरीतच इंदीवर आणि विठ्ठलभाई पटेल यांची सुघड गीतरचना, राजेश रोशनचे टिमटिमणारे संगीत आणि साधना सरगम, मोहंमद अझीझ यांचे सूर यांची भट्टी जमून त्यात आपण भाजून निघतो. म्हणून मी या गाण्याला पावणेपाचपैकी साडेपाच तारे देतो.

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    Lol अख्खा पॅराच इनोदी. स्लार्टी. अजून येऊ द्या.

    स्लार्ट्या.. :हहपुवा:
    =========================
    नूतन वर्षाभिनंदन..

    स्लार्टी Rofl
    दूसरी क्लिप तर केवळ आहे!!! Rofl

    भट्टी जमून त्यात आपण भाजून निघतो>>> खी: खी:
    (ही खिदळणारी बाहुली कशी टाकायची??? )

    नवीन सदस्यान्साठी: अ-अ म्हणजे अचाट-अतर्क्य!!
    बरोबर ना?

    माझ्यातर्फे "सोने की सायकल, चांदी की सीट". चित्रपटः भाभी कलाकारः सायकल, गोविंदा आणि जुही चावला गायकः नितिन मुकेश, अनुराधा पौडवाल. ह्यात सायकलचा अभिनय आणि जुही चावलाचा फ्रॉकसकट गेट अप सर्वात जास्त आवडला.

    पावणेपाचपैकी साडेपाच तारे देतो >>>> Lol

    महान अ आणि अ लिरिक्स-
    मुक्काला मुकाबला, उर्वशी उर्वशी, पट्टी रॅप - हमसे है मुकाबला
    टिकट टू हॉलिवूड - झूम बराबर झूम

    महान अ आणि अ नृत्य-
    सावरिया रे ओ सावरिया - कही प्यार ना हो जाए (गुलाबी जीन्स मधील जुलाबी जॅकी)
    मेरा दिल ले गई कोई कम्मो किधर - जिद्दी (जिद्दीनी नाचणारा सन्नी)
    यारा ओ यारा - जीत (सन्नीभाई वन्स अगेन..)
    मै अपना नाम भूला - जोर (लगे रहो सन्नी भाई...)
    पागल हुवा - कोहराम (नाना आणि तब्बू चा नाच...)

    महान अ आणि अ चित्रीकरण-
    सरकाई लेओ खटिया - राजाबाबू (करिश्मा च्या तंगड्यांमधून कॅमेरा, बनियन आणि लेंगा घातलेला हीरो, लुंगी कुर्ता घातलेली हिर्वीण, पाण्याचा हौद, गवत...)
    याच धर्तीवर
    अंगना मे बाबा - आँखे, बज गया तबला तबेलेमें - राजाजी

    अजून येतीलच...
    पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...
    _______
    थोडा है थोडे की जरूरत है...
    जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है!

    चल.....चल्....चल्......चल्......चल्.....चल्/......चल्.....चल्............................चssssल!!!!!
    ~~~~~~~~~~~~~~~~~~
    वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

    >>>जुलाबी जॅकी
    >>करिश्मा च्या तंगड्यांमधून कॅमेरा, बनियन आणि लेंगा घातलेला हीरो, लुंगी कुर्ता घातलेली हिर्वीण, पाण्याचा हौद, गवत...
    अँक्या Rofl

    सोनपापडी मेरी सोनपापडी
    सोन हलवे मेरे सोन हलवे...

    अपने जिगर को थाम के बैठो
    थाम के बैठो दिल थाम के बैठो
    के बांधी कमरिया से सारी
    के आई अब आँटी की बारी
    आँटी नं १ आँटी नं १
    आँटी नं १ आँटी नं १
    _______
    थोडा है थोडे की जरूरत है...
    जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है!

    अजून या गाण्याचा उल्लेख नाही? पी. के. मेहबूब ह्यांनी नावाला जागून पीकेच लिखेला है शायद ..

    टेलीफोन धुन में हसने वाली
    मेलबोर्न मछली मचलने वाली
    डिजिटल में सुर है तराशा
    मॅडोना है या नताशा
    झाकीर हुसैन तबला तू है क्या
    सोना सोना तेरा चमके रूप सलोना
    सोना सोना सेल्युलर फोन तुम तो हो ना
    कंप्युटर को लेकर ब्रह्मा ने रचाया क्या

    तुम ना होते तो ये धुप नही होती रिमझिम भी नही होती
    तुम ना होते तो चांद नही होता सपना भी नही सजता
    तुमको पुकारा साँसे खुशबू फैला रही मेरी
    तुम ना शरमाना जुल्फोंमें अपनी खुदको छुपा लेना

    नाम तेरा किसीको लेने नहिं दुंगा वो सुख भी नही दुंगा
    गजरा तुम्हारा गिरने नही दुंगा मुरझाने नही दुंगा
    मेरे अलावा किसी औरत को ना पास बुलाना
    तुम भी कभी भी मदर तेरेसा को छोड के नाम ना लेना

    तेरी गलिमें में कोई मर्द ना छोडूंगा औरत भी ना छोडूंगा
    तेरी हसीं को उडने नही दुंगा मेरे दिलमें बसा लुंगा
    शोरूम में साजन औरत की मुरत छुने ना दुंगी
    जीवन में प्रीतम तुम्हें प्यार की रेखा पार करने ना दूंगी

    :p

    चित्रपटः हिंदुस्तानी

    स्लार्टी. अंक्या >>>> शिरिष कणेकरांची...'जल्दीसे पेट्रोल भरो चा संवाद' माझी फिल्लम्बाजी आठवली यार Proud Proud Proud

    जबर्‍या आहे हा बाफ्...अन्क्या सरकैलो चे वर्णन अवर्णनीय Wink

    ०-------------------------------------------------०
    नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
    आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

    ऊं ऊं ऊं
    टारझन ओ माय टारझन
    आजा मै तुझे प्यार कैसे.....(काय ओळी होत्या कोण जाणे.)
    ऊं ऊं ऊं
    टारझन ओ माय टारझन
    ~~~~~~~~~

    हे लेटेस्ट गुलाल मधलं :
    सही आहे Happy
    राणाजी म्हारे ऐसे गुरराये ऐसो थर्राये
    भर आये म्हारे नैन
    जैसे दूर देस के टावर मे घुस गये एरोप्लेन
    जैसे सरेआम इराक मे जाके बस गये अन्कल सैम
    जैसे बिना बात अफगाणिस्तान का ऐसो बज गया बॅन्ड

    मिनू त्या ओळी बहुदा अश्या आहेत.

    टारझन ओ माय टारझन
    आजा मै तुझे सिखाती हूँ प्यार कैसे हो ....
    ओ ओ ओ टारझन
    टारझन ओ माय टारझन

    अँक्या
    अरे लिंकापण दे ना गाण्याच्या.

    "नागराजा, नागराजा, नागराजा तुम आ जाओ". हे गीत आहे मकसद या चित्रपटातलं. गीतरचना आहे इंदिवर यांची, गायलंय किशोर कुमार यांनी आणि संगीत दिलं आहे भप्पी लाहिरी यांनी.

    पडद्यावर आहेत श्रीदेवी, जयाप्रदा, जितेंद्र आणि राजेश खन्ना. या गाण्याचं वर्णन करायला तर खुद्द सहस्त्रशीर्ष शेषनाग सुद्धा घाबरतील.. हे बहुधा गाण्यात नागांच्या होणार्‍या हालांमुळे असतील. अशी गाणी ऐकवून(!) त्यांच्यावर अत्याचार केल्याचा परिणाम म्हणून ते (म्हणजे नाग, कलाकार नव्हे) पूर्ण गाणंभर तळमळत वळवळत राहतात..
    पण तरीही.. प्रत्येक अ.आणि आ. अभ्यासकाने बघितलंच पाहिजे असं हे गाणं आहे. (अर्थातच IMO :P)

    तर गाणे सुरू होते तेच जया आणि श्रीच्या उड्यांनी. नमनालाच मंगल केल्यासारख्या त्या दाखवून देतात की या तांडवसदृश नृत्यप्रकार करणार आहेत. (मध्ये मध्ये नाग जमातीतील सांबा नृत्यही येते, त्याचा उल्लेख पुढे येईलच)
    मग आत गाभार्‍यात दार लावून नागांचा खजिना (!) लुटण्याचं खल करत असलेले खलनायक घंटेचा झालेला आवाज ऐकून आतून बाहेर येतात. आता या मंडळींना नाचकाम करायचंच होतं तर गुपचूप नाचून घ्यायचं ना? उगीच "आम्ही काहीही केलं तरी लोकांनी ते बघितलंच/ऐकलंच/वाचलंच पाहिजे" असे माबोवरच्या कवींसारखे (अ)विचार कशाला.. असले फालतू प्रश्न आपण विचारणार नाही या बोलीवर पुढचं गाणं सुरू होतं. खलनायक पण बिचारे "आता आलाच आहात तर घ्या नाचून" च्या आविर्भावात गाणं ऐकायला लागतात.
    राजेश खन्ना त्याच्या चट्यापट्याच्या टीशर्ट मधून आपलं गरगरीत पोट लपवण्यासाठी जाकीट घालून गाण्याची नांदी करतो आणि त्यामुळे आपल्याला सेटवर कॅमेरा सारखा वाकडातिकडा हलतोय ते कशामुळे तेही कळतं.
    आता गाण्यातल्या काही नोंदी..
    १. जितेंद्रचं बहुतेक नृत्यदिग्दर्शकाशी फाटल्यामुळे त्याला नाचायला स्टेप्स नाहीत. पण तो हुश्शार माणूस त्याची उणीव भासू देत नाही, मधूनच मानेला सुरेख (आणि नाजूक) झटके वगैरे देत अदा दाखवतोच. ती मिशी मात्र कशीकशीच वाटते त्याच्यावर.. अगदी मिशी लावलेला विश्वजीत आठवतो.
    २. कादरखानला का (का? का? का?) घ्यायचे लोक पिक्चरमध्ये?!!! यांत तो चष्म्याला वर उघडणार्‍या काचा लावून इकडेतिकडे टिवल्याबावल्या करत असतो.
    ३. राजेश खन्नाला नुसतं गाण्याबरोबर ओठ हलवायला सांगितलं असतं तर गाणं २००० पट सुसह्य झालं असतं (असं परत IMO) उगाचच हातवारे आणि भयंकर अभिनय(?) आणि कपडे.. त्याचे कपडे!! (माबोवरच्या सुप्रसिद्ध कपडेतज्ञ इकडे लक्ष देतील का.. )
    ४. गाण्याचा आनंद उपभोगत असताना त्याचा मेरुमणी येतो तो ३ मिनिटे आणि २५ सेकंद या शुभमुहूर्तावर. जया आणि श्री अचानक आसपास सगळीकडे सापही साप असल्यासारख्या इकडेतिकडे वेगाने हात फिरवतात आणि आपल्याला नाग जमातीचा सांबा आणि अमेरिकन रॉक एन रोल च्या मधलं काहीतरी बघायला मिळून जे काय अगदी मळमळून येतं त्याला तोड नाही!
    ५. श्री ला हे असलं काहीतरी करताना बघूनच त्या हर्मेश मल्होत्राला त्याची सापीण/नागीण/हिरवीण मिळाली अशी वदंता आहे.. हे असलं काहीतरी तिच्यात वळवळत आहे हे तेव्हाच त्याच्या ध्यानात आलं असणार.
    ६. श्री एकूणात कमी पडते नाचायला जयापुढे.. (असे वादग्रस्त विधान करून इकडे "चित्रपट कसा वाटला" सारखा वाद निर्माण करून प्रतिसादसंख्या वाढवण्याची इच्छा दिसतेय अशा कुज.खव. प्रतिक्रियांचा लेखक आधीच निषेध करतो)
    ७. सगळं नाचून गाऊन संपल्यावर प्रेमचोप्राला साक्षात्कार होतो की इतका जुलूम करुन घ्यायची गरज नव्हती. म्हणून तो एकदम नाटकात येंट्री घेतल्यासारखा अगदी सेटच्या मध्ये येऊन पिस्तूल काढून हवेत गोळी झाडतो ज्यामुळे फुकट बघणारेच फक्त (कॅमेराला आणि पोकळ सेटला धक्का लागणार नाही याची काळजी घेत व ते दाखवत) पळून जातात.

    या अफाट गाण्यामुळेच पुढे नगिनासारखा अ. आणि अ. चित्रपट आपल्याला बघायला मिळाला असा लेखकाचा पक्का विश्वास आहे. वर जितेंद्र आणि राजेश खन्ना यांचं जोडीनं (म्हणजे त्यांच्या हिरवीणींबरोबर बर्का .. )अभिनयनृत्य.. आणि श्री/जयाचा नागजमातीचा सांबा!!
    म्हणूनच याला कुठल्याही नगण्य रेटींगमध्ये बांधण्यात येऊ नये असा प्रस्ताव मांडतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

    क्ष Lol
    गाणं जबरी आणि तुझे वर्णनात्मक लिखाण तर केवळ आहे.

    स्लर्टी आणि क्ष, जबरी विश्लेषण आहे. Lol

    स्लर्टी: याच गाण्यावर इतर मौलिक विचार जुन्या हितगुज वर या पानावर वाचता येतील.

    क्ष - ते गाणे ऐकले आहे पूर्वी खूप आता बघायला ही पाहिजे. याच्या पूर्वी क्वचित पाहिलेला एक प्रकार म्हणजे दोन्ही हीरोंना एकाच गायकाचा आवाज (किशोर).

    आणि स्लर्टी तुझ्या तीन निकषांपैकी एक जरी असला तरी येथे ते गाणे टाकावे अशी उपसूचना कृपया मान्य व्हावी!!!

    Rofl क्ष, अ-अ गाण्यांचं विचेचन मस्तच. ह्या गाण्याने/पिक्चरने तुझ्या नागजमातीबद्दल असलेल्या अपुर्‍या ज्ञानात भर पडली असेल ह्यात शंकाच नाही. पण तरीही काही कमी राहिली असल्यास झी टिव्हीवरची 'नागिन' ही मालिका बघावी. साप दूध घातलेली कॉफी पित नाहीत हे मला त्यावरुनच कळलं. Proud

    साप दूध घातलेली कॉफी पित नाहीत हे मला त्यावरुनच कळलं. >>

    सायो, माझ्या ज्ञानात पण खालील मौलिक भर पडली :
    १. नागिणीला हिंदी सिनेमाचे गाणे आणि नाच येतात.
    २. त्यांच्यातही हेवेदावे असतात- "एक नागिन ने दुसरी नागिन का घर तोड दिया!"
    ३. सेंट मारल्यास ते मूळरुपात येतात.
    असे बरेच काहीबाही.

    साप दूध घातलेली कॉफी पित नाहीत हे मला त्यावरुनच कळलं.
    >>>> हा हा हा हा हा.... अ. आणी अ. च आहे Happy Happy Happy Happy Happy Happy

    ०-------------------------------------------------०
    नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
    आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

    हो हो मला पण Happy नागिन मधे ड्वायलॉक आहे "अगर ये नाग है तो ये दूध वाली कॉफी नही पियेगा" Biggrin
    त्या अमृताचं क्यारेक्टर असलं कॉम्प्लेक्स आहे, सध्यातर म्हणे इच्छाधारी नागिणीच्या मानवी अवतारात ती मेली अन तिचं भूत (!!) झालंय!! Rofl

    अगर ये नाग है तो ये दूध वाली कॉफी नही पियेगा">>>>
    माझ्या ऑफिसात- आजूबाजूला बरेच लोक दूध वाली कॉफी पित नाहीत!
    असं काही बीअरबद्द्ल नसावं असं वाटतं, कारण बीअर या लोकांना कधीही चालते.

    क्ष Rofl

    त्या गाण्यामध्ये जितेंद्र चक्क पांढर्‍या शुभ्र कपड्यांऐवजी काळ्याकुट्ट कपड्यात आहे...

    Pages