ह्या क्लिप मधे बघा....
४ मिन ४० से ला गाणं सुरू होतं...
मोनीश बैल आणि ममता कुलकर्णी जेवायला हाटलात आलेत...
अक्षयकुमार हातात सफरचंद झेलंत एंट्री मारतो... पूर्ण पांढरे कपडे, पांढरे हातमोजे, कपाळावर टिळा आणि पोनी... आणि हो... चेहेर्यावर प्रचंड चिडके भाव (हे गाणंभर आहेत... बहुतेक चुम्मा न मिळताच चुम्म्याचं गाणं करायला लागल्याबद्दल अक्की नाराज असावा...) त्याला पाहून ममता प्रचंड घाबरते... (आज मै चुम्मा लेकर ही रहूंगा असे भाव त्याच्या डोळ्यात...)
एक्स्ट्रा लोक एक अजगर गुंडाळलेलं खोटं सफरचंद आणतात आणि त्यावर तलवार चालवून रक्त उडवतात... धूर वगैरे... (असा धूर, गुलाल, रंग या गाण्यात सतत उडतो... काय लोक पण कसल्याही हाटलात जातात... पण इथे बैल आणि ममता सोडून इतर कुणी जेवताना वगैरे दिसत नाही...)
मग अक्षय च्या कवायतींना सुरवात... गाणंभर हा कवायतच करतो... ती पण चिडून चिडून...
हाटलातलं सगळं डेकोरेशन पण सफरचंद थीम चं आहे...
एका दृष्यात अक्षय हाताची बंदूक करून डोक्यानी गोळ्या मारल्याची अॅक्शन करतो...
अक्षय ची कवायत बघून बैल पण घाबरतो...
कडव्यांबरोबर अक्षय एकदा काळे आणि एकदा लाल कपडे बदलतो...
मधूनच गळ्यात अजगर घेऊन पण येतो... (मिलिंद सोमण आसपास असावा अशी मला उगाच शंका आली...)
कडव्यांच्या मधलं म्यूझिक पण 'चुम्मा चुम्मा' असं इष्टाईल मधे आहे.. त्याचं निमित्त साधून अक्षय शेंडी झटकतो, रंगाचे बाँब फोडतो आणि काही मार्शल आर्ट चे प्रकार पण दाखवून घेतो...
तिसर्या कडव्याच्या सुरवातीला तो ममता ला ओढून स्टेज वर आणतो, अर्ध सफरचंद खातो आणि अर्ध बुक्की मारून फेकून देतो... (बहुदा किडकं असावं...)
(अॅडम आणी ईव्ह नी पण सफरचंदच खाल्लं होतं ना...) कारण या कडव्या नंतर तो ममताचा जोरदार चुम्मा घेतो... त्यावेळी बैलानी मुसंडी मारू नये म्हणून सर्व एक्स्ट्रा मधे फील्डिंग लावतात... बैलाला आट्यापाट्या खेळण्यात गती नसल्यानी तो लगेच येऊ शकत नाही... तो पर्यंत अक्षयभाऊ काम करून परत निघालेले असतात... बहुदा चुम्मा पण नीट जमला नसावा... कारण चेहेर्यावर ते चिडके भाव कायम आहेत...
_______
सपनोंसे भरे नैना, तो नींद है ना चैना...
फारेंडा, या सिनेम्यात या गाण्याआधी बैल आणि ममता यांनी अक्षयकुमाराला मारायचा प्रयत्न केलेला असतो. अवतार गिल हे ममतेचे वडील हार्ट अॅटॅक येऊन मरतात, पण मरण्याआधी गंवार, गाव का छोरा पण सद्वर्तनी आणि धाडसी अक्षयकुमाराचे लग्न आपल्या पोरीशी जबरदस्ती लावून देतात. (पण जो खरा पोलिस असतो.) तिचे बैलावर प्रेम असते. मग ते अक्षयकुमाराचा काटा काढायचे ठरवतात. पण तरी तो वाचतो आणि ते जिथे आनंद साजरा करायला जेवायला जातात, तिथे येऊन हे गाणे म्हणतो.
शेवटी असे कळते की, अवतार गिल हे जिवंत असून त्यांनी हे नाटक तिला बैलाच्या मोहपाशातून सोडवण्यासाठी केले होते.
अॅडम, इव्ह वगैरे नसावे. बाहेरून सफरचंद कितीही चांगले दिसले तरी आत किडके असते, असा काहीसा फंडा असावा. (कारण त्याला मारण्याआधी ममता कुलकर्णी चांगल्या सफरचंदासारखी 'भरो.. मांग मेरी भरो' हे गाणे म्हणते.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
काय अफाट विश्लेषण लिहितात एकेक. परवा ती धर्मेंद्र, जया प्रदाच्या गाण्याची लिंक उघडली नाही आणि आज बघितलं ते गाणं. काय ती चड्डी त्याची नी त्याचा व्यायाम.
फारेंडा, खूप वर्षं झाली पाहून. आला त्याच साली, त्याच महिन्यात केबलवाल्याच्या कृपेने पाहिला होता. आता लिहायचे तर पुन्हा पाहावा लागेल. तूनळीवर आहे अख्खा. तुला फरिश्ते मिळत नसेल तर हा पहा. (आणि तूच लिही.)
बाकी या हिंदी सिनेम्यांचे मी एक पाहून ठेवले आहे. आत्ताआत्तापर्यंत आपल्याला हिडीसफिडीस करणारे सफरचंद एकदम -
'भरो मांग मेरी भरो..
करो प्यार मुझे करो..
दासी तेरी प्यासी रही... कितने जनम' (वि. सू. हे ही गाणे बघणीय आहे.)
वगैरे गोष्टी बोलायला लागले तर त्यात काही काळेबेरे असेल अशी शंकाही न येता, या व्यक्तीचे आज अपरिहार्य असे हृदयपरिवर्तन झालेच शेवटी, अशा आनंदात बाकी लोक असतात. पण बाकी काहीही बदलले नसताना एकदम ह्यातला देव का जागृत झाला, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
गाणंभर हा कवायतच करतो... ती पण चिडून चिडून...>>>
हे ही गाणे बघणीय आहे.) >>> अगदी अगदी सफरचंदातली बी (सफरचंदातच) वाढायला लागल्यामुळे कदाचित ते मांग भरण्याचा आग्रह धरत असेल.
***
लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)
नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो
>>>
फारेंड आणि धरम पाजी
अरे जेवताना ठसका लागला ना लोकहो :फिदी:, अजुन गाणे तर पहायचेच आहे...
जितेंद्रच्या 'हिम्मतवाला'च्या काळात एक गाणे येउन गेले...साउथ इंडीयन हिरोईन आणी जितेंद्र असावा बहुतेक! अजुनही ते गाणे होळीला ...मुंगळाच्या बरोबरीने वाजवतात!
काही ओळी अशा:
----आणि असेच एकेक पदार्थांची नावे आहेत प्रत्येक कडव्यात. साउथ इंडियन नटीचा ते अप्सरांसारखे पण अर्धवट कपडे घालुन केलेला तो हिडीस नाच..! पहाणा-यावर अत्याचार आहे अगदी...!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
अरे तो अंध नसेल त्याचे पात्र अंध दाखवले असेल. काय सांगावे दोन्ही अंध पात्रे प्रेमात पडल्यावर नाचण्यातून आविष्कार करत असेल तर असे गाणे निर्माण होऊ शकते. मग त्याला हसणे मात्र क्रूरपणाचे होईल....
मी ही टाकण्या आधी आंतरजाला वर बरीच माहिती शोधली होती. जेवढे वाचले त्यात न टाकण्यासारखे काही दिसले नाही म्हणून मग टाकला होता. आता तसे नाही याची खात्री होईपर्यंत काढतो. नक्की कशामुळे असे दाखवले आहे ते मलाही माहीत नव्हते. इतर चित्रपटांसारखाच एक वाटला म्हणून टाकले होते.
हे गाणे मस्तच आहे, गाजले आहे. पण राजेंद्रकुमारची 'गाण्यातील अभिनयाची' पद्धत इथे फारच स्पष्ट दिसते. म्हणजे राजेंद्रकुमार नाचायचा नाही, त्याची खासियत म्हणजे 'बोट/हात दाखवणे, dumb charades खेळणे'. उदा. ये जमीन गा रही है - तो जमिनीकडे हात करेल, ये आसमान गा रहा है - तो आकाशाकडे बोट दाखवेल आणि गवयासारखा हात करेल. हा अभिनवय (अभिनव अभिनय) पुढील गाण्यात अगदी उठून दिसतो - http://www.youtube.com/watch?v=jN5lLXMYiYM
(सुरुवात - सायराबानू ऊर्फ प्रिया विमानात आहे. राकु खाली जीप चालवतोय)
कौन है (हात आकाशातल्या विमानाकडे) जो सपनों में (कुठेतरी तिसरीकडेच हात) आया
कौन है (परत आकाशाकडे हात) जो दिल में (हात छातीवर) समाया (सुकाणूवरील हात सोडून पसरणे)
वो (परत हात वर आकाशाकडे) झुक गया आसमाँ भी (वर केलेला हात खाली आणून स्प्रिंगवर हात दाबण्याची अॅक्शन)
इश्क मेरा रंग लाया (सुकाणूवरील दोन्ही हात सोडून पूर्ण पसरणे... गाडी खड्ड्यात जायला लागते, तेव्हा अत्यंत घाईघाईने सुकाणूला मिठी मारतो)
कौन है जो सपनों में आया ("मान वेळावूनी धुंद बोलू नको" स्टाईल लाडीकपणा), कौन है (वर बोट) जो दिल में (बोट छातीवर) समाया, लो झुक गया (हात वर दाखवून तो खाली दाखवणे) आसमाँ भी,
इश्क मेरा रंग लाया (परत हात पूर्ण पसरणे), ओ प्रिया (आकाशाकडे पाहून दिलेली हाळी)
पुढच्या कडव्यात 'चला जा रहा हूँ, मंझिलों से बढा जा रहा हूँ' (हात प्रवासाच्या दिशेने दाखवणे)... आणि मग या गाण्यातील अगदी खासम् खास गोष्ट येते. तो परत धृपद सुरू करतो... आता मागील वेळी हात सोडून चालवताना गाडी खड्ड्यात जाता जाता वाचली होती. तेव्हा या कडव्यात हात न सोडता सर्व अभिनवय -
कौन है जो सपनों मे आया (मान तिरकी वर करणे), कौन है जो दिल में (एक हात परत छातीवर) समाया (तोच हात थोडासा पसरला),
लो झुक गया आसमा भी (मानेने वरची दिशा दाखवून मग थोडेसे खाली झुकणे... हा सर्वात महान प्रकार !)
इश्क मेरा रंग लाया (अपघात टाळण्यासाठी एकच हात पसरणे)
ओ प्रिया (परत वरच्या दिशेला बघून हाळी)
जिस्म (हात छातीवर मारणे) को मौत आती है लेकिन (झोपण्याची अॅक्शन !!!!!!)...
रोशनी इसकी जाती नही है (हात कोपरातून वर करून बोटांनी नकार ठसवणे)...
मला समजलेला अभिनवय : हात थोडे पसरले = 'समाना', पूर्ण पसरले = 'इश्क ने रंग लाना'
याशिवाय, आसमाँ, दिल, इ. गोष्टी कुठे असतात हे कायमचे ठसते.
बापरे!
बापरे! खरंच धरणी पोटात घेईल तर बरं! फारेंडा, धन्स![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ह्या वयात
ह्या वयात असला नाच? हे भगवान. बूधि घोदी लाल लगाम .
बाप रे..
बाप रे.. भयाण प्रकार आहे! दाऊद वै. च्य बड्डेपार्टीत ह्या तिघांनी हे गाणे असे सादर केलेले का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ह्या क्लिप
ह्या क्लिप मधे बघा....
४ मिन ४० से ला गाणं सुरू होतं...
मोनीश बैल आणि ममता कुलकर्णी जेवायला हाटलात आलेत...
अक्षयकुमार हातात सफरचंद झेलंत एंट्री मारतो... पूर्ण पांढरे कपडे, पांढरे हातमोजे, कपाळावर टिळा आणि पोनी... आणि हो... चेहेर्यावर प्रचंड चिडके भाव (हे गाणंभर आहेत... बहुतेक चुम्मा न मिळताच चुम्म्याचं गाणं करायला लागल्याबद्दल अक्की नाराज असावा...) त्याला पाहून ममता प्रचंड घाबरते... (आज मै चुम्मा लेकर ही रहूंगा असे भाव त्याच्या डोळ्यात...)
एक्स्ट्रा लोक एक अजगर गुंडाळलेलं खोटं सफरचंद आणतात आणि त्यावर तलवार चालवून रक्त उडवतात... धूर वगैरे... (असा धूर, गुलाल, रंग या गाण्यात सतत उडतो... काय लोक पण कसल्याही हाटलात जातात... पण इथे बैल आणि ममता सोडून इतर कुणी जेवताना वगैरे दिसत नाही...)
मग अक्षय च्या कवायतींना सुरवात... गाणंभर हा कवायतच करतो... ती पण चिडून चिडून...
हाटलातलं सगळं डेकोरेशन पण सफरचंद थीम चं आहे...
एका दृष्यात अक्षय हाताची बंदूक करून डोक्यानी गोळ्या मारल्याची अॅक्शन करतो...
अक्षय ची कवायत बघून बैल पण घाबरतो...
कडव्यांबरोबर अक्षय एकदा काळे आणि एकदा लाल कपडे बदलतो...
मधूनच गळ्यात अजगर घेऊन पण येतो... (मिलिंद सोमण आसपास असावा अशी मला उगाच शंका आली...)
कडव्यांच्या मधलं म्यूझिक पण 'चुम्मा चुम्मा' असं इष्टाईल मधे आहे.. त्याचं निमित्त साधून अक्षय शेंडी झटकतो, रंगाचे बाँब फोडतो आणि काही मार्शल आर्ट चे प्रकार पण दाखवून घेतो...
तिसर्या कडव्याच्या सुरवातीला तो ममता ला ओढून स्टेज वर आणतो, अर्ध सफरचंद खातो आणि अर्ध बुक्की मारून फेकून देतो... (बहुदा किडकं असावं...)
(अॅडम आणी ईव्ह नी पण सफरचंदच खाल्लं होतं ना...) कारण या कडव्या नंतर तो ममताचा जोरदार चुम्मा घेतो... त्यावेळी बैलानी मुसंडी मारू नये म्हणून सर्व एक्स्ट्रा मधे फील्डिंग लावतात... बैलाला आट्यापाट्या खेळण्यात गती नसल्यानी तो लगेच येऊ शकत नाही... तो पर्यंत अक्षयभाऊ काम करून परत निघालेले असतात... बहुदा चुम्मा पण नीट जमला नसावा... कारण चेहेर्यावर ते चिडके भाव कायम आहेत...
_______
सपनोंसे भरे नैना, तो नींद है ना चैना...
टाईमपास
फारेंड
फारेंड![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
गाणं आणि विश्लेषण, दोन्ही महान !
फारेंडा,
फारेंडा, या सिनेम्यात या गाण्याआधी बैल आणि ममता यांनी अक्षयकुमाराला मारायचा प्रयत्न केलेला असतो. अवतार गिल हे ममतेचे वडील हार्ट अॅटॅक येऊन मरतात, पण मरण्याआधी गंवार, गाव का छोरा पण सद्वर्तनी आणि धाडसी अक्षयकुमाराचे लग्न आपल्या पोरीशी जबरदस्ती लावून देतात. (पण जो खरा पोलिस असतो.) तिचे बैलावर प्रेम असते. मग ते अक्षयकुमाराचा काटा काढायचे ठरवतात. पण तरी तो वाचतो आणि ते जिथे आनंद साजरा करायला जेवायला जातात, तिथे येऊन हे गाणे म्हणतो.
शेवटी असे कळते की, अवतार गिल हे जिवंत असून त्यांनी हे नाटक तिला बैलाच्या मोहपाशातून सोडवण्यासाठी केले होते.
अॅडम, इव्ह वगैरे नसावे. बाहेरून सफरचंद कितीही चांगले दिसले तरी आत किडके असते, असा काहीसा फंडा असावा. (कारण त्याला मारण्याआधी ममता कुलकर्णी चांगल्या सफरचंदासारखी 'भरो.. मांग मेरी भरो' हे गाणे म्हणते.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
काय अफाट
काय अफाट विश्लेषण लिहितात एकेक. परवा ती धर्मेंद्र, जया प्रदाच्या गाण्याची लिंक उघडली नाही आणि आज बघितलं ते गाणं. काय ती चड्डी त्याची नी त्याचा व्यायाम.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बापरे! काय
बापरे! काय डेडली पार्श्वभूमी आहे. हा तू पाहिलास आणि येथे लिहीला नाहीस?
हो ते 'भरो...' गाणे पूर्वी पाहिल्यासारखे वाटते.
चांगल्या सफरचंदासारखी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
श्र,
श्र,![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
फारेंडा,
फारेंडा, खूप वर्षं झाली पाहून. आला त्याच साली, त्याच महिन्यात केबलवाल्याच्या कृपेने पाहिला होता. आता लिहायचे तर पुन्हा पाहावा लागेल.
तूनळीवर आहे अख्खा. तुला फरिश्ते मिळत नसेल तर हा पहा. (आणि तूच लिही.) ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाकी या हिंदी सिनेम्यांचे मी एक पाहून ठेवले आहे. आत्ताआत्तापर्यंत आपल्याला हिडीसफिडीस करणारे सफरचंद एकदम -
'भरो मांग मेरी भरो..
करो प्यार मुझे करो..
दासी तेरी प्यासी रही... कितने जनम' (वि. सू. हे ही गाणे बघणीय आहे.)
वगैरे गोष्टी बोलायला लागले तर त्यात काही काळेबेरे असेल अशी शंकाही न येता, या व्यक्तीचे आज अपरिहार्य असे हृदयपरिवर्तन झालेच शेवटी, अशा आनंदात बाकी लोक असतात. पण बाकी काहीही बदलले नसताना एकदम ह्यातला देव का जागृत झाला, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
गाणंभर हा
गाणंभर हा कवायतच करतो... ती पण चिडून चिडून...>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सफरचंदातली बी (सफरचंदातच) वाढायला लागल्यामुळे कदाचित ते मांग भरण्याचा आग्रह धरत असेल.
हे ही गाणे बघणीय आहे.) >>> अगदी अगदी
***
लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)
रच्याबा.
रच्याबा. रॉबिन, त्या गाण्यात शेवटी कादरखान नाही, दिनेश हिंगू येतो ना ?
***
लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)
>>>सफरचंदात
>>>सफरचंदातली बी (सफरचंदातच) वाढायला लागल्यामुळे कदाचित ते मांग भरण्याचा आग्रह धरत असेल.
रॉबिन,
रॉबिन, त्या गाण्यात शेवटी कादरखान नाही, दिनेश हिंगू येतो ना ?
>>>
की फरक पैन्दा?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्र, तो
श्र, तो अचाट चित्रपट मी मैत्रिणीबरोबर (बाराकर वैद्यांची बायको) थेटरात बघितला आहे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बा रा कर
बा रा कर वैद्य किती शहाणे म्हणायचे !
प्रभु
प्रभु देवाचे " उर्वशी उर्वशी ...." हा डान्स म्हाणजे अंग किती प्रकारे खाजवता येते ह्याचे एक प्रात्यक्षिकच आहे.....
नंतर दोघे
नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
फारेंड आणि धरम पाजी
अरे जेवताना ठसका लागला ना लोकहो :फिदी:, अजुन गाणे तर पहायचेच आहे...
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
जितेंद्रच
जितेंद्रच्या 'हिम्मतवाला'च्या काळात एक गाणे येउन गेले...साउथ इंडीयन हिरोईन आणी जितेंद्र असावा बहुतेक! अजुनही ते गाणे होळीला ...मुंगळाच्या बरोबरीने वाजवतात!
काही ओळी अशा:
उई मां, उई मां , उई उई उई उई
मोहे सजन तुझे भुक लगी तो
पुरी कचोडी रसगुल्ला बन जाउंगी
मोहे सजन तोहे प्यास लगी तो....
----आणि असेच एकेक पदार्थांची नावे आहेत प्रत्येक कडव्यात. साउथ इंडियन नटीचा ते अप्सरांसारखे पण अर्धवट कपडे घालुन केलेला तो हिडीस नाच..! पहाणा-यावर अत्याचार आहे अगदी...!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
...
...
यूटुब वर
यूटुब वर कोणी ओ बेन्नि लाव्वा पाहिले आहे का? subtitles explicit आहेत पण not suitable for office.
फारेंड तो
फारेंड तो व्हीडीओ आधी कॉमेडी वाटलाच..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण कमेंटमधे वाचले तो हिरो अंध आहे..
मग नाही आलं हसू..
कोरिओग्राफी विनोदी आहे हे मात्र खरं!
www.bhagyashree.co.cc/
हो भाग्या
हो भाग्या म्हणतेय ते बरोबर आहे पण त्या हिरविणीला नीट नाचायला काय झाले होते? की तीही अंध आहे?
छे छे.. तो
छे छे.. तो काही अंध वगैरे नाहीये.. आंतरजालावर त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे..
अरे तो अंध
अरे तो अंध नसेल त्याचे पात्र अंध दाखवले असेल. काय सांगावे दोन्ही अंध पात्रे प्रेमात पडल्यावर नाचण्यातून आविष्कार करत असेल तर असे गाणे निर्माण होऊ शकते. मग त्याला हसणे मात्र क्रूरपणाचे होईल....
हो का?.. मी
हो का?.. मी काही खातरजमा केली नाही!
पण माझ्या मते जबसे हुई है मोहब्बत ला काँपिटीशन होऊच शकत नाही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
www.bhagyashree.co.cc/
मी ही
मी ही टाकण्या आधी आंतरजाला वर बरीच माहिती शोधली होती. जेवढे वाचले त्यात न टाकण्यासारखे काही दिसले नाही म्हणून मग टाकला होता. आता तसे नाही याची खात्री होईपर्यंत काढतो. नक्की कशामुळे असे दाखवले आहे ते मलाही माहीत नव्हते. इतर चित्रपटांसारखाच एक वाटला म्हणून टाकले होते.
हे गाणे
हे गाणे मस्तच आहे, गाजले आहे. पण राजेंद्रकुमारची 'गाण्यातील अभिनयाची' पद्धत इथे फारच स्पष्ट दिसते. म्हणजे राजेंद्रकुमार नाचायचा नाही, त्याची खासियत म्हणजे 'बोट/हात दाखवणे, dumb charades खेळणे'. उदा. ये जमीन गा रही है - तो जमिनीकडे हात करेल, ये आसमान गा रहा है - तो आकाशाकडे बोट दाखवेल आणि गवयासारखा हात करेल. हा अभिनवय (अभिनव अभिनय) पुढील गाण्यात अगदी उठून दिसतो -
http://www.youtube.com/watch?v=jN5lLXMYiYM
(सुरुवात - सायराबानू ऊर्फ प्रिया विमानात आहे. राकु खाली जीप चालवतोय)
कौन है (हात आकाशातल्या विमानाकडे) जो सपनों में (कुठेतरी तिसरीकडेच हात) आया
कौन है (परत आकाशाकडे हात) जो दिल में (हात छातीवर) समाया (सुकाणूवरील हात सोडून पसरणे)
वो (परत हात वर आकाशाकडे) झुक गया आसमाँ भी (वर केलेला हात खाली आणून स्प्रिंगवर हात दाबण्याची अॅक्शन)
इश्क मेरा रंग लाया (सुकाणूवरील दोन्ही हात सोडून पूर्ण पसरणे... गाडी खड्ड्यात जायला लागते, तेव्हा अत्यंत घाईघाईने सुकाणूला मिठी मारतो)
कौन है जो सपनों में आया ("मान वेळावूनी धुंद बोलू नको" स्टाईल लाडीकपणा), कौन है (वर बोट) जो दिल में (बोट छातीवर) समाया, लो झुक गया (हात वर दाखवून तो खाली दाखवणे) आसमाँ भी,
इश्क मेरा रंग लाया (परत हात पूर्ण पसरणे), ओ प्रिया (आकाशाकडे पाहून दिलेली हाळी)
पुढच्या कडव्यात 'चला जा रहा हूँ, मंझिलों से बढा जा रहा हूँ' (हात प्रवासाच्या दिशेने दाखवणे)... आणि मग या गाण्यातील अगदी खासम् खास गोष्ट येते. तो परत धृपद सुरू करतो... आता मागील वेळी हात सोडून चालवताना गाडी खड्ड्यात जाता जाता वाचली होती. तेव्हा या कडव्यात हात न सोडता सर्व अभिनवय -
कौन है जो सपनों मे आया (मान तिरकी वर करणे), कौन है जो दिल में (एक हात परत छातीवर) समाया (तोच हात थोडासा पसरला),
लो झुक गया आसमा भी (मानेने वरची दिशा दाखवून मग थोडेसे खाली झुकणे... हा सर्वात महान प्रकार !)
इश्क मेरा रंग लाया (अपघात टाळण्यासाठी एकच हात पसरणे)
ओ प्रिया (परत वरच्या दिशेला बघून हाळी)
जिस्म (हात छातीवर मारणे) को मौत आती है लेकिन (झोपण्याची अॅक्शन !!!!!!)...
रोशनी इसकी जाती नही है (हात कोपरातून वर करून बोटांनी नकार ठसवणे)...
मला समजलेला अभिनवय : हात थोडे पसरले = 'समाना', पूर्ण पसरले = 'इश्क ने रंग लाना'
याशिवाय, आसमाँ, दिल, इ. गोष्टी कुठे असतात हे कायमचे ठसते.
***
सरपंच, वाड्यावर समदी येवस्था केली हाय !
स्लार्ट्य
स्लार्ट्या धन्य आहे रे बाबा तुझी..........![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages