निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीकांत, कविता मस्त!
शकुन, काय सह्ही फुलं आहेत! सुंदर आलेत फोटो. त्या डॅफोडिल्स मधला एक फोटो म्हणजे त्यांचा फॅमिली फोटो वाटतोय! Happy

हं... झालंय खरं असं. दुपारी हवा इतकी स्तब्ध असते ना, की पंखा लावला तरी त्याच्या परिघातच काय तो वारा जाणवतो, जरा वीतभर लांब बसलेल्या व्यक्तीला वारा लागतच नाही.

<< स्चच्छ करकरीत उबदार सुर्यप्रकाश, त्या पार्श्वभुमीवर निमुळती छते असलेली, पांढ-या निळ्या हिरव्या पिवळ्या रंगात रंगवलेली एकसारखी घरे, घरांच्या खिडक्यांना टांगलेल्या कुंड्या आणि त्या कुंड्यांमधुन फुलेच फुले. घराच्या भिंतींवर बांधलेले फ्लॉवरबेड आणि त्यातुन डोकावणारी फुलेच फुले..>> अगदी अगदी... फार सुंदर दृष्य असतं हे.. मुळात म्हणजे प्रदुषण फार कमी. त्यामुळे जे काही दिसतं ते स्वच्छं दिसतं Happy
न चुकता मनात विचार येतोच की आपल्याकड्चं प्रदूषण कधी कमी होणार..आणि त्यासाठी आपण स्वतः काय करु शकतो..

फोटोंचं कौतुक करून हुरुप वाढवल्याबद्दल सगळ्यांन्न धन्यावाद !! ह्या धाग्यामुळे घराबाहेर पडलं की डोळे उघडे ठेउन निरिक्षण करायची चांगली सवय लागलीय. खूप काही शिकायला पण मिळतय.

<<<फोटोंचं कौतुक करून हुरुप वाढवल्याबद्दल सगळ्यांन्न धन्यावाद !! ह्या धाग्यामुळे घराबाहेर पडलं की डोळे उघडे ठेउन निरिक्षण करायची चांगली सवय लागलीय. खूप काही शिकायला पण मिळतय.>>>
शकून १००% अनुमोदन !

आता भाज्यांची पाळी...
नॉरिच (Norwich, Uk) शहरातल्या एका मोठ्ठ्या दुकानात (supermarket) पाहिलेल्या भाज्या. तुमच्यापैकी काहींनी पाहिल्या सुद्धा असतील ह्यातल्या काही. पण मी पहिल्यांदा च पाहिल्या.

तसं यु.के. मधे जास्त काही पिकत नाहीच. शिवाय देशोदेशीचे लोक इथे रहात असल्यनी बर्याच देशातल्या भाज्या, फळं विकायला असतात इथे. प्रत्येक भाजीचं नाव, किंमत, उपयोग, आणि उगम (देश) लिहून ठेवलय. अत्यंत आकर्षक मांडणी आणि interesting माहिती. खूप वेळ जातो ह्या भाजीपाल्याच्या सेक्शन मधे.

१. पालेभाज्यांचा विभाग. आपले भाजीवाले जसं पाणी शिंपडून ठेवतात भाज्या, तसं इथे एका पाईप मधून बाष्प फवारलं जातय. what an idea sir ji ना अगदी Lol . palebhajya.jpg

२. मोदका सारख्या पाकळ्या असलेले टोमॅटो.
modal_tomato.jpg

३. बटाटे : हळकुंडा सारखे लंबुळके,
batate_lambulke.jpg

गुलाबी - पिंक पोटेटो ( पिशव्यांमधे आहेत )
batate_gulabi.jpg

आणि काळे पण Happy - पर्पल पोटेटो अस लिहिलं होतं पण चक्कं काळे दिसत होते.
batate_kale.jpg

हिरवे मुळे Happy
mule_hirawe.jpg

काळे मुळे ( एखाद्या कंदा सारखे दिसतायत, पण दुकानात रॅडिश च लिहिलं होतं). घरी आणून किसून पहायल हवे होते की आपल्या मुळ्यांसारखे मुळे आहेत की वेगळं काही आहे.
mule_kale.jpg

elephant garlic (हे मी दिलेलं नाव नाही. दुकानात लिहिलं होतं).. ही लसूण ची एक पाकळी आहे. ढब्बू ढोल लसूण पाकळी Happy
motha_lasoon.jpg

शकुन, भाज्या म्हणजे माझा आवडीचा विषय.
भारताच्या हवामानात या सगळ्या व्हायला हव्यात. बटाट्यातले पण एकदोनच प्रकार होतात, आपल्याकडे.

माझ्या सुदैवाने केनयात भरपूर प्रकारच्या आणि उत्तम प्रतीच्या भाज्या मिळतात.
नायजेरियात मात्र फारसा वाव नसायचा निवडीला.

मित्रानो माझ्या कडच्या ओव्याच्या (पानांची भजी करतात त्या) झाडाला बारीक तुरे आले आहेत बहुतेक फुलं येत असतील. मी पहिल्यांदीच पहातोय. फोटो टाकीनच.

सुप्रभात.

बापरे केवढ्या पोस्ट झाल्या ! वर वर वाचल्या. सगळ्यांचे फोटो अप्रतिम आहेत.

जो_एस, ओव्याच्या पानांची भजी फार मस्त होतात. एकदम खमंग चव येते. बनवले की आम्हाला विसरू नकोस. Happy नाहीतर तुझ पोट दुखेल अन आणखी ओवा खावा लगेल. Lol

नव्या वर्षाच्या शुभेच्छा ! सर्वच फोटो अप्रतिम ! Poem Search Engine ची लिन्क सेव्ह करुन ठेवली. मस्तच आहे. कालच `कैलाशपती`' चे झाड पाहिले (नक्षत्रउद्यानात, CDSS च्या समोरच्या लेन मधले) . काय सुरेख दिसतं !

त्यांनी काय वर्णन केलेय ?
मला कुंती, गायत्री, रुक्मीणी यांची झाडे माहित आहेत.
कळलावी (ग्लोरिया सुपर्बा) ला गौरीचे हात म्हणतात.

कोणाकडे कुसुंबीचा फोटो आहे का? असल्यास टाका प्लीज.

दिनेशनी वर लिहिलेले वाचल्यापासून 'कहो कुसुंबी साडी रंगावा, कहो तो भगवा भेस...चाला वाही देस' काही मनातून जायला तयार नाहीये.

माधव, मी आताच आठवण काढत होतो, कारण मालिनी राजुरकर यांचा, माधो मुकुंद मुरारी, हा टप्पा ऐकत होतो esnip वर आहे. त्यांच्या बर्‍याच रचना आहेत तिथे.

जागू, ऐनाची पालवी माहिती आहे ना. तशीच लालभडक (नाही ती छटा वेगळीच) पालवी असते. झाड मोठे आणि पानेही मोठी. राणीच्या बागेत आहे, एक झाड.

शकुन, मस्त फोटो - ते काळे मुळे बहुदा Horse radish आहे - आत हिरवं असतं ते - आणि फेसलेल्या मोहोरी सारखं झणझणित डोक्यात जातं खाल्ल्यावर - जपानी 'सुशी' बरोबर देतात त्याची चटणी.

तुझ्या फुलांच्या फोटो पैकी Magnolia माझं लाडकं - त्याची स्टार Magnolia ह्या जातीला भन्नाट सुवास असतो - आमच्या गल्लीत हे फुललं की मी भयंकर खुष असते Happy

आता जिप्स्या कुसुंब दाखवायच काम तुझ. पहिला राणीच्या बागेत जा आणि कुसुंबाचा फोटो काढून टाक इथे.

३ Phalaenopsis ऑर्किड
४ Cymbidium ऑर्किड आहे
५ डेलिया आहे

मस्त फोटो एकदम

Pages