तुला पाहिले मी...
ग्रेसच्या ओळींवर लिहीले गेलेले अजून काही, त्यालाच अर्पण ...
........................
बाबांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन पार पडलं होतं. हॉस्पिटलमध्ये एक दिवस रहावं लागलं होतं. मी आणि बहीण दोघेही परदेशात होतो. त्यामुळे आईबाबांना ते दोन्ही बघावं लागलं होतं, याचा सल मनात होताच. अंतरांचे अवगुण अगदी प्रकर्षाने अंगावर आले. त्यातच बाबांनी हॉस्पिटलमधून घरी येताना चालत यायचा पराक्रम केला. कुठलाही रिक्षेवाला सोडायला तयार नव्हता म्हणून. मग तर तो सल अगदी चक्रवाढ पद्धतीने द.ता.द.से. वाढत होता.
अशातच एका संध्याकाळी कामावर जावे लागले होते. इथली संध्याकाळ म्हणजे करड्या रंगाच्या ढगातून पावसाची पीरपीर सुरू होती. ना धड जोरात पडत होता, ना धड थांबत होता. बाजूने गेलेला एखादा ट्रक त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी काचेवर उडवत होता. अशातच हलणार्या वायपर्समधून लाल रंगाचे पाणी ओघळले. एकाएकी मागचे पुढचे सगळेच ट्रॅफिक अगदी स्तब्ध झाले. माझ्यापुढे रस्त्याचे एक नागमोडी वळण होते. वळणाच्या एका टोकावरून पार अगदी पुढच्या वळणापर्यंतचे स्पष्ट दिसत होते. जणू गाड्यांच्या नदीला कुणीतरी बांध घातला होता. गाड्यांच्या अनेक खिडक्यांपैकी एका खिडकीत मी , एक हात सुकाणूचक्रावर तर एक हात कपाळाला लाऊन विचार करत बसलो होतो. सहज आकाशाकडे लक्ष गेले. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा हिरवा मुकूट आहे तशा आकारात काळे ढग आकाशात पसरले होते. मी विचार करत होतो ही कोण चेटकीण येते आहे आता, असे पिंजारलेले काळे केस घेऊन. उन्हाळ्यात ह्याच रस्त्यावरून जाताना, उबदार अशा पिवळ्या भगव्या रंगाच्या मावळत्या सूर्यप्रकाशात, निळ्या आभाळात पांढरे ओरखडे उमटवणारी विमाने आठवली. ही विमाने अलगद मला ग्रेसकडे घेऊन गेली
तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठिवरी मोकळे |
इथे दाट छायातूनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे ||
असा कसा हा माणूस ? असं कसं त्याला सगळं माहिती? असे कसे त्याचे शब्द पाठलाग करत असल्यासारखे ऐन वक्ताला येऊन टपकतात ? गळा दाटून आलेला हुंदका आणि डोळा तरळलेले पाणी कसे त्याला कळते?
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा.
तो बिल्वरांचा चुडा मात्र त्यादिवशी दिसला नाही. त्याआधीच बांध निघाला आणि पाणी मोकळं झालं.
सुरेख !!! हेही भिडलं अगदी !!
सुरेख !!! हेही भिडलं अगदी !!
नि:शब्द!
नि:शब्द!
सुरेख.
सुरेख.
असा कसा हा माणूस ? असं कसं
असा कसा हा माणूस ? असं कसं त्याला सगळं माहिती? असे कसे त्याचे शब्द पाठलाग करत असल्यासारखे ऐन वक्ताला येऊन टपकतात ? गळा दाटून आलेला हुंदका आणि डोळा तरळलेले पाणी कसे त्याला कळते?>>
फार सुंदर लिहिताय, आधीचेही इतकेच सुंदर होते
धन्यवाद
महाकवींच्या ओळींचा उत्कट अनुभव घेणे हे नशीबही आणि ते उतरवणे हे श्रेष्ठत्वही
(No subject)
सुरेख रे नंद्या. अगदी
सुरेख रे नंद्या. अगदी आतपर्यंत पोचलं
लिहित रहा रे. एकसलग नाही पण असे छोटे तुकडे तुकडे टाकले तरी खूप छान वाटतंय वाचायला...
मस्त लिहीलं आहेस रे.
मस्त लिहीलं आहेस रे.
खरंच नि:शब्द!!!! नंद्या
खरंच नि:शब्द!!!!
नंद्या __/\__
असा कसा हा माणूस ? असं कसं त्याला सगळं माहिती? असे कसे त्याचे शब्द पाठलाग करत असल्यासारखे ऐन वक्ताला येऊन टपकतात ? गळा दाटून आलेला हुंदका आणि डोळा तरळलेले पाणी कसे त्याला कळते?>>>>>>खुपच सुरेख.
काय सुरेख लिहितो आहेस!
काय सुरेख लिहितो आहेस!
मस्त! मस्त!! सुरेश वाडकरांनी
मस्त! मस्त!!
सुरेश वाडकरांनी 'अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा' या एकाच ओळीतले ओल, स्पंदन आणि आकांत हे सगळे शब्द अगदी चपखलपणे दाखवलेत.
व्वा... अगदी काळजाला भिडलं !!
व्वा... अगदी काळजाला भिडलं !!
जाम आवडलं खुप मस्त
जाम आवडलं
खुप मस्त
सुंदर लिहिलयस!
सुंदर लिहिलयस!
फार मस्त लिहिलयस नन्द्या.
फार मस्त लिहिलयस नन्द्या.
खुप छान लिहिलय!
खुप छान लिहिलय!
सुरेख
सुरेख
खूप छान.
खूप छान.
नंद्याभौ!!
नंद्याभौ!!
मस्त रे भाऊ ..
मस्त रे भाऊ ..
नंद्या.. सुरेख !
नंद्या.. सुरेख !
बेफी आणि वरदा +१
बेफी आणि वरदा +१
खुपच छान! सगळा प्रसंग अगदी
खुपच छान! सगळा प्रसंग अगदी डोळ्यापुढे उभा राहिला.
वा! (पूर्णपणे नाहीच कळलेलं ..
वा! (पूर्णपणे नाहीच कळलेलं .. :))
वा मालक..
वा मालक..
सुरेख लिहीलं आहेस. आवडलं.
सुरेख लिहीलं आहेस. आवडलं. लिहीत रहा.
आवडलं.
आवडलं.
सुंदर !
सुंदर !
फार सुंदर लिहीलं आहेस .
फार सुंदर लिहीलं आहेस .
सुंदर लिहिलं आहे! असा कसा हा
सुंदर लिहिलं आहे!
असा कसा हा माणूस ? असं कसं त्याला सगळं माहिती? असे कसे त्याचे शब्द पाठलाग करत असल्यासारखे ऐन वक्ताला येऊन टपकतात ?
>> नि:शब्द अनुमोदन!
ग्रेस साहेबांच्या शब्दांची
ग्रेस साहेबांच्या शब्दांची अनुभुतीच येते.
प्रत्येकच कविता कळावी लागत नाही...अशी भेटावी लागते, सुंदर लिहिलय.
Pages