पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे 'मसालेदार' चारोळ्या रचण्याची!
ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हांला चारोळ्या रचण्यासाठी एखादं छायाचित्र, किंवा एखादा विषय देऊ.
तुम्ही झक्कास चारोळ्या रचायच्या, आणि इथे लिहायच्या..
स्पर्धेचे नियमही खूप सोपे..
१. दिलेल्या छायाचित्रावर किंवा विषयावर तुम्ही चारोळी रचायची आहे.
२. चारोळी अर्थातच मराठीत असावी.
३. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक चारोळ्या स्पर्धेसाठी इथे लिहू शकतो.
४. तुमच्या प्रवेशिका तुम्ही त्या त्या स्पर्धेच्या धाग्यावर टाकायच्या आहेत. कृपया स्वतंत्र धागा सुरू करू नये.
५. चारोळ्या तुम्ही स्वतः रचलेल्याच असाव्यात. इतरत्र टाकलेल्या, पूर्वप्रकाशित, आक्षेपार्ह मजकूर असलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. शिवाय त्या लगेच अप्रकाशित केल्या जातील.
६. प्रत्येक स्पर्धेसाठी एक विजेता निवडला जाईल.
७. बक्षीस हे कल्पकता, चारोळीची रचना तसेच चारोळीतून पदार्थ आणि त्यातील मसाले यांची कशी सांगड घातली आहे, ह्यावर अवलंबून असेल.
६. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहतील मायबोलीचे मा. वेबमास्तर आणि मा. प्रशासक.
चारोळ्या रचण्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं छायाचित्र...
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
एखाद्या पदार्थाचं छायाचित्र, दुरून येणारा मसाल्याचा वास जसा भूक वाढवतो, तसंच हे मिसळीचं छायाचित्र पाहून चारोळया रचण्यासाठी सज्ज व्हा... !
मिसळीचं छायाचित्र मिनोती यांच्या सौजन्याने, © मिनोती.
केवळ ९० गिर्हाईकं?? अरे
केवळ ९० गिर्हाईकं?? अरे बापरे! अजून लोकं यायला हवीत... अजून मिसळ भरपूर शिल्लक आहे.
लोकहो, नवा चटपटीत पदार्थ लवकरच सादर होणार आहे, तोपर्यंत मिसळीची मजा लुटत रहा. अश्याच बहारदार चारोळ्या करत रहा.
मटकी, बटाटा आणि तळण्यासाठी
मटकी, बटाटा आणि तळण्यासाठी तेल.
फरसाण नसेल, तर तुमची मिसळ फेल!
कांदा, टोमॅटो, आणि गरम मसाला,
खोबरं-कोथिंबीर चिरून, वरनं भुरभुरायला.
धनेजिरे पूड, लाल मिरचीचं तिखट,
शिजवून घेऊन बनवा, मिसळीचा 'कट'
लसणाच्या पाकळ्या, आणि थोडसं 'आलं',
'आमसूल' मिळालं, तर 'बेष्ट' काम झालं.
वाटण करून घ्या, घ्या नाहीतर फिरवून,
मटकी-बटाटे धुवा आणि टाका शिजवून.
एकीकडे बनेल, मटकीची उसळ,
वरून कट घातला, की झाली की हो 'मिसळ'!
:आवरा:
- धन्यवाद : - http://chakali.blogspot.in/2008/01/kolhapuri-misal.html
काय तुम्ही घालता गरम
काय तुम्ही घालता गरम मसाला?
मिसळीसाठी वापरा कांदा लसूण मसाला
चिवड्यासारखं घ्याल वरून भुरभुरवून खोबरं
लक्षात ठेवा, मग तुमचं नाही काही खरं
(No subject)
दुसर्याच्या डोळ्यातलं शोधू
दुसर्याच्या डोळ्यातलं शोधू नये कुसळ
स्वत:च्या डोळ्यातलं पहावं मुसळ
आपापले मसाले नी आपापली उसळ
लक्ष देऊन खा आपल्या प्लेटीतली मिसळ!
मामी :हह्गलो:
मामी :हह्गलो:
हसू नका हाहा करून उत्तर द्या
हसू नका हाहा करून
उत्तर द्या ना चारोळीतून
तिखट अन् धनेजिरे पूड शिजवता कसली?
फोडणीतच घाला नाहीतर मिसळ फसली
मिसळ नसते कधी एकट्याने
मिसळ नसते कधी एकट्याने खायची,
जुनी सवय शाळेतली, वाटणावाटणी करायची.
गरम किंवा कांल, कसाही असो मसाला,
आपलं लक्ष चवीकडं, सग्ळं चालतंय आपल्याला
लाल शालूतली नववधू ही सजली पहा
लाल शालूतली नववधू ही सजली
पहा दिसते कशी साजिरी...
लिंबलोण तुम्ही उतरून घ्या....
घाला शेव-कांदा अन कोथिंबीरी!
तिसरं महायुध्द मिसळीवरून
तिसरं महायुध्द मिसळीवरून पेटणार तर! .... चालू द्या, चालू द्या.
............. आणि मी शंभराव्वं गिर्हाईक! यिप्पीSSSSSS
आत्ता नाही वेळ, नंतर देतो
आत्ता नाही वेळ,
नंतर देतो उत्तर
आई हाणेल लाथ!
जर, गेलो नाही लवकर....
बाय्बाय....
मिसळ म्हणेल : चव माझी
मिसळ म्हणेल :
चव माझी तिकटजाळ
रंग माझा येगळा....
कांदा-लिंबू-गाटीसंगट
स्वादच माझा आगळा!
साहित्याचं खमंग फरसाण,
साहित्याचं खमंग फरसाण, कंपुंची उसळ
प्रतिसादाची झणझणीत ओतली तर्री
ड्यु आयड्यांनी पिळला लिंबु खट्टा
माबो मिसळीचा करा आता चट्टामट्टा
आर्ये, मस्त ग.
आर्ये, मस्त ग.
अरे बाप रे अजुन मिसळच
अरे बाप रे
अजुन मिसळच चरताय्त व्हय.....
मामी...
सगळेच
सगळेच
मस्तच सगळे
मस्तच सगळे
आर्ये, मांमी विकांत स्पेशल
आर्ये, मांमी
विकांत स्पेशल मसालेदार पदार्थाची वाट बघतोय
गटगची तारीख ठरवून टाक रे <<<<<<<<< १ एप्रिल
फोटो पाहून तोंडाला सुटलं
फोटो पाहून तोंडाला सुटलं पाणी
खा खा खाल्लीस मिसळ
पैसे मागितल्यावर खिसा उलटा
चुपचाप ताटल्या विसळ
अश्वे, ......
अश्वे, ......
केश्वे,लै भारी
केश्वे,लै भारी
अक्के
अक्के
पाच दिवसापुर्वीची मिसळ आज
पाच दिवसापुर्वीची मिसळ आज झाली शिळि!
म्हणुन आता आमची आळिमिळि गुपचिळि!!
मित्रांनो, आपल्या खमंग आणि
मित्रांनो, आपल्या खमंग आणि उत्स्फुर्त प्रतिसादांबद्दल आभार!
चारोळ्यांसाठी पुढचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू.
<< चारोळ्यांसाठी पुढचा विषय
<< चारोळ्यांसाठी पुढचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू.
>> तोपर्यंत बसा शब्द घोळवत आणि जिभल्या चाटत, असं का ?
चारोळ्यांसाठी पुढचा विषय
चारोळ्यांसाठी पुढचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू..>>>>>>>>>>
पण या चारोळ्यांच्या स्पर्धेचा विजेता कुठे घोषित केलाय?
मंजिरी+१
मंजिरी+१
मिसळीच्या ठेसनातनं गाडी कधी
मिसळीच्या ठेसनातनं गाडी कधी फुडं जानार???????
<< मिसळीच्या ठेसनातनं गाडी
<< मिसळीच्या ठेसनातनं गाडी कधी फुडं जानार??????? >> मुंबैकराना प्रॉब्लेम नाय; त्यान संवय आहे, 'मेगॅब्लॉक'ची अन ठप्प गाडीत लोंबकळत उभं रहायची !!
भाऊ, पण इथे गाडी सायडिंगला
भाऊ, पण इथे गाडी सायडिंगला टाकल्याचा सौंशेव येतोय.
Pages