आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
<< फक्त सेहवाग बर्याच वेळा
<< फक्त सेहवाग बर्याच वेळा जे वाटते ते बोलताना मी बघितला आहे >> आणि, भज्जी 'वाट्टेल तें' बोलतो म्हणून बहुधा मिडीया त्याला टाळतच असाव्या !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Cricket ची अजिबात पंखी नसुनही
Cricket ची अजिबात पंखी नसुनही काल पुण्याची match बघायला गेले.
Stadium चा माहोल अनुभवायचा होता. पण वाईईईईईट हरलो. अजिबात मजा आली नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सेहवाग प्रचंड पेटलेला आहे.
सेहवाग प्रचंड पेटलेला आहे. त्याची ढेरी ही कमी दिसत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांत काय झाले होते?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुंबईची फिल्डिंग महा-गचाळ आहे.
प्रेक्षकांत स्टीव वॉ बसलाय.
दिल्ली -१३ षटकांत १३५-० !!!!
दिल्ली -१३ षटकांत १३५-० !!!! आज साहेबांची कसोटी लागणार !!!!
१५७-३ [ १६ षटकं] ! दिल्ली
१५७-३ [ १६ षटकं] ! दिल्ली गांठेल २०० चा पल्ला ? केव्हीन पीटरसन आहे अजून !
दिल्ली २०७. मुंबई १९-३
दिल्ली २०७. मुंबई १९-३![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सचिनच्या नवीन रोलमधे पहिल्याच दिवशीं 'अविश्वासाचा ठराव' !!!!
भजी आणि आर पी ला हाकलले नाही
भजी आणि आर पी ला हाकलले नाही तर मुम्बईला सर्व सामने अत्यंत अवघड जाणार आहेत. आज सुदैवाने मुनाफला हाकलले होते, पण भजी आणि आर पी ला ठेवल्याने मुनाफच्या हकालपट्टीचा काहीच फायदा झाला नाही.
भजीने आतापर्यंतच्या ८ सामन्यात फक्त १ बळी घेतलेला आहे आणि गोलंदाजीत सपाटून मार खाल्लेला आहे. पण हट्टाने तो स्वत:कडे भरपूर गोलंदाजी घेतो. इतर फिरकी गोलंदाज बर्यापैकी गोलंदाजी करत असताना हा तथाकथित ऑफस्पिनर राउंड द विकेट येऊन सगळे चेंडू लेगच्या बाहेर टाकतो. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व यातही त्याचा आनंद आहे. He is good for nothing!
मलिंगा आपला देशबंधू
मलिंगा आपला देशबंधू जयवर्देनाला गोलंदाजी करताना मुद्दाम लॉलिपॉप टाकतो की काय असा मला संशय यायला लागला आहे.
कालच्या सामन्यात मलिंगाच्या पहिल्या षटकात फक्त १ धाव मिळाली (त्यात जयवर्देनाने १ चेंडूत १ धाव व सेहवागने ५ चेंडूत ० धावा केल्या).
त्यानंतर मलिंगाच्या दुसर्या षटकात जयवर्देनाने ६ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा केल्या. त्या षटकात एकही यॉर्कर टाकला नव्हता.
मलिंगाच्या तिसर्या षटकात एकूण १३ धावा निघाल्या. त्यात जयवर्देनाने ५ चेंडूत एका चौकारासह ९ धावा केल्या, २ वाईड धावा मिळाल्या व सेहवागने १ चेंडूत २ धावा केल्या. या षटकात मलिंगाने १ च यॉर्कर टाकला.
मलिंगाने ४ थ्या षटकात फक्त २ धावा दिल्या व २ गडी बाद केले. या षटकात त्याने ५ यॉर्कर टाकले. हे षटक सुरू होण्यापूर्वीच जयवर्देना बाद झालेला होता.
एकंदरीत काल मलिंगाने टाकलेल्या १२ चेंडूंवर जयवर्देनाने २५ धावा केल्या व इतरांनी (म्हणजे सेहवाग, पीटरसन्, नागर, रॉस टेलर व नमन ओझा यांनी) १२ चेंडूत फक्त ४ धावा केल्या. २ धावा वाईडच्या मिळाल्या (मलिंगा ४-०-३१-२). त्याने जयवर्देनाला क्वचितच यॉर्कर टाकला. त्याने जयवर्देनाला टाकलेले बहुतेक चेंडू लॉलीपॉप प्रकारातले होते. इतरांना मात्र त्याने तिखट गोलंदाजी केली.
मला उगाचच संशय यायला लागलाय.
सेहवाग एकदम फिट दिसतोय. पोट न
सेहवाग एकदम फिट दिसतोय. पोट न दिसता भरदार छाती दिसतेय.
>>He is good for
>>He is good for nothing!
स्पॉट ऑन मास्तुरे..... हरभजनला कॅप्टन करुन अंबानीनी चूक केलीय असे वाटतेय..... भज्जी ऐवजी रोहितपण चालला असता कॅप्टन म्हणून!
गिलख्रिस्ट आणि व्हेटोरी
गिलख्रिस्ट आणि व्हेटोरी शिवायच त्यांच्या टीम्स जास्त चांगल्या परफॉर्म करतायत....
काल व्हेटोरी संघात परत आला आणि फॉर्मात असलेले आरसीबी हारले!
छाअन
छाअन
<< हरभजनला कॅप्टन करुन
<< हरभजनला कॅप्टन करुन अंबानीनी चूक केलीय असे वाटतेय..... >> अंबानीसारख्यानी केलेली चूकही 'महाग' वाटली तरी शेवटीं फायदेशीरच ठरते, असा रिलायन्सच्या लाखों भागधारकांचा तरी ठाम विश्वास आहे !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गुण तक्त्यात 'डेंजर झोन'मधे न जाण्यासाठी आजचा सामना मुंबईसाठी खूपच महत्वाचा !
आणि राजस्थानसाठी सुध्दा!
आणि राजस्थानसाठी सुध्दा!
द्रवीड - रहाणे सॉलिड ओपनिंग
द्रवीड - रहाणे सॉलिड ओपनिंग पार्टनरशीप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राजस्थान विजयाच्या मार्गावर!
राजस्थान हारले.. अवघ्या १
राजस्थान हारले..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अवघ्या १ रन्स ने.. अँबी मोर्कल ने १९ व्या ओवर्स मधे फक्त ३ रन्स दिले १ विकेट घेउन..:(
जबरदस्त मॅच रंगली
सो क्लोज.... एका ओव्हरमध्ये
सो क्लोज....
एका ओव्हरमध्ये मॅच फिरली.... राजस्थानने विजय गृहीत धरल्यासारखा वाटत होता... जरा आधीपासून accelerate करायला हवे होते!
काल वानखेडे वर मैदाना पेक्षा
काल वानखेडे वर मैदाना पेक्षा स्टेडियम मधे जास्त धमाल आली. वानखेडेची नविन खेळपट्टी संथ आणि मंद होत चालली आहे. त्यामुळे वरुन फटके मारणारे लवकर टपकतात.
काल जिंकताना मुम्बईची फारच
काल जिंकताना मुम्बईची फारच दमछाक झाली. जेमतेम १०० धावा करताना तोंडाला फेस आला होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आजतगायत मुम्बईची सलामीच्या जोडीची समस्या कायम आहे. यावर्षी सचिनच्या बरोबरीने लेव्ही, ब्लिझार्ड, फ्रॅन्कलिन, टी सुमन इ. खेळाडूंना सलामीला खेळविण्याचा प्रयोग केला. पण बहुतेक सामन्यात सलामीची जोडी अपयशी ठरली. फ्रॅन्कलिन वगळता सचिनसकट मुम्बईचे सर्व सलामीचे फलंदाज अपयशी ठरलेले आहेत. काल चक्क भज्जीला २ बळी मिळाले.
मुम्बई पाठलाग करण्यासाठी दुर्बल संघ समजला जातो. गेल्या ५ वर्षात मुम्बईने यशस्वी पाठलाग केलेली सर्वाधिक धावसंख्या १८० आहे. यशस्वी पाठलाग केलेल्या सामन्यातही बर्याच वेळा मुम्बईच्या तोंडाला फेस आलेला आहे. मुम्बईने प्रथम फलंदाजी करावी हेच उत्तम.
<< मुम्बईने प्रथम फलंदाजी
<< मुम्बईने प्रथम फलंदाजी करावी हेच उत्तम. >> मर्यादित षटकांच्या स्पर्धांची एक खासियतच असावी कीं संघांची सुरवातीची कामगिरी स्पर्धेच्या उतारार्धात बहुधा अचानक बदलते [ कॄपया आंकडेवारी नका विचारूं !]. म्हणून मला दिल्लीबद्दल जरा शंका वाटतेय व मुंबईबद्दल [ विशेषतः त्यांच्या सलामीच्या जोडीबद्दल ] आशा वाटतेय !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सलामीच्या जोडीत सचिनचीही मोठी
सलामीच्या जोडीत सचिनचीही मोठी खेळी बघायला सगळेच आतां उत्सुक आहेत !!
गांगुलीच्या अत्यंत विचित्र
गांगुलीच्या अत्यंत विचित्र नेतृत्वामुळे व स्वतःच्या, नेहरूच्या आणि सॅम्युअल्सच्या खराब गोलंदाजीमुळे, डेक्कनने अत्यंत खराब क्षेत्ररक्षण करूनसुद्धा पुणे हरले. गांगुलीने संघाच्या १८ व्या व आपल्या ३ र्या षटकात तब्बल २५ धावा दिल्या. पुढच्या १९ व्या व आपल्या शेवटच्या षटकात फुल्टॉसचा मारा करण्याच्या उच्च परंपरेला जागून नेहरूनेही २५ धावा दिल्या. त्या २ षटकांमुळे डेक्कनने १७ षटकात २ बाद १३० वरून १९ षटकात ३ बाद १८० ची मजल मारली. भारतीय गोलंदाजांना ३ च षटके द्यावीत. ४ थ्या षटकात ते अत्यंत स्वैर मारा करून सामन्याचा निर्णय फिरवतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. नेहरूने २ वेळा, अमित मिश्रा, चावला इ. अनेकांनी हे सिद्ध केले आहे.
पुण्याकडे कारकून, स्टीव्हन स्मिथ (ह्याने शेन वॉर्नकडून लेगस्पिनचे प्रशिक्षण घेतलेले आहे) असे चांगले फिरकी गोलंदाज असताना त्यांना एकही षटक दिले नाही. कारकून आज आयपीएलमध्ये प्रथमच खेळला. ३-४ दिवसांपूर्वीच त्याने विंडीजविरूद्ध २ र्या डावात ५ बळी घेतलेले होते. स्टीव्हन स्मिथला तर आतापर्यंतच्या १० सामन्यात एकही षटक दिलेले नाही. नेहरू, उत्तप्पा, मनिष पांडे इ. वर गांगुली अजून किती दिवस विसंबून राहणार आहे?
स्टीव्ह स्मिथने म्हणे २-३ दा
स्टीव्ह स्मिथने म्हणे २-३ दा गांगुलीला बॉलिंग मागितली पण ...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पंजाबने मस्त रोखलय बेंगलोरला.... आता बघू काय होतय!
<< स्टीव्ह स्मिथने म्हणे २-३
<< स्टीव्ह स्मिथने म्हणे २-३ दा गांगुलीला बॉलिंग मागितली पण ... >> दादा, धोनी यांचा एकंदरीतच फिरकीवर फारसा भंरवसा नाहीय, असं आपलं माझं एक निरीक्षण .
पण भाऊ, अश्विन तर धोनी का
पण भाऊ, अश्विन तर धोनी का लाडला है!
पंजाब जिंकले पाहिजेल आज...चुरस आणखी वाढेल
पुण्याला यापुढचे सामने
पुण्याला यापुढचे सामने जिंकायचे असतील तर दादाऐवजी कारकूनला कर्णधार करून उत्तप्पा, मनिष पांडे, नेहरू, दादा व राहुल शर्मा यांना डच्चू द्यावा. अन्यथा पुण्याचं काही खरं नाही.
बरं झालं पंजाब जिंकले आज. मला
बरं झालं पंजाब जिंकले आज. मला बंगळूर व कलकत्त्याचे संघ अजिबात आवडत नाहीत (त्यांच्या मालकांमुळे).
एकंदरीत १९ वं षटक बर्याच सामन्यात अत्यंत महत्त्वाचं ठरतंय.
रारॉला २ षटकांत १५ धावा हव्या असताना मॉर्केलने १९ व्या षटकांत फक्त ३ धावा देऊन १ बळी मिळवून सामना फिरविला होता.
मुम्बईला पंजाबविरूद्ध २ षटकात ३२ धाव्या हव्या असताना चावलाने १९ व्या षटकांत तब्बल २७ धावा देऊन सामना मुम्बईला बहाल केला होता.
आज पंजाबला २ षटकात ७ धावा हव्या असताना झहीरने १९ व्या षटकात फक्त २ धावा दिल्या व त्या षटकात २ धावबाद झाल्याने पंजाब प्रचंड दडपणाखाली आले होते.
मद्रासला बंगळूर विरूद्ध २०६ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या २ षटकात तब्बल ४३ धावा हव्या असताना कोहलीने १९ व्या षटकात तब्बल २८ धावा देऊन सामना फिरविला होता.
<< पण भाऊ, अश्विन तर धोनी का
<< पण भाऊ, अश्विन तर धोनी का लाडला है! >> कदाचित , इथं त्याला 'एक्स्पोझ' करून कायमचाच त्याचा कांटा काढायचा प्लान असेल धोनीचा !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< मला बंगळूर व कलकत्त्याचे संघ अजिबात आवडत नाहीत (त्यांच्या मालकांमुळे). >> मास्तुरेजी, ज्यांच्याकडे कमालीचा 'माल' व 'लक' आहे तेच आयपीएल संघाचे मालक होऊं शकतात ! त्यांच्यात परत तुमच्या माझ्या आवडीमुळे भेदभाव कशाला करा !!
<< एकंदरीत १९ वं षटक बर्याच सामन्यात अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. > > खरंय. शेवटच्या दोन षटकांपर्यंत सामन्याचा निर्णय अनिश्चित असणं यातच टी-२०ची खरी गंमत आहे. आणि तसं या स्पर्धेत बरेचदा होतंय.
आजची मॅच मराठी मनाला विशेष भुरळ घालणारी ! पुणे वि. मुंबई !!! मॅच पुण्यात आहे त्यामुळे मॅचनंतर तीन पारंपारिक प्रतिक्रिया काय बरं असतील -
पुणे जिंकले - " अहों, त्या गांगुलीशास्त्र्यांच्या डोक्याचें माप घ्या बरें; पगडी द्यावयासच हवी त्यांस !! "
मुंबई जिंकली -" यंदा पाण्याचें दुर्भिक्ष्यच ना पुण्यात ! नाहीं तर आज पाणी पाजायचेंच होतें त्या मुंबैस !! "
दोन्ही संघ बरोबरीत - " दोनही संघाच्या खेळाडूंस उदंड दक्षिणा मिळालेली; दोघेही तृप्त तर कशास भांडतील पंक्तीत पुढे कोण म्हणून ! "
शेवटच्या दोन षटकांपर्यंत
शेवटच्या दोन षटकांपर्यंत सामन्याचा निर्णय अनिश्चित असणं यातच टी-२०ची खरी गंमत आहे. >>> शेवटच्या चेंडू पर्यंत म्हणा हव तर... अश्या सामन्यांची सरासरी २५% च्या वर आहे म्हणे.
एक कुजबुज... दुसरा स्ट्रॅ.टा.आ. घेतला की सामन्याचा रंग बदलतो.
दोनही संघाच्या खेळाडूंस उदंड दक्षिणा मिळालेली; दोघेही तृप्त तर कशास भांडतील पंक्तीत पुढे कोण म्हणून ! >>> या प्रतिक्रीयेवर मात्र सर्वस्वी झक्कींचा कॉपीराईट आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>> आजची मॅच मराठी मनाला
>>> आजची मॅच मराठी मनाला विशेष भुरळ घालणारी ! पुणे वि. मुंबई !!!
सचिनमुळे मी मुम्बईच्या बाजूने आहे. "पुणे वॉरिअर्स" या नावात "पुणे" आहे, पण संघात "पुणे" नाही. मनिष पांडे, उत्तप्पा, नेहरू, राहुल शर्मा इ. जवळपास सर्व सामन्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंना वारंवार संघात घेण्याचे दादाचे धोरणच समजत नाहिय्ये (तो स्वतः सुद्धा पूर्ण फ्लॉप आहे). इतर संघात अधूनमधून स्थानिक खेळाडूंना संधी दिली जाते. परवा डेक्कननेही कटकच्या सामन्यात ओरिसाच्या सामंतरायला खेळवले होते. दादाने आजतगायत एकही स्थानिक खेळाडू एकाही सामन्यात खेळविलेला नाही.
Pages