Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< 'तुम्ही तुमच्या पान्ढर्या
<< 'तुम्ही तुमच्या पान्ढर्या झग्याच्या आत पॅन्ट घालता का? >>

१ नंबर
काल घडलेला किस्सा - ५
काल घडलेला किस्सा -
५ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस. त्याचे मित्र्-मैत्रिणी (त्यांच्या आई-बाबांबरोबर) जमलेत.
त्यातल्या एक काकू दूसरीला - " हो ना, आता नेहा (त्यांची मुलगी) ची आजी पण नाही, 'नेहा' ला शाळेत सोडायचा प्रश्ण्च येतो. . त्या असताना काही काळजी नव्ह्ती. आता शेवटी विजयकाकांची रिक्शा लावली. इतकी भरलेली असते ना रिक्शा, पाउल ठेवणे अशक्य .. ... .. "
हे माझ्या मावशीच्या सोसायटीमध्ये रहाणाय्रा मुलीने आईकले. ति तिच्या आजीला तेथूनच ओरडून म्हणाली - "आजी , तू मरू नको. विजयकाकांच्या रिक्शेत अता पाउल ठेवायला पण जागा नाहिये" . . .
सगळे हारलेच हे आईकून. . . .
माझा मुलगा (वेदांत) बदाम
माझा मुलगा (वेदांत) बदाम खात नाहि ( वय ८ )... कधि काय विसरला तर मि त्याला बोलते बदाम खात नाहि.ना म्हनुन विसरलास.....एकदा मि बोललि अरे मि आज बदाम भिजत घालायचि विसरलि . ब स्स .....मग का य माझे वा क्य मला..... बदाम खा बदाम खा ....मग विसरनार नाहिस...
माझी कन्यका स्नेहा,वय वर्ष २.
माझी कन्यका स्नेहा,वय वर्ष २. तिचा तसा हा पहिलाच विनोद. तिला तिच्या learning center मधे लहान आणि मोठा असे बहुतेक शिकवले. जसे big flower and baby flower असे. तिने मला घरी आल्यावर पुस्अकातील चित्र दाखवुन तिला तो concept कसा कळला हे देखिल सन्गितले. काल तिला छोट्या झारितुन पाणी पडण्या चा खेळ दाखवला तर म्हणाली, "Baby Shower"
आणि नेमक या weekend ला एका मैत्रिणी च्या Baby Shower ला गेलो होतो. जाताना तिला कुथे आणि कशासाठी चाललो आहोत ते ही सान्गितले होते. पण तिला कळले नव्हते इतकेसे. कदचित या प्रसन्गा नन्तर तिच्या डोक्य अत एक अद्रुश्य दिवा पेटला असेल. concept clear झाल्या चा. 
आता location: त्याच मैत्रिणीचा तोच baby shower, club house मधे होता. दुसर्या मैत्रिणीचा मुलगा ३ वर्षाचा, restroom मधुन येताना gym व शेजारी shower दिसला. त्यानी विचारले इथे काय आहे. तर मैत्रिणीने सन्गितले shower आहे म्हणुन. तर हा म्हणतो " हा, मावशी चा baby shower आहे"
हा माबोवरून घडलेला किस्सा..मी
हा माबोवरून घडलेला किस्सा..मी फ्रोजन भेंडीबद्दल विचारलं होतं त्याबद्दलचं उत्तर जरा मोठ्याने वाचून दा़खवत होते आणि त्यात असं होतं की मसाला घालून भेंडी परता आणि मुलाला भेंडी खूप आवडतात पण अजून तो ति़खट खात नाही..तो खेळता खेळता थांबुन लगेच म्हणाला," पण भेंडीमध्ये तिखट घालायचं नाही..सांग त्या लेसिपीला"
भन्नाट किस्से !!! माझ्या
भन्नाट किस्से !!!
माझ्या मुलीचा किस्सा. माझ्या आजे सासर्याचं नाव " गंभीरराय" होतं. ( माझा नवरा कर्नाटक चा आहे. घरी मराठीच बोलतो कारण साबा मराठी आहेत)
एकदा आम्ही अॅनीमल प्लॅनेट पहात होतो. माकडांची काही तरी फिल्म होती. माझा नवरा तिला काहीतरी समजावत होता. बोलता बोलता तो म्हणाला " माकड आपले पुर्वज होते. "
आमच्या मॅडम लगेच म्हणाल्या, " म्हणजे गंभीरराय माकड होते?" आणि अतिशय गंभीर पणे सासर्यांकडे पाहु लागली.
आमची हसुन हसुन पुरेवाट.
आमच्या नात्यातल्या एकां कडे जेवायला गेलो होतो. तेंव्हा तिने सगळ्यांसमोर " मला ती वाघाची पोळी वाढ !" असं म्हंटलं होत. त्या पोळ्या जरा करपल्या होत्या त्या मुळे त्या वर मोठे मोठे काळे ठीपके आले होते. त्या मुळे वाघाची पोळी !!!!
आयला मोकी मी काय लॉजिक आहे
आयला मोकी मी काय लॉजिक आहे लेकीच्म सहीच
मोकीमी
मोकीमी
चार एप्रिलला आम्ही आमच्या
चार एप्रिलला आम्ही आमच्या गावी केळशीला गेलो. आमच्या तिथल्या काळजीवाहू कर्मचार्याने (caretaker) काही गुरे पाळली आहेत त्यातली एक गाय आदल्या दिवशीच व्याली होती. तिचं पिल्लू बघायला आमची कन्यका (वय ४ वर्ष) आणि आमचे चिरंजीव (वय १.५ वर्ष) असे त्याच्या बरोबर गेले. पिल्लू दूध कसं पितं ते बघितल्यावर कन्यकेने येऊन तिच्या आजीला विचारलं, "ए आज्जी त्यांचं खाली असतं, आपलं वर असतं ना?"
धरणीमाता पोटात घेईल तर बरे असे वाटण्याचा याहून भीषण प्रसंग कोणता बरे असू शकेल?
मंदार डेन्जर किस्सा आहे...
मंदार
डेन्जर किस्सा आहे...
मंदार ... अतोनात हसते
मंदार ... अतोनात हसते आहे.... अशक्य आहे......
मंद्या पोरगी सॉलिड आहे तुझी
मंद्या पोरगी सॉलिड आहे तुझी
मंदार...... भयंकर आहे हा
मंदार......

भयंकर आहे हा किस्सा.......
<<धरणीमाता पोटात घेईल तर बरे असे वाटण्याचा याहून भीषण प्रसंग कोणता बरे असू शकेल? >>+100
मंदार................लक्षच
मंदार................लक्षच ठवायला लागत असेल कन्यकेवर! कुणावर गेलीये?(दिवे!!!)
माझी आई राजूकडुन (आमचा
माझी आई राजूकडुन (आमचा नेहमीचा फळवाला) फळे घेत होती. बरोबर माझी मुलगी इरा (त्या वेळेस ६-७ वर्षांची)
आई - राजू कालचे कलिंगड अजिबात चांगले नव्हते. अगदी बेचव.
इरा - अग आजी त्याला राजू दादा काय करणार? हे सगळ निसर्गच बनवतोना?
मंदार धरणीमाता पोटात घेईल तर
मंदार
धरणीमाता पोटात घेईल तर बरे असे वाटण्याचा याहून भीषण प्रसंग कोणता बरे असू शकेल? >>+१०००
मी आणि माझी शेजारीण योगा
मी आणि माझी शेजारीण योगा क्लास अटेंड करायला निघत होतो. तेव्हढ्यात तिचे पुत्ररत्न (वय वर्ष ३) आले आणि विचारु लागले, "मम्मी तुझा योगा क्लास कुठे आहे?" तिने त्याला लोकेशन सांगितले. त्यावर चिरंजीवांनी पुढचा प्रश्न विचारला, "सगळ्या फॅट गर्ल्स तिथे जातात का?" आम्ही दोघि अवाक...
माझ्या सासरी dining table
माझ्या सासरी dining table जवळ एक दार होते आणि तिथे नेहमी एक towel लावलेला असे. मुलीला ( वय २ वर्ष )जेवण झाल्यावर हात तिथे पुसण्याची सवय होती
बहिणीकडे गेलो असता hall मध्ये बहिणीचे mr सोसायटीच्या लोकाबरोबर चर्चा करीत होते . त्या लोकामध्ये एक व्यक्ती धोतर घालून आली होती . मुलीचे जेवण झाल्यावर तीला towel दिसला नाही ती hall गेली व त्या व्यक्तीच्या धोतराला व्यवस्थित हात व तोंड पुसले .५ वीत असताना मुलीला sanctuary प्रोजेक्ट आले होते. ती आणि तिच्या मैत्रिणी ते तयार करत होत्या. मी त्यांना मचाण सुध्धा दाखवा असे सांगत होते तितक्यात नवर्याचा फोन आला त्याने तिला विचारले काय प्रोजेक्ट आहे तिने सांगितले sanctuary चे आहे आणि स्मशान तयार करत आहे .न व रा उस मध्ये आणि आम्ही पुण्यात असे ४ ते ५ वर्ष चालू होते. नवर्याला वाटत होते आपली मुले फारच बाळबोध वाढतात आहे मी एकटीच असल्याने मुलांना घेऊन सगळीकडे फिरावे लागत असे. एकदा आम्ही मैत्रिणी सात च्या आत घरात बघायला गेलो चिरंजीव बरोबर होते (वय ७) आल्यावर नवर्याचा फोन आला त्याने मुलाला विचारले कसा होता सिनेमा तर हा म्हणतो बाबा फार sex होता.शेजारच्या मैत्रिणीची मुलगी याच्याच वयाची. तिची आजी म्हणाली आपण वाटिकेत जाऊ ( आमच्या तिथे एक वाटिका आहे आणि तिथे बरेच तरुण मुलगे आणि मुली असतात) तर तिने आजी ला सांगितले नको आजी तिथे फार sex असतो
सगळ्या फॅट गर्ल्स तिथे जातात
सगळ्या फॅट गर्ल्स तिथे जातात का
प्रचन्ड हसते आहे.
म्हणजे गंभीरराय माकड होते?
तुम्ही तुमच्या पान्ढर्या झग्याच्या आत पॅन्ट घालता का? >>> किती कुतुहल ते !!
'तुम्ही तुमच्या पान्ढर्या
'तुम्ही तुमच्या पान्ढर्या झग्याच्या आत पॅन्ट घालता का?>>

मंदार....
मंदार....
आज सकाळी पोरीसाठी (वय: ३
आज सकाळी पोरीसाठी (वय: ३ वर्शे ४ महीने) कपात दुध काढले आणी हॉर्लिक्स टाकायला विसरलो. पोरीच्या हातात कप देताच: "बाबा, ह्यात हॉर्लिक्स का नाही टाकाले?"
मी:"अरे, विसरलो वाटतं". पोरगी: "कारण तुम्ही चहा पीता ना, दुध पीत नाही. आजोबा (माझे सासरे) म्हणाले दुध प्यायल्यानी मी खुप हुशार होणार आहे. जे चहा पीतात ते बुद्धू होतात, म्हाइती आहे का?"
सासरे समोरच बसलेले होते, त्यांची दांडी गुल!
मला माझ्या लहान मावस बहिणीचा
मला माझ्या लहान मावस बहिणीचा एक किस्सा सान्गावासा वाटतो... आम्ही सगळे गणपतीपुळ्याला गेलो होतो तेव्हाची मजा... सन्ध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो आणि देव दर्शन झाल्यावर सगळे जण म्हणजे मी, आई, बाबा, माझा लहान भाऊ, मावशी, काका आणि माझी त्या वेळी ५वीत असलेली आणि दुसरीत असलेली बहिण असे सर्व समुद्रात खेळायला गेलो. एक दिड तास पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर भिजलेले कपडे बदलायला रूमकडे निघालो होतो, तेवढ्यात मावशीच्या लक्शात आले कि ती चुकून माझ्या दुसरीतल्या बहिणीचा पेटिकोट घरून आणायला विसरली आहे. ते नेमके मावशीने माझ्या आईला बहिणिसमोर सान्गितले. झाल, हीने ते ऐकुन जे भोकाड पसरल आणि रागारागाने मावशीला मोठ्याने रडत २-३ दा म्हणाली " तू बाबान्चे चड्डी आणि बनियन तेवढे आठवणीने आणलेस पण माझा पेटीकोट तेवढा विसरलीस".
येणारे जाणारे लोक ते ऐकुन इतके हसले की आम्ही आधी सर्व एकदम भाम्बावुन्च गेलो आणि नन्तर त्यान्च्या हास्यात सामिल झालो.... आता जेव्हा कधी आमच्या कुटुम्बियान्ची सहल निघते तेव्हा हा किस्सा आवर्जून आठवला जातो आणि ती बहीण असेल तर आमच्या थट्टेने तिचा जीव नकोसा होतो...:)
माझ्या लेकीचा आताचा किस्सा
माझ्या लेकीचा आताचा किस्सा (वय ३ वर्षे )

मला म्हणाली ,मम्मा मला तुझ्यासारखे केस हवेत मोठ्ठे.. मी आपले उत्तर दिले तु माझ्याएवढी मोठी झालीस की होतील मोठे केस
तर लगेच प्रतिप्रश्न आला
'मग आपले पप्पा अजुन मोठे नाही झाले का??'
mayuri
mayuri
मयु
मयु
माझा मुलगा -वेदांत- (वय ९
माझा मुलगा -वेदांत- (वय ९ वर्षे ) स ध्या T.V. व र् pregnancy test ची ADVT. येते ना ते व्हा विचार तो ते पानी कूढून येते ? आता का य सागू ??
मयुरी.
मयुरी.
माझ्या मैत्रिणिच्या मुलीचा
माझ्या मैत्रिणिच्या मुलीचा किस्सा...
तिने मुलिला (व व २)आई बाबा म्हणायला शिकवले होते. एकदा त्यान्च्या घरी कोणी तरि आले होते , त्यानि विचारले , "पप्पा कोटे आहे "... तिने समोरच्या घराकडे बोट दाखवले , कारण तेथे राहणारी (व व ४) मुलगी बाबाना "पप्पा" म्हणत असे. आणी पप्पा म्हणजे बाबा हे हिला माहित नव्हते.
माझ्या मैत्रिणिकडे मात्र त्या बाई बघायला लागल्या.
'मग आपले पप्पा अजुन मोठे नाही
'मग आपले पप्पा अजुन मोठे नाही झाले का?>>
Pages