निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे रात्री आकाशात आणखी मजा असते ती पक्ष्यांची. स्थलांतर करणारे अनेक पक्षी मोठ्या थव्याने जात असतात. त्यात अग्निपंखी पण असतात.
आणि विमानं. माझ्या घराजवळच दोन विमानतळ आहेत. त्यांचे दिवे.
फक्त नाहीत ते प्राजक्त, निशिगंध, मोगरा, मधुमालती आणि रातराणीचे गंध. हि झाडे आहेत इथे, पण इतक्या वर गंध येत नाही.

दिनेशदा, गंधाचा उल्लेख केलात म्हणुन सांगावस वाटलं, पाडव्याच्या लागुन आलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन नागपुरला जाऊन आलो (रेल्वेने). संपुर्ण प्रवासात जाताना येताना दोन्ही वेळा रात्रभर कडुनिंबाच्या मोहराच्या गंधाने सगळा प्रवास सुगंधीत केला. आहाहा....... आता आठवलं तरी मस्त वाटतयं.....

एक माझी समजूत आहे. ज्याच्या फांद्या जगतात तो गावठी गुलाब म्हणजे तो कसाही जगतो.<<<<<जागु मी पण आहे तुझ्याबरोबर.
मामी वावटळीचे फोटो मस्तच!
दिनेशदा खरच एखाद्या पुस्तकातला उतारा वाचतोय असेच वाटले.
स्निग्धा, कडुनिंबाच्या मोहराच्या गंध आणि दिनेशदा म्हणतात तसा शिरिषाचा गंध दोहोंशी माझे बालपण जोड्लेले आहे. माझ्या बालपणातल्या दोन्ही सूट्ट्या नगरला आजोळीच जायच्या. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या त्यानिमित्ताने.

आणि विमानं. माझ्या घराजवळच दोन विमानतळ आहेत. त्यांचे दिवे.

दिनेशदा,
आपल्यात वरील एक तरी साम्य आहे,मला खुप बरं वाटलं .मला इथलं विमाननगर जवळ आहे.

गंध इतका नाही आला ...पण गावाकडॅ आंब्याचा मोहोर खुप पहायला मिळाला,
Happy

अनिल, आपल्या गावाकडे साखर कारखान्याच्या परिसरात येणारा, आणि काजूच्या
मोहोराचा वास पण.
हे वास तर अगदी व्होल्वो बसमधे पण येतात !

थोडं विषयांतर ....पण एक सत्य किंवा शेतकर्‍यांच्या निसर्गातला हा असा एक विनोद ...
शेतकर्‍याला मिळालेला हळदीचा (एका क्विंटलचा बाजारपेठेतला) गेल्या वर्षीचा दर रु.१३०००- १९०००
शेतकर्‍याला मिळालेला हळदीचा (एका क्विंटलचा बाजारपेठेतला) या वर्षीचा दर रु.४०००- ६०००
...कारण मधल्या काळाल महागाई तर सगळ्यांसाठीच वाढली आहे
जगात अशी थटटा फक्त (भारतीय) शेतकर्‍यांचीच होत असावी ...द्राक्षे/बेदाणे च्या बाबतीत हिच अवस्था आहे, एका किलो निर्यातक्षम बेदाण्याचा दर फक्त ८० रु काढला जात आहे जो गेल्या वर्षी १५० रु होता.
निसर्गातुन मिळत असलेल्या या उत्पादनाला योग्य भाव न देता एक प्रकारे निसर्गाची देखील थट्टा केली जाते अस म्हणता येईल ...

मामी, वावटळीचे फोटो मस्त आलेत.
दिनेशदा, खरंच चांदण्या बघत पहुडणे हा अनुभवच आहे. आणि तुम्ही लिहिलेलं काव्यच वाटतंय!
मी सोलापूर जवळ सांगोला म्हणून गाव आहे तिथे एका मैत्रिणीकडे ३/४ दिवस रहायला गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांची आमराई होती; सगळे रायवळ आंबे! काय चव होती त्यांची! तिकडे हापूस नाहीच मिळायचा. आणि तिच्या माळवदी गच्चीत आम्ही झोपायचो. वर चांदण्यांचा खच पडलेला... शब्दांत सांगताच येणार नाही असा नजारा बघितला होता.

१०००

मस्त फुले..

मामी, रविवारी सकाळी लौकर जायचा बेत आहे. बाग उघडायच्या आत गेटवर हजर...

अणुशक्तीनगरच्या बस डेपोत ऐशुला हे गुलाबी ट्यबेबुया भेटले. काल ती मुद्दाम डेपोत उतरली, फोटोसाठी Happy

शकुन, छान फूल.
याचे पुर्ण चित्रण सर अटेंबरो नी केलेले आहे. त्यांच्या नजरेतून कुठले अदभूत सुटले
असेल का, तेच शोधावे लागेल.

शकुन्..जावाच्या जंगलात राफ्लेशिया पाहिलं तेंव्हा ते एखाद्या परिराज्यातून थेट इकडे आलेलं वाटलं..
Happy अदभुत फूल आहे..

मला स्वतःला जीवशास्त्राचा विद्यार्थी म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो. याच्यामागं माझं असं एक तत्वज्ञान आहे. लोक
जीवशास्त्राचा अभ्यास निरनिराळ्या कारणांसाठी करत असतील. कुणी आवड म्हणून, कुणी अहमहमिकेनं नवं संशोधन करण्याच्या इराद्यानं, कुणी पोटासाठी तर इतर अनेक जण दुसरं काही करता आलं नाही म्हणून. या सगळ्या गोष्टी कदाचित मलाही लागू असतील, पण यांच्यासकट आणि यांच्या पलिकडे मी माझ्या अभ्यासाला स्वतःला समजून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून पहातो. प्राणी आणि वनस्पतींचा अभ्यास करायचा तो माणसाला समजून घेण्यासाठी. माणूस एक प्राणी म्हणून जन्माला आला, प्राणी म्हणून उत्क्रांत झाला. त्यामुळे प्राणी समजल्याखेरीज माणूस समजणं आणि कदाचित माणूस समजल्याखेरीज प्राणी समजणं मला अशक्य वाटतं. माणसाचा अथवा प्राण्यांचा अभ्यास करणारे अनेक जण ही चूक करतात. माझ्या निसर्गनिरीक्षणाच्या छंदाच्या सुरुवातीला मी माणसाकडे थोडं तुच्छतापूर्वक दुर्लक्ष करत आलो. पण मग हळुहळू प्राण्यांच्या वागणुकीत मला माणूस दिसू लागला आणि मग माणसातला प्राणी शोधण्यासाठी मी माणसांवरही नजर टाकू लागलो, विशेषतः लहान मुलांवर.

- आरण्यक - डॉ. मिलिंद वाटवे.

ही तबेबुयाची फुलं गळताना, देठाचा भाग खाली आणि गोलगोल भिरभिरत; जणू काही भिंगरीच फिरतीये असा भास व्हावा, अशी पडतात. ऐशूला म्हणावं फोटो सुंदर आलाय. त्या झाडावर हिमवर्षाव झाल्यासारखं वाटतंय.

याचे पुर्ण चित्रण सर अटेंबरो नी केलेले आहे. त्यांच्या नजरेतून कुठले अदभूत सुटले
असेल का, तेच शोधावे लागेल.>>>>>> अगदी अगदी!!

मी हे एका वॉच टॉवरवर बसून लिहितोय. सबंध दिवसात दहा वीस प्राणी पाण्यावर येतात. एरवी काही काम नसतं म्हणून लिहिता वाचता येतं. सागाची पानं गळली आहेत. त्यामुळे खार चालली तरी मोठा आवाज होतो. तरीसुद्धा लिहिता लिहिता दर दोन मिनिटांनी मी वर पहातो. चाहूल घेतो. काही नसेल तर पुन्हा लिहायला लागतो. असंच मी सहज वर पाहिलं.

......... दुपार कलली आहे आणि हिरव्या पाण्यावर काळ्या सावल्या आणि पिवळं उन नाचत आहे. वारा स्तब्ध आहे, कुठेही आवाज नाही आणि पाण्यावर झुकलेल्या फांदीच्या सावलीत एक पिवळंजर्द जनावर उभं आहे. धुक्याच्या पदरासारखा आवाज न करता पाण्यावर आलेला वाघ. पुढच्या क्षणी तो पाण्यात शिरतो. काही सेकंदात नदी पार करुन जातो. दुसर्‍या बाजूच्या बांबूच्या जाळीत. अगदी योगायोगानं मी त्याच वेळी मान वर केली नसती तर.........

...... असे क्षण कॅमेर्‍यात मावत नाहीत. हिमालयाचे फोटो फार सुंदर काढले असले तरी मला ते पाहवत नाहीत. कारण हिमालय मी पाहिला आहे. तो या चौकटीत कोंबता येत नाही हे मला माहित आहे. छायाचित्रापेक्षा असे क्षण मनात जपणं हे अधिक चांगलं साधन आहे. पण आठवणीही कालांतरानं बुजतात. मनातलं चित्र अंधुक होत जातं. क्षण अमर करण्याचं आठवणीपेक्षा चांगलं काही साधन असेल ?

.... अनेकदा मी जंगलात दिवसभर बसून असतो. दिवसभरात एकही प्राणी दिसत नाही. वेळ जातो तसतसे जंगलाचे रंग बदलत जातात. दिवस संपतो तेव्हा काही वेळ गेलाय असं वाटतंच नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळचे रंग एकमेकात कालवलेले असतात. काळ थांबलेला असतो. सगळं जंगल पारदर्शक झालेलं असतं.

......टाईम आणि स्पेस यांच्या पलिकडचं हे जंगल वाटतं. उपनिषदांचे -'यस्मिंस्तु पच्यते कालः'...... ते हेच तर नसेल...

.... हा क्षण ! काळ गिळलेला हा क्षण मला पकडायचा आहे. ज्या क्षणी ही कला साधेल त्या क्षणी माझ्या हातून कॅमेरा गळून पडलेला असेल...कायमचा.......

- आरण्यक - डॉ. मिलिंद वाटवे.

मित्र-मैत्रिणींनो, माझ्या घरातले सगळ्या कुंड्यांमधले गुलाब व इतर झाडे वाळुन चालली आहेत किंबहुना खुपच खुरटी झाली आहेत. घरच्याघरी काही उपाय आहे काय? उन्हाळ्यातली पानझड ठीक आहे पण अगदीच मलुल वाटताहेत.
घरच्या घरी खत किंवा बाहेरुन आणुन एखादे खत सुचवाल का कुणी?

शुभांगी कुलकर्णी - कुंडीतील माती उकरुन प्रत्येक कुंडीत एक मूठ शेणखत व एक मूठ स्टेरामिल (खत) टाकावे, पाणी - फार ओलीगच्च कुंडी नको व फार कोरडी नको असे घालावे.

शशांक, छान उतारा.
पुस्तक वाचायलाच पाहिजे.
खरेच असे क्षण विरत जातात. दुसर्‍याला वर्णन करुन सांगणे प्रत्येकवेळी जमतेच असे नाही.

जागू,
मुहुर्त टळला कि गं...

व्वा!! शशांकजी मस्तं उतारे आहेत दोन्ही....

गुलाबी ट्यबेबुया... ते बालगंधर्वपाशी आहे ते हेच झाड आहे का....? मला ज्जाम आवडत ते फुलांचं भिरभिरत खाली पडणं..... Happy

रच्याकने.... आम्च्या मोगर्‍याला १०-१२ कळ्या आल्या आज... फायनली.... फोटो टाकायचा प्रयत्न करणार आहे मी या वेळी....

Pages