Submitted by एक नसलेल अस्तित्व on 21 January, 2012 - 02:59
सहजच जेव्हा आज गावाकडे आलो,
आठवणीतल्या त्या मळ्याकडे आलो,
ओळखीच्या त्या वाटेवरून चालत,
विसरलेल्या माझ्या घराकडे आलो!
अंगणातल्या त्या मातीमध्ये
विखुरलेली माझी स्वप्ने दिसली,
माझ्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघत
पडकी भिंतही खुदकन हसली!
चालत-चालत जेव्हा माझ्या शाळेजवळ आलो
पाठीवरल्या दप्तराच्या आठवणीत बुडालो
आठवून इथला प्रत्येक क्षण कंठही दाटून आला,
समुद्राला आज जणू त्याचा किनाराच मिळाला!
गावच्या मंदिराजवळ आजही कुणीतरी खेळतंय
खेळता-खेळता मध्येच माझ्याकडे बघून हसतंय
हसण्यातून त्याच्या मला माझीच आठवण आली
स्वप्नांच्या त्या दुनियेत डोळ्यांची कड ओली झाली!
आजही मन माझे गावाकडेच माझ्या ओढ घेते
प्रत्येक आठवणीत माझ्या स्वतःचाच शोध घेते,
शोधता-शोधता मला मी कुठेतरी एकाकीच दिसतो
पडलेल्या माझ्या घराबाहेर आजही वेडा उभा असतो!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मला खुप आवडली कविता.असच
मला खुप आवडली कविता.असच चांगलं काही लिहित जा मित्रा.
यांच गावाकडच घर पडलय आणि
यांच गावाकडच घर पडलय आणि म्हणे याना गावची ओढ आहे,काय ठोकता राव.
फालकोर: धन्यवाद सर, आणखी खूप
फालकोर: धन्यवाद सर, आणखी खूप काही लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा!
विभाग्रज: सर, काळाबरोबर खूप
विभाग्रज: सर, काळाबरोबर खूप गोष्टी बदलतात. गरजेमुळे शहरात अडकलेल्या नायकाला त्याच्या गावची आठवण का येवू नये? त्याच्या लहानपणीच घर पडलय पण त्याच्या आठवणी मात्र शाबूत आहेत!
सुरेख मांडलंय सगळं
सुरेख मांडलंय सगळं कवितेतून....... खूप आवडली......
धन्यवाद शशांक सर!
धन्यवाद शशांक सर!
विभाग्रज: सर, काळाबरोबर खूप
विभाग्रज: सर, काळाबरोबर खूप गोष्टी बदलतात. गरजेमुळे शहरात अडकलेल्या नायकाला त्याच्या गावची आठवण का येवू नये? त्याच्या लहानपणीच घर पडलय पण त्याच्या आठवणी मात्र शाबूत आहेत!>>>>
नायकाला सांगा, म्हणाव परत पडलेल घर उभ कर,मग त्याला दरवाजात आई-बाबा उभे दिसतिल.
लगे रहो.
आपल म्हणन पटतंय!!!
आपल म्हणन पटतंय!!!