चारोळी स्पर्धा...मसाला मार के...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 March, 2012 - 01:25

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!

Box 18 x 18 inch.jpg

'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे 'मसालेदार' चारोळ्या रचण्याची!

ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हांला चारोळ्या रचण्यासाठी एखादं छायाचित्र, किंवा एखादा विषय देऊ.
तुम्ही झक्कास चारोळ्या रचायच्या, आणि इथे लिहायच्या..

स्पर्धेचे नियमही खूप सोपे..

१. दिलेल्या छायाचित्रावर किंवा विषयावर तुम्ही चारोळी रचायची आहे.

२. चारोळी अर्थातच मराठीत असावी.

३. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक चारोळ्या स्पर्धेसाठी इथे लिहू शकतो.

४. तुमच्या प्रवेशिका तुम्ही त्या त्या स्पर्धेच्या धाग्यावर टाकायच्या आहेत. कृपया स्वतंत्र धागा सुरू करू नये.

५. चारोळ्या तुम्ही स्वतः रचलेल्याच असाव्यात. इतरत्र टाकलेल्या, पूर्वप्रकाशित, आक्षेपार्ह मजकूर असलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. शिवाय त्या लगेच अप्रकाशित केल्या जातील.

६. प्रत्येक स्पर्धेसाठी एक विजेता निवडला जाईल.

७. बक्षीस हे कल्पकता, चारोळीची रचना तसेच चारोळीतून पदार्थ आणि त्यातील मसाले यांची कशी सांगड घातली आहे, ह्यावर अवलंबून असेल.

६. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहतील मायबोलीचे मा. वेबमास्तर आणि मा. प्रशासक. Happy

***

चारोळ्या रचण्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं छायाचित्र...

misal.JPG

या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..

एखाद्या पदार्थाचं छायाचित्र, दुरून येणारा मसाल्याचा वास जसा भूक वाढवतो, तसंच हे मिसळीचं छायाचित्र पाहून चारोळया रचण्यासाठी सज्ज व्हा... !

***

मिसळीचं छायाचित्र मिनोती यांच्या सौजन्याने, © मिनोती.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हापुरी मिसळ, तिला झणझणीत तडका
आणा रे खुर्ची, ए, चटकन मार की फडका
लालभडक तर्री, लिंबु, कोथिंबिर वर दोन पाव
दोन चमचे खातांनाच घाम फुटला की राव

सिनेमा मराठी अन चारोळ्या मराठी ,
स्पर्धेचे मात्र येथे हिंदितून नाव,
मिसळ धावून आली मसाल्यासाठी,
छायाचित्रातून झाला तडिपार पाव !

.

कालचा उरल्याला रस्सा उकळवला खदखदा
बंड्याला पिटाळले आणायला कोतमीर, लिंब नी कांदा,
शेजीबाईनं दिल्यालं मऊ फरसान घातलं वर
यान्ला दिली अशी मिसळ न आता मी खातुय ताजा करी-बैदा

म्हणायला काय सगळेच म्हणतात
घरच्या बायको पेक्षा शेजारीण बर्री...
खरच सांगतो माझ्यासाठी मात्र तू
झणझणीत मिसळीवरची रसदार तर्री...!

तिख्खटजाळ भुरका अन कानातून वाफा
पहिल्याच घासाला पाय झाडती लाफा
झणझणीत मसाला मग हा खावाच कशाला ?
एवढं नाय कळत, अहो डोकं थंड करायला !

Proud

कोल्हापूरी मिसळीचा,
नाद नाही करायचा,
गूळ खोबरं वांगं घालून
'इस्कॉट' नाही करायचा!

आंघोळ करून लवकर लवकर,
गाठा आधी 'उद्यम नगर',
झाला जरका जराबी उशर,
बंदच बघताल दुकानाचं शटर

तिखटा मसाल्याची आशी झंझनीत तर्री,
मिसळीचा विषय कट, तर्री लै भार्री!
सोडाच राव आता ती 'पोह्यांची' 'न्याहरी' ,
'कोल्हापूरी मिसळीची' बात हाय न्यारी!

ओ मिसळ्ळ नाही हो. मिस्सळ.
मि-ही-स-स-ह-ळ मिस्सळ!
ही पुन्यामुम्बईआस्ट्रोलियाची लोकं म्हंजे.... चला! धा वेळा लिवा Proud Light 1

उसळीवर शेव, शेवेवर चटणी
चटणी सोबत कोथिंबीर आणि लिंबाची फोड.....
चविष्ट मिसळ बनवणे एकदमच झाले सोप्पे
फक्त सोबत हवी प्रवीण मसाल्याचीच जोड.....
--------------------------------------------------
उसळ, शेव, लिंबू, कोथिंबीर अन चटणी
एवढे जिन्नस घातले पण काहीतरी आहे कमी
मसाला घाला टीचभर येईल बघा लज्जत
प्रवीण मसालेवाले देतात हमी.....
--------------------------------------------------
उसळीवर शेव, शेवेवर चटणी
चटणीवर कोथिंबीर आणि लिंबाची संगत
मिसळ झाली तयार पण ... धीर धरा थोडा
चटकदार मसाला घातल्याशिवाय येणार नाही रंगत

मामे, मामांचं काही खरं दिसत नाही!
>>>>> वत्सला ... नाय नाय गो. मी तेंची लै काळजी घेते. ह्ये आपलं असंच रटफट जुळवायला. Happy

या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं.. >>> माध्यम प्रायोजक , ह्या स्पर्धेत अख्ख्या महाराष्ट्रातील मायबोलीकर भाग घेणार असतील तर तिकिटं फक्त मुंबई किंवा पुण्यापुरतेच मर्यादीत का ?

मराठी माणसाची आवडती न्याहारी
प्रवीण मसाला वाढवी मिसळिची खुमारी
चवदार मिसळिला नाही गावाचे बंधन
कोल्हापुरी,पुणेरी आणा आता पटकन.

मिसळ मिसळ मी लय भारी, लाल तर्री, कट त्यावर
कांदा लसूण चटणी माह्यात, व्हते बघा मी चटकदार
पिवळं लिंबू फरसाण सोबत, कोथिंबीर कश्शी हिरवीगार
बगता काय हिकडं तिकडं, मारा आडवा हात मिसळीवर

आहा !! मामी,ऋयाम्,लाजो,कौतुक,... मस्त चटपटीत चारोळ्या..
लाजो Proud मला आजच कळ्ळं तुझ्यात एक चारोळीत्री(कवियत्री सार्खच गं Lol ) लप्लीये ती!!!!
नलिनी,प्राजक्ता,उमेश ..सह्हीये Happy

झण्झणीत कांदालसूण मसाल्याचा तवंग लय भारी
ते 'बेडेकर'च्या मिसळीची चव नाही बरं का बरी
'चोरगे' 'खासबाग' नि 'फडतरे' ची तर्रीच हो खरी
कोल्हापूरचा नाद करायचा नाही या बाबतीत तरी! Proud

बशीमध्ये दिसावा मस्त लालभडक तर्रीचा रंग
मटकीच्या उसळीत हवाच कोथिंबिरीचा तरंग
पहिल्याच घासात आठवावा मसाल्याचा फणका
उडवू एखाद्या रविवारी 'मिसळ गटग' चा दणका Proud

प्लेटमध्ये ठेवलिय लालजर्द मिसळ भरुन!
पेरलीय त्यावर हिरवीगार कोथींबीर वरुन!
शेजारी रसदार पिवळेधमक लिंबु !
नुसते बघत बसत आता कसे थांबु ?

कांदापोहे, शिरा, बटाटावडा!
ईडली, डोसा, मेदुवडा!
चि़जब्रेड, कटलेट, ब्रेड उसळ!
कुठे हे आणी कुठे......मिसळ!

चमचमीत कर म्हणून रावांचा आग्रह भारी,
इतक्या लवकर कशी होईल मिसळीची तयारी?
...मसाल्याने केला कट ,
तयार झाली कोल्हापुरी मिसळ झटपट.

(इदर्भातल्या) लोकांयले मालुम नाही मिसळीची भाजी,
फोटू पाहून इच्यारते, 'साजरं दिस्ते नं जी?'
'अबे, याच्यामंदी हाए मटक्या आनं करी'
'र्‍हाऊ दे बापा, सावजीची मटणतर्री बरी'

पुणेरी मिसळीची तर्‍हाच न्यारी!
दिसते लालभडक, पण गोडिला भारी!!
त्यावर सजवली कोथींबीर दोन पाने, लिंबु चतकर!
पाव फुकट कसे विचारता राव, आम्हि तर पुणेकर!!

फरसाण आली तळून, मटकी नटून शिजून
लाल काटाआडून बघतेय , डाळ डोळे भरून
ओवाळायला सर्वस्व, लिंबु बसलंय टपून
जराही न चिडून , कोथींबिर घेतेय चिरून .

Pages