राज-ए-desert (II) : ब्राईस कॅनियन

Submitted by rar on 26 April, 2012 - 19:54

ब्राईस कॅनियन अ‍म्फिथिएटर

ब्राईस कॅनियन नॅशनल पार्क, युटा, अमेरिका

ग्रँड कॅनियन किंवा झायॉन नॅशनल पार्क पेक्षा ही जागा तशी कमी प्रसिद्ध...म्हणजे लौकिकार्थानं हा 'पटेल स्पॉट' नाही. पण निसर्गाचा जो काही चमत्कार इथे पाहायला मिळतो तो अवर्णनिय ! भणाणणारा वारा, पाणी आणि बर्फ यामुळे दगडांची झालेली झीज .. हे या सौदर्यांचं रहस्य.

हे अजून काही फोटोज. खूप लांबवर (जवळ जवळ १००-२०० मैल) पसरेलेले कॅनियन आणि अ‍ॅम्फिथिएटर

दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना जवळून अश्या दिसतात...

गुलमोहर: 

मस्त फोटो.
ते खालच्या उजव्या कोपर्‍यात रावण उभे केल्यासारखं वाटतयं. >>> काय काकद्रुष्टी आहे. Happy
मी परत वर जाउन फोटो पाहीला. आणि मला पण रावण दिसायला लागले Uhoh

सुंदर.

ब्राईस कॅनियनचे फोटो आवडल्याचं सांगीतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
अजून काही फोटोज टाकले आहेत.

(ह्या अश्या जागी गेल्यावर फोटोग्राफी- एक कला, म्हणून फोटो काढण्याच्या जोडीला त्या जागेची भौगोलिक माहिती सांगणारे वगैरे फोटोही काढले जातात. तसा एखादा फोटो वरच्या फोटोत असेल तर त्याचे कॉम्पोसिशन, प्रकाशयोजना, अँगल ह्याबाबतीत काही कमी-अधिक झाले असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमस्व. :))

मस्त फोटो Happy
ग्रँड कॅनियन प्रत्यक्ष पाहून सुद्धा गुगल इमेजेस मध्ये पाहिलेलं ब्राईस कॅनियन अक्षरशः अद्भूत वाटलं होतं. प्रत्यक्ष जायचा योग नाही आला अजून.

Pages