सहज
एकाच मातीतून उगवणार्या दोन अंकुरांच एकमेकांशी नातं काय? त्यांच्यात सुद्धा असतील का नाती.. भाऊ, बहीण अशासारखी. पण मग ते जितके आनंदी दिसतात तितकेच दिसले असते का?
खरंच वार्यावर स्वच्छंदपणे डोलणार्या शेताकडे पाहीलं तर असं वाटतं की त्यातलं प्रत्येक रोप आनंदात आहे. कशाबद्दल? कशाबद्दल असं काही नाही, ते आनंदात आहेच. ते 'आहे' या आनंदात.. वारा आहे या आनंदात.. किंवा नुसतंच 'आनंदात'..
एकाच मातीतून उगवलेल्या एका सुंदर फळा / फुला शेजारी एखादं जरा दर्जामधे त्याच्यापेक्षा कमी असलेलं फळ फुल आलं, म्हणून जे जास्त चांगलं आहे त्याला गर्व झाल्याचं किंवा जे कमी चांगलं आहे त्याला न्युनगंड वाटल्यासारखं असं कधी वाटतं का बघुन..... अं हं.. काय बरं कारण असेल?
तसं नसतं तर, एका रोपानं, दुसर्या रोपानं त्याच्या वाट्याचा जीवनरस चोरला असा आरोप केल्याचं ऐकायला मिळालं असतं कदाचित.
मला आपलं वाटतं की याचं रहस्य स्विकारात दडलंय. त्या प्रत्येकानं स्वतःच स्वतःच्या केलेल्या स्विकारात. आपली आपण मर्मस्थळं ओळखून आपलाच आपण स्विकार करणं हेच रहस्य असेल का या सगळ्यांच्या आनंदाचं? नाहीतर आत्ममग्न असेल कदाचित ते प्रत्येक रोप, फळ, फुल..
ए, किती गोड
ए, किती गोड लिहीलेस गं.. आवडले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलं
छान लिहिलं आहेस, मीनु...........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे
सुंदरच...
सुंदरच... छानच लिहिलं आहेस ग..
सहजसुंदर....
सहजसुंदर....आरपार..... आवडलं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.
धन्यवाद. बरेच दिवस मनात हा विचार येत होता म्हणून लिहीलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
तितकस सहज
तितकस सहज नाहीये हे
छानच लिहीलय
>>>त्या प्रत्येकानं स्वतःच स्वतःच्या केलेल्या स्विकारात
स्वत:च्या आणि दुसर्याच्याही स्विकारात.
खरतर प्रत्तेक वस्तुला, जिवाला स्वतंत्र अस्तित्व आहे स्वतंत्र गुणधर्म आहेत,
आपणच उगाच गुणवत्तेच्या फुटपट्या लावतो सगळ्याला. त्याही आपल्या दृष्टीकोनातून
हे सगळच सापेक्ष आहे. आपण शुंन्य कुठे मांडतो यावर अधीक आणि उण्याची स्थानं ठरतात.
सुधीर
सुंदर
सुंदर विचार्...छान लिहिलयं!
मीनू, लेखाच
मीनू,
लेखाची/ लेखांची सुरूवात आहे का ही? म्हणजे तसं वाटतंय.
असो..
>>तसं नसतं तर, एका रोपानं, दुसर्या रोपानं त्याच्या वाट्याचा जीवनरस चोरला असा आरोप केल्याचं ऐकायला मिळालं असतं कदाचित.<<
थोडसं अवांतर... रोपं नाहीतरी दोन झाडं किंवा वनस्पतींच्यात असलेल्या नात्यांचे जे ३ प्रकार आहेत त्यातला एक घातकी चोरी आहे बरंका. पॅरॅसाईट म्हणतात त्या चोरट्या वनस्पतीला. दुसरा एक चोर असा की जीवनसत्व चोरतो पण मूळ झाडाला अपाय करत नाही. सिम्बॉयन्ट म्हणतात या चोराला. ऑर्किडस हे एक उदाहरण याचं.
असो.. फारच गाडी भरकटली..-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
धन्यवाद
धन्यवाद सुधीर, स्वर, निधपदी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नीधपदी पुढे काही लिहीणार नाहीये गं .. हो तू म्हणतेस त्या जाती माहीती आहेत मला... मला आपलं शेताकडे पाहून हा विचार सुचलेला आहे.. बांडगूळ असतंच पण ते वेगळं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
ते नीधपदी
ते नीधपदी बंद कर आधी...
आणि कधीतरी पुढे लिहायला म्हणून ठेवून दे ना.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मीनू,
मीनू, सुरेख लिहिलं आहेस, अजुन थोडं मोठं चाललं असतं.
ते नीधपदी फक्त ठराविक बीबीवर म्हणायचं गं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>ते नीधपदी
>>ते नीधपदी फक्त ठराविक बीबीवर म्हणायचं गं...<<
ज्जेब्बात...
मंजुडी ने एकदम सही फर्माया..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
khup chan lihile Aahe
khup chan lihile Aahe
मीनू...च्च..
मीनू...च्च.. (एखादा अतीव सुरेख लागलेला स्वर ऐकला मी माझ्या तोंडून हेच निघून जातं
)
तुला सत-चित्-आनंद ह्यामधलं आनंदस्वरूप म्हणायचय का?... मला तरी तेच (वाचतेय) असं वाटलं.
सुरेखच.