चारोळी स्पर्धा...मसाला मार के...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 March, 2012 - 01:25

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!

Box 18 x 18 inch.jpg

'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे 'मसालेदार' चारोळ्या रचण्याची!

ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हांला चारोळ्या रचण्यासाठी एखादं छायाचित्र, किंवा एखादा विषय देऊ.
तुम्ही झक्कास चारोळ्या रचायच्या, आणि इथे लिहायच्या..

स्पर्धेचे नियमही खूप सोपे..

१. दिलेल्या छायाचित्रावर किंवा विषयावर तुम्ही चारोळी रचायची आहे.

२. चारोळी अर्थातच मराठीत असावी.

३. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक चारोळ्या स्पर्धेसाठी इथे लिहू शकतो.

४. तुमच्या प्रवेशिका तुम्ही त्या त्या स्पर्धेच्या धाग्यावर टाकायच्या आहेत. कृपया स्वतंत्र धागा सुरू करू नये.

५. चारोळ्या तुम्ही स्वतः रचलेल्याच असाव्यात. इतरत्र टाकलेल्या, पूर्वप्रकाशित, आक्षेपार्ह मजकूर असलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. शिवाय त्या लगेच अप्रकाशित केल्या जातील.

६. प्रत्येक स्पर्धेसाठी एक विजेता निवडला जाईल.

७. बक्षीस हे कल्पकता, चारोळीची रचना तसेच चारोळीतून पदार्थ आणि त्यातील मसाले यांची कशी सांगड घातली आहे, ह्यावर अवलंबून असेल.

६. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहतील मायबोलीचे मा. वेबमास्तर आणि मा. प्रशासक. Happy

***

चारोळ्या रचण्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं छायाचित्र...

misal.JPG

या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..

एखाद्या पदार्थाचं छायाचित्र, दुरून येणारा मसाल्याचा वास जसा भूक वाढवतो, तसंच हे मिसळीचं छायाचित्र पाहून चारोळया रचण्यासाठी सज्ज व्हा... !

***

मिसळीचं छायाचित्र मिनोती यांच्या सौजन्याने, © मिनोती.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ ९० गिर्‍हाईकं?? अरे बापरे! अजून लोकं यायला हवीत... अजून मिसळ भरपूर शिल्लक आहे. Wink

लोकहो, नवा चटपटीत पदार्थ लवकरच सादर होणार आहे, तोपर्यंत मिसळीची मजा लुटत रहा. अश्याच बहारदार चारोळ्या करत रहा. Happy

मटकी, बटाटा आणि तळण्यासाठी तेल.
फरसाण नसेल, तर तुमची मिसळ फेल!
कांदा, टोमॅटो, आणि गरम मसाला,
खोबरं-कोथिंबीर चिरून, वरनं भुरभुरायला.

धनेजिरे पूड, लाल मिरचीचं तिखट,
शिजवून घेऊन बनवा, मिसळीचा 'कट'
लसणाच्या पाकळ्या, आणि थोडसं 'आलं',
'आमसूल' मिळालं, तर 'बेष्ट' काम झालं.

वाटण करून घ्या, घ्या नाहीतर फिरवून,
मटकी-बटाटे धुवा आणि टाका शिजवून.
एकीकडे बनेल, मटकीची उसळ,
वरून कट घातला, की झाली की हो 'मिसळ'!

:आवरा: Proud

- धन्यवाद : - http://chakali.blogspot.in/2008/01/kolhapuri-misal.html

काय तुम्ही घालता गरम मसाला?
मिसळीसाठी वापरा कांदा लसूण मसाला
चिवड्यासारखं घ्याल वरून भुरभुरवून खोबरं
लक्षात ठेवा, मग तुमचं नाही काही खरं Proud

दुसर्‍याच्या डोळ्यातलं शोधू नये कुसळ
स्वत:च्या डोळ्यातलं पहावं मुसळ
आपापले मसाले नी आपापली उसळ
लक्ष देऊन खा आपल्या प्लेटीतली मिसळ!

हसू नका हाहा करून
उत्तर द्या ना चारोळीतून
तिखट अन् धनेजिरे पूड शिजवता कसली?
फोडणीतच घाला नाहीतर मिसळ फसली

Biggrin

Happy

मिसळ नसते कधी एकट्याने खायची,
जुनी सवय शाळेतली, वाटणावाटणी करायची.
गरम किंवा कांल, कसाही असो मसाला,
आपलं लक्ष चवीकडं, सग्ळं चालतंय आपल्याला Wink

तिसरं महायुध्द मिसळीवरून पेटणार तर! .... चालू द्या, चालू द्या. Proud

............. आणि मी शंभराव्वं गिर्‍हाईक! यिप्पीSSSSSS

मिसळ म्हणेल :

चव माझी तिकटजाळ
रंग माझा येगळा....
कांदा-लिंबू-गाटीसंगट
स्वादच माझा आगळा! Happy

साहित्याचं खमंग फरसाण, कंपुंची उसळ
प्रतिसादाची झणझणीत ओतली तर्री
ड्यु आयड्यांनी पिळला लिंबु खट्टा
माबो मिसळीचा करा आता चट्टामट्टा

आर्ये, मांमी Rofl

विकांत स्पेशल मसालेदार पदार्थाची वाट बघतोय Happy

गटगची तारीख ठरवून टाक रे <<<<<<<<< १ एप्रिल Happy

फोटो पाहून तोंडाला सुटलं पाणी
खा खा खाल्लीस मिसळ
पैसे मागितल्यावर खिसा उलटा
चुपचाप ताटल्या विसळ

मित्रांनो, आपल्या खमंग आणि उत्स्फुर्त प्रतिसादांबद्दल आभार!

चारोळ्यांसाठी पुढचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू. Happy

<< चारोळ्यांसाठी पुढचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू.
>> तोपर्यंत बसा शब्द घोळवत आणि जिभल्या चाटत, असं का ? Wink

चारोळ्यांसाठी पुढचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू..>>>>>>>>>>

पण या चारोळ्यांच्या स्पर्धेचा विजेता कुठे घोषित केलाय? Uhoh

<< मिसळीच्या ठेसनातनं गाडी कधी फुडं जानार??????? >> मुंबैकराना प्रॉब्लेम नाय; त्यान संवय आहे, 'मेगॅब्लॉक'ची अन ठप्प गाडीत लोंबकळत उभं रहायची !! Wink

Pages