निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी मस्त फोटो. मुंबईत दुर्मिळ आहे. वावटळीला मोकळी जागा मिळाली तर
ती जास्त फैलावते.
जिप्स्या, वावटळ नावाचा जूना मराठी चित्रपट होता. "दादला नको गं बाई, मला
नवरा नको गं बाई" हे भारुड त्या चित्रपटातलं.

मामी वावटळीचे फोटो मस्त Happy अमेरिकेत त्यांचे केवढे कौतुक (?) होते अर्थात त्या असतात पण खूप ताकदीच्या.

जागू दुसरा गुलाब गावठी वाटतोय. फ्लोरीबंडा आणि गावठी दोन्ही प्रकारांना सुगंध असतो. पण फ्लोरीबंडा जरा जास्तच फुलतो गावठी प्रकारापेक्षा. आणि हो, तो पण नुसत्या फांदीने जगतो. पण त्याचे खोड आणि फांद्या नाजूक असतात.

मुंबईत गावठी गुलाब कुठे विकत मिळतात का?

आजोळी याच रंगाचे पण जास्त पाकळ्या
असलेले एक गुलाब असतो त्याला गावठी गुलाब म्हणतात. त्याचा सुगंध बर्‍याच
लाबवर जातो.>>>>>>>>>>>>दिनेशदा, हा का तो गुलाब? Happy
DSCN0039.jpgDSCN0041.jpg

माधव, कुणाकडे झाड असेल तरच. वसईचे म्हणून एक गुलाब फुलबाजारात मिळतील,
पण त्यांना तो सुगंध नसतो.
सुक्या मेव्याच्या दुकानात, गुलाबकळी म्हणून एक प्रकार मिळतो. त्या गुलाबांच्या
सुकवलेल्या कळ्या असतात. (बहुतेक उत्तरेकडून येतात.) त्यांना मात्र छान सुगंध येतो. मिठाईमधे वापरतात त्या.

शोभा,
आपल्याकडे यापेक्षा थोडा फिका रंग असतो. पण याला जर तो सुगंध असेल, तर
त्याचा गुलकंद करता येईल. या रंगाचा एक चिनी वाण मी बघितलाय. खुप सुगंध
असतो त्याला.

शोभा,
आपल्याकडे यापेक्षा थोडा फिका रंग असतो. पण याला जर तो सुगंध असेल, तर
त्याचा गुलकंद करता येईल. या रंगाचा एक चिनी वाण मी बघितलाय. खुप सुगंध
असतो त्याला.>>>>>>>दिनेशदा, तो गुलाब कोकणात आमच्या शाळेत होता. सगळ्य़ा मुलींच लक्ष असायच त्याच्यावर. खूप वेळा तो मलाच मिळायचा. (वडील त्याच शाळेत शिक्षक असल्यामुळे, मी शाळा बंद होईपर्यंत, शाळेतच असायची. मग शनीवारी मला ते फ़ुल मिळायच. ) Happy

माझा हा गुलकंद करण्याचा प्रयोग सध्या सुरु आहे. मागच्या माहिन्यापासुन गुलाब जोरात फुलतो आहे. म्हणुन प्रयोग करुन पहावासा वाटला. भांड्यात आता अंदाजे २०-२५ चमचे गुलकंद तयार झाला आहे. खाली खाली खुप पाकट दिसतोय आणि वरवरच्या पाकळ्या अजुन मुरल्या नाहीत.

कधी कधी काही खुळी स्वप्न बाळगून असतो आपण.
मौसम मधले, दिल ढूँढता है फिर वही... मधल्या ओळी प्रत्यक्षात अनुभवाव्या असे
मला फार वाटायचे.
उघड्यावर चांदण्यात झोपायचे.. या गर्मीयोंकी रात जो .. मी सध्या अनुभवतोय.
इतक्या वर्षात कधी उघडे आंगण नसायचे तर कधी सुरक्षितता !
सध्या आमच्याकडे पावसाळा लांबल्याने मी गच्चीतच झोपतोय. रात्री खुप बोचरा वारा
सुटतो, तरीही नेटाने झोपतोच. चांदण्या बघता बघता काहीबाही आठवत राहतो.

मग अशीच एक रात्र आठवते. ओमानमधल्या सूर गावातली. रात्री कासवांचा अंडी घालण्याचा कार्यक्रम बघून आल्यावर तिथेच वाळवंटात पथार्‍या पसरून आम्ही झोपलो.
मधेच मला जाग आली तर दूरवर दोन आकृत्या दिसल्या. काही वेळाने लक्षात आले ते
भटके ऊंट आहेत. त्यांना निरखत राहिलो, तर काही वेळाने दोन हिरवे चकाकते दिवे
दिसले. आधी कळलेच नाही, मग लक्षात आले ते कोल्हे आहेत. तशाच आणखी काही
दिव्यांच्या जोड्या दिसल्या. आम्ही तिथे तंदुरी चिकन केली होती. त्यातली हाडे
एका पिशवीत भरुन ठेवली होती. त्या वासाने आले असावेत. किंवा कासवाची पिल्ले
बाहेर यायची वेळ झाली होती म्हणून आले असतील.
जवळच्या समुद्रांच्या लाटांचा मंद आवाज. आणि चांदण्यात प्रकाशमान झालेले
ते वाळवंट. दूरवर पसरलेले. लांबवर टेकड्या, एखादा चुकार दिवा. मंद वारा. खुडून
घ्याव्यात इतक्या चांदण्या.
खोटे कशाला सांगू, कुणाला न सांगता, क्षितीजापर्यंत चालत जावेसे वाटले.
वाट नव्हतीच, असणारही नव्हती..
राह बनी खुद मंझिल....

मी अबोली वर लेख लिहत आहे. माझ्या मनात तिच्या नावाबद्दल गोंधळ चालू आहे. प्लिज मला अबोली की आबोली ते सांगा.

खुपच सुरेख लिहिलयत दिनेशदा. गच्चीत झोपण्याचा आनंद लहानपणी पुरेपूर अनुभवलाय. उन्हाळ्यात रात्री चांदण्या बघत मोकळ्या जागी झोपण्यासारखे सुख नाही. नंतर कधीतरी अचानक रात्री पाऊस सुरू झाल्यावर झालेली धावाधावही आठवते.

इतकंच नाही. तर १९७१-७२ सालच्या भारत पाकिस्तान युध्दाच्या वेळी रात्री मुंबई आणि परीसरात ब्लॅकआऊट डिक्लेअर केला जायचा. त्यावेळी घरच्या गच्चीवर आई-बाबांच्या मांडीवर बसून आकाशात गस्त घालणारी आपली विमानं बघितलेली अजून आठवताहेत.

मामी..वावटळीचा फोटो मस्त आलाय...
पाण्याला मुंग्या..पहिल्यांदाच ऐकलं ..
सुरेख उतारा वाचतोयसं वाटलं.. यस्..जागु +१०० Happy

जवळच्या समुद्रांच्या लाटांचा मंद आवाज. आणि चांदण्यात प्रकाशमान झालेले ते वाळवंट. दूरवर पसरलेले. लांबवर टेकड्या, एखादा चुकार दिवा. मंद वारा. खुडून घ्याव्यात इतक्या चांदण्या. खोटे कशाला सांगू, कुणाला न सांगता, क्षितीजापर्यंत चालत जावेसे वाटले. वाट नव्हतीच, असणारही नव्हती.. >>>>> वा दिनेशदा, काय सुंदर वर्णन केलेत....

कायम शहरात रहाणार्‍यांनी शहराबाहेर अगदी दूर (शक्य झाल्यास समुद्र किनारी) जाऊन जिथे सिटी लाईट्स नसतील अशा ठिकाणी अमावस्येच्या आसपास जरुर आकाश पहायला जावे - इतका चांदण्यांचा खच पडलेला असतो की काय सांगावे - अनुभवाचीच गोष्ट आहे ही.....

मागे १९९३ साली आम्ही मित्रमंडळींनी मुरुड -जंजिरा ट्रीप केली होती - गुढीपाडव्याच्या आसपास.... - रात्री १२-१च्या सुमारास पश्चिम - दक्षिण क्षितीजावर एक इतके अप्रतिम नक्षत्र झळकताना पाहिले मुरुड बीचवर.... की कित्येक मिनिटे कोणी काही बोलूही शकलो नाही...... - मग पुण्यात आल्यावर कळले की ती वृश्चिक रास होती.
सध्या पहाटे ४-५च्या सुमारास पुण्यातूनही (संपूर्ण भारतातूनच) ही रास चमकताना दिसेल - दक्षिण दिशेला - विंचवाच्या नांगीसारखे दिसणारा हा अतिशय सुंदर असा नक्षत्र समूह जरुर पहाणे.

तसेच सध्या सायंकाळी मृगशीर्षही (व्याध) छान दिसते.

हो शशांक, फार सुंदर दिसते ती. आणि आकार ओळखू येईल अशी ती एकच रास
आहे बहुदा.
त्यातल्या शेपटातला जो मधला तारा आहे, तो आपल्यापासूनचा सर्वात जवळचा
तारा, असे वाचले होते.

आम्ही बरेचदा उन्हाळ्यात तर जास्तच ह्या चांदण्या रात्रींचा आस्वाद घेतो. झोपण्यापुर्वी आम्ही आम्ही श्रावणी, मी आणि तिचे बाबा तिघेही टेरेसवर चटई घेउन बसतो. चांदण्यांच्या रुपड्याला सजवण्यासाठी आंब्याची झाडेही हातभार लावत असतात.

माझ्याकडे एक खूप जुने असे - "हा तारा कोणता" या नावाचे पुस्तक आहे (लेखक बहुधा परांजपे किंवा गोखले) - या पुस्तकात कोणत्या तारखेला किती वाजता (भारतातून) संपूर्ण आकाश (रात्रीचे) कसे दिसेल याची सचित्र माहिती इतकी सुंदर दिली आहे की या पुस्तकामुळे याविषयाची (खगोलशास्त्र) काहीही माहिती नसलेल्या व्यक्तिलाही त्यात रुचि उत्पन्न होईल व सहाजिकच रात्री एक नजर तरी आकाशाकडे टाकाविशी वाटेल........

सध्या या इंटरनेटच्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात भर दुपारीही 'टॅब' डोक्यावर धरुन आकाशस्थ सर्व तारे / ग्रह पहायला मिळाल्यावर मला अगदी लहान मुलासारखा आनंद झाला........ पण "हा तारा कोणता" या पुस्तकाची ओढ अजून तशीच आहे.........

त्यातही रात्री जे डोळ्यांनी प्रत्यक्ष आकाश दिसते त्याला तर तोडच नाही - तो केवळ अनुभवच....... अनुभवी तो या बोला सुखावेल गा.......

खगोलशास्त्राची जरा (जुजबी) तोंडओळख झाली की - सप्तर्षि, ब्रह्महृदय, वृषभ / मिथुन रास, व्याध, कृत्तिकेचा तारकापुंज, मघा (विळ्या सारखा आकार), चित्रा-स्वाती, शर्मिष्ठा, वृश्चिक रास वगैरे सहज ओळखता येतात ........ रात्री वा पहाटे थोडा - तास -अर्धा तास वेळ काढला तर या सर्व नक्षत्र दर्शनाने मनावरचे मळभ (दिवसभरातले वा रात्रीचे) नक्कीच दूर होईल.........

Pages