निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी खूप दिवसांनी इथे आलोय.. Happy म्हणजे कामावर आलो म्हणून आता इथेपण.

जे वाचायचे राहिले होते तिथपासून वाचून इथवर आलो.. भरपूर वेळ लागला.. Happy कसे आहेत सर्व?

ही राणीबाग एकदा बघायचीच आहे!!

>>> नक्की बघा.. पण बुधवारी येऊ नका. बंद असते.. Happy बाकी कुठलाही मधला वार पकडून या म्हणजे निवान्त्पाना मिळेल. नाहीतर नुसती गर्दी असते विकांताला. Happy

नक्की बघा.. पण बुधवारी येऊ नका. बंद असते.. स्मित बाकी कुठलाही मधला वार पकडून या म्हणजे निवान्त्पाना मिळेल. नाहीतर नुसती गर्दी असते विकांताला.>>>>अगदी अगदी. रोहनला अनुच्मोदन Happy
तुम्ही सगळे नक्कीच या. हवा तसा पाहुणचार करू Happy पण नक्की या.

राणीच्या बागेत जायला हाच वसंत ऋतू चांगला.
--
यावर्षी आमच्याकडचा पावसाळा फार लांबला ते लिहिलेच आहे. मानवाला अत्याधुनिक
साधने वापरुनही पावसाचा अचूक अंदाज करणे अजून जमलेले नाही. पण निसर्गात
काही जीवांना ते जमते.
चिमण्या धुळीत खेळू लागल्या, चतूरांची लगबग वाढली कि पावसाळा जवळ आला
असे समजायचे. मुंग्यांची पण खुप लगबग असते या दिवसात.
पावसात त्यांची वारुळे कितपत टिकतात माहित नाही, पण पावसाळ्याची बेगमी मात्र
करुन ठेवतात त्या.
काल माझ्याघरी तर एका कपात राहिलेल्या पाण्याला पण मुंग्या आलेल्या बघितल्या.
एरवी इथे घरात तेही सहाव्या मजल्यावर मुंग्या दिसत नाहीत.
इथल्या जंगलात मात्र, सफारी अँट्स नावाच्या मोठ्या मुंग्या असतात. त्यांचा चावा
चांगलाच कडकडीत असतो.
मला एकदा प्रबळगडावर पण पाण्याला मुंग्या आलेल्या दिसल्या. तिथे आधीच पाणी
कमी आहे. रात्री झोपताना आम्हाला तिथल्या वाडीतल्या लोकांनी, हंडा भरुन पाणी
दिले त्यालाच मुंग्या आल्या होत्या. त्यावेळी आम्ही वैतागलो होतो, मग विचार केला
पाण्याची गरज तर प्रत्येक जीवाला असते. अगदी फार कमी जीवांना वेगळे पाणी
प्यायची गरज वाटत नाही. कारण ते त्यांना अन्नातूनच मिळते

पावसाच्या बाबतीतले चितमपल्ली यांनी केलेले मगरीचे (बरोबर २१ व्या दिवशी पाऊसच नव्हे तर पूर) आणि एका माश्याबद्दलचे (पोटात नक्षत्रांचे २७ कप्पे) उल्लेख, आठवले.

दिनेशदा -
अगदी फार कमी जीवांना वेगळे पाणी प्यायची गरज वाटत नाही. कारण ते त्यांना अन्नातूनच मिळते >>> मला वाटतं पाली, सरडे आहेत या गटात. अजून कोण कोण आहेत असे ?

मी हल्लीच एक हॉर्स अ‍ॅरम नावाच्या फुलाची क्लीप बघितली. समुद्रालगतच्या बेटांवर
हे फुल जमिनीलगत उमलते. त्याचा रंग किरमीजी असतो आणि गंध सडलेल्या
मांसासारखा. (म्हणून हे नाव) या फुलाकडे, मांसावर गुजराण करणार्‍या माशा आकर्षित होतात. आणि परागीवहन करतात.
या माश्यांना पकडायला काही पालीपण फुलांवर येतात. त्याही थोडेफार परागीवहन
करतात. पण खरी मजा पुढेच आहे.
परागीभवन झाले कि यात काही बिया तयार होतात त्यावर मांसल आवरण असते (ते
मात्र पिवळ्या, केशरी रंगाचे) पाली हि फळे पण खायला शिकल्यात. (ते त्यांचे मूळ
खाद्य नाही.) फळे खाल्ली तरी बिया मात्र त्यांच्या विष्ठेतून तशाच बाहेर पडतात.
अशा बिया सुलभतेने रुजतात.
पालींच्या या बदलत्या सवयीमूळे, आधी दुर्मिळ असणारे हे फुल आता चांगलेच फैलावले आहे.
मला नेहमीचा प्रश्न, झाडाने हा "विचार" केला असेल का, कि पालींना आवडेल आणि
खाता येईल असे फळ कसे निर्माण करायचे ? आणि कुठल्या पालीने, ते फळ
चाखण्याचे धाडस पहिल्यांदा केले असेल ?

दिनेशदा, छान माहितीपुर्ण पोस्टी...

मला नेहमीचा प्रश्न, झाडाने हा "विचार" केला असेल का, कि पालींना आवडेल आणि
खाता येईल असे फळ कसे निर्माण करायचे ? आणि कुठल्या पालीने, ते फळ
चाखण्याचे धाडस पहिल्यांदा केले असेल ?>>>>>>>>>>> यावरुन आठवलं, असाच काहीसा एक विचार एका लेक्चरमधुन आमच्या समोर मांडला गेला होता.. पण तेव्हा "झाडाने हा "विचार" केला असेल का, कि पालींना आवडेल आणि खाता येईल असे फळ कसे निर्माण करायचे" या प्रकारच्या बाजुला जवळपास सगळ्या सांयटिस्ट लोकांनी विरोध केला होता.. नेमके आर्ग्युमेन्ट्स आणि केस स्टडी आठवत नाहिये.. पण कदाचीत वाटवे सरांचं लेक्चर असावं, इवोल्युशन च्या संदर्भात... परंतु जे सांयटिस्ट काम करताना थोडाफार तरी फिलॉसॉफिकल विचार करायचे त्यांना हा विचार अ‍ॅक्सेप्ट करायला अजिबात त्रास झाला नाही... अवांतराकरता क्षमस्व

हो चिमुरी. इथे पण माझ्या एका लेखावर अशा प्रतिक्रिया आल्या होत्या.
आपल्या दृष्टीने विचार हि एक मेंदूने करायची प्रक्रिया असते. मग झाडाला
मेंदू कुठे असतो ? पण बदल केवळ अपघातानेच घडतात, त्यातले जे उपयोगी असतात
ते टिकतात व पुढच्या पिढीत उतरतात, असे मत मांडले गेले. मला ते पटत नाही.

बुंधा तसाच आहे पण पणे वेगळी वाटत आहेत... Happy ठाण्यात गडकरी समोर आणि कापुरबावडी पोलीस स्टेशन समोर अशी २ मोठी गोरख चिंचेची झाडे आहेत..

सुप्रभात.

सध्या आमच्या गावठी गुलाब जोरात बहरलाय.

त्या झिनियाला आमच्याकडे गाजरा म्हणतात. पावसाळा सुरु झाला की ह्याचे बी आमच्याकडे पेरतात मग रोपे उगवली की वाफ्यांमध्ये लावली जातात. नंतर नवरात्रीच्या वेळेला ही फुले फुलतात.

स_सा, मला शंका आहे. पाने वेगळी वाटताहेत.>>> नक्कीच वेगळे झाड असावे - गोरखचिंच नाहीये.....
जागू - या गावठी गुलाबाला खूप छान - गोड वास येत असेल ना ?

जागू, याला तूम्ही गावठी गुलाब म्हणता ? आजोळी याच रंगाचे पण जास्त पाकळ्या
असलेले एक गुलाब असतो त्याला गावठी गुलाब म्हणतात. त्याचा सुगंध बर्‍याच
लाबवर जातो.
आपल्या रिमाच्या गावी असेच सुगंधावरुन आम्ही ते झाड शोधून काढले होते.
गुलकंद त्याचाच करतात.

जागू मला तो फ्लोरिबंडा जातीचा गुलाब वाटतोय. रंग गावठी गुलाबाचा आहे पण दिनेशनी म्हटल्या प्रमाणे गावठी गुलाबाला भरगच्च पाकळ्या असतात. त्याची पानेही जरा गोलाकार असतात. काटे दणकट असतात लागला तर मस्तकात कळ जाते. फुलाच्या देठावरही काटेरी लव असते (ही मात्र बोचरी नसते).

एक माझी समजूत आहे. ज्याच्या फांद्या जगतात तो गावठी गुलाब म्हणजे तो कसाही जगतो. Lol

वेगळा असेल पण ह्याला काही प्रमाणात कलमी फुलांपेक्षा सुगंध जास्त येतो.

एक माझी समजूत आहे. ज्याच्या फांद्या जगतात तो गावठी गुलाब म्हणजे तो कसाही जगतो. हाहा

वेगळा असेल पण ह्याला काही प्रमाणात कलमी फुलांपेक्षा सुगंध जास्त येतो. >>> येस जागू, मलाही अगदी असेच वाटते, आणि सुगंध म्हणशील तर माझ्यामते Happy फक्त या गुलाबालाच असतो......

जागू, जर फांद्या जगत असतील तर त्यावर दुसर्‍या गुलाबाचे कलम करायला योग्य.
आता उन्हाळा आहे ना, सहज गुलकंद करता येईल. (दुसर्‍या प्रकारातल्या फुलांचा)
एका पसरट भांड्यात पाकळ्या आणि साखर टाकत जायचे आणि भांडे, दादरा बांधून उन्हात ठेवायचे. जेवढ्या पाकळ्या तेवढीच वजनी साखर.

दिनेशदा मी एकदा केला होता गुलकंद पण साखरे ऐवजी खडी साखर टाकून. दुसर्‍या प्रकारच्या फुलांचा करू ना नक्की.

मानवाला अत्याधुनिक
साधने वापरुनही पावसाचा अचूक अंदाज करणे अजून जमलेले नाही. पण निसर्गात
काही जीवांना ते जमते.
>>>> अगदी अगदी. लहानपणी घराच्या आजूबाजूला शेतवडी होती. त्यामुळे कुंपणावर चढलेले सरडे दिसायचे. यांची डोकी लाल दिसायला लागली की आई म्हणायची आता पाऊस येणार. घरात मुंग्यांची लगबगही सुरू व्हायची.

आताच्या माझ्या घरात पावसाची वेगळी लक्षणं दिसतात. एकतर वळीवाचा पाऊस पूर्वेकडून धूळ आणि प्रचंड वार्‍यासमवेत संध्याकाळच्या सुमारास येताना दिसतो. मग मान्सुन सुरू होतो तेव्हा त्याचं सगळं हत्तीदळ अरबी समुद्रावरून कूच करून येताना दिसतं. आणि पश्चिमेकडून महाप्रचंड वारा सुरू होतो. या वार्‍यामुळे माझ्याकडे एक येडचाप प्रॉब्लेम निर्माण होतो. लेकीच्या बेडरूमच्या खिडकीला तळाशी एक छिद्र आहे त्यातून कितका मोठ्ठा आवाज यायला लागतो की बस्स. आणि तो घरभर घुमतो. पहिल्यांदा असा आवाज ऐकून आम्ही पाच मिनिटं त्याचा सोर्स शोधत फिरत होतो. आता तिथे कापड खुपसून ठेवातो. Happy

दिनेशदा - त्या गुलकंदात इतर गोष्टी केव्हा घालतात ? त्यापेक्षा सगळी कृतीच द्याल का पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत - ज्याला कोणाला शक्य आहे तो करुन बघेल....... (तुमच्याशिवाय अजून योग्य व जाणकार व्यक्ति तरी कोण असणार - हे सगळं सांगायला....)

एवढीच कृती शशांक. पुण्यातल्या सध्याच्या उष्ण कोरड्या हवेत चांगला होईल तो.
औषधांपैकी प्रवाळ टाकतात. पण ते शेवटी.

मध्यंतरी भर दुपारी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानात निसर्गाचा एक अदभुत सोहळा बघायला मिळाला. वावटळ. अगदी माझ्या डोळ्यादेखत अगदी छोटिशी सुरूवात झाली आणि बघता बघता त्या वावटळीनं एक बर्‍यापैकी मजबूत रूप धारण केलं. मैदानात वेडीवाकडी वळणं घेत ती अगदी माझ्या गाडीशेजारून मागे जाऊन रस्त्याच्या मधोमध विसर्जन पावली. मुंबईत हा असा प्रसंग बघायला मिळणं हे माझं भाग्यच. त्यावेळी टिपलेली ही क्षणंचित्र :

v1.jpgv2.jpgv3.jpgv4.jpgv5.jpgv6.jpg

Pages