आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
>>आजचा खेळ बघा त्याचा धडकी
>>आजचा खेळ बघा त्याचा
धडकी भरवलेली दिल्लीला आणि त्याच्या हाताखाली पुण्यासारखी कमजोर टीम टॉप४ मध्ये आहे
सहा सामन्यात अडखळत खेळल्यानंतर एक सामना चांगला खेळलाय आत्ता तो... आणि जरा त्या रायडर आणि थॉमसला पण क्रेडिट द्या!
भाऊ, जबरी व्यंगचित्र! काल
भाऊ,
जबरी व्यंगचित्र!
काल गंग्याला सुबुद्धी सुचल्यामुळे त्याने नेहरूला शेवटचे २० षटक दिले नाही. पण तरीसुद्धा नेहरूने काल आपल्या शेवटच्या षटकात २-३ फुल्टॉस टाकून पुवॉ ला हरवायचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण दिल्लीच्या तळाच्या फलंदाजांनी तो प्रयत्न चतुराईने हाणून पाडला. नेहरू, पवण्या, इरफान वगैरे गोलंदाजांना ४ ऐवजी ३ च षटके द्यावीत कारण ते आपल्या ४ थ्या षटकांत हमखास फुल्टॉस, वाईड, लेगस्टंपवरचे किंवा ऑफच्या बाहेरचे आखूड टप्प्याचे चेंडू असा स्वैर मारा करून हातात येत असलेला सामना हमखास घालवतात.
सचिनला अजून टच सापडत
सचिनला अजून टच सापडत नाहीये.
भार्गव भट बोलिंग करतोय, तो २१ वर्षांचा आहे. सचिन खेळतोय २१ वर्षांपेक्षाही जास्त
मला वाटतं सचिन आज आक्रमक
मला वाटतं सचिन आज आक्रमक होऊनच खेळत होता. चावलाचे लेगब्रेकही अगदी सुरवातीपासून तो 'अगेन्स्ट द स्पीन' छानच खेळत होता. धांवचित झाला नसता तर पूर्वीच्या सचिनची झलक आज पहायला मिळाली असती !
आर आर ने पकड फारच ढिली
आर आर ने पकड फारच ढिली सोडलीय.... ह्या रन्स शेवटी महागात पडू नयेत म्हणजे मिळवली
फारच गचाळ फिल्डींग करतायत आज आरआर
स्टेबल सुरुवात करुन शेवटी धुवायचे हा आरआरचाच फंडा वापरलाय आज आरसीबीने
बंगळूरने आज शेवटच्या ५०
बंगळूरने आज शेवटच्या ५० चेंडूत १२२ धावा ठोकल्या. ११.४ मध्ये ६७ वरून २० षटकांत १८९!
हुर्रे.... द्रवीडची फिफ्टी
हुर्रे.... द्रवीडची फिफ्टी
पण आरआरची अवस्था काही खास नाही.... बाकी कुणी खेळायलाच तयार नाही!
द्रवीड आउट.... आता नो होप्स!
द्रवीड आउट.... आता नो होप्स!
भाउ व्यंगचित्रे मस्तच
भाउ व्यंगचित्रे मस्तच
दादांचा विजय असो.
<< दादांचा विजय असो. >>
<< दादांचा विजय असो. >> "दादांचा" हें बहुवचनी आहे कीं बहुमानार्थी ? गांगुली, सचिन, द्रविड इ.इ.ना प्रेमामुळे 'अहो' नाही म्हणत कुणी व खरंतर बरेच दादा लोक आहेत 'आयपीएल'मधे, म्हणून शंका !
अरेच्चा, पुणे वॉरिअर्सची मॅच
अरेच्चा, पुणे वॉरिअर्सची मॅच आणि इथं सामसूम !
आज पुण्याची सुरवात बेकार झाली २-२ विकेट्स ! दादा अगदींच फालतू फटका आधीच ठरवून खेळायला गेला व बाद झाला. पांडे व उथापा सुंदर खेळले व स्कोअर १४६-२ [२० षटकं] झाला. पुण्याचीं शेवटचीं षटकं नाही पाहूं शकलो पण विकेटस हातांत होत्या तर १५ षटकांनंतर उचलाउचली करून धांवसंख्या वाढवायला हवी होती असं वाटतं. अर्थात, सेहवागचा आज दिवस होता [ ४८ चेंडूत नाबाद ८७] त्यामुळे थोडा फार स्कोअर वाढून कांही फरक नसता पडला; दिल्लीने १६ षटकांतच १४८-२ स्कोअर करून दाखवला !
भाऊ.. उथप्पा अगदीच टुकार
भाऊ.. उथप्पा अगदीच टुकार खेळला... जास्त धावा नक्कीच झाल्या असत्या... पिच नक्कीच असं नव्हतं की त्यामुळे धावा काढणे अवघड होते... पांडेनी दुसर्या बाजूने व्यवस्थित धोपटलाय... उथप्पा बाद झाला असता तर कदाचित स्मिथ, लुक राईटनी फास्ट धावा केल्या असत्या..
मागच्या एक दोन मॅच मधे पाहिले
मागच्या एक दोन मॅच मधे पाहिले - जेव्हा दुसरा संघ टाईट बोलिंग करतो तेव्हा वॉरियर्सचे फलंदाज काहीतरी वेगळे करायला जात नाही (एबी प्रमाणे).
उथप्पा बाद झाला असता तर कदाचित स्मिथ, लुक राईटनी फास्ट धावा केल्या असत्या..>>> सहमत. आज विकेट फेकायला हवी होती १५-१६ ओव्हर्सनंतर.
पण एक मात्र आहे. इतर टीम्सच्या मानाने मुळात पुण्याचा संघ बराच कमकुवत आहे. यातील बरेच लोक आपापल्या देशाच्या संघात स्थान मिळवू शकत नाही. परवा वाचले की स्टीव स्मिथला पहिल्या ऑक्शनमधे कोणीही घेतला नव्हता.
दादाने त्यामानाने हा संघ घेऊन चांगली लढत दिलेली आहे. पण त्याचे स्वतःचे फलंदाजीतील कौशल्य आता खूपच उतरले आहे. स्पिनरला पुढे येउन सिक्स मारताना तो पूर्वी कधीही चुकत नसे.
यावर्षी आयपीएलच्या
यावर्षी आयपीएलच्या आतापर्यंतच्या सर्व सामन्यात कोहली अपयशी ठरलेला आहे. तो २ दिवसांपूर्वी अजमेरच्या दर्ग्यावर पण जाऊन आला. पण लगेच कालच्या सामन्यातही तो अपयशी ठरला. दर्ग्यावर किंवा देवळात जाण्याचा आणि यश/अपयशाचा काहीच संबंध नाही.
<< उथप्पा अगदीच टुकार खेळला
<< उथप्पा अगदीच टुकार खेळला >> मीं तीं षटकं पाहिलीं नाहीत .पण, आयपीएलचं हें सत्र उथप्पासाठी राष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याची शेवटची संधी असावी व म्हणूनच कदाचित अतिकाळजीच्या दबावामुळे तो असा खेळला असावा . तो चांगलीच आक्रमक फलंदाजी करूं शकतो.
<< पुढे येउन सिक्स मारताना तो पूर्वी कधीही चुकत नसे. >> तो फटका नि:संशय premeditated होता व शून्यावर एक विकेट गेली असताना तो खेळणं गांगुलीसारख्या मुरब्बी फलंदाजाकडून अपेक्षित नव्हतं, असं मला वाटतं. अर्थात, यामागें गांगुलीचा वेगळा विचार असूं शकतो.
रायडर फेल..... पुणे फेल!
रायडर फेल..... पुणे फेल!
>>अशा लोकांची तुलना फक्त गाणे
>>अशा लोकांची तुलना फक्त गाणे ऐकायला जाणार्या खर्या दर्दी लोकांशी करा.
बरोबर आहे की मग.... तुम्ही पण पैसे आहेत म्हणून महागडी तिकिटे काढून आयपीएल बघायला जाणार्यांची तुलना त्या दिखाऊ शास्त्रीय संगीत दर्दी लोकांशी करा... सगळी कडेच असे लोक असतात... त्यामुळे उगा खेळावर आणि स्पर्धेवर टीका कशाला?
>>बाकीच्या भानगडी कडे लक्ष देऊ नये....सगळे उद्देश एकत्र साध्य होतील अशी अपेक्षा करणे म्हणजे निराशेला आमंत्रण देण्यासारखे आहे
कुठल्या भानगडी आणि कुणाला आलीय निराशा?.... आम्ही तर मस्त खेळाचा आनंद लुटतोय
>>हळू हळू २०-२० मधल्या क्रिकेटचे तंत्रज्ञान असा लेख कुणि प्रसिद्ध करेल, तसे तंत्रज्ञान शिकवणारे व शिकणारे लोक होतील,
प्रत्येक फॉरमॅटचे एक तंत्र असते आणि त्यात खेळायचे तर ते शिकले पाहिजेल!
तंत्राचा आद्य बादशाह गावस्कर एक्स्ट्रा कव्हर मधून आयपीएल वर स्तुतीसुमने उधळतोय आणि तंत्राचा अजुन एक बादशाह द्रवीड चक्क एका टीमचे यशस्वी प्रतिनिधित्व करतोय!
हे जाणते खेळाडू जर आयपीएलसारख्या स्पर्धांचा पुरस्कार करतायत आपण कोण त्याला थुत्तरफोड आणि सवंग म्हणून हिणवणारे
मस्त रंगत चाललीय स्पर्धा आता
मस्त रंगत चाललीय स्पर्धा
आता जवळ जवळ निम्मी स्पर्धा संपली तरी डेक्कन सोडून उरलेल्या सर्व संघांना समान संधी आहे!
इथुन पुढे मात्र सर्वानाच सावध खेळायला पाहिजेल... एखाद्-दुसरा पराभव पण निर्णायक ठरु शकतो
<< प्रत्येक फॉरमॅटचे एक तंत्र
<< प्रत्येक फॉरमॅटचे एक तंत्र असते आणि त्यात खेळायचे तर ते शिकले पाहिजेल! >> अगदीं विषय निघालाच आहे म्हणून -
मीही सुरवातीला मर्यादित षटकांच्या स्पर्धांकडे [ विशेषतः टी-२०] जरा तुच्छतेनेच पहायचो. पण हळू हळूं माझ्या लक्षात आलं कीं नजाकत, खानदानी प्रतिमा नसलेल्या या खेळानेही क्रिकेटला खूप कांही दिलंय [अर्थात, पैसे सोडून !]. पूर्वी आंखूड टप्प्याचा ऑफ स्टंपबाजूचा चेंडू टपली मारून स्लिपच्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून सीमापार करणं निषिद्ध मानलं जायचं; आज सेहवाग ,सचिनसारखे खेळाडू या फटक्याचा सुरेख उपयोग कसोटी सामन्यातही करताना दिसतात. 'ऑफ स्टंप'बाहेर जावून चेंडू लेगस्लिपच्या डोक्यावरून सीमापार करणं, 'पॅडल शॉट' इ.इ.चंही श्रेय मुख्यतः क्रिकेटच्या या नवीन प्रकारालाच आहे. फिरकीला 'अगेन्स्ट द स्पीन' खेळणं एक वेळ हास्यास्पद समजलं जायचं; आज तें एक कमालीचं कसब मानलं जातं ! [ सचिनच्या या कसबाबद्दल शेन वॉर्नलाच विचारा !]. गोलंदाजीतही 'यॉर्कर'चा, 'स्लोवर डिलीव्हरी'चा सर्रास पण नेमका उपयोगही मर्यादित षटकांच्या सामन्यांमुळेच प्रतिष्ठेचा झाला. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत तर मर्यादित षटकांच्या सामन्यानी एक अतिउच्च दर्जाच निर्माण करायला मदत केलीय.व सर्वांत महत्वाचं, प्रत्येक षटक अतिमहत्वाचं असल्याने, गोलंदाज व फलंदाज यांच्यात प्रत्येक चेंडू हा एक ' माइंड गेम ' झालाय व त्याचा उपयोग क्रिकेटच्या सर्वच प्रकारात खूप महत्वाचा ठरतोय.
आणि, संगीत मनापासून आवडणार्याला शास्त्रोक्त संगीताप्रमाणेच लोकसंगीत, आदिवासींच्या ढोलनृत्यातील
ठेका व लय यांतही आनंद मिळतोच ना; तसं समजावं हवं तर आम्हां क्रिकेटवेड्यांबद्दलही !
मुंबई जिंकली ! सचिन[३४],
मुंबई जिंकली ! सचिन[३४], शर्मा [५०] व रायुडु [ १७ चेंडूत ३४] विजयाचे शिल्पकार. अवाना व अझर मेहमूदने [ माजी पाक गोलंदाज] पंजाबसाठी सुंदर गोलंदाजी केली.
रॉबिन पीटरसन्, रायडू, रोहित
रॉबिन पीटरसन्, रायडू, रोहित शर्मा आणि काही प्रमाणात सचिनच्या फलंदाजीने सामना जिंकून दिला.
मुम्बईला यापुढे जिंकायचे असेल तर मुनाफ व भज्जीला हाकलले पाहिजे. Both Munaf and Bhajji are good for nothing! दोघेही अत्यंत खराब गोलंदाजी करतात. पंजाबने १३ षटकांत ८० वरून २० षटकांत १६८ वर मजल मारली ती मुख्यत्वेकरून या दोघांच्या खराब गोलंदाजीमुळे.
मुनाफने स्वतःच्या शेवटच्या दोन षटकांत १६+१६ = ३२ धावा दिल्या. शेवटून दुसर्या षटकात तर त्याने लागोपाठ ४ फुल्टॉस टाकले आणि सपाटून मार खाल्ला. शेवटच्या षटकातही तो फुल्टॉस टाकत होता.
भज्जी अत्यंत यूसलेस गोलंदाज (व फलंदाज सुद्धा) आहे. उजव्या हाताने उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना हा लेगच्या फूटभर बाहेर चेंडू टाकतो. तो चेंडू इतका बाहेर असतो की यष्टीरक्षकाला सुद्धा तो अडवता येत नाही व वाईडच्या ५ धावा मिळतात. आणि एवढे करून तो दिनेश कार्तिकलाच शिव्या घालत होता. अत्यंत निष्प्रभ गोलंदाजी, भरपूर वाईड चेंडू ही त्याच्या गोलंदाजीची वैशिष्ट्ये.
रॉबिन पीटरसन शिल्लक असताना भज्जी उगाचच स्वतः वर फलंदाजीला येऊन दोन चेंडू वाया घालवून बाद झाला (ज्यावेळी १६ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या तेव्हा). रायडूच्या आधी दिनेश कार्तिकला पाठविणे हाही मूर्खपणाच. त्याची कॅप्टनशिप अत्यंत विचित्र आहे.
सुदैवाने पीटरसन् व रायडूने १९ व्या षटकात मारामारी करून विजयश्री खेचून आणली.
गोलंदाजीत आज अवाना मला खूपच
गोलंदाजीत आज अवाना मला खूपच सरस वाटला. त्या खालोखाल अझर मेहमूद . फ्रँकलीनची धांवसंख्या २२ चेंडूत २२ च असली तरी सलामीला येवून मुंबईसाठी केलेली ती खेळीही महत्वाचीच. गिलख्रिस्ट जसा खेळत नसूनही पंजाबचं प्रेरणा स्थान आहे तसंच सचिनचं कप्तान नसूनही मुंबईबाबत आहे, हें सतत जाणवतं. भज्जीबद्दल कप्तान व गोलंदाज/फलंदाज म्हणून फार अपेक्षा नव्हत्याच व त्यामुळे अपेक्षाभंग पण नाही !
आत्ता दादाने फोर अडवताना चक्क
आत्ता दादाने फोर अडवताना चक्क आडवे पडून बॉल रोखला, तो ही एकदम योग्य रीतीने, ते पाहून थक्क झालो! प्राचीन काळी तो जेव्हा खेळत होता तेव्हाही कधी पाहिल्याचे आठवत नाही त्याचे कॅचिंग नेहमीच चांगले होते पण ग्राउंड फिल्डिंग बद्दल तो फारसा फेमस नाही
चार्जर्स ने ज्या पद्धतीने आज सुरूवात केली होती त्यामानाने १७७ म्हणजे बरेच रोखले त्यांना.
आज दादाकडून 'कॅप्टन्स नॉक'
आज दादाकडून 'कॅप्टन्स नॉक' अपेक्षित आहे. दादाचा ऑफसाईड खेळ पहाणं हा एक और आनंद.
>>पण ग्राउंड फिल्डिंग बद्दल
>>पण ग्राउंड फिल्डिंग बद्दल तो फारसा फेमस नाही
उलट (गचाळ)ग्राउंड फिल्डिंग बद्दलच तो फार फेमस आहे
बुमरॅन्ग, ते उपहासानेच लिहीले
बुमरॅन्ग, ते उपहासानेच लिहीले होते पण गचाळ म्हणजे दोन्ही पायातून बॉल जाणे वगैरे इतर महान लोकांबद्दल ऐकलेले किस्से त्याच्याबद्दल बघितले नाहीत. पण महाराजा म्हणजे बॉलच्या कडे पळत थोडाच जाणार? बॉल आला तर पकडू. नाहीतर बॉल अडवल्यावर आउट करता येणार असेल तर मेहनत करायची. उगाच रन रोखायला कोण स्ट्रेच करणार
जेव्हा कोणी आउट होणार असेल तेव्हा ही फिल्डिंग बघा.
http://www.youtube.com/watch?v=gkT7fFN2fQs
हे दोन कॅच बघा
http://www.youtube.com/watch?v=QPNY3vtNyzI
http://www.youtube.com/watch?v=JOiHuDnldD0
मग जो चेहरा करून बघतोय तो जणू म्हणतोय की काय उगाच मेहनत करायला लावतात!
मस्त खेळत होता आज तो.... आता
मस्त खेळत होता आज तो.... आता बघू बाकीचे वीर काय करतात ते!
डेक्कनकडून हारले तर अगदीच नाचक्की होईल
<< मस्त खेळत होता आज तो....
<< मस्त खेळत होता आज तो.... >> पण मैदानाच्या ज्या भागाचा तो खराखुरा राजाच, त्याच भागात त्याचा एक सोपा झेल सुटला व दूसरा घेतला गेला ! अजूनही पुण्याला जिंकणं कठीण नाही. उथपाबद्दलही अपेक्षा आहेतच .
पुणे वॉरिअर्स १८ धांवानी हरले
पुणे वॉरिअर्स १८ धांवानी हरले ! बॅड लक !!
"आम्ही १५-२० धांवा उगीचच दिल्या ", गांगुलीचं यावर वक्तव्य. संगकारा ही म्हणूं शकला असता, " गांगुलीला एक जीवदान व त्याच्याविरुद्धचं एक पायचितचं अपील फेटाळलं गेलं म्हणून; नाही तर आणखी मोठ्या फरकाने जिंकलो असतो आम्ही !". सहज मला वाटलं, "आम्ही १५-२० धांवा उगीचच दिल्या ", " आमची मधली फळी ढेपाळली ", "आमची गोलंदाजी ढिसाळ झाली " इ.इ. विधानं हरल्यानंतर समर्थनार्थ करणं निदान आयपीएलमधे तरी आवश्यकच आहे का ? 'त्यानी १७७ केल्या, आम्ही नाही करूं शकलो, पूर्णविराम' , हें अधिक योग्य नाही वाटत २० षटकांच्या सामन्यानंतर? बाकी काय असेल तें ड्रेसिंगरुममधे सांगा ना तुमच्या संघ सहकार्याना !
भाऊ, बरोबर आहे. खरे म्हणजे
भाऊ, बरोबर आहे. खरे म्हणजे पुण्याची फिल्डिंग त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगली होती. म्हणजे जास्त धावा त्यांनीच दिल्या
पण ही डिप्लोमॅटिक वक्तव्ये कदाचित पीआरचा भाग असतो. फक्त सेहवाग बर्याच वेळा जे वाटते ते बोलताना मी बघितला आहे ("Bangladesh are an ordinary team" वगैरे )
Pages