Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
मला पण अजूनही बघाविशी वाटत
मला पण अजूनही बघाविशी वाटत नाहीये ही सिरियल. का कुणास ठाऊक. पण प्रोमोज बघितल्यावरच माझं हे मत झालं. बायकांवरचे अत्याचार शेवटी तेच. सास-बहू सिरियल असो की उंच झोक्यावर बसलेली यमू असो. अर्थात कलाकार चांगले आहेत म्हणा. पण अजून तरी ह्या सिरियल चं भाग्य आमच्या टिव्हीवर उजळलेलं नाहीये
काहीतरी हुकले आहे
काहीतरी हुकले आहे का.
गर्भाधान विधी झाल्याशिवाय असे मुलीला रात्री (अभ्यासिकेत का होईना पण) पाठवत?
खांद्यावर हात वगैरे ठेवणे अलाऊड होते?
भरत मयेकर+१
रैना ह्या मालिकेच्या
रैना ह्या मालिकेच्या दिग्दर्शकाने वहिनीसाहेब , भाग्यलक्ष्मी सारख्या एक से एक सुमार सिरीयल्स दिल्यात. चांगल्या कथानकाची किती वाट लावतोय ते पहात बसायचं आता.
ह्या मालिकेच्या दिग्दर्शकाने
ह्या मालिकेच्या दिग्दर्शकाने वहिनीसाहेब , भाग्यलक्ष्मी सारख्या एक से एक सुमार सिरीयल्स दिल्यात >>> अरे बापरे तो वीरेन का कोण तो दिग्दर्शक आहे या मालिकेचा आता तर बिग नो !
काल ते रमाला ताई का कोण त्या
काल ते रमाला ताई का कोण त्या रागवतात व मारतात ते काही पटेना. बघवेना. चाइल्ड अब्यूजच वाटले. त्या विडोज फार सतेज व सुखी दिसतात हे तर जाम विनोदी आहे. मुलगी जाम गोड आहे. आय होप शी रन्स अवे.
prady काय सांगतेस.
prady काय सांगतेस.
हो रैना. तोच तो. आता यापुढे
हो रैना. तोच तो. आता यापुढे सास्वांनी मिळून छळ करणे यावरच भर असेल मालिकेचा.
बाकी गर्भाधानाआधी पाठवले जायचे नाही हे तर आहेच. खांद्यावर हात हा तर लईच घोळ.
फारेण्ड.. मी आहे रे ही मालिका डोक्यात जाणारी.
सगळे शाळेच्या गॅदरिंगमधे वावरावे तसे वाटतात त्या कपड्यांच्यात आणि त्या भाषेत.
सगळ्या बायकांचे दागिने पदराच्या बाहेर?? सतत नाकात नथ? केवढा मोठा पदर काढलेला साड्यांचा.. कपड्यांचा कोरेपणा तर कुठूनही लपत नाही. मेकपही लपत नाहीत.१८७० च्या दरम्यान नवरा बायको देवळात म्हणून घाटावर फिरायला जायचे एकत्र? काहीही.
मारूतीच्या दगडी देवळाला टळटळीत लाल ऑइलपेंट..
परवा तर एक स्कायब्लू कलरची मिलवाली नव्वारी पाह्यली.. १८७० मधे मिल्स होत्या की काय?
आणि काय ती भाषा... फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनमधे पाठ करून म्हणल्यासारखी. भाषेसाठी वर्कशॉप नावाचा प्रकार करायचा असतो अश्या प्रकारच्या प्रोजेक्टसमधे हे इतपत या युनिटला कुठे माहित असणार म्हणा. त्यातल्या त्यात शरद पोंक्षेची भाषा नैसर्गिक वाटते बाकी सगळे धन्यवाद.
लहान मुलं कुठेही अडोरेबल दिसतात. त्या छोट्या मुलीमुळे लोक बघतायत त्यामुळे एवढ्यात तिला मोठं करणार नाहीत. तिचा भरपूर छळ झाल्याशिवाय. नाहीतर टिआरपी मिळणार कसा...
मारूतीच्या दगडी देवळाला
मारूतीच्या दगडी देवळाला टळटळीत लाल ऑइलपेंट>>
१८७० च्या दरम्यान नवरा बायको देवळात म्हणून घाटावर फिरायला जायचे एकत्र?>>
हायला नीरजा. हेच हेच.
प्रत्येक भागातील अशा चुकांची यादी काढायचा सुद्धा कंटाळ आला.
खटकत कसे नाही लोकांना पाहताना.
बरं खटकुन जाता कुठे. इतर पर्याय अजूनच भयाण आहेत.
रैना, मला वाटतं हे जर नावाजले
रैना, मला वाटतं हे जर नावाजले जात असेल तर प्रेक्षक म्हणून आपण (कलेक्टिव्हली..) हे डिझर्व्ह करतो.
एकुणातच चलता है अॅटिट्यूड जिथे तिथे.. तसा इथेही
बरं खटकुन जाता कुठे. इतर
बरं खटकुन जाता कुठे. इतर पर्याय अजूनच भयाण आहेत. <<
ते ही भरपूर टि आर पी देणारे आहेतच
"मी कढी नाही केली, बक्षीस कसे
"मी कढी नाही केली, बक्षीस कसे घेऊ? "
शाबास यमे!
रमाबाई रानडेंचे प्रत्यक्ष
रमाबाई रानडेंचे प्रत्यक्ष जीवन आणि मालिकेत दाखवले जाणारे प्रसंग यात खुप मोठी दरी वगैरे आहे का? ज्यांनी त्यांचे पुस्तक वाचले आहे, त्यांनी कृपया प्रकाश टाकावा. बाकी एवढ्या जुन्या काळात नक्की कसे जीवनमान होते, हे व्यवस्थित माहितच नसल्याने क्रिटिकल न होता मालिका खरोखर एन्जॉय करता येते आहे. एल्दुगोपेक्षाही याच मालिकेची वाट बघितली जातेय. इतर सास बहू टाईप मालिकेसारखी ही नक्कीच नाही. अजूनतरी नाही. एका समाजसुधारक जोडप्याचा जीवनपट तोही डेलीसोपच्या स्वरुपात बघता येत असल्याचा आनंद मिळतो आहे. अर्थात, तो किती दिवस टिकेल, हे मात्र नाही सांगता येणार. दिग्दर्शक तिला कसे वागवतात, यावर सगळे अवलंबून आहे.
असो, यमीने निरुपण करुन नवर्याचे, सत्यवचनाने सासर्यांचे आणि आज्जींना औषध देऊन बरे करुन ताईसासूंचे मन जिंकले. पण तिथे कथा संपत नाही ना! त्यामुळे शेवट गोड असं नाही म्हणता येणार... सतत स्वतःला सिद्ध करत राहण्याची यमूची धडपडच पहावी लागणार आहे का? की कथा पुढेही सरकणार आहे?
मला बाकी काही माहित नाही पण
मला बाकी काही माहित नाही पण ही मालिका पाहिल्यापासुन माझी बहिण घरात शहाण्यासारखी वागायला लागलिये हे मात्र नक्की
परवा पहाटे उठुन अभ्यास करत बसली होती. १०वीचा अभ्यास सुरु केला
आईनी कारण विचारलं तर म्हणाली त्याकाळी मुलींनी शिकावं म्हणुन लोकं आटापिटा करायचे आता इतक्या सहज आम्हाला शिकायला मिळतय तर आम्ही अभ्यास करायला हवा
तरी अजुन त्या मालिकेत इतक काही सुरु झालं नाहीये त्याआधीच हिला कळलं
मला वाटत तिला ती मालिका पहायला लावण्यामागचा आईचा विचार हाच असावा
जयवी १००००००+ या मालिकेचे
जयवी १००००००+
या मालिकेचे प्रोमो बघुनच ही कोणत्या दिशेने जाणार याची कल्पना होती. त्यामुळे कधीच बघितली नाही हे बरे झाले. मालिका पहण्यापेक्षा पुस्तकच वाचा लोकहो. ही मालिका म्हणजे सध्याच्या सास - बहू ड्रामाच्या बॅकग्राउंड ला जुन्या काळाचा पडदा लावल्यासारखी आहे फक्त.
थोडेसे अवांतर पण इथे आणि
थोडेसे अवांतर पण इथे आणि सर्वत्र इतके वाईट प्रतिसाद असतात मालिकांबद्दल त्यामुळे एक प्रश्न सतत सतावतो कि लोक ह्या मालिका\ टीव्ही पहाणे बंद का करत नाहीत??????
ती यमुना अका तेजश्री वालावलकर
ती यमुना अका तेजश्री वालावलकर खूपच पोक्त आहे वाटते, आम्ही सारेत तिची मुलाखत पाहिली , तिथे पण अगदी यमुना पद्धतीने बोलत होती. दामल्याने सांगितले की, तु जरा यमुनेतून बाहेर ये.. तरी बाई एकदम पोक्त ह्या वयात... (हुजुरपागाचा परीणाम का. ?)
डेलिया, मलाही हाच प्रश्ण आहे,
डेलिया,
मलाही हाच प्रश्ण आहे, एकडचे वाचून एक दोन भाग बघितले की वाटते आपल्याला इतका पेशन्स नाहीये... पुन्हा कोण लॅप्टॉप वर डोळे लावून बघणार...
थोडेसे अवांतर पण इथे आणि
थोडेसे अवांतर पण इथे आणि सर्वत्र इतके वाईट प्रतिसाद असतात मालिकांबद्दल त्यामुळे एक प्रश्न सतत सतावतो कि लोक ह्या मालिका\ टीव्ही पहाणे बंद का करत नाहीत?????? >>>>>>>>
अनुमोदन !!
त्या विडोज फार सतेज व सुखी
त्या विडोज फार सतेज व सुखी दिसतात हे तर जाम विनोदी आहे
मलाही हे खुपच खटकले. जुन्या पुस्तकांमध्ये त्या काळाच्या वर्णनांमध्ये विधवांना कायम एकवेळचेच जेवण मिळायचे, विविध उपासतापास नी पूजाअर्चा त्यांच्यामागे लावुन दिलेल्या असत व्.व. वाचलेय. जेवणातही काय खावे याचेही नियम होते. मागे एकदा थोडा भाग पाहिला ज्यात सासु रमेला भरवत असते नी एक लाल आलवणवाली ताटावरुन उठुन जाते त्यात त्या आलवणवालीच्या ताटात भरपुर पदार्थ वाढलेले दिसले.
मी अधुन मधुन एलदुगोच्या आधी ही मालिका पाहते याचे कारण ती लहान मुलगी हे आहे.
मला ही मालिका अजूनतरी आवडते.
मला ही मालिका अजूनतरी आवडते.
प्रज्ञा +१ मलाही अजूनतरी फार
प्रज्ञा +१ मलाही अजूनतरी फार आवडतेय....
झंपे, ती खरंच पोक्तपणे बोलते, पण त्याचेच मला भारी कौतुक वाटते, गोडंबी गिफ्टेड मुलगी म्हणून... त्या वयातल्या सगळ्याच मुलांना असे बोलणे जमत नाही. मोठमोठाल्ले डायलॉग्ज कसे लीलया पाठ करुन सहजतेने म्हणते ती... आणि तरीही तिच्यातली निरागसता अगदी लपत नाही. गो तेजश्री, तुझे भविष्य उज्जवल आहे.
असो, बाळम्भटजी यमूच्या आईला आणतील का सोबत? की यमूच जाईल माहेरी? "आम्ही सारे खवय्ये"तल्या मुलाखतीत तिने नवर्याची तार वाचण्याच्या आणि तिला वाचता येते हे आईपासून लपवण्याच्या प्रसंगाबद्दल सांगितले होते, तो प्रसंग तिच्या माहेरी घडतो आणि तो लवकरच घडेल असे वाटते.
साने, काल आणि परवाचे भाग
साने, काल आणि परवाचे भाग बुडालेत, ऑफिसच्या कामापायी
एकही एपिसोड मिस करावा नाही वाटत ह्या मालिकेचा!
बागे, काल आणि परवा काही विशेष
बागे, काल आणि परवा काही विशेष घडले नाही गं... आज्जींना दम्याचा अॅटॅक आला आणि यमूने चाटण देऊन त्यांना बरे केले आणि माधवरावांनी तिला पुढची अक्षरं गिरवण्यासाठी खोलीत बोलवले. तिकडे यमूची आई तापाने फणफणलीये आणि लेकीची आठवण काढत बसलेली दाखवलीये. यमूनेही बाळम्भटजींना आईला भेटायला घेऊन या अशी विनंती केलीये. आणि हो, तो तिचा छोटा दीर तिचा दु:स्वास करत बसतो, ते एक बोअर रोज पहावं लागतंच आहे.
बागेश्री, ह्या मालिकेचे सर्व
बागेश्री, ह्या मालिकेचे सर्व एपिसोड 'आपली मराठी ' वर आहेत.
धन्स साने, शुगोल अगं हो तो
धन्स साने, शुगोल
अगं हो तो दु:स्वास पण इनोसन्स राखत चालली आहे ती मजा
यमूनेही बाळम्भटजींना आईला भेटायला घेऊन या अशी विनंती केलीये>> अरे वा, मायलेकीची भेट दाखवणार आहेत तर
प्रिया. | 18 April, 2012 -
प्रिया. | 18 April, 2012 - 14:५३ :
~मुलींनी शिकावं म्हणुन लोकं आटापिटा करायचे आता इतक्या सहज आम्हाला शिकायला मिळतय तर आम्ही अभ्यास करायला हवा. ~
प्रिया अगदी तुम्ही मनातल बोललात माझ्या. मी सुधा रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी इत्यादी स्त्रियान बद्दल जेव्हा जेव्हा काही वाचते किवा त्यांच्या बद्दल काही पाहण्याची संधी मिळते तेव्हा माझ्या मनात सुधा सर्वप्रथम हाच विचार येतो.
आपण साऱ्या जणी खरेच भाग्यवान आहोत.........आज आपण ह्या नव्या पेढीचे प्रतिनिधित्व करतो आहोत कारण कुठेतरी ह्या स्त्रियांनी शंभर दोनशे वर्षांपूर्वी स्त्री शिक्षण आणि स्वातंत्र्य ह्याचे बी पेरले आणि आज आपण साऱ्याजणी मिळून त्या फळांचा आस्वाद घेत आहोत.
जुन्या परंपरा, संस्कृती....... त्यांचा त्या काळातील सामाजिक जीवनावर पडणारा चांगला वाईट प्रभाव हे सगळ पाहील वाचल की वाटत आपल्याला शिकता याव ह्या साठी या सगळ्या स्त्रियानी किती धाडसी पावल उचललीत मग आपण का बरे मागे राहावे.
ह्या प्रकारच्या जुन्या काळावर आधारीत टीवी मालिका पाहताना माझ्या मनात सुधा फक्त हेच विचार येत असतात.
प्रिया, अनन्या, तुमच्या
प्रिया, अनन्या, तुमच्या पोस्ट्स वाचून खुप छान वाटलं... प्रेरणादायी...
काळाशी न जमणार्या गोष्टींकडे
काळाशी न जमणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला ही सिरियल पहाविशी वाटते. आपलं लाडाकोडातलं लहानपण, लग्नानंतरची कौतुकं आठवली की या स्रियांबद्दल कसंसच वाटतं. त्यांनाही ते सगळे हक्क लग्गेच हवेत असं वाटतं. फक्त रमेच्या त्या धाकट्या दिराला दोन दणके द्यायला हवेत.;) तो मुलगाही अगदी बरोबर काम करतोय.
अनन्याताई,सानी मला भितीच
अनन्याताई,सानी
मला भितीच वाटतेय आता हिची आई मरतेय की काय
मला भितीच वाटतेय आता हिची आई
मला भितीच वाटतेय आता हिची आई मरतेय की काय >>> मला सुद्धा ....खूपच आजारी दाखविले आहे तिला
Pages