मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही नवर्‍याच्या मित्राकडे गेलो होतो. त्याची १.५ वर्षाची मुलगी आणि माझी ४ वर्षाची दोघी खेळत होत्या. ती छोटी एक चित्रांचं पुस्तक घेऊन आली मग मी तिला विचारलं 'पेंग्विन कुठय दाखव बघू.... तर तिने माझ्या मुलीकडे बोट दाखवलं..... तर आमचं रत्न लगेच उद्गारलं ' आई मग मी तिला डुक्कर म्हणू?'

आम्हाला मेल्याहून मेल्यासारखं झालं... दोघंही ओरडलो तिला ... छोटीचे आईबाबा असूदे असूदे लहान आहे म्हणत राहिले. माझी मुलगी तेव्हा काही बोलली नाही पण घरी येऊन अस्सा काही आकांडतांडव केला की तुम्ही मला तिला डुक्कर नाही म्हणू दिले... खूप समजवले की तो कसा घाणेरडा प्राणी आहे, तुला कोणी असं म्हटलं तर कसं वाटेल इ. इ. मग पटलं बहुतेक.
मुलं खरंच कधी काय बोलतील काही नेम नाही.

तर आमचं रत्न लगेच उद्गारलं ' आई मग मी तिला डुक्कर म्हणू?'

तिला मायबोलीचा आय डी काढून द्या.. अगदी योग्य उमेदवार आहे. ! Happy

माझा मुलगा तान्हा असताना नवर्‍याचा कामानिमित्त बराच प्रवास असे.
जसा मुलगा मोठा व्हायला लागला तसं एकटीला सांभाळता येईनासा झाला.
फोनवर बोलताना माझ्या आईला मी सांगत होते की आता निदान दोनेक वर्षे तरी (मुलाचे) बाबा घरी (प्रवास नको या अर्थी) हवेत.
सहज लक्ष गेलं तर हा खिडकीतून हाक मारून त्याच्या मैत्रिणीच्या बाबांना बोलावत होता.
काय करतोयस? असं विचारताच मोठ्यानं म्हणाला की आपले बाबा आफिचला गेलेत, तिचे बाब आपल्या घरी हवेतच!
आपल्या कोणत्या बोलण्याचा अर्थ मुलं काय समजतील हे सांगता येत नाही.

तिला मायबोलीचा आय डी काढून द्या.. अगदी योग्य उमेदवार आहे. ! >>> अगदी अगदी गं अंजली. अगदी योग्य उमेदवार आहे.

माझी मुलगी तेन्व्हा ३ वर्षाची असेल. तिला आमच्या शेजारच्या ताई शी खिडकीत उभे राहुन बोलायची सवय होती. एकदा रात्री ती तशी गप्पा मारत होती. मी टोयलेट मधे होते. त्या ताई ने विचारले की,"तुझी आई काय करते आहे". आमच्या बाई साहेब खणखणीत आवजात म्हणाल्या "माझी आई शी करायला गेली आहे." नवर्‍याने हे ऐकुन तीला लगेच दामटले. जरा वेळाने मी बाहेर आले तेन्व्हा मला कळले. शेजारचे सगळे हसुन हसुन गार झाले. इकडे आम्ही कानकोन्डे झालो.

गम्मत दुसर्‍या दिवशी झाली. लिफ्ट मध्ये मला माझी ८व्या मजल्यावर रहाणारी मैत्रिण भेटली. तीने मला चिडवायला सुरवात केली. "आम्हाला माहिती आहे तु काल रात्रि १० वाजता काय करत होती ते." मला मेल्या हुन मेल्या सारखे झाले. याचा अर्थ सगळ्या बिल्डीन्गला कळले होते.

हा किस्सा सन्गु की नको ह्या विचारात होते....पण इकडे सगळे एकदम मजेशीर चलले आहे. म्हणुन लिहीला.

काही गोष्टी आपण (नीदान आम्ही तरी ) मोठयाने बोलताना किन्वा सान्गताना थोडा मुलाहीजा बळगतो. लहान मुलान्ना तो नसतो आणि त्यात काही गैर ही नाही. त्यान्च्या नकळत ती तो प्रसन्ग घडवायला कारणी भूत ठरतात.

लहानपणी सगळे खरच बोलतात. >>>>>
हो ना. तीच तर गम्मत आहे. त्या खरे बोलण्याने जे घोटाळे होतात त्यान्चाच तर हा बाफ आहे. वर नमुद केलेले खुपसे किस्से अशाच खरे बोलण्याने झालेले आहेत.

माझि मुलगि प्रश्न नाचे भदार जनु. एक् दा whisper चि add पाहुन माझ्या सासुला प्रश्ननाचा भ् दिमार केला. तेव्हा वेल म्आरुन नेन्यासाथि त्या म्ह्ननाल्या कि ते मोत्या मान साचे Huggies अहे.ते तिच्या mind मधे होत. मि अनि मझे hub तिला big bazar म्॑अधे घेउन गेलाओ. अनि तिने मला suprise mhanoon whisper annon dila.ani kay mhante mala mummy ha ge tiza huggiese. तेवा मला ध् रनि माता ने पोतात ghayve asech vatale.

आम्ही नव्हतो इतके आगाऊ लहानपणी. एकदा आईला विचारलं होतं "मी कुठून आलो" तेव्हा जो धपाटा बसला त्यानंतर तत्सम आणि संबंधीत प्रश्न विचारणं बंद झालं. डॉक्टरांकडे एकदा गेलो होतो तेव्हा ते मातोश्रींना म्हणाले "अहो त्यात काय, सांगायचं पोटातून आलास" (पुढचा प्रश्न "पोटात कुठून आलो" हा ओठांवर न येता पोटातच राहिला कारण तो धपाटा). असो.

हा घ्या खूप लाजवणारा किस्सा

माझ्या शेजारी असलेली महिला व तिची २ ते अडीच वर्षाची मूलगी सीमा आमच्याकडे गप्पा मारायला आलेली होती ,बरोबर आणखीही काही शेजारी होते तेवढ्यात सीमाने आपल्या आईकडे दूध पिण्यासाठी (स्तनावरचे) लगड सुरु केली. सर्वांसमोर तिला काहीस ओशाळवाण झाल्याने तिने दूध अजिबात मिळणार नाही असे सांगितले.
त्यावर ती मूलगी म्हणजे सीमा जाम चिडली आणि म्हणाली- पप्पाला कशी देतेस मलाच देत नाही.

यावर ती बिचारी महिला काही न बोलता गपचूप निघून गेली आणि आम्ही मनातल्या मनातच हसू लागलो,

किरण कुमार, इथे मुलांचे निरागस किस्से लिहीणे अपेक्षित आहे, ओपन फोरमवर लिहीताना तारतम्य वापरावे ही विनंती.
इथे याआधीही अश्या प्रकारचे किस्से आले होते. कृपया सर्वांनीच इथे लिहीताना विचार करावा ही विनंती. हा धागा निखळ मनोरंजन होईल या उद्देशाने काढला होता.

माझ्या भाची ला एकदा तिची आजी म्हणजे माझी आत्या भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगत होती.."आणि खांबातुन नरसिंह बाहेर आला"..तर हि कन्या म्हणे, "आजी जानकीचा नरसिंह का??"..तेंव्हा पासुन घरात कुंकू पहाण बन्द Happy

माझी भाची नुक्तिच शाळेत जाऊ लग्लि होती
तिला विचारले तुझे नव कय तर पट्कन सान्गितले
निकिता चिन्तामन .......
पुढचा प्रश्न
तुझ्य बाबाचे नव
जग्गनाथ .......

बाइनि नन्तर मझ्य बहिनाला विचारले हिने असे का उत्तर दिले तर तिने सन्गितले ति तिच्या मोठ्या काकाना बाबा
हाक मारते व वडिलाना अप्पा हाक मारते.

माझ्या मुलाचा किस्सा ४ वर्शाचा आहे.
त्याला एका कार्यक्रमात पोएम म्हणायला सांगीत्ली (तश्या त्याला १० - १२ पाठ आहे) तर हा म्हण्तो कसा ? पोएम पोएम पोएम पोएम पोएम पोएम पोएम

माझ मुलगा ४ वर्षा चा आहे.
मी माझ्या नवर्यला सोनु म्हणते, हे माझ्या सासरी फक्त माझ्या २ जावांना माहीत आहे . मी सासरी गेले की त्यांना अहो जाओ घालते .
आता मागच्या सुट्टीत आम्ही सगळे पुन्यला म्ह्नणजे सासरी गेलो होतो. सगळे पाहुणे सासु-सासरे,नंनदा त्यांचे मि. , अजुन काही नातेवाईक असे सगळे गप्पा मारत बसलो होतो. आणी माझ्या पुतन्याला पण घरी सोनु म्हणतात . मी त्याला म्हणाली सोनु जरा पाणी आण रे मला , त्याने बहुतेक एकल नसाव. माझा चिरंजीव जोरात ओरड्ला पप्पा मम्मा ला पाणी आणुन द्या ..सासु बाई म्हणाल्या अरे मम्मा सोनु दादा ला सांगतेय की पाणी आणुन दे म्हणुन .. त्यावर पठ्ठ्या म्हणाला की आ़ई सोनु म्हणजे पप्पा , सोनु दादा म्हटल कि दादा.... Lol Lol :

एका मित्राची पुतणी आमच्या घरी आली होती, तिला विचारलं, "काय गं बाबा कुठे आहे.?."
तिनं अजिबात न लाजता उत्तर दिलं, "बाबा घरी बसून सिगारेटी फुकतोय..!!" Lol
याप्रसंगामुळे लहान मुलांसमोर काहीही, करताना बोलताना भान राखायला हवे, हे मी नक्कीच शिकले..

परवा आमच्या रत्नाला (वय वर्षे अडीच) पेल्ग्रूप मधून आणण्यासाठी गेले होते. त्याच्या टीचरने त्याला माझ्या हाती सोपवताना विचारले की "आज ये स्कूल मे आने से पेहले टीव्ही देखके आया है क्या?"

साहेबांना दूधाचे वावडे आहे. पण "टीव्ही लावून दिलास तर दूध पिईन" या धमकीमुळे हल्ली हा नवीन प्रघात पडला आहे. साहेब एकिकडे टीव्ही वर छम्मकछल्लो, बॉडीगार्ड व तत्सम गाणी पाहत पाहत स्वतःचे मनोरंजन करतात (व मला सकाळच्या घाई-गडबडीच्या वेळी सुखाने कामे उरकण्यास वेळ प्रदान करतात) व दुसरीकडे पटापट (व गटागट) दूध संपवतात.

मी टीचरला "हो" म्हटले व घाबरतच विचारले की "क्यु? क्या हुआ?" तर टीचर म्हणते "आज पुरा टाईम स्कूल मे 'जलेबी बाई' गाना गा रहा था" Uhoh काल तर कहरच केलान्! परवाच्या या संभाषणानंतर टीव्ही चा प्रघात बंद करण्याचा निर्णय घेतला. काल अमलातही आणला. काल टीचरने सांगितले की शाळेत ह्या पठ्ठ्याने सांगितले की "रोज सकाळी माझी आई घरात 'जलेबी बाई' बघते."
Blush

माझ्या भाचीचा एक किस्सा माझ्या वहिनीला दोन मुली आहेत त्यातली ही पहिली. तर झालं असं की कोणीतरी वयस्कर बाई आमच्याकडे आल्या होत्या माझ्या वहिनीने त्यांना नमस्कार केला तर या सवयीने म्ह्णाल्या" आता मुलगा होऊ देत" त्यावर माझी ७ वर्षीय भाची म्हणाली " अहो पणजी बाई आता ते शक्य नाही ऑपरेशन झालंय तिचं" आणि तिने हे इतकं गंभीरपणे आणि मॅचुअरली म्हटल की आम्ही तिला काहिच बोलू शकलो नाहित.

जानकीचा नरसिंह>>
सोनू>>
बाबा घरी बसून सिगारेटी फुकतोय>>
जलेबी बाई>>
ऑपरेशन झालंय तिचं>>

अशक्य हसतोय Rofl

बायको आणि मुलगी मागच्याच आठवड्यात पुण्यातल्या एका दुकानात खरेदीला गेल्या होत्या. मुलीचं वय चार वर्ष.
दुकानदाराने सहज नाव विचारलं, मुलीने व्यवस्थित सांगितलं. परत खरेदीशी संबंधित काही बोलणं झाल्यावर दुकानदाराच्या लक्षात राहिलं नसावं म्हणून त्याने परत नाव विचारलं.
तर आमची कन्यका म्हणते "मघाशी सांगितलं ना?"

जानकीचा नरसिंह>>

पुढच वाक्य अस होत की तो संध्याकाळी खांबात नाही तर बेडरुम मध्ये असतो
Uhoh
तिने दरवेळी नरसिंहाला बेडरूममध्येच पाहिलं होतं वाटतं
च्यामारी आपण कधी हे असल काही नोटिस करत नाही

Pages